पुण्याचा आर्किमिडीज ‘लक्ष्मण गोगावले’ : ज्यांनी पाय “π” ची अचूक किंमत सांगितली आहे.

नुकतीच उन्हाळ्याची सुट्टी संपून शाळा सुरु झाली होती. आठवीच्या वर्गावर गणिताच्या शिक्षकानीं आपल्या विद्यार्थ्यांना पूर्वज्ञान किती आहे हे तपासण्यासाठी फळ्यावर एक गुणाकाराचे गणित मांडले. सगळी मुले खाली मान घालून वहीत उदाहरण सोडवत होती. एक मुलगा काहीच न करता सरांकडे फक्त बघत होता. सरांनी विचारलं,

“बाळा तुला काहीच येत नाही काय?”

पण मुलाला उत्तर येत होत. त्याने गणिताचे उत्तर सांगितले.  त्यांनी विचारलं कुठे सोडवल? तो म्हणाला,”सर तोंडीच सोडवल.” सरांना आश्चर्य वाटलं.

एखाद्या वेळेस त्याला उत्तर पाठ असाव म्हणून  त्यांनी त्याला आणखी अवघड गुणाकार घातला, त्याचेही उत्तर एका क्षणात मिळालं. त्या मास्तरांचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसेना. त्यांनी त्या मुलाला गणित कसं सोडवल हे विचारलं. त्याला ते सांगता येत नव्हत पण उत्तर बरोबर येत होत.

बाकीच्या विद्यार्थ्यांनी सांगितलं सर हा गणिताचा जादुगार लक्ष्मण शंकर गोगावले.

लक्ष्मण गोगावले यांचा जन्म पुण्याच्या जवळच्या गोगलवाडी येथे एका माळकरी कुटुंबात झाला. लहानपणापासून त्याला गणिताची कोडी सोडवण्याचा नाद लागला. त्याकाळात रविवार सकाळ मध्ये शाम मराठे यांच गणिताबद्दलचे लिखाण, कोडी, जादूचा चौरस छापून येत असे. ते वाचायला तो आपल्या गणित शिक्षकांच्या घरी ५-६ किमी चालत जात असे.

त्याला गणित सोडून कोणत्याही विषयात गती नव्हती. कायम त्याच्या डोक्यात गणितातले आकडे फिरत असत. बेरीज, वजाबाक्या, गुणाकार-भागाकार, वर्गमूळ घनमूळ अशा संख्याशी खेळणे याचं त्याला वेड होत.

गणितातल्या समीकरणानी त्याचं आयुष्य व्यापलं होत मात्र शालेय अभ्यासक्रमातल्या गणिताशी कधीच त्याचे सूर जुळले नाहीत. दहावीला असताना चक्क तो आपल्या लाडक्या गणित विषयात नापास झाला. अंकगणिताचा हा बादशहा बीजगणित भूमितीशी जुळवून घेऊ शकत नव्हता.

त्याच्या टी.जी. जाधवर सरांना माहित होत रूढ शिक्षणपद्धती लक्ष्मणच्या टॅलेंटला न्याय देऊ शकणार नाही. त्यांनी त्याला पुण्याला पाठवलं. पु.ग.वैद्य सरांनी त्याला आपटे हायस्कूल मध्ये नोकरी दिली. शाळेचा व्हरांडा हेच त्याचे घर झाले. तिथे राहूनच गणिताच्या आकडेमोडीचे आश्चर्यजनक प्रयोग तो करत राहिला.

त्यांच्या गणिती कौशल्याबद्दल सांगायचं झालं तर ते जन्मतारखेवरून काही क्षणात जन्मवार सांगू शकतात. त्यांनी नवीन सिरीज शोधली आहे, ते जादूचे चौरस काही क्षणात बनवू शकतात. आकडेमोडीत त्यांनी कंप्युटर ला हरवले आहे.

त्यांचा दावा आहे की त्यांनी “पाय” π या संकल्पनेची अचूक किंमत शोधली आहे जे आत्ता पर्यंत सुपरकंम्प्यूटरला ही शक्य झाले नाही.

त्यांचे हे संशोधन IOSR Journal of Mathematics या सुप्रसिद्ध गणित विषयक मासिकात प्रकाशित झाले आहेत. आर्यभट्टापासून आर्किमिडीजपर्यंत अनेकांनी पायची किंमत शोधण्याचा प्रयत्न केला. या पायच्या किंमतीवर अजूनही वाद सुरूच आहेत.

लक्ष्मण गोगावले यांच्या मते पायची अचूक किंमत अवकाश संशोधनासाठी उपयोगी पडणारी आहे.

Exact value of pi = (17 – 8√3) = 3.143593539448981651780429267953021… 

गणिताचे फोर्मल शिक्षण त्यांचे झाले नाही, जे आहे ते त्यांनी एकलव्याप्रमाणे स्वतःचं स्वतः मिळवले आहे.

आज हजारो शाळा महाविद्यालयांमध्ये मुलांची गणिताविषयीची भीती मोडावी यासाठी त्यांची व्याख्याने आयोजित केली जातात. अंकगणित आकडेमोड जादू याबद्दल गणित शिक्षकांना, बँक कर्मचाऱ्याना प्रशिक्षण देण्यासाठी त्यांना बोलावले जाते. अनेक वर्तमानपत्रे टीव्ही चॅनलवर त्यांच्या मुलाखती प्रसिद्ध झाल्या आहेत.

बऱ्याच बँकांनी मानाची नोकरी त्यांना देऊ केली पण गणिताच्या संशोधनासाठी आयुष्य वाहिलेल्या लक्ष्मण गोगावले यांनी ती नाकारली.

विद्यार्थ्यांमध्ये गणिताची आवड निर्माण व्हावी यासाठी गणिताचे खेळ, गंमतीजंमती, शिक्षकांना शिकवण्याच्या सोप्या पद्धती, स्पर्धापरीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना झटक्यात गणिते सोडवण्यासाठी क्लुर्प्त्या यांची ओळख व्हावी म्हणून त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. यात ,”लक्ष्मणाची डायरी, गट्टी गणिताशी, स्पर्धापरीक्षा, मण्यांची जादू ” ही पुस्तके प्रसिद्ध आहेत.

आज गणिताला आपल्यातले अनेकजण रुक्ष वाळवंट समजतात. अशा वेळी या विषयातलं सौंदर्य सगळ्यांना समजावे यासाठी लक्ष्मण गोगावले या अवलियाची अखंड धडपड सुरूच आहे.  

तर भिडू लोग तुम्हालाही जर गणिताने तुमचं आयुष्य अवघड करून टाकलंय, तुमच्याही गणिताच्या काही शंका असतील, तुम्हालासुद्धा या जादूगाराप्रमाणे गणिताची जादू शिकायची आहे तर पुण्याच्या धनकवडी मध्ये जाऊन गोगावले सरांना नक्की भेटा.

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. ABC says

    Please refrain from publishing this kind of crap. It is not just stupid but wrong. He claims that pi = 17 – 8(3)^(1/2). This is WRONG!

Leave A Reply

Your email address will not be published.