हिंदीत शपथ घेणारा मंत्री “संघ” के रुप मैं अस का म्हणतो..

आज नरेंद्र मोदींनी दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. राष्ट्रपती भवनासमोर झालेल्या या भव्य आणि दिमाखदार समारंभासाठी जवळपास ८ हजार लोकांना निमंत्रण देण्यात आले होते. बांगलादेश, नेपाळ, भूतान, श्रीलंका,  म्यानमार, थायलंड या देशांचे प्रमुख हजर होते. अत्यंत काटेकोर नियोजन असणाऱ्या या शपथविधी समारंभात नरेंद्र मोदी यांच्यासह राजनाथ सिंग, अमित शहा, नितीन गडकरी, स्मृती इराणी अशा अनेक जेष्ठ नेत्यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली.

या निमित्ताने नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रीमंडळाचे अभिनंदन करणारे संदेश फिरत आहेत. यामध्ये एक संदेश सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

“हिंदी में प्रतिज्ञा लेने वाला हर मंत्री केह रहा हू मै ‘ संघ’ मंत्री के रूप में……”

माजी सनदी अधिकारी व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक अविनाश धर्माधिकारी यांनी देखील हा संदेश आपल्या फेसबुक वॉलवर शेअर केला आहे. यापूर्वी २०१४ साली देखील याच प्रकारचा संदेश त्यांनी आपल्या वॉल वर टाकला होता.

मात्र सध्या त्यावरून वाद होत आहे. अनेकांचा गैरसमज झाला आहे की भारताचे पंतप्रधान आणि मंत्रीमंडळ शपथ घेताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आपण मंत्री आहोत असे म्हणत आहेत. काही जण विनोदाने तर काही जण अभिमानाने हा मेसेज whatsapp फेसबुक वरून शेअर करत आहेत.

पण ही गोष्ट खरी नाही,

भारताच्या संविधानाच्या राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री, मंत्रीमंडळ, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांच्या शपथ काय स्वरूपाच्या असतील हे आधीच निश्चित केलेले आहे. या शपथविधी विधीचे सोपस्कार काय असतील याचा देखील त्यात उल्लेख असतो.

राज्यघटनेच्या तिसऱ्या अनुसूची मध्ये पंतप्रधान व मंत्रीमंडळाच्या पदाच्या शपथेचा नमुना दिलेला आहे,

इंग्लिश शपथ.

I, (name), do swear in the name of God (or, solemnly affirm) that I will bear true faith and allegiance to the Constitution of India as by law established, that I will uphold the sovereignty and integrity of India, that I will faithfully and conscientiously discharge my duties as a Minister for the Union and that I will do right to all manner of people in accordance with the Constitution and the law, without fear or favour, affection or ill-will.

हिंदी शपथ. 

मैं, (अमुक), ईश्वर की शपथ लेता हूँ/सत्यनिष्ठा से प्रतिज्ञान करता हूँ कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूँगा, मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्ण रखूँगा, मैं संघ के प्रधानमंत्री/मंत्री के रूप में अपने कर्तव्यों का श्रद्धापूर्वक और शुद्ध अंतःकरण से निर्वहन करूँगा तथा मैं भय या पक्षपात, अनुराग या द्वेष के बिना, सभी प्रकार के लोगों के प्रति संविधान और विधि के अनुसार न्याय करूँगा।

या शपथेचा एक आणि एक शब्द विचार करून लिहिला गेला आहे. त्याच्या मागे एक विशिष्ट असा अर्थ आहे. येथे संघ याचा अर्थ भारतीय संघराज्य किंवा युनियन असा आहे. त्याचा संबंध गंमतीमध्येही कोणत्याही संघटनेशी जोडणे हा देशाचा आणि त्या पदाचा अपमान आहे. असे संदेश आपल्याला आल्यास कृपया ते फॉरवर्ड करू नये.

Leave A Reply

Your email address will not be published.