हरवलेल्या सायकलीनं त्याला शतकातला महान बॉक्सर बनवलं..!

मोहम्मद अली खर नाव कॅशियस क्ले. जन्मला अमेरिकेचं केंटुकी राज्यातल्या लुईव्हिले गावात. वडील पोस्टर रंगवणारे पेंटर आणि आई घरकाम करणारी. घरची परिस्थिती अतिशय हलाखीची. त्यातून वर्णभेद तर रोजचाच.

त्याकाळी अमेरिकेत अनेक जन कृष्णवर्णीयांना जनावराची वागणूक द्यायचे. त्याची आई सांगते तो लहान होता तेव्हा त्याला एका दुकानात पाणी पिऊ दिल नाही कारण तो काळा आहे.

त्याच्यात प्रचंड रग होती आणि त्याहूनही प्रचंड राग होता.

आपणच गरीब कां? आपल्यालाच लोक अस का वागवतात असे प्रश्न त्याला पडायचे आणि त्याच्या आईलादेखील या प्रश्नांची उत्तर नसायची. त्यात त्याला डिसलेक्सिया हा रोग होता. शाळेत जायचा. डोक्याने हुशार होता मात्र लिहायला वाचायलाच यायचं नाही. बाकीची मुलं चिडवायची. आईवडील दोघेही कडक स्वभावाचे त्यामुळे शाळेत खूप मोठी भांडणे झाली नाही, किंवा

भरमसाठ खाणे आणि खेळणे एवढीच त्याची आवड. त्याला सायकल हवी होती. पण त्याचे वडील नेहमी त्याला आपण घेऊ अस सांगायचे. त्याला पण ठाऊक होतं कि हे फक्त आश्वासन आहे निया त्यांना सायकल घेणे परवडणार नाही. पण तो सायकल मागायचं थांबायचा नाही.

एकदिवस शाळेतून घरी आला आणि त्याला एक नवी कोरी सायकल घराबाहेर दिसली. वडिलांनी खूप साठवून साठवून ६० डॉलरची सायकल त्याच्यासाठी आणली होती.

त्याला जग जिंकल्याप्रमाणे आनंद झाला. आता गल्लीतल्या मित्रांमध्ये तो एकटा पडणार नव्हता. ते जिथे फिरायला जातील तेव्हा त्यांच्याबरोबर सायकलवरून उंडारायला त्याला मिळणार होते.  त्याचा प्रत्येकक्षण सायकल भोवती जायचा. त्याच्यासाठी आत्ता पर्यंतच्या आयुष्यातली सर्वात मोठ्ठ गिफ्ट होतं.

एकदा एक फेस्टिव्हल बघायला आपल्या मित्रांसोबत सायकलवरून गेला. मस्त पैकी तिथे आकाशपाळणा वगैरे खेळला, भरपूर खान झाल. आनंदात परत आला तेव्हा त्याला कळाल कि आपली सायकल चोरीला गेली आहे. त्याच्यासाठी डोक्यावर आभाळ कोसळलं. प्रचंड रडला.

वडील रागवतील ही भीती होतीच पण त्याहूनही सायकल त्याची जीव कि प्राण होती आणि ती गेली याचा त्याला राग होता.

बारा वर्षाचा हा छोटा मुलगा रागाच्या भरात पोलीस स्टेशनला गेला. तिथल्या पोलीस ऑफिसरला त्याने सगळी घटना सांगितली. आपली सायकल हरवली आहे यामुळे बेभान होऊन लालबुंद झालेला हा मुलगा त्या ऑफिसरला वेगळाच वाटला. त्याने सहज विचारल कि जर चोर सापडला तर काय करशील?

यावर त्या मुलाने जोरात बुक्की मारल्याची अक्शन केली आणि म्हणाला,

“I will whup him.”

त्याचा अविर्भाव बघून पोलीस ऑफिसरने ओळखल या पोरात एक फायटर दडला आहे. त्याच्या एनर्जीला व्यवस्थित वाट करून दिली तर खूप मोठा बॉक्सर बनेल.

पोलीस ऑफिसर जोई मार्टिन हा स्वतः एक बॉक्सर होता. त्याची स्वतःची अकडमी होती. तिथे कशीयस क्लेच ट्रेनिंग सुरु झाल.  त्याला ती हरवलेली सायकल कधी मिळाली नाही पण पुढच्या दहा वर्षात तो वर्ल्ड चम्पियन बनला होता.

रेकोर्डब्रेक कमी वयात त्याने जगातल्या नावाजलेल्या सगळ्या बॉक्सरना हरवलं. त्याचा पंच, त्याची चपळता, त्याचा आवेश, त्याचा खेळ परत कोणीही करू शकलं नाही.

तो स्वतः देखील म्हणायचा,

“तुम्ही सगळे लकी आहात कारण तुम्हाला मला फाईट करताना पाहायला मिळतंय. माझ्या सारखा कधी झाला नाही, आणि कधी होणार ही नाही. I am the greatest.”

यात त्याचा माज होताच पण त्याहूनही त्याला आत्मविश्वास होता. एक मतीमंद, काळा म्हणवला जाणारा प्रचंड दांडगा मुलगा त्याला चॅम्पियन व्हायचा आत्मविश्वास त्याच्या हरवलेल्या सायकलीने मिळवून दिला.

हे ही वाच भिडू.

 

1 Comment
  1. asha says

    Very Nice Info. Good Work

Leave A Reply

Your email address will not be published.