जुहीचे वडील सुद्धा IRS होते, पोरीला सलमानशी लग्न करू दिलं नव्हतं

बॉलिवूडचा दबंग सलमान खान याचं अनेक अभिनेत्रींसोबत अफेअर होतं किंबहुना त्याच्या लग्नाच्या देखील चर्चा होत्या.  कितीही चर्चा होऊ द्यात पण आजही सलमान सिंगलच आहे. ५४ वर्षीय सलमानवर आजही मुली तितक्याच मरतात.

भूतकाळात ऐश्वर्या राय बच्चन, कतरिना कैफ, भाग्यश्री, जरीन खान यांच्यासह अनेक अभिनेत्रींशी जोडले गेले आहे आणि यादी मोठी आहे. त्यामुळे त्याचे लग्न हा बऱ्याच दिवसांपासून चर्चेचा विषय आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही!

पण यातच एक नाव असंही आहे ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती असेल. आम्ही बोलतोय ती त्या काळातील सुंदर आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री जुही चावला, जिच्याशी सलमान खान लग्न करू इच्छित होता. आणि तशी मागणी करायला देखील तो जुहीच्या घरी गेला होता. 

ITMB शोजला दिलेल्या थ्रोबॅक मुलाखतीत, दबंग अभिनेत्याने जुहीचे वर्णन करतांना “ती खूप क्युट आहे. गोंडस मुलगी आहे”. 

एका जुन्या मुलाखतीत सुद्धा सलमान खानने अभिनेत्री जुही चावला आपली आयुष्यभराची जोडीदार म्हणून पसंत होती असा खुलासा केला होता. आणि लग्नाची रीतसर मागणी घालण्यासाठी सलमान जुही चावलाच्या घरी गेल्याचा खुलासा देखील केला होता.

जेंव्हा सलमानने जुहीच्या घरी जाऊन सांगितले की, त्याला जुहीसोबत लग्न करायचे आहे, तेव्हा हे ऐकून जुहीच्या वडिलांनी त्याच्या या लग्नाच्या प्रस्तावाला नकार दिला होता. पण सलमानला त्याच्या लग्नाचा प्रस्ताव नाकारण्याचे कारण समजलंच नाही. जुहीच्या वडिलांनी मला का नकार दिला हे मला माहीत नाही पण कदाचित मी त्यांच्या मते मी जुहीसाठी योग्य जोडीदार नव्हतो म्हणून त्यांनी नकार दिला असावा असं सलमानने सांगितले होते.

जेंव्हा माध्यमांनी त्याला विचारले कि, जुहीच्या वडिलांनी या लग्नासाठी होकार का दिला नसेल तेंव्हा  सलमान मिश्किलपणे उत्तर दिलं कि, “पता नहीं क्या चाहिये था. कदाचित मी त्यांच्या अपेक्षेप्रमाणे असणारा जावई नव्हतो”.

 १९९५ मध्ये जुहीने उद्योगपती जय मेहताशी लग्न केले आणि त्यांना दोन मुले देखील आहेत.

जुही चावलाचे वैयक्तिक आयुष्यही अनेकदा चर्चेत राहिले आहे. जुहीला वादांपासून दूर राहणे आवडत असले तरी तिच्या लग्नाच्या गॉसिपिंगमुळे वातावरण तापले होते.

कृपया सांगा की जुही चावला पती जय मेहताची दुसरी पत्नी आहे. जय मेहता यांनी सुजाता बिर्ला यांच्याशी पहिले लग्न केले. १९९० मध्ये बेंगळुरू येथे विमान अपघातात सुजाता बिर्ला यांचे निधन झाले. या अपघातानंतर जुहीच्या आईनेही जगाचा निरोप घेतला. अशा परिस्थितीत दोघेही पूर्णपणे एकटे पडले होते आणि या काळात दोघेही एकमेकांचे आधार बनले होते. यानंतर जुही आणि जय यांच्यात जवळीक वाढू लागली. दोघांनी १९९५ मध्ये गुपचूप लग्न केले.

असो सलमान त्याच्या बॅचलरहुडचा आनंद घेत होता आणि इकडे जुहीने लग्न केले होते.

श्चर्याची गोष्ट म्हणजे सलमान खान आणि जुही चावला यांनी आजपर्यंत एकही चित्रपट एकत्र केला नाही. दोघांच्या फॅन्सला हि जोडी मोठ्या पडद्यावर एकत्र दिसलीच नाही.

यावरही सलमाननेच असं सांगितलं कि, जुहीने सांगितले होते कि, तिला सलमानसोबत काम करायचे नाही. जुहीच्या वडिलांनी सलमानसोबत काम करण्यास नकार दिल्याच्या बातम्या आल्या होत्या. दिवाना मस्ताना चित्रपटातील एका दृश्यासाठी सलमान आणि जुही एकत्र दिसले असले तरी. या सीनमध्ये दोघेही कोर्ट मॅरेज करत होते ज्यात अनिल कपूर हा त्यांच्यासोबत उभा असलेला दाखवला आहे.. बस्स एवढेच काय ते दोघे एकत्र दिसले त्यानंतर नाहीच.  

सलमान आणि जुहीने एकत्र फक्त एकच चित्रपट केला असला तरी, दोघेही खऱ्या आयुष्यात एकमेकांबद्दल आदराने बोलतात.

हे हि वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.