१७ वर ५ आउट असताना कपिल देव मैदानात आला आणि वर्ल्डकपचं स्वप्न पूर्ण झालं.

भारताचा महान बॅटसमन सुनील गावस्कर याला एकदा एका मुलाखतीमध्ये त्याने पाहिलेली वर्ल्डकप मधली सर्वोत्तम बॅटिंग कोणती विचारण्यात आलं होतं तेव्हा त्याने एका क्षणात उत्तर दिल,

“कपिल देवने १९८३च्या वर्ल्ड कप वेळी काढलेल्या १७५ धावा. “

त्या वर्ल्डकपला भारताला कोणीही विजयाचा दावेदार समजले जात नव्हते. भारताने या पूर्वी झालेल्या दोन वर्ल्डकप मध्ये मिळून फक्त एकच मॅच जिंकली होती ती सुद्धा इस्ट आफ्रिकेविरुद्ध जी टीम पूर्वी कधीही क्रिकेट खेळत नव्हती आणि यानंतरही परत कधी दिसली नाही.

१९८३च्या विश्वकपपूर्वी क्रिकेट समालोचक, तज्ञ मंडळी, माजी खेळाडू तर सोडाच भारतामधले क्रिकेट फॅन्स,खुद्द खेळाडूनादेखील आपण वर्ल्ड कप जिंकू शकतो यावर विश्वास नव्हता. त्यांनी वर्ल्डकप हरल्यावर कुठे सुट्टीला जायचं याच नियोजन करून विमानाची तिकिटे देखील बुक केली होती.

फक्त एकच खेळाडू होता ज्याला विश्वास होता आपणही जिंकू शकतो, त्याच नाव कपिल देव

या चोवीस वर्षाच्या खेळाडूकडे नुकतीच देशाच्या कप्तानीची जबाबदारी देण्यात आली होती. टीममधले बरेचसे खेळाडू त्याला सिनियर होते. जेव्हा कपिल त्यांना आपण जिंकण्यासाठी खेळू हे समजावून सांगायचा तेव्हा ते त्याला खुळ्यात काढायचे. त्याकाळात आपल्याला कसोटी खेळायची तेही अनिर्णयीत ठेवायची सवय होती. वनडे गेम नेमका काय असतो याचा अजूनही अंदाज आला नव्हता.

वर्ल्डकप सुरु झाला, पहिल्याच सामन्यामध्ये भारताने वेस्टइंडीजला हरवले. तेव्हा अनेकांना धक्का बसला. बऱ्याच जणांना वाटलं की चुकून जिंकले असतील. पणया विजयामुळे भारतीय खेळाडूना स्वतःबद्दलचा आत्मविश्वास वाढला.

भारताच्या ग्रुपमध्ये वेस्ट इंडीज बरोबर ऑस्ट्रेलिया आणि झिम्बाब्वे या दोन टीम होत्या. या तिन्ही टीम खूप बलाढ्य होत्या. झिम्बाब्वे देखील तेव्हा फॉर्ममध्ये होती. त्यांची बॉलिंग अटक भल्याभल्या बॅट्समननां जड जात होती. भारताला सेमीफायनल मध्ये जायचं असेल तर त्यांना हरवणे गरजेचे होते.

१९ जून १९८३. टेंटब्रिजवेल्स इंग्लंड

कपिल देवने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करयचा निर्णय घेतला. पण त्या दिवशी काय झालं काय माहित पण आपला सर्वोत्तम फलंदाज गावस्कर पहिल्याच ओव्हरला झिरोवर आउट झाला. दुसरा सलामीवीर के.श्रीकांतने गावस्कर आउट झाल्यावरआपल्या आक्रमकतेला थोडा मुर्द घालून विकेट टिकवून खेळायचा प्रयत्न केला. पण तो बराच वेळ शांत राहणे शक्य नव्हते. तीन ओव्हर झाल्या तरी एकही रनन क्ध्लेल्या श्रीकांतच्या संयमाचा अंत अखेर अंत झाला. त्याने पुढचाचं बॉल उचलून मारायचा प्रयत्न केला पण त्या नादात बाउन्ड्री लाईनला कच देऊन विकेट गमावून बसला.

त्या पाठोपाठ संदीपपाटील, मोहिंदर अमरनाथ, यशपाल शर्मा हे हजेरी लावून आउट झाले. भारताची अवस्था १७ धावांवर पाच बाद अशी झाली होती. सगळे स्पेशालीस्ट बॅट्समन आउट झाले होते. तीस चाळीस धावांमध्ये भारताला गुंडाळता येईल असा अंदाज झिम्बाब्वेच्या कर्णधाराला वाटू लागला.

पण कपिल देव अजूनही मैदानात होता.

कपिल काही स्पेशालीस्ट बॅट्समन नव्हता. तो गरजेच्या वेळी रनरेट वाढवण्यासाठी फटकेबाजी करण्यास फेमस होता. रॉजर बिन्नी पुढचा बॅट्समन होता. त्याला बरच टेन्शन आलं होत. आता सगळ्या देशभरच लक्ष त्यांच्याकडे होतं. कपिल ने रॉजर बिन्नीला आल्या आल्या सांगितले,

“अभी मॅच के ५४ ओव्हर बाकी है. कुछ भी हो जाये आज मै आउट नही होणे वाला. “

आणि झालही तसच. कपिलने सुरवातीपासून बचावात्मक खेळायला सुरवात केली. तो एक रन आणि दोन रन काढून स्ट्राईक चेंज करत राह्यची असा त्यांचा प्लान होता. रॉजर बिन्नी देखील त्याला व्यवस्थित साथ देत होता. दोघांची पार्टनरशिप चांगली झाली. पण ७७ धावा स्कोरबोर्डवर असताना बिन्नी आउट झाला.  त्याच्या पाठोपाठ रवी शास्त्री सुद्धा १ रन काढून पॅव्हेलीयन मध्ये परतला.

तोवर कपिलने एकही चौकार मारला नव्हता. त्यानंतर आला मदनलाल. कपिलला लक्षात आले आता फक्त बॉलर उरले आहेत. त्यांच्यावर भरोसा ठेवण्यात अर्थ नाही. त्याने आता रनरेट वाढवायला सुरवात केली. मदनलाल एका साईडला विकेट टिकवून उभा राहिला .

भारताच्या १४० धावा झाल्या होत्या तेव्हा मदनलाल देखील आउट झाला. त्यानंतर मैदानात उतरला सय्यद किरमाणी . तो नववा खेळाडू होता त्याच्या बॅटला बॉल लागला तरी नशीब अशी कंडीशन होती. पण त्याने आल्या आल्या कपिलला सांगितले,

“तू अपना नॅचरल गेम खेल. मै हुं तेरे साथ. “

कपिल ऐंशीवर खेळत होता. अजूनही कपिलने एकही उंच फटका मारला नव्हता. किरमाणीच्या त्या शब्दाने त्याला आत्मविश्वास आला. त्याने सेन्चुरी पूर्ण केली. भारताची ही वनडे क्रिकेटमधली पहिली सेंच्युरी होती. शतक पूर्ण झाल्यावर कपिलने आपली बॅट बदलली.

नवीन बॅट मिळाल्यावर मात्र त्याने चौकार आणि षटकारांची बरसात सुरु केली. त्या दिवशीचा कपिलचा खेळ अभूतपूर्व होता. भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर कोणीच अशी बॅटीग आता पर्यंत केली नव्हती. जी भारतीय टीम ५० धावा तरी बनवेल का शंका वाटत होती त्यांनी २६७ धावांचे टार्गेट झिम्बाब्वेला दिले. त्यातल्या १७५ धावा एकट्या कपिलने बनवल्या. इतर सगळ्या खेळाडूंनी मिळून शंभर देखील रन काढल्या नव्हत्या.

प्रत्युत्तर द्यायला उतरलेल्या झिम्बाब्वेला हे प्रचंड टार्गेट झेपले नाही. भारताने हा सामना अविश्वसनीयरित्या जिंकला. कपिल या सामन्याचा मॅन ऑफ दी मॅच होता. विव्हियन रिचर्ड सारखे अनेक स्फोटक फलंदाज देखील कपिलच्या त्या इनिंगला जगातली सर्वात भारी वर्ल्ड कप इनिंग म्हणतात. 

याच सामन्यानंतर भारताचा वनडे खेळायचा अप्रोच बदलला. १७५ धावा तेव्हा एकटा खेळाडू काढू शकतो, एका सामन्यात सहा सहा सिक्स मारू शकतो हीच तेव्हा आश्चर्याची गोष्ट होती. तो एक वर्ल्ड रेकॉर्ड होता. म्हणूनच गावस्कर म्हणतो अशी इनिंग त्याने पूर्ण आयुष्यात कधीही बघितली नाही.

या मॅच वेळी फक्त एकच वाईट घटना झाली ती म्हणजे या सामन्याच कसला तरी संप असल्यामुळे टीव्हीवर टेलिकास्ट करण्यात आलं नव्हत. करोडो भारतीय फॅन्स हा सामना पाहण्यापासून मुकले. एवढच नाही तर या सामन्याच शुटींगही झाले नसल्यामुळे आजही कोणाला ती मॅच बघता येत नाही. पुढे कपिलला जेव्हा या सामन्याचं शुटींग झालं नसल्याबद्दल वाईट वाटते का या बद्दल विचारण्यात आले तेव्हा त्याने एक खूप सुंदर असे उत्तर दिले,

“अच्छा हुआ उस मॅच का शुटींग नही हुआ. तब मॅच का रेकोर्डिंग हो जाता तो आज  वो हमारे यादोमे जिंदा है वो नही होता.”

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.