हसीना पार्करच्या पतीचा गेम करणाऱ्याला पकडायला पोलिसांना 22 वर्षे लागली होती….
मुंबईत अंडरवर्ल्डची खरी सुरवात आणि गँगवॉरचं आगमन कधी झालं याचं उत्तर मिळतं ते जेजे हॉस्पिटलमध्ये झालेल्या गोळीबारातून आणि घडलेल्या हत्याकांडातून. पण याची ठिणगी ज्या माणसाने टाकली होती, ज्याच्यामुळे मुंबईत गँगवॉरला सुरवात झाली त्या माणसाला पकडायला मुंबई पोलिसांनी 22 वर्षे लागली होती त्याबद्दलचा आजचा किस्सा जाणून घेऊया.
मुंबई अंडरवर्ल्डला आणि गँगवॉरला तोंड फोडणारा गडी होता दयानंद पुजारी ऊर्फ सलीयन.
गँगस्टर दयानंद पुजारी उर्फ सलीयन हा सुरवातीच्या काळात एक साधा गुन्हेगार होता पुढे तो अरुण गवळीसाठी काम करू लागला. जेजे हॉस्पिटलमध्ये घडलेल्या गोळीबार कांडात दयानंद पुजारी उर्फ सलीयन हा सामील होता. दाऊद इब्राहिमचा दाजी असलेल्या हसीना पार्करच्या नवऱ्याला कायमचं गार करणारा गडी होता दयानंद पुजारी. ही घटना त्याकाळात मोठी मानली गेली होती. कारण अंडरवर्ल्डचा तेव्हा एक नियम होता की जी दुष्मनी आहे ती टोळ्यांमध्ये ठेवायची यात घरच्यांचा काहीही संबंध नसणार पण घडलं तिसरच, दयानंद पुजारीने थेट दाऊदच्या दाजीलाच गार केलं होतं.
हसीना पार्करच्या नवऱ्याला मारून दयानंद पुजारी उर्फ सलीयन जे काय गायब झाला तो करत कोणाला दिसलाच नव्हता. पण 1992 साली एका धाडीत तो पोलिसांना सापडला, अगोदर त्याला पोलिसांनी बेदम चोप दिला आणि जेलात डांबलं. पण 1996 साली दयानंद पूजारीला बेल मिळाली आणि तो बाहेर आला. बेल मिळाल्यावर तो डायरेक्ट फरार झाला. दयानंद पुजारीचा गेम करण्यासाठी दाऊदने त्याच्या मागावर आपले शूटर सोडलेले होते.
या सगळ्यांमधून आपला जीव वाचवण्यासाठी दयानंद पुजारी उर्फ सलीयन कुठं धाब्यावर काम कर, कुठं तिसऱ्याच जागेवर झोपी जा अशी कामं करू लागला. त्याला अटक होण्याच्या अगोदर झाशीमध्ये तो एका धाब्यावर काम करत होता.
फरार होण्याच्या अगोदर त्याने कुटुंबासोबत संपर्कच केलेला नव्हता. पण याच काळात पोलिसांना बातमी लागली की कांजूरमार्गे दयानंद पुजारी उर्फ सलीयन हा आपल्या घरच्यांना भेटायला त्याच्या घरी येत आहे. पोलिसांनी पद्धतशीर प्लॅन रचला आणि अलगद दयानंद पुजारी पोलिसांच्या जाळ्यात अडकला. पण पोलिसांना त्यासाठी 22 वर्षे काढावी लागली.
जेजे हत्याकांडाच्या प्रकरणातून फरार झालेला दयानंद पुजारी एका हॉटेलमध्ये कुक म्हणून सुद्धा काम करत होता. 22 वर्षांचा मोठा काळ एका गँगस्टरला पकडण्यासाठी लागला होता.
हे ही वाच भिडू :
- जेव्हा पोलिसांची धाड पडली आणि दाऊद अर्धी बिर्याणी टाकून जीव मुठीत घेऊन पळून गेला होता…
- ममता कुलकर्णीचा नवरा ड्रग्सच्या धंद्यात दाऊदचा देखील बाप होता
- बिचाऱ्या अशोक चव्हाणांना दाऊद समजून अमिताभ बच्चनला ट्रोल करण्यात आलेलं..
- एक असा गंड पत्रकार ज्याने दाऊदच्या हॉटेलवर ४.२८ कोटींची बोली जिंकली होती!