डेन्मार्कवरून आलेल्या दोघा मित्रांनी भारताचा अभिमान असलेली कंपनी बनवली : एल अँड टी

एल अँड टी हि कंपनी औद्योगिक क्षेत्रात किती मोठी आहे याची बऱ्याच लोकांना कल्पना नसेल. नावावरून हि कंपनी फॉरेनची वाटते पण हि कंपनी आपली देशी आहे आणि भारतातली टॉप मोठ्या कंपन्यांमध्ये तिचं नाव घेतलं जातं. दिल्लीतील फेमस लोटस टेम्पल, दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट, मुंबई एअरपोर्ट, आयसीसीआय बिल्डिंग आणि जगातला सगळ्यात मोठा पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटी हे सगळं एल अँड टी ने बनवलेलं आहे.

एल अँड टी ने भारताच्या औद्योगिक क्षेत्रात मोठं योगदान दिलेलं आहे. तर जाणून घेऊया हे फॉरेन नाव असलेली कंपनी भारतीय कस काय झाली. एल अँड टी कंपनीकडे सुरवातीला एक रुम होती तीही अगदी छोटी ज्यात फक्त एक माणूस आणि थोडंफार फर्निचर बसु शकले इतकी. पण आज घडीला ५५ एकरपेक्षा जास्त जमीन एल अँड टी कडे आहे कि ज्यात बरच काही करता येऊ शकतं. 

१९३८ पासून एल अँड टीची गोष्ट सुरु होते. जेव्हा दुसऱ्या विश्वयुद्धाच्या घोषणा केल्या जात होत्या. तेव्हा दोन डॅनिश इंजिनिअर जे एकमेकांचे चांगले मित्र होते, एकाच वर्गात शिकायचे आणि कायम सोबत असायचे. त्यांनी आपलं भविष्य भारतात बघितलं होतं. ते होते हेनिन होल्क लार्सन आणि सोरेन क्रिस्टिअन टोब्रो.

हेनिन होल्क लार्सन आणि सोरेन क्रिस्टिअन टोब्रो हे भारतात यासाठी आले होते कि ते आपल्या देशातील डेअरी मशीन भारतात विक्री करू शकेल. हे त्यांचं काम यशस्वीही झालं मात्र १९३९ साली दुसरे महायुद्ध सुरु झालं आणि ब्रिटिशांनी बाहेर येणाऱ्या सगळ्या गोष्टींवर बंदी लादली. यामुळे लार्सन आणि टोब्रो यांचं डेअरी इक्विपमेंट विकण्याचं काम बंद झालं. ते हे डेअरी इक्विपमेंट डेन्मार्कवरून मागवायचे आणि विकायचे.

सोरेन क्रिस्टिअन टोब्रो सांगतो, त्या काळात मी एकदा गांधीजींचे एक वाक्य वाचलं होतं , भारतीयांचा लढा स्वातंत्र्यासाठी आहे, गोऱ्या व्यक्तींशी नाही. त्यांच्या त्या वाक्यामुळे मला भारतात बिझनेस करण्याचा कॉन्फिडन्स आला.

महायुद्धामुळे त्यांचा बिझनेस थांबला होता पण याच महायुद्धाने त्यांना दुसरी संधी दिली. वर्ल्ड वॉरमध्ये जहाजांचासुद्धा वापर झाला होता. यामुळे लार्सन आणि टोब्रो यांनी शिप रिपेअरिंगचा व्यवसाय सुरु केला. हा व्यवसाय त्यांना आर्थिकरित्या स्थिरावून गेला. १९४० साली एल अँड टी वर कृपा झाली तेव्हा जेव्हा त्यांनी इन्स्टॉलेशन फिल्डमध्ये आपलं नशीब आजमावलं. 

यामधून कंपनीला मोठा प्रोजेक्ट मिळाला तो म्हणजे टाटा कडून. टाटा तेव्हा भारतातली सगळ्यात मोठी कंपनी होती. टाटाला सोडा ऍश स्टॅन्ड बनवायचं होतं तेव्हा त्यांनी हा प्रोजेक्ट एल अँड टीला देऊ केला. अगोदर हा प्रोजेक्ट एका जर्मन इंजिनिअरला देण्यात आला होता पण त्याने विश्व युद्धाच्या भीतीने त्याने हे काम सोडल कारण वर्ल्ड वॉरमध्ये जर्मन हरले होते.

एल अँड टी ने हा प्रोजेक्ट सुवर्णसंधी समजून पदरात पाडून घेतला आणि वेळेच्या अगोदरच हा प्रोजेक्ट पूर्ण केला तेही उत्कृष्ट गुणवत्तेसहित. यामुळे भारतात या कंपनीचा उदो उदो होऊ लागला. एल अँड टी ने तेव्हाच हवा केली होती कि ते भारतातली सगळ्यात मोठी कंपनी बनू शकते. एल अँड टी चं काम बघून परदेशातल्या कंपन्या त्यांच्यासोबत काम करण्यासाठी निवेदनं पाठवू लागल्या.

पुढे एल अँड टी ने ऑइल, बिस्कीट आणि ग्लास बनवू लागली. यासोबतच एल अँड टी ने ट्रॅक्टर आणि रोडरोलर, पोकलँड बनवायला देखील सुरवात केली. १९४८ साली मुंबईच्या पवईमध्ये ५५ एकर जमीन खरेदी केली आणि आपला प्लांट सुरु केला. यामुळे भारतातल्या अनेक लोकांना रोजगार मिळाला. १९५० साली एल अँड टी पब्लिक कंपनी बनली तेव्हा हजारो कोटींचा टर्नओव्हर त्यांचा होता.

पुढे लार्सन आणि टोब्रो यांनी एकापाठोपाठ रिटायरमेंट घेतली. आज घडीला एल अँड टीचे सूत्र ए.एम. नायर आहेत. कंपनीप्रती त्यांचं असलेलं डेडिकेशन बघून त्यांना महत्वाची पदे देण्यात आली होती. करोडोंची उलाढाल आणि हजारो लोकांना नोकरी देण्याचं काम आज एल अँड टी करते. 

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.