या एका माणसाने केलेल्या गद्दारीमुळे संपूर्ण भारतदेश इंग्रजांचा गुलाम बनला..

आपल्या सगळ्यांनाच माहितेय कि, इंग्रजांनी २०० वर्ष भारतावर राज्य केलं. २४ ऑगस्ट १६०८ ला गुजरातमधून इंग्रज आत घुसले आणि जवळपास सगळ्या भारताला आपल्या इशाऱ्यावर नाचवलं.  या २०० वर्षात इंग्रजांनी काय केलं , काय नाही हे काय वेगळं सांगायला नको. पण फार क्वचित लोकांना माहित असेल कि, हे सगळं  घडण्यामागे एक घटना कारणीभूत होती. ज्यामूळे इंग्रजांना भारतभर आपलं जाळं पसरवण्याची संधी मिळाली.

हे सगळं महाभारत घडलं ते मीर जाफर नावाच्या एका व्यक्तीमुळं. ज्याच्या धोक्याचा शिकार बनला बंगालचा नवाब सिराजउद्दोला. तो मॅटर इतका भयंकर होता कि, नवाबाची सत्ता तर गेलीच पण जीवही गेला.  त्यामुळे अनेक पिढ्यांपर्यंत लोक आपल्या पोरांची नाव मीर जाफर ठेवायला नको म्हणत होते. हे नाव म्हणजे गद्दारीचं एक प्रतीक बनलं होत. 

बंगालच्या या नवाबाचं संपूर्ण नाव होत मिर्जा  मुहम्मद सिराजउद्दोला, ज्याला  ‘आख़िरी आज़ाद नवाब’ असंही म्हंटल जात. तेही बरोबरच आहे म्हणा. कारण त्याचा जीव गेल्यानंतरच भारतात इंग्रजांनी आपले हातपाय पसरायला सुरुवात केली.  १७३३ मध्ये जन्मलेल्या या राजाचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा तो फक्त २४ वर्षाचा होता. आपल्या मृत्यूच्या वर्षभराआधीच त्यानं बंगालची गादी सांभाळली होती.

हा तोच काळ होता जेव्हा ईस्ट इंडिया कंपनी भारतात आपला जम बसवण्यासाठी उतावीळ होती. सिराजउद्दोला कमी वयात राजा बनला होता, आत हे नातेवाईकांच्या डोळ्यात तर खुपणारचं. सगळ्यात जास्त राग होता तो त्याची खाला घसीटी बेगम. सिराजउद्दोलाने नवाब बनल्यानंतर काहीच दिवसानंतर त्यांना कैद केलं होत.  नवाबाने बरीच वर्षे बंगालचा सेनापती असलेल्या मीर जाफरऐवजी मीर मदानला प्राधान्य दिलं. त्यामुळंच मीर जाफर नवाबांवर नाराज होता. 

त्यात आपला जम बसवण्यासाठी  इंग्रज वाटचं बघून होते. आणि त्यांच्या ह्या रस्त्यात नबाव अडथळा होता. जो दूर करण्यासाठी इंग्रजांचा सेनापती  रॉबर्ट क्लाइवनं आपले काही जासूस बंगालमधी पाठवले. त्याचवेळी क्लाइव्हच्या कानावर खबर आली ती मीर जाफरची. मीर जाफर नवाब बनण्याची स्वप्न बघत होता. हीच संधी साधतं क्लाइव्हनं त्याच्याशी संपर्क साधला आणि इथूनच नवाबाविरुद्ध कट रचायला सुरुवात झाली.

एका लढाईनं भारताचं भविष्य बदललं 

इंग्रजांनी बंगालवर हल्ला केला. नवाब सिराजउद्दोला आपलं सगळं सैन्य इंग्रजांविरूद्ध लावू शकत नव्हता. त्यात कोणाची मदत घ्यावी म्हंटल तर उत्तरेकडून अफगाण राज्यकर्ता अहमद शाह दुरानी आणि पश्चिमेकडील मराठ्यांकडून नेहमीच धोका होता. यामुळं आपल्या फौजेच्या एका तुकडीसह प्लासीला पोहोचला.  

मुर्शिदाबादपासून सुमारे २७ मैलांवर तळ ठोकला. २३ जूनला एका चकमकीत सिराजउद्दोलाच विश्वासू मीर मदान मारला गेला.  नवाबाने सल्ल्यासाठी मीर जाफरला निरोप पाठविला. मीर जाफरने सल्ला दिला कि, युद्ध थांबवलं जावं. नवाबाने मीर जाफरचा सल्ला मानला आणि युद्ध थांबवले.

नवाबची फौज छावणीकडे परत येऊ लागली. मीर जाफरने रॉबर्ट क्लाइव्हला परिस्थिती सांगितल. क्लायव्हने पूर्ण ताकदीने हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे सिराजच्या फौजेला काय करावं ते सूचनासं झालं आणि फौज विखुरली. क्लाइव्हने लढाई जिंकली. नवाब सिराजउद्दोलाला पळ काढावा लागला. मीर जाफर तातडीने जाऊन ब्रिटीश सेनापतीला भेटला. करारानुसार त्याला बंगालचा नवाब बनविण्यात आला. नवाब फक्त नावापुरताच मात्र सत्ता इंग्रजांच्या हाती.

दरम्यान, प्लासीच्या युद्धातून पळून गेल्यानंतरही सिराजउद्दोला फार काळ मुक्त राहू शकला नाही. मीर जाफरच्या शिपायांनी त्याला पाटण्यात पकडलं. ज्यानंतर त्याला मुर्शिदाबादला आणलं. मीर जाफरचा मुलगा मीर मीरननं त्याला जिवेमारण्याचा हुकूम दिला.  

नमक हराम ड्योढ़ी!
पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादच्या लगबाग भागात एक हवेली आहे. जी धोकेबाज  मीर जाफरची हवेली आहे. या हवेलीला नमक हराम ड्योढ़ी असं म्हंटल जात. याच ड्योढ़ीत सिराजउद्दोला फासावर लटकवण्यात आलं. आणि दुसऱ्या दिवशी त्याच्या मृतदेहाला हत्तीवर चढवून मुर्शिदाबाद शहरात परेड करण्यात आली. 

सत्तेसाठी  मीर जाफरने ती लढाई जिंकली खरी. पण इतिहासात त्याच नाव धोकेबाज म्हणूनच घेतलं जात.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.