‘लेडी बोस’ने प्रयत्न केले म्हणून महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला

­तुम्हाला जर कुणी हा प्रश्न विचारलाच, स्त्रियांच्या सर्वांगीण विकासाचा मापदंड कोणता ? अर्थातच स्त्रियांचा आर्थिक, सामाजिक आणि राजकीय विकास. हे उत्तर बोलायला जितकं सोपं जातं तितकंच गंभीर आहे.

असो तर इतर गोष्टींबद्दल खोलात न जाता आपण थेट मुद्द्यालाच सुरुवात करूया तो म्हणजे स्त्रियांचा मतदानाचा अधिकार ! 

भारतात महिलांचा राजकारणातला सहभाग आणि त्यांचा मतदानाचा टक्का दोन्ही गोष्टी तितक्याही सकारात्मक नाहीयेत. राहिला मुद्दा मतदारसंघातील महिलांच्या राखीव जागांचा तर त्याच वास्तवही लपलेलं नाहीये.

राखीव जागा लागल्या की त्याठिकाणी आपल्या बायकोला निवडून आणून स्वत: कारभार हाकणाऱ्यांची संख्या कमी नाहीए तरीही याच राखीव जागांमुळे महिला राजकारणात येवू शकतात हे देखील तितकच खर आहे. आज राजकारणात महिलांना थोडेफार चांगले महत्व आले आहे…कशामुळे ? मतदानाचा अधिकारामुळे आणि त्यांनी घेतलेल्या राजकीय क्षेत्रातील पुढाकारामुळे. 

पण एक काळ असाही होता जेंव्हा भारतात महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता…

पण महिलांना मतदानाचा हा अधिकार मिळाला तो अबला बोस यांच्यामुळे..

अबला बोस यांचा जन्म ८ ऑगस्ट १८६५ चा. त्यांच्या वडिलांच नाव दुर्गामोहनदास. दुर्गामोहन हे ब्राम्हो समाजाचे नेते होते. तर अबला बोस यांच्या आई या विधवा पुर्नविवाह, विधवांचे पुर्नवसन या समाजकार्यात सक्रीय होत्या. अबला दहा वर्षाच्या असतांनाच त्यांची आई वारली. पण महिलांच्यासाठी काहीतरी चांगलं करण्याचं बाळकडू त्यांना लहानपणीच मिळालं होतं..

त्यांचे बालपणच महिलांना शिक्षणाचा अधिकार, उच्चशिक्षण अशा विचारात गेलं होतं. अबला देखील प्राथमिक शिक्षण घेवून बेथ्थून कॉलेजात गेल्या. तिथे मेडिकल क्षेत्रातलं शिक्षण घेवून पुढे मद्रास विश्वविद्यालयात गेल्या.

यानंतर वयाच्या २३ व्या वर्षी त्यांचं लग्न जगदीश चंद्र बोस यांच्याशी झालं. जगदीश चंद्र बोस यांना रेडिओ सायन्स चे जनक म्हणूनही ओळखलं जातं. ते आपल्या यशाचे श्रेय आपल्या प्रेरणास्रोत असणाऱ्या पत्नीला देतात.त्यानंतर त्यांना लेडी बोस हि उपाधी दिली गेली. 
पण याही पेक्षा पुढं जाऊन पाहणं देखील गरजेचं आहे की,   भारतीय समाजात त्यांचं योगदान अमूल्य आहे. 
शिक्षण क्षेत्रातील त्यांचे अमूल्य कार्य…
 
त्यांनी केलेल्या कार्यांत भर पडली ती म्हणजे त्यांच्या विदेश वाऱ्यांची. पती जगदीश बोस हे अनेकदा विदेश वाऱ्यांवर असायचे. त्यानिमित्ताने लेडी बोस देखील विदेशात त्यांच्या सोबत जायच्या. परदेशात त्यांनी महिलांची सामाजिक आणि राजकीय स्थिती बघितली. या देशातील स्त्रिया किती प्रगत आहेत, अशीच परिस्थिती भारतातही असावी असं त्यांना मनोमन वाटलं आणि त्याच विचारात त्या भारतात परतल्या. 
 
भारतात परतल्या  बरोबर त्या कामाला लागल्या. भारतातील महिलांचं आयुष्य सुधारण्याचा त्यांनी चंगच बांधला होता. १९१० च्या सालात त्या ब्राम्हो बालिका विद्यालयाच्या त्या सचिव बनल्या. २६ वर्षे बोस त्या पदावर कार्यरत राहिल्या. यासाठी त्यांच्या कार्यात त्यांना गुरुदेव रविंद्रनाथ टागोर, भगिनी निवेदिता आणि विद्यासागर यांची मदत मिळाली. या सर्वांच्या प्रयत्नाने भारतात स्त्री शिक्षणाच्या चळवळीला दिशा मिळाली. अबला बोस यांनी त्यांच्या कार्य काळात एकूण ८८ प्राथमिक शाळा, १४ प्रौढ वर्ग केंद्रे सुरु केली. १९९० मध्ये त्यांनी स्त्री शिक्षण समितीची स्थापना केली.  या समितीच्या स्थापनेचा उद्देशच मुले, मुली आणि महिलांना शिक्षित करणे हा होता. देशातील महिलांना मताधिकार मिळवून देण्यातही त्यांनी उल्लेखनीय भूमिका बजावली. 
त्यांच्या प्रयत्नांमुळे महिलांना मताधिकार मिळाला
जेंव्हा भारतात महिलांच्या मताधिकाराची चर्चा झाली आणि त्या चर्चेत अबला बोस आल्या. त्यांनी या चर्चेला चर्चेपुरतंच मर्यादित न ठेवता मताधिकाराला प्रत्यक्षात आणण्याची तयारी सुरु केली.
१९१७ मध्ये माँटेग्यू-चेम्सफोर्ड सुधारणांच्या वाटाघाटींच्या संदर्भात मॉन्टॅगू दौऱ्यावर होते. त्या दरम्यान एडविन मोंटागू यांना एक शिष्टमंडळ भेटायला गेलं त्या मंडळाच्या बोस या सदस्य होत्या, त्यांच्या शिवाय सरोजिनी नायडू, मार्गारेट बहिणी, डोरोथी जिनराजदासा, रमाबाई रानडे या देखील शिष्टमंडळाच्या भाग होत्या.  

त्यानंतर १९२१ मध्ये बॉम्बे आणि मद्रासमध्ये महिलांना पहिल्यांदा मतदानाचा अधिकार मिळाला…आणि महिलांना मताधिकार देणारे हे पहिले प्रांत ठरले.

त्याचवेळी अबला बोस यांनी महिलांच्या हक्कांसाठी लढा लावून धरला. आणि त्याचे फलित म्हणजे १९२५ पर्यंत बंगालच्या महिलांनाही मतदानाचा अधिकार मिळाला आणि १९२६ मध्ये संपूर्ण देशातील महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला.

स्वातंत्र्यानंतर भारतातील महिला शिक्षित, स्वावलंबी आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हावेत यासाठी अबला यांनी केलेले प्रयत्न आणि त्यांच्या कल्पना स्वातंत्र्यानंतर सरकारी धोरणांचा अविभाज्य भाग बनल्या.

अबला बोस कायमच म्हणत की स्त्री एखाद्याची पत्नी आणि सून होण्याएवढी मर्यादित नसून स्त्रियांना दिलं जाणारं शिक्षण महत्वाचं आहे. समाजामध्ये ज्या स्त्रिया कायमच दुय्यम दर्जावर जगत आल्या, त्या स्त्रियांसाठी झटणाऱ्या एक अग्रणी म्हणून अबला बोस यांना मानलं जातं.

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.