ओ दिदी, राज्यपालांना ब्लॉक करू नका की!

आज की ताजा खबर ! पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यपाल जगदीप धनखड यांना ट्विटरवर ब्लॉक केलंय. हे असं ब्लॉका ब्लॉकीची प्रकरण निब्बा निब्बी मध्ये घडत असतात हे ऐकून होतो आम्ही. राव पण भारताच्या राजकारणात हे असं घडलेलं पहिलंच प्रकरण ओ.

काय प्रकरण आहे विस्ताराने बघू…

ममता बॅनर्जी आणि पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांच्यात बऱ्याच दिवसांपासून तणाव आहे. त्यातच आता ममता दीदींनी राज्यपालांना थेट ट्विटरवर ब्लॉकच केलं . राज्यपालांच्या ट्विट्समुळं वैतागून आपण हा निर्णय घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. याआधी ममता दीदींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आपण अनेकदा पत्र लिहून राज्यपालांना हटवण्याची मागणी केली होती, पण यावर अद्याप कार्यवाही झालेली नाही. असं स्पष्ट केलंय.

ममता दिदींच नक्की म्हणणं काय आहे ?

त्याच झालंय असं की राज्याचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना (डीजीपी) धमकावण्याचं काम करत होते असं ममता दीदी म्हणतायत. राज्यपाल धनखड ट्विट्सच्या माध्यमातून सरकारी अधिकाऱ्यांना अशा पद्धतीनं धमकावत होते की, जसे ते त्यांचे बिगारी कामगार आहेत.

आता यावर राज्यपाल गप्प बसतील असं होणारच नाही,

त्यांनी माँ कॅन्टिन आणि कोरोना महामारीच्या काळात केल्या गेलेल्या नियोजनात घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. महात्मा गांधींच्या पुण्यतिथीदिनीच राज्यपालांनी दिदींच्या सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हंटले की, राज्य सरकार बंगालमधील लोकशाहीला गॅसच चेंबर बनवलं आहे. या राज्यात लोकशाहीचा श्वास कोंडतो आहे. इथं कायद्याचं राज्य नव्हे तर राज्यकर्त्याचा कायदा आहे. इथलं राजकारण रक्तरंजित झालं असून संविधानाची रक्षा करणं माझं कर्तव्य आहे.

आता हा वाद आत्ताच झालंय असं तुम्हाला वाटत असेल, तर थांबा. हा वाद आत्ताच नाही तर बंगालमध्ये विधानसभा निवडणूक झाल्यानंतर तृणमूल फुललं तेव्हापासून सुरुय.

तर मे २०१२ मध्ये विधानसभा निवडणुकीदरम्यान हिंसाचार झालेल्या कुचबिहार जिल्ह्याचा दौरा राज्यपाल जगदीप धनखड यांनी आखल्यामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आक्षेप घेतला होता. त्यावेळी दीदी म्हंटल्या होत्या,

तुम्ही कुचबिहार दौरा एकतर्फी पद्धतीने आखल्याचे मला सोशल मिडीयावरून कळले. गेली कित्येक दशके अस्तित्वात असलेल्या शिष्टाचारांचा यामुळे भंग झाल्याचा मला खेद होतो. असे अचानक दौरे आखण्याचे निर्णय घेण्यापासून तुम्ही परावृत्त व्हावे.

त्यावर राज्यपाल म्हंटले,

घटनात्मक कर्तव्याचा एक भाग म्हणून मी राज्यातील हिंसाचारग्रस्त भागाचा दौरा करणार आहे. त्यासाठी व्यवस्था करण्याचा आदेश मी सरकारला दिला आहे. दुर्दैवाने त्यांचा प्रतिसाद फारसा सकारात्मक नाही. मी दौऱ्यासाठी स्वतः व्यवस्था करेन.

आणि या घटनेपासूनच दोघांमधून विस्तव जात नाही. तेव्हापासून जी भांडण सुरू आहेत जी आजपर्यंत सुरूच होती. शेवटी दिदींच्या मनात आलं की आज काय व्हायचं असेल ते होऊ दे. शेवटचा फैसला करू आणि करू ब्लॉक.

 

Leave A Reply

Your email address will not be published.