कृष्णा नदीमुळे आंध्र आणि तेलंगणा मध्ये देखील वाद पेटलाय

आपल्या देशाचे सरन्यायाधीश एन व्ही रमना यांनी २ ऑगस्ट रोजी सांगितले की, ते आंध्र प्रदेश आणि तेलंगणा दरम्यानचा कृष्णा नदीच्या पाणी वाटपाच्या वादाच्या प्रकरणाची कोणत्याही बाजूने सुनावणी होणार नाही.

सीजेआय रमना यांनी स्पष्ट सांगितले आहे कि, या वादामध्ये एकच पर्याय आहे तो म्हणजे, दोन्ही राज्य सरकारने यामध्ये मध्यस्थी करावी आणि उपाय काढावा असं त्यांना सांगण्यात आलं आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ४ ऑगस्ट रोजी होणार आहे.

सीजेआय रमना यांनी असंही सूचित केले की, ते या प्रकरणातून स्वत: ला मागे घेतलं आहे कारण ते या प्रकरणाची सुनावणी करू इच्छित नाही कारण ते दोन्ही राज्यांचा आहे. जर हे प्रकरण मध्यस्थीने सुटत असेल तर ठीक नाही तर मी हि केस दुसऱ्या बेंचला ट्रान्स्फर करेल, असंही ते म्हणाले. 

कृष्णा नदीच्या वादाने आता आणखी एक वळण घेतले, याधीही महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आंध्र प्रदेशला संयुक्तपणे विरोध करण्यास सहमती दर्शविली होती, रिपरियन राज्यांमधील पाणी वितरणावरील कृष्णा जल विवाद न्यायाधिकरणाच्या २०१० च्या आदेशावर फेरविचार करावा असा मुद्दा २०१९ मध्ये देखील मांडला होता.

आत्ता चालू असलेला तेलंगाना आणि आंध्रप्रदेश वाद काय आहे? 

आंध्र प्रदेशने तेलंगणावर असा आरोप केला होता कि, कृष्णा नदीच्या पाण्याचा तेलंगणा राज्य वीज निर्मिती करण्यासाठी आवश्यकते पेक्षा जास्त पाण्याचा वापर करत आहे. आंध्रचे म्हणणे आहे की हे हा अति वापर २०१५ मध्ये झालेल्या कराराच्या विरोधात आहे. तेलंगणा आंध्र प्रदेशपासून विभक्त झाल्यानंतर एक वर्षानंतर हा करार करण्यात आला होता.

आंध्र प्रदेशने सर्वोच्च न्यायालयाकडे याचिका दाखल करत अशी मागणी केली आहे की, केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाला श्रीशैलम, नागार्जुन सागर आणि पुलिचंतला धरणांवर नियंत्रण ठेवण्याचे निर्देश द्यावेत. आंध्र म्हणाले की ही सर्व धरणे दोन्ही राज्यांमध्ये समान आहेत. तेलंगणातील या धरणांमधून पाणी काढून घेतल्यामुळे त्यांच्या भागातील सिंचनाला मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचाही राज्याचा आरोप आहे.

आंध्र प्रदेश आणि तेलंगणाचे विभाजन झाल्यापासून कृष्णा व्यतिरिक्त गोदावरी नदीच्या बाबतीत देखील त्यांच्यात पाण्याच्या वाटणीवरून दोन्ही राज्यांमध्ये तणाव आहे.

एकूण कृष्णा नदी वाद नेमका काय आहे ?

कृष्णा ही पूर्वेला वाहणारी नदी आहे जी महाराष्ट्रातील महाबळेश्वर येथे उगम पावते आणि बंगालच्या उपसागरात विलीन होऊन महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातून वाहते. त्याच्या उपनद्यांसह, हे एक विशाल खोरे बनवते जे चार राज्यांच्या एकूण क्षेत्राला ३३% व्यापते.

कृष्णा महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांतून वाहते. प्रत्येक राज्यात कृष्णेच्या पाण्याचा वापर किती प्रमाणात व्हावा, याबद्दल तिन्ही राज्यांत वाद आहेत. १९६९ साली यासाठी न्या. बच्छबत यांच्या अध्यक्षतेखाली एक लवाद नेमण्यात आला होता. त्याचा निकाल डिसेंबर १९७३ मध्ये लागून आंध्रला सु. २३ घ. मी. पाणी, कर्नाटकाला सु. २० घ. मी. पाणी व महाराष्ट्राला सु. १६ घ. मी. पाणी वापरण्याचा हक्क मिळाला होता.

प्रत्येक राज्यात अनेक लहानमोठे प्रकल्प हाती घेऊन ते पुरे करण्याचे प्रयत्न सुरुवातीपासूनच चालू आहेत. महाराष्ट्रातील कोयना प्रकल्प, कर्नाटकमधील तुंगभद्रा प्रकल्प व आंध्र प्रदेशातील नागार्जुनसागर प्रकल्प हे विशेष मोठे प्रकल्प आहेत.

कृष्णेचा मार्ग काय आहे ?

कृष्णा नदी ही दक्षिण भारतातील गोदावरी आणि कावेरी या नद्यांच्या दरम्यान असलेली प्रमुख नदी. तिचा उगम सह्याद्रीच्या रांगेतील धोम महाबळेश्वरामधून होतो. येथून पश्चिमेस अरबी समुद्र फक्त सु. ६५ किमी. इतका दूर आहे. महाबळेश्वर डोंगराच्या उत्तरेकडून खाली येऊन कृष्णा आग्नेय व पूर्व दिशांनी वाहू लागते.

वाई खोऱ्यातून कृष्णा वाईच्या आग्नेयीस ३७ किमी. वर असलेल्या माहुलीस येते. येथून कृष्णा दक्षिणवाहिनी होते. माहुलीपासून कराड येथे कृष्णा आणि कोयना यांचा प्रीतिसंगम आहे. तिथून  महाबळेश्वरहून पश्चिमेस उतरून मग दक्षिणेकडे वाहत पश्चिमेकडे जाते आणि कराडपासून मग  सांगलीजवळ पोहचते, तिथे कृष्णेला पश्चिमेकडून वारणा व पूर्वेकडून येरळा ह्या नद्या मिळतात.

त्यानंतर कोल्हापूर आणि नंतर कासारी, कुंभी, तुळशी, भोगावती व सरस्वती यांमिळून पंचगंगा झाली आहे. यानंतर कृष्णेला दूधगंगा नदी मिळते व ती कर्नाटकाच्या हद्दीत शिरते.

महाराष्ट्राच्या सातारा व सांगली जिल्ह्यांतून कृष्णा सु. ३०० किमी. वाहते. तिचे पात्र विशेषतः रहिमतपूर पर्यंत खोल व खडकाळ असले, तरी तिचे ३०–३५ किमी. रुंदीचे खोरे अत्यंत सुपीक काळ्या मातीचे आहे.

कर्नाटक राज्याच्या बेळगाव जिल्ह्यातून कृष्णा पूर्वेकडे वाहत कर्नाटक पठारावरून विजापूर जिल्ह्यात येते. आंध्र व कर्नाटक यांच्या सीमेवर आंध्र प्रदेशाचा महबूबनगर व कर्नाटकचे गुलबर्गा व रायचूर जिल्हे एकत्र येतात. त्यानंतर पुढे आंध्र प्रदेशाची राजधानी हैदराबादवरून दक्षिणेकडे वाहते.

हे हि वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.