शंभर बायका एकत्र आल्या आणि सगळ्या राज्यात नशामुक्तीचा पॅटर्न उभा राहिला

घरगुती हिंसाचाराला बळी पडणाऱ्या गावातील महिलांची संख्या वाढत चालली होती. काही पुरुषांनी पैशांसाठी आपल्या बायकोला विकल्याची घटना समोर आल्या होता. या सगळ्या गोष्टी थांबविणे गरजेचे होते. यासाठी काही तरी करता येईल का म्हणून गावातील महिला प्रयत्न करत होत्या. 

त्यांना एक सामाजिक कार्यकर्ता बद्दल माहिती कळाली होती. त्यांनी भेट घेऊन आपली समस्या सांगितली. त्यावेळी तुम्ही एकत्र येऊन कशा प्रकारे काम करायला हे त्यांनी सांगितले होते. 

२००६ मध्ये याच शमशाद बेगम यांनी बालोद जिल्ह्यातल्या गावातील घरगुती हिंसाचाराचा सामना कराव्या लागणाऱ्या १०० महिलांना सोबत घेऊन महिला कमांडो ब्रिग्रेडची स्थापना केली. यात काही अशा महिला होत्या ज्यांच्या नवऱ्याने त्यांना पैशाच्या बदल्यात विकले होते. 

महिला कमांडो ब्रिगेडची स्थापना गावाला नशामुक्त आणि स्वच्छ ठेवण्यासाठी करण्यात आली होती. छत्तीसगड मधील १४ जिल्ह्यांमध्ये ही संघटना काम करत आहे. सध्याच्या घडीला एकट्या बालोद जिल्ह्यात ३०० ग्रामपंचायत मधील १५ हजार पेक्षा अधिक महिला कमांडो ब्रिग्रेड मध्ये सक्रिय आहेत.

याची मूळ संकल्पना पद्मश्री सन्मानित करण्यात आलेल्या शमशाद बेगम यांनी मांडली होती. शमशाद बेगम ने छत्तीसगड मधील मागास वर्गीयांसाठी मोठ्या प्रमाणात काम केलं आहे.  

ज्या वेळी महिला अशा प्रकारची ब्रिगेड तयार करत होत्या. यावेळी गावातील काही लोकांनी त्यांना विरोध केला होता. महिला कमांडो ब्रिगेड स्थापन करून कुठल्या आतंकवादी, नक्षलवाद्यांसाठी लढणार आहात असा प्रश्न उपस्थित केला होते. 

त्यावेळी या महिला कमांडोनी दिलेले उत्तर फार महत्वाचे होते. त्यांचे म्हणणे होते की,  युद्ध फक्त सीमेवर लढले जात नाही आणि दुष्मन हे लांबचेच असतात असंही नाही.  कधी-कधी आपल्या जवळच्या लोकांसोबत लढा द्यावा लागतो. तो सामाजिक लढा असतो.  

या लढ्याचा उद्देश शत्रूला संपविण्याचा नसतो.  तर त्याची विचारसणी बदलणे हा असतो. ज्यामुळे संपूर्ण समाज बदलता जाईल. अशी महिला कमांडो ब्रिग्रेड स्थापन करण्यामागची संकल्पना असल्याचे सांगितलं जात.   

 या महिला दारू बंदी, हुंडा बळी, घरगुती हिंसा सारख्या गोष्टी थांबविण्यासाठी काम करतात. 

यांचा ड्रेस कोड ठरलेला आहे. महिला कमांडो ब्रिग्रेडचा ड्रेस कोड राणी कलरची साडी आणि डोक्यावर टोपी असा आहे.  या महिला १० ते १५ जणींची टीम करून गावात घडणाऱ्या घटनेवर लक्ष ठेवत असतात. गावातील रस्त्यावर गस्त घालतात. त्यावेळी कोणी दारू पिऊन फिरतांना दिसल्यास त्याचे दारूचे व्यसन सोडविण्याचा प्रयत्न करतात. 

बालोद जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक आरिफ शेख यांनी या महिला करत असलेलं काम पाहून त्यांना प्रोत्साहन दिलं होत. २०१६ मध्ये या महिलांना छत्तीसगड पोलिसांनी स्पेशल पोलीस कमांडोचा दर्जा दिला आहे. या महिला कोणत्याही लष्करी किंवा निमलष्करी दलाचा भाग नाहीत. 

हे काम करण्यासाठी महिलांना अनुदान अथवा पैसे मिळत नाही. जो त्रास आपल्याला भोगावा लागला तो मुलांना होऊ नये म्हणून त्यांनी हे काम हाती घेतलं आहे.

नशा मुक्तीसाठी सुरु झालेली ही महिला ब्रिगेड गरजवंताना मदत करत आहे. त्याच बरोबर बचत गट  स्थापन करण्यात आले आहेत. जे महिलांना रोजगाराच्या बाबतीत आत्मनिर्भर बनवत आहेत. यासाठी १०-१० महिलांचे ग्रुप एकत्र येत लहान-लहान गृह उद्योग सुरु केले आहेत.

ज्या गावात कोणाचीही भीती न बाळगता उघड्यावर दारू पिण्यात येत होती, पत्ते खेळले जात होते. या सगळ्या गोष्टींना महिला कमांडो ब्रिगेड स्थापन केल्याने बंद झाल्याचे सांगण्यात येत आहे. २००६ मध्ये जेव्हा महिला ब्रिगेड सुरुवात झाली तेव्हा अशा प्रकारे आणि इतके वर्ष काम करू शकतील याचा कोणी विचारही केला नव्हता. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.