क्रिकेटमधली मंदिरा बेदीची ‘एक्स्ट्रा इनिंग’ अख्खा देश कौतुकाने बघायचा.

२००३ सालच क्रिकेट वर्ल्ड कप दक्षिण आफ्रिकेमध्ये होणार होत. दहावीच्या परीक्षाचा सिझन होता. आमच्या काही परीक्षा नव्हत्या. क्रिकेटचा सिझन आला कि आम्ही पण बटबॉल बडवायला मैदानांत उतरायचो. ज्यांच्या परीक्षा होत्या ती मुले घराच्या खिडकीतून बारीक तोंड करून आमच्या कडे बघायची. मॅच सुरु असली कि स्कोर किती झाला विचारयाची. आम्हाला त्याचं दुख्ख पाहवत नसे. पण करणार तरी काय?

क्रिकेटिंग फेव्हर त्याच्या पिक वर होते. ऑस्ट्रेलिया टीम फुल फॉर्म मध्ये होती, पाकिस्तान इंग्लंड च्या टीम सुद्धा जबरदस्त होत्या. नव्वदच्या दशकातल खेळल्या गेलेल्या क्लासिक क्रिकेटचा हळूहळू अंत होऊन  दोन हजार सालाच्या नंतर आलेली टेक्नोलॉजीवाल्या क्रिकेटची सुरवात होत होती. पब्लिक सुद्धा हा बदल हळूहळू पचवत होत.

भारतीय टीम सुद्धा बदललेली होती. जॉन राईटच्या रुपात पहिल्यांदाच भारताला परदेशी कोच मिळाला होता. गांगुलीच्या कप्तानीमध्ये भारताच्या टीममध्ये नवीन जोश भरला होता.

टीव्हीवरच्या जाहिराती मध्येसुद्धा फक्त आणि फक्त क्रिकेट होत. सचिन कार्ल हूपर आणि शेन वॉर्नची होनोलुलू वाली जाहिरात फेमस झाली होती. भारतात केबल टीव्ही वगैरे येऊन बरेच दिवस झाले होते. आता दूरदर्शन सुद्धा कालबाह्य होण्यास सुरवात झालेली. पहिल्यांदाच वर्ल्ड कप भारतात दूरदर्शन शिवाय सेट मक्सवरसुद्धा दाखवल जाणार होत.बरेचजन आता मॅच त्यावरच पाहत होते.

या वर्ल्डकप वेळी एक क्रांतिकारी घटना घडली. त्याचे नाव होते एक्स्ट्रा इनिंग.

क्रिकेट मध्ये सामना सुरु होण्यापूर्वी आणि सामना संपल्यावर तज्ञ आणि अनुभवी माजी क्रिकेटर्सच पनेल बसून कोण कुठे चुकल याची चर्चा करायचे. टिपिकल आफ्रिकन म्युजिकच्या आवाजात हा प्रोग्रम सुरु होत होता. यात विशेष काय अस तुम्ही म्हणाल. तर या एक्स्ट्रा इनिंगच वैशिष्ट्य म्हणजे या सेग्मेंटचे होस्ट होते चारू शर्मा आणि मंदिरा बेदी.

भारतात पहिल्यांदा एक पोरगी क्रिकेटशो ची अॅन्कर झाली होती. 

जर बॉयज स्कूलमध्ये एखादी मुलगी शिरली तर काय होईल तसच भरतीय क्रिकेट प्रेमीना मंदिरा बेदीला क्रिकेटवर चर्चा करताना बघून झालं. त्याकाळात गैरसमज होते कि मुलीना क्रिकेटमध्ये एका ओव्हर मध्ये बॉल किती असतात ते पण माहित नसत. मंदिराच्या येण्यान सगळ्यांना धक्का बसला होता. तिच्याबद्दल थोडस कौतुक, थोडीशी असूया, थोडासा राग आणि बरच काही. आम्ही पण त्यातच होतो, खोट कशाला बोला.

मंदिरा बेदी हे नाव भारतात पहिल्यांदा १९९४ सालच्या शांती सिरीयल मुळे फेमस झालं होतं.तरून तडफदार खमकी पत्रकार शांती बनलेली मंदिरा बेदी म्हणजे नव्या पिढीच्या आत्मविश्वासाने भरलेल्या भारतीय नारीची प्रतिक मानली गेली होती. त्याच्या पुढच्याच वर्षी  दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे मध्ये एका छोट्या रोल मधून मोठ्या पडद्यावर देखील तिने एन्ट्री केली. यातला रोल मात्र एका लाजाळू मुलीचा होता. दोन्ही रोल तसं बघायला गेल तर नॉन ग्ल्मॅरस होते.

जवळपास आठ नऊ वर्षांनी मंदिरा परत आली तेही क्रिकेट वर्ल्ड कप मध्ये. कोणी विचारही केला नव्हता. 

मंदिरा बेदीचा क्रिकेटवर बोलण्याचा कॉन्फिडन्स, तिचं सुंदर इंग्लिश, तिची गोड स्माईल अजूनही तशीच होती. फक्त ती पूर्वी पेक्षा जास्त हॉट दिसत होती. याचे कारण होत ती घालत असलेल्या डिझायनर साड्या. मनिष मल्होत्रा सारख्या डिझायनरनी डिझाईन केलेल्या साड्या घातलेली मंदिरा हे त्या वर्ल्ड कपच एक वेगळच आकर्षण झाल होतं.!!

कधीही क्रिकेटच्या सुरवातीच्या शेवटच्या रटाळ चर्चा न ऐकणारे बाप्ये, तुम्हाला काय क्रिकेट कळतंय असा हिणवला गेलेला महिला वर्ग हे सगळे मंदिराच्या साड्या बघायला एक्स्ट्रा इनिंग बघू लागले. त्या चर्चाच वातावरण देखील बदललं होतं. तिने क्रिकेट चर्चाना ग्ल्मरस बनवलं.

तिकड सचिनच्या तुफानी बॅटींगच्या जोरावर भारतीय टीम एका पाठोपाठ एक विजय मिळवत वर्ल्ड कप मध्ये हवा करत चालली होती आणि दिवसेंदिवस मंदिराच्या ब्लाउजच्या बदलल्या जाणार्या डिझाईन मुळे भारतातल वातावरण अजून तापत चालल होत. दहावीची पोरं मॅच बघायला मिळत नाही यापेक्षा मंदिरा बेदी पण बघायला मिळत नाही म्हणून डबल निराश झाली होती.

अशातच एकदा एका कुठल्यातरी सेमी फायनल सामन्यात तर मंदिराने घातलेली साडी आणि ब्लाउज त्या मॅच पेक्षा जास्त फेमस झाला.  संस्कृती रक्षकांनी ठरवल इनफ इज इनफ. मंदिरा बेदीच्या विरुद्ध शिवसेना वगैरे पक्षांनी दंगा केला. आंदोलने झाली. सरकार पातळीवर कम्प्लेंट गेल्या. मंदिराला मारण्याच्या , रेपच्या धमक्या देऊन झाल्या. खेळाडूंच, टीव्ही बघणाऱ्या पोरांचं लक्ष विचलित होते वगैरे आरोप झाले. भारत कसा जिंकणार वगैरे म्हणून तिला माफी मागायला लावली.

अखेर फायनल मध्ये मात्र मंदिरा पदर सावरून बसली. पण दुर्दैवाने भारत काही वर्ल्ड कप जिंकू शकला नाही. 

बाकी कोणी काहीही म्हणो तिने भारताला शिकवले कि मुलीनाही क्रिकेट समजत, त्याच्यावर बोलता येऊ शकत. तिने जगाला दाखवून दिल कि साडी सुद्धा सेक्सी दिसू शकते. क्रिकेटला तिच्यामुळे ग्लॅमर मिळालं यात काही चुकीच नाही.आता तर मंदिरा ४७ वर्षाची झालीय. तिला एक मुलगा देखील आहे. पण आजही ती भारतीय मुलींना आपल्या चाळीशीत ही कसं फिट राहावं हे शिकवतीय.

२००३ चा वर्ल्ड कप सचिनने शोएब अख्तरची केलेली धुलाई, त्याने फायनलला खाल्लेली कच, झहीर खानने टाकलेला नोबॉल सोबत मंदिरा बेदी साठी देखील आठवला जातो. तिच्या बरोबर या कार्यक्रमाचा होस्ट चारू शर्मा असायचा हे ही कोणाला आठवत नाही. आठवतात त्या फक्त मंदिराच्या साड्या. 

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.