THE MARTIAN : या चित्रपटातून एक गोष्ट मी नक्की घेतली ती म्हणजे अफाट महत्वाकांक्षा.

पिक्चरवर लिहायच्या स्पर्धेतला हा तिसरा चौथ्या लेखांचा संच. काय होतय तर मेल खूप आले आहेत. ते सर्व एकत्र घेवून लावणं हे लय लोड देणारं काम झालय. त्यात एखाद्याचा लेख राहिला तर त्याच्यावर अन्याय केल्यासारखं होईलच पण घरात बसून लोक रिकामे असल्याने ते आमच्यावर सूड उगवतील अशी भिती पण वाटते.

असो पण सगळ्यांनीच लय भारी लेख लिहलेत. आत्ता होम अलोनची सिरीज फक्त राहिले. ती उद्या दिनांक ६ एप्रिलला पोस्ट केली जाईल आणि परवा दिनांक ७ एप्रिलला आम्ही नावे जाहीर करू.

लोकांना आवडलेले लेख आणि आमचे समिक्षक हे पसंती क्रमांक काढतील.

“बोलभिडूची” भूमिका सांगायची झाली तर, सगळ्याच लेखकांना उभ्यानं बक्षिस वाटतं फिरू वाटायलय. पण नियमात हात बांधलेत वो. उद्या पाच जणांची नावे जाहिर होतील.

THE MARTIAN पिक्चरवर आलेले लेख खाली देत आहोत.

१. सचिन साठे यांचा लेख

Hollywood च्या सिनेमाच नाद पहिल्या पासून त्यात अंतराळात जाणारी व मंगळावर जाऊन बटाटा शेती असला सिनेमा आलाय हे मित्रा कडून समजलं त्याच वेळी ठरवलं की हा सिनेमा पाहायचा एकदम फुल HD मध्ये पिचर डाउनलोड केला व बघायला सुरवात केली.  

एक टीम मंगळावर मातीचे नमुने गोळा करत आहे, त्यांना समजतं की वाळूचे मोठं वादळ येणार आहे तेव्हा ते आपलं मिशन मध्ये सोडून जाऊ लागतात त्यात आपला हिरो Mark Watney वादळ मुळे मंगळावर अडकतो बाकीचे लोक तो मेला म्हणून पृथ्वीकडे परत येऊ लागतात तर तिकडे आपला हिरो जिवंत आहे.

आपण जिवंत आहे व वादळात पोटाला झालेली जखम असल्या परिस्थितीत जगण्याची इच्छा त्याला एक आयडिया देते त्याचा कडे बेस Hub मध्ये असणारे सामना तो वर्गीकर करतो त्यातवर तो 90 दिवस काढू शकणार हे समजतं Watney तर संशोधक त्यात Botney वाला मग काय शेती करायची ठरवतो, मग शेतीसाठी माती गोळा करतो, ती Hub मध्ये पसरतो बटाटे पेरतो आता पीक घायचं म्हणतलं तर पाणी पाहिजे तर मग मंगळावर पाणी नाय मग हिरो दादा सायंटिस्ट हाय डोकं लावतो हैड्रोजन व ऑक्सिजन मिसळून पाणी तैयार करतो व बटाटे शेतीला पाणी पुरवतो, शेतीला पीक चांगलं पाहिजे तर खत पण पाहिजे त्यासाठी टीमचे मल मूत्र याचा वापर करतो, चिक्कार बटाटे येतात खाण्या-पाण्याचा प्रश्न सुटला, 

पुढं हिरो Hub च्या आत बाहेर करताना बाहेरचं सामान इकडं तिकडं करत असतो ते पृथ्वीवर बेस हब वर लक्ष्य ठेवून असेलेल्या एका नासा च्या ऑपरेटरच्या लक्ष्यात येतं हे समजू पर्यत हिरो Watney ना मृत्यू घोषित केलंय त्याचा मंगळवरून येणाऱ्या टीमला,

हे माहीत नाय की आपला हिरो जिवंत हाय.

तोपर्यत मागे कधी मंगळावर माणसानं अगोदर पाठवलेलं यान Mars Rover हिरो शोधून काढतो, मोबाईलच्या काळात पत्र पाठवणं असं ते पण त्यातनं तो पृथ्वीवर संदेश पाठवून आपण जिवंत आहे व पृथ्वीवर परत येऊ शकतो हे कळवतो 

नासा प्लॅन बनवते हिरोला परत आणायचा ज्याला मंगळावर पोहचायला 1 वर्ष लागणार घाईतल मिशन फेल झालं मग पुढं काय ? 

नासातलं एक तरुण हुशार पोरगं कमी वेळात मंगळावर न उतरता हिरोला कसं वाचवायचे याची आयडिया देतं, तिकडे पृथ्वीकडे येणारी त्याची टीम परस्पर जाऊन त्याला वाचवण्यासाठी परत फिरते.

हिरोला सांगण्यात येतं की कसतरी तू मंगळवरून उड्डाण घे, वाचवायला आलेली टीम मंगळावर उतरली तर परत उडू शकणार नाही कारण त्यांच्या कडे कमी इंधन, हिरोच्या यानाच वजन भी जास्त कमी करा म्हणजे 5000 किलो कमी करून यान उडवण्याची तैयारी करतो, हिरो भी हुशार जुन्या रॉकेट मधलं इंधन काढून उड्डाण घेतो, कमी दाबाने हिरो बेशुद्ध होतो नशिबाने शुध्दीवर येतो जीवावर होऊन यानातून बाहेर पडतो पण त्याचा स्पीड व वाचवायला आलेलं त्यांचं स्पीड काय जुळेना, शेवटी हिरो स्वतःच्या स्पेस सूटला छिद्र पाडून स्पीड कंट्रोल करतो 

मोठया प्रयत्नानंतर हिरोला हवेतलया हवेत पकडलं जातं व यानात घेतलं जातं

हिरो वाचला आणि जीव शांत झाला.

हिरो सही सलामत पृथ्वीवर परत येतो 

परत येऊन हिरो शांत बसत नाय तो अंतरिक्ष मध्ये जाणाऱ्या नवीन पोरांना ट्रेनिंगला द्यायला सुरुवात करतो, दुसऱ्या ग्रहावर कसं जिवंत राहायचं हे शिकवायला लागतो. 

मंगळावर बटाटे शेती यासाठी बघायला घेतलेला सिनेमा काय शिकवून गेला 

  1. आपण कुठं ही कसल्याही परिस्थितीत असू दे हिंमत राखली पाहिजे.
  2.  आपण घेतलेले ज्ञान, शिक्षण याचा आयुष्यात पुरेपूर वापर केला पाहिजे
  3. गंभीर परिस्थिती खंभीर राहिलं की बुद्धीचा वापर करून आपण योग्य मार्गावरून आपलं ध्येय गाठू शकतो.
  •  सचिन साठे.

 

Screenshot 2020 04 05 at 12.01.15 PM

२. अभिषेकी यांचा लेख

कल्पना करा या पृथ्वीवर तुम्ही अखेरचे मनुष्य आहात आणि तुम्हाला यापुढे दुसऱ्या मनुष्याला भेटता येणारच नाही तर…?

मनुष्य जेंव्हापासून समूह करून राहू लागला तेंव्हापासून या विश्वाने कूस बदलायला सुरुवात केली. आपल्या समूह करून राहण्यातच आपलं भलं आहे हे मानवाला समजलं आणि तो एकत्रित, समूह करून राहू लागला.

त्यातूनच मानव जमात पृथ्वीवरील सर्वात शक्तीशाली जमात बनत गेली. पण जर हा माणूस एकटा असेल तर तो दुर्बल आणि हतबल आहे का?

या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्यायचं असेल तर Ridley Scott दिग्दर्शित “The Martian” हा चित्रपट पाहायला हवा. पृथ्वीपासून हजारो प्रकाशवर्षं दूर असलेल्या मंगळ या ग्रहावर मानवी शास्त्रज्ञांचा एक समूह अभ्यास व संशोधन करण्यासाठी गेलेला असतो. त्या ग्रहावर सर्वकाही नियोजितपणे सुरू असताना अचानक वादळ सुटतं आणि त्या समूहाला गडबडीत तेथून निघून यावं लागतं.

पण या गडबडीत त्यांचा एक सोबती मागे सुटतो!

Mark Watney हे त्या पात्राचं नाव. त्या प्रचंड मोठ्या ग्रहावर तो एकटाच मागे उरतो…! चित्रपटात सुरूवातीलाच असलेला हा प्रसंग अतिशय प्रभावीपणे चित्रित केला असल्याने कथेची परिणामकारकता येथपासूनच वाढत जाते.

याच प्रसंगापासून सुरुवात होते चित्रपटाच्या मूळ कथेला. मंगळ ग्रहावर अडकलेला एकटा मनुष्य आणि त्याचा जगण्यासाठीचा संघर्ष! दुसरीकडे, मागे राहिलेल्या सहकार्‍याला परत पृथ्वीवर आणणे यासाठी झटणार्‍या त्याच्या सहकार्‍यांची प्रयत्नांची पराकाष्ठा हाच चित्रपटाच्या कथेची मुख्य गाभा आहे. त्या अनुषंगानेच कथेची गुंफण व प्रसंगांची रचना झालेली आहे. 

जोपर्यंत पृथ्वीवरील इतर सहकारी Mark Watney ला परत आणण्यासाठी प्रयत्न करत असतात तोपर्यंत त्याला तिथे जिवंत राहायचं असतं. जिथे सजीवसृष्टी नाही तिथे त्याला मर्यादित साधनांच्या आधारे श्वास चालू ठेवायचे असतात.

Survival ! जगण्याचा सिध्दांत !

शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष करून जगणं या निसर्गाच्या सिध्दांतावर तो मार्गक्रमण करू लागतो. समूहापासून विलग झालेला, एकटा असलेला, ना कोणी मदतीला ना कोणी बोलायला, किती काळ जगू शकतो याची शाश्वती नसतांनाही अशा परिस्थितीत त्याचा जगण्याचा संघर्ष एकट्याने सुरूच राहतो.

एखाद्या Science Fiction चित्रपटात शोभून दिसावेत असे काही प्रसंग चित्रपटात घडत जातात आणि Mark Watney चा मंगळ ते पृथ्वीवर परतण्याचा प्रवास अत्यंत रोचकपणे समोर येत जातो. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणाऱ्या घटनांच्या क्रमातून प्रेक्षक मात्र त्या कथेत पूर्णपणे गुंतला जातो. चित्रपटाच्या अगदी शेवटला अवकाशात जे काही प्रसंग चित्रित करण्यात आले आहेत ते पाहताना श्वास रोखले जातात, अंगावर रोमांच उभे राहतात !

आणि त्यातूनच चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला एका वेगळ्याच जगाची सफर घडते. एकंदरीतच, चित्रपट पहावा असा आहेच पण त्याहीपेक्षा अधिक मानव म्हणून तो वेगळीच अनुभूती देणारा आहे. 

चित्रपट तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण आहे. खासकरून छायाचित्रण अतिशय विलोभनीय आहे. मंगळ ग्रह व अवकाशातील वातावरण डोळ्यांना थक्क करून सोडणारे आहे आणि किंचित भीतीदायकही ! चित्रपटात काही प्रसंग निसर्गाची चौकट किती अमर्याद आहे याची जाणीव करून देणारे आहेत आणि विज्ञान त्यात शिस्तबद्धपणे

आपलं अस्तित्व टिकवून असल्याची वस्तुस्थितीही स्पष्टपणे दाखवणारे आहेत. कलाकारांचा अभिनय ही चित्रपटाची सर्वात जमेची बाजू म्हणता येईल. चित्रपटातील नायक, Mark Watney (भूमिका साकारणारा Matt Damon) जो या अभूतपूर्व परिस्थितीत अडकला आहे त्याचं वागणं, बोलणं आणि शेवटच्या क्षणी रडणं हे सगळं वेगळ्या दुनियेतील वाटतं.

प्रसंगानुरूप येणारं पार्श्वसंगीतही प्रभावशाली आहे. एक चित्रपट म्हणून अतिशय संपन्न असलेली ही कलाकृती !

कठीणतील कठीण परिस्थितीतही माणसाची केवळ एका आशेवर जगण्यासाठीची धडपड किती महत्वाची असते हे तर अधोरेखित होतंच पण त्यासोबतच चित्रपटात अजून एक प्रसंग आहे जो वेगळं भाष्य करतो. माणसाचं मन हे किती गूढ आहे याचं द्योतक त्या प्रसंगातून समोर येईल.

जेंव्हा नायकाची मंगळ सोडून निघायची वेळ येते तेंव्हा तो एक कटाक्ष त्या ग्रहाकडे टाकतो !

असं वाटतं त्याचं मन तिथे गुंतलं आहे. मुक्कामाचं गाव आल्यावर काही क्षणांपूरता चांगली ओळख झालेल्या सहप्रवाशाचा निरोप घेताना जे भाव प्रगट होतील तसे भाव त्याच्या चेहऱ्यावर दिसतात. आयुष्यातील सर्वात कठीण काळ जिथे काढला आहे, जिथे जीवन मरणाचा प्रश्न होता त्या जागेचा निरोप घेतांनाही तो नायक हळवा का होतो?

आपणही आपल्या आयुष्यात कठीण प्रसंगातून मुक्त झाल्यावर मुक्तपणे अश्रू ढाळतोच!

यातून मानवी जीवनाचे दोन पैलू ठळकपणे नमूद केलेले दिसतात. एक म्हणजे Survival, जगण्याची उमेद आणि दुसरं म्हणजे माणसाचं भावनात्मक असणं! या दोन Qualities आपल्याला माणूस बनवतात. त्या आपल्यात आहेत म्हणून आपण मानव आहोत! मग आपण कुठेही असलो, कसेही असलो तरी ती आपली ओळख मोडली जात नाही.

Mark Watney चा त्या मंगळ ग्रहावरील संघर्ष, तेथून परत येण्याची जिद्द या निमित्ताने तो पृथ्वीबाहेर, मंगळ ग्रहावरसुद्धा आपलं मानवत्व सिद्ध करून दाखवतो आणि पुन्हा पृथ्वीवर पोचतो असा तो The Martian!

लेखक : अभिषेकी  latenightedition.in@gmail.com

Screenshot 2020 04 05 at 12.01.38 PM

३. सौरभ खानोलकर यांचा लेख

आज आपण घरात अडकून पडलो आहोत. अगदीच महत्त्वाच्या कामाशिवाय बाहेर पडण्यावर आपल्याला बंधने आहेत. कुटुंबासोबत असुनही ५-६ दिवसातच बहुतांश लोक अस्वस्थ झाले आहेत. विचार करा, जर तुम्हाला एकटंच रहावं लागलं असतं तर..?

त्यातही तुमच्यापासून आजुबाजुला दुरवर कोणी असलं नसतं तर..? इतक्या दूरवर की कोणत्याही संपर्क साधनाशिवाय तुम्ही एकटेच एका ग्रहावर अडकून पडला असता तर..?

‘द मार्शिअन’ चित्रपट सुरू होतो तो तांबूस लालसर रंगछटांत मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागाच्या ओसाड पण चित्तवेधक दर्शनाने..!

नासाच्या एरीझ-३ या अंतराळ मिशनवर असणारी टीम ही त्यांच्या मंगळावरील १८ व्या दिवशी मातीचे नमुने गोळा करत असते. इतक्यात त्यांच्या यानातील सहकाऱ्यांकडून त्यांना येत असणाऱ्या जोरदार वादळाची कल्पना दिली जाते.

येणाऱ्या वादळाची तीव्रता इतकी असते की त्यांचा एमएव्ही (ग्रहाच्या पृष्ठभागावरील नमुने गोळा आणि साठवणीचे उपकरण) पलटी व्हायची शक्यता निर्माण होते आणि मिशनच्या कमांडर मेलिसा लुईस यांना मिशन तात्काळ स्थगित करुन मंगळावरून निघायचा निर्णय घ्यावा लागतो.

टीम वादळातून हर्मीझ या त्यांच्या यानाकडे परतत असताना झालेल्या अपघातात टीममधील एक सदस्य आणि चित्रपटाचा नायक मार्क वॉटनी हा दूरवर फेकला जातो. त्याचा सिग्नल न मिळाल्याने आणि वारंवार संपर्क साधूनही त्याच्याकडून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने बाकीची टीम त्याला मृत गृहीत धरते व हर्मीझ यान परतीच्या प्रवासाला निघते.

पण वॉटनी जिवंत असतो..

बेशुद्धावस्थेत जखमी झालेल्या वॉटनीला कमी अॉक्सिजन पातळीच्या इशाऱ्याने जेव्हा जाग येते तेव्हा त्या संपूर्ण ग्रहावर तो एकटा राहिलेला असतो आणि संपर्कासाठी कुठलेच साधन नसते.

त्याच्यासमोर असते ती ३१ दिवसांपर्यंत टिकेल अशी डिझाईन केलेली फक्त एक हॅब..(मंगळावरच्या वातावरणात रहाण्यासाठी तयार केलेली जागा)

हॅबमध्ये जाऊन स्वतःच्या जखमेवर उपचार केल्यानंतर त्याला त्याच्यावरच्या भीषण संकटाची चांगलीच जाणीव होते.

जरी कुठल्या मार्गाने त्याने नासाशी संपर्क केला तरी त्याची सुटका करण्यासाठी पोहोचायला त्यांना ४ वर्षे लागणार, त्याच्याकडच्या अॉक्सिजनेटर (अॉक्सिजन तयार करणारी व्यवस्था) मध्ये बिघाड झाला तर प्राण गमवावे लागणार, असलेल्या वॉटर रिक्लेमर (रिसायकलिंग करुन पाणी उपलब्ध करणारी व्यवस्था) मध्ये बिघाड झाला तर तहानेने जीव गमवावा लागणार, मर्यादित काळासाठी डिझाईन केलेली ती हॅब त्या काळानंतर नाही टिकली तर वातावरणाशिवाय तिथे राहणे अशक्य होणार, आणि दैवकृपेने यातले जरी काहीच झाले नाही तरी काही काळाने त्याच्याजवळचे मर्यादित अन्न संपून अन्नावाचुन जीव गमवावा लागणार..

पृथ्वीपासून ५ कोटी मैलांवर असलेला, पुर्णपणे एकटा पडलेला आणि सर्वांनीच त्याच्यावरची आशा सोडून दिलेला वॉटनी मानसशास्त्रीयदृष्ट्या किती निराशाजनक परिस्थितीतून जात असेल..?

स्वाभाविकपणे या परिस्थितीने वॉटनी गडबडतो, पण नायक तोच असतो जो प्रतिकूल परिस्थितीत योग्य पावले उचलतो. भले समोर कोणतीही आशा नसली तरी वॉटनी जे करणे अत्यावश्यक आहे ते करण्याच्या दृष्टीने पावले उचलतो.

बाकी काही निश्चित नसले तरी मंगळावर जास्त काळ कंठावा लागणार हे तर निश्चितच असते, व त्यादृष्टीने त्याच्यासमोर असलेल्या सर्वात मोठ्या दोन अडचणींवर मात करण्यासाठी तो सज्ज होतो.

एक म्हणजे अन्नाचा तुटवडा..

सुदैवाने वॉटनी हा वनस्पतीशास्त्रज्ञ असतो आणि  त्याला जिवंत राहण्यासाठी समोर एकमेव पर्याय दिसतो तो म्हणजे जिथे काहीच उगवत नाही त्या मंगळावर शेती करायचा..!

त्याच्यासमोर दुसरी मोठी अडचण असते ती म्हणजे नासाशी संपर्क साधणे..

या दोन्ही गोष्टींसाठी तो करत असलेले प्रयत्न, त्याची त्यामागची धडपड, ती करताना समोर उद्भवणाऱ्या अनंत अडचणी आणि त्यावर मात करण्यासाठी त्याने काढलेले मार्ग हे एका मागोमाग प्रसंगातून कल्पकतेने मांडत चित्रपट पुढे सरकतो.

नासाशी वॉटनीचा संपर्क साधला गेल्यावर आणि हर्मीझमधून परतीच्या प्रवासावर असलेल्या त्याच्या सहकाऱ्यांना वॉटनी जिवंत असल्याचे कळाल्यावर कथानक वळण घेते, आणि त्याला या संकटातून बाहेर काढण्यासाठी एकामागोमाग वेगवेगळी पात्रे जोडतात.

आपल्या आजुबाजुला प्रत्येकामध्ये एक नायक असतो. आपल्याला फक्त त्याला वेळेवर बाहेर येऊ द्यायचे असते. अगदी त्याच स्वयंस्फुर्तीने सर्वजण एकत्रितपणे समोर येणार्‍या अडचणींवर मात करण्यासाठी पुढे सरसावतात.

वॉटनीच्या सुटकेचे उपाय म्हणून नासाकडे दोन पर्याय शिल्लक राहतात.

एक म्हणजे, पुढील ४ वर्षांत तिथे पोहोचणाऱ्या मिशन एरीझ-४ करवी त्याची सुटका करणे. ज्यासाठी त्याला ४ वर्षे सर्व अडचणींवर मात करीत एकांतवासात जिवंत रहायचे कठीण काम लागणार होते.

आणि दुसरा, पृथ्वीकडे येत असणाऱ्या हर्मीझ यानाला परत मागे फिरून वॉटनीच्या सुटकेसाठी पाठवणे.

एका माणसाचा जीव वाचवायला टीममधील इतर पाच जणांचा जीव धोक्यात घालण्याचा मनाकडे झुकणारा निर्णय घ्यायचा; की वॉटनीला ४ वर्षे प्रारब्धाच्या हवाली करून पाच जणांना ते येत आहेत तसे सुखरूप येऊ द्यायचा बुद्धीकडे झुकणारा निर्णय घ्यायचा, असा अवघड पेच नासासमोर उभा ठाकतो.

अडचणीत असलेल्या माणसाला मदतीला धावून जाण्याची एक अंतःप्रेरणा माणसामध्ये उपजतच असते मग ते जगात कुठेही का असेना..!

भुकंप झाल्यावर जगातून मदत केली जाते, पूर आल्यावर जगातून मदत केली जाते.

याच मुलभूत अंतःप्रेरणेच्या थिमवर बेतलेला हा चित्रपट क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवतो. आपण चित्रपटाशी जोडले जातो आणि अगदी आपलाच कोणी तिथे अडकल्यासारखे त्याच्या सुटकेसाठी प्रार्थना करु लागतो, हेच या चित्रपटाच्या मांडणीचे यश आहे.

लिहिण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आभारी आहे भिडू..

आपलाच भिडू,

सौरभ खानोलकर

 

Screenshot 2020 04 05 at 12.00.58 PM

४. जयेश चव्हाण यांचा लेख

अंतराळ, उडत्या तबकिर्या, परगृही(एलिएन्स),तारामंडळ, धुमकेतू, आकाशगंगा, सूर्यमाला अशे काहीसे पूर्णपणे ज्ञात नसलेले खगोलशास्त्रीय विषय हे पुस्तकांच्या, कथांच्या माध्यमातून, ऐकीव स्वरूपाच्या माहितीतून सर्वांच्या परीचयाला आलेले आहेतच.

पण हे विषय अन त्यांचा एकूणच आवाका पाहिल्यास ज्या संशोधकांनी याविषयी सखोल अस संशोधन केल व ज्या साहित्यीकांनी आपल्या अंगी असेलेल्या लेखन कौशल्याच्या आधारे या शोधांना मूर्त स्वरूप दिल त्यावरून हे खगोलशास्त्र या दोन्ही मंडळींनी कल्पना केल्या प्रमाणे पुढे प्रत्यक्ष चित्रपटाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना अनुभवायला मिळेल याचा कोणी विचारही केला नसेल.

परंतु आज २१व्या शतकात आधुनिक तंत्रज्ञानाच्याद्वारे चित्रपट माध्यमाने ही किमया लीलया साधली आहे. याच विषयावर आधारित एक नितांत सुंदर असा, मनामध्ये कुतूहल निर्माण करणारा चित्रपट म्हणजे दि मार्शियन. 

रिडली स्कॉट या हॉलीवूड मधील नामांकित दिग्दर्शकाने दिग्दर्शित केलेला व मॅट डेमन या लोकप्रिय नटाच्या अभियनायाने सजलेला हा चित्रपट एंडी वियर  लिखित “दि मार्शियन” या कादंबरीवर आधारित आहे.

सन २०३५ साली नासाने आखलेल्या मंगळ ग्रह मोहिमेंतर्गत मंगळ ग्रहावर एरीस ३ हे यान उतरून नियोजित ३१ दिवसांपैकी १८ दिवस झाले आहेत. त्यात मार्क व त्याचे इतर साथीदार हे या ग्रहावरील मातीचे नमुने घेत आहेत. रात्री सर्व टीम आपल्या सेफ्टी हब(तंबू)मध्ये असताना त्यांना नासाकडून धुळीचे एक वादळ वेगाने त्यांच्या दिशेकडे येत असल्याची माहिती मिळते व बघता बघता ते वादळ त्यांच्या जवळ येत.

त्या वादळातही सर्व टीम यानाच्या दिशेने निघाली असता सर्वात शेवटी असलेल्या मार्कच्या अंगावर तिथलीच बाजूची एक वस्तू अचानक जोरात आदळते व तो यानापासून दूर फेकला जातो. टीम कडून संपर्काचा प्रयत्न करूनही मार्क कडून कुठलाच प्रतिसाद येत नाही, अशा परिस्थितीत त्याला शोधणे अथवा तिथेच थांबून राहणे हे अशक्य आणि धोक्याचे असल्याने त्याची टीम परत पृथ्वीकडे प्रस्थान करते.

साहजिकच त्याला शोधण्यासाठी व मदत पाठवण्यासाठी लागणारा एकुनच वेळ लक्षात घेता तसेच मंगळावर असलेल्या वातावरणात सेफ्टी मास्क व ऑक्सिजन शिवाय मार्क जिवंत राहणे शक्य नाही या निष्कर्षावर या मंगळ मोहिमेच नेतृत्व करणारे नासाचे अधिकारी येतात. तर दुसरीकडे चित्रपटाचा हिरो मार्क हा अजूनही जिवंत आहे व त्याला पूर्णपणे कल्पना आलेली आहे की आता तो एकटाच तिथे फसलेला आहे व त्याच्या मदतीला तिथे दुसरे कोणीही नाही.

अन मग सुरु होतो तो एका मनुष्याच्या जिद्दीचा, साहसाचा,बुद्धी, चातुर्याचा, सबुरीचा, एकटेपणाचा, संवेदनेचा, भावनांचा, अनुभव कौशल्याचा एक विलक्षण असा प्रवास.

तो हि अर्थातच पृथ्वीच्या म्हणजेच जगण्याच्या, जीवनाच्या दिशेने. उपलब्ध असलेल्या साधनांतून पाणी, ऑक्सिजन, अन्नाची निर्मिती करण्यापासून ते परतीच्या प्रवासासाठी नासाशी संपर्क करणे, त्यासंबंधीची योजना बनवणे, यान पुन्हा तयार करणे अशा अनेक छोट्या-मोठ्या बाबी, त्याचं नियोजन अतिशय उत्कृष्ट पणे मार्क करतो आणि शेवटी नासा अन त्याला सोडून परतीच्या प्रवासाकडे निघालेल्या त्याच्या टीमच्या सहाय्याने तो यशस्वीपणे सर्व संकटांवर मात करत पुन्हा आपल्या भूमीवर परत येतो.

अर्थात हा चित्रपट पाहताना यातील बारकावे, वैज्ञानिक संज्ञा, फिजीक्स-थर्मोडायनामिक्सच्या सिद्धांतांची सोप्या भाषेतील केलेली मांडणी, चित्रपटाला गती देणारे संवाद, प्रसंगांच-लोकेशन्सच केलेलं सादरिकरण व त्याहूनही अधिक उत्कंठा वाढवणार पार्श्व संगीत, कलाकारांचा अभिनय, एकूणच एखाद्या चित्रपटाच कथानक जिवंत ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींकडे दिग्दर्शकाने किती कल्पकतेने, बारकाईने लक्ष दिले आहे याची जाणीव होते. 

२०१५ साली ७०० कोटी रु. हून अधिक निर्मिती मूल्य असलेला हा चित्रपट ४००० कोटींहून अधिकचा गल्ला जमवून व्यावसायिकदृष्ट्या यशस्वीही झाला.

या चित्रपटाने अनेक पुरस्कारही मिळवले, विशेष करून २०१६च्या  गोल्डन ग्लोब पुरस्कारात मॅट डेमनला उत्कृष्ट अभिनेत्याचा तर या चित्रपटाला उत्कृष्ट  चित्रपटाचा बहुमानही मिळाला.

खर तर रिडली स्कॉट सारखा ऐतहासिक चित्रपट बनवण्यात पारंगत असलेल्या दिग्दर्शक व डेमोन सारखा एक्शन हिरो या चित्रपटाचा भाग होतात व आपल्यातील सर्वोत्तम गुणवत्तेचा नमुना सादर करून दि मार्शियन सारखी अंतराळ विषयीची काहीशी अवघड, वेळखाऊ वाटणारी व प्रचंड खर्चिक असलेली कलाकृती सादर करतात व त्यात ते यशस्वीही होतात हे सर्वच विलक्षण स्फुर्थी देणार, आल्हाददायक, प्रेरणादायी, नव्या कल्पकतेला बळ देणार व मानवाच्या अंगी असलेल्या उर्जेच मूर्तिमंत स्वरूप स्पष्ट करणार आहे याचा हा चित्रपट पाहताना आपणाला अनुभव आल्याशिवाय राहत नाही.                   

जयेश बालासाहेब चव्हाण 

मु.पो. हातोला, ता. अंबाजोगाई,  बीड 

संपर्क क्र. ८२७५२६८३७२     

Screenshot 2020 04 05 at 12.00.58 PM

५. शिवराज डोंगरे यांचा लेख

हल्ली कोरोंना व्हायरस मुळं सगळ्याना एकटं राहवा, साथसोवळे (सोशल डिस्टंसिंग) पाळा म्हणून सांगितलं जात आहे.

मरणाच्या भितीने बर्यापैकी जनता घरी पण बसून आहे. एकलकोंडेपणाची भावना सगळ्यांना खायला उठत असेल.

पण याच भावनेच्या टोकाचा अनुभव दृश्यात्मक स्वरुपात घ्यायचा असेल तर दिग्दर्शक स्कॉट रिडली यांचा The Martian पिक्चर भिडूंनी जरूर बघावा. त्यानंतर आपल्या सध्याच्या एकटेपणामधला गजबजाट तुम्हाला नक्की जाणवेल.

तर सुरुवात होतीये अशी की नासाच्या 8 जणांच्या अंतराळविरांची टोळी मंगळावर मातीचे, खडकाचे नमुने घ्यायचं काम एका मिशन अंतर्गत करत असते. अचानक एक वादळ येतं आणि मार्क वॉटनी नावाचा त्यांच्यापैकी एक, त्याच्या स्पेस सूट मध्ये अँटेना चा प्रोब वेगाने घुसल्यामुळे दूर उडून पडतो आणि हरवतो.

वादळाच्या धोक्यामुळे बाकीचे सदस्य मिशन अर्धवट सोडण्याचा निर्णय घेतात आणि वॉटनी मेला असं समजून बाकीचे सर्व जण परतीचे उड्डाण करतात. पण उलट वॉटनी त्या प्रोबमुळंच वाचतो. कसाबसा मंगळावरच्या हबमध्ये ( त्यांचं राहायचं ठिकाण) येतो आणि जखमेवर वगेरे उपचार घेतो.

इथूनच सुरू होतं त्याच्या एकट्याचं संकटांशी आणि त्याचबरोबर एकटेपणाशी असलेलं युद्ध.

“space never cooperates” हा अतिशय मनाला स्पर्श करून जाणारा एक डायलॉग त्यात आहे.

अंतराळात अडकल्यावर तुम्ही एक प्रश्न सोडवा लगेच दुसरा प्रश्न पुढ्यात येऊन ठाकतो. जर एकामागून एक येणारे सगळे असे माहित नसलेले प्रश्न तुम्ही सोडवलेत तर वाचाल. वॉटनीने मरायच्या शक्यता जसं की पाणी, कुठलाही अपघात, नासाशी संभाषण अशा एक ना अनेक समस्या त्यानं सांगितल्यावर बघणाऱ्यांचीच फाटते आणि यावर सगळ्यात शेवटी तो शांतपणे म्हणतो की, या सगळ्यातून वाचलो तर शेवटी अन्न संपून जाईल कारण पुढचं नासा चं मिशन 4 वर्षांनी येणार आहे!!

हळू हळू एक एक प्रश्न तो सोडवायला लागतो. यामध्ये तंत्रज्ञानाचा बराचसा भाग आहे. जसं की वनस्पती शास्त्रज्ञ असल्याने मानवी विष्ठा आणि मंगळावरची माती यामध्ये शेती करू शकणे करणे, नासा सोबत Hexadecimal भाषेमध्ये संवाद साधणे, एका अपघातानंतर पुन्हा हब ची दुरुस्ती वगेरे वगेरे.

समांतरपणे पृथ्वीवरूनदेखील वॉटनीला वाचवायचे प्रयत्न सुरू होतात. शेवटी चीन च्या मदतीने नासा त्याला वाचवण्यात कशी यशस्वी होते हे पाहणे रंजक आहे. कथानकातील पात्रांची मानसिक आंदोलनं टिपण्यात दिग्दर्शक कमालीचा यशस्वी ठरला आहे.

वॉटनी जिवंत असल्याचे मिशन ची प्रमुख असणार्या कमांडर लुईस ला समजते तेव्हा तिच्या मनामध्ये निर्माण झालेली अपराधीपणाची भावना किंवा वॉटनी ला वाचवण्यासाठी अनिश्चित काळासाठी मिशन कालावधी वाढविण्यासाठी सगळ्यांनी जीव धोक्यात घालून घेतलेला निर्णय तसेच शेवटी सगळे अडथळे पार करून शेवटच्या उड्डाणासाठी तयार झालेल्या वॉटनीच्या भावना हे सगळं कमालीचं आहे.

दरम्यान अधेमधे विनोदाची केलेली पेरणी जस की कमांडर लुईसची डिस्को म्युझिकची आवड जे वॉटनीचे 1.5-2 वर्ष मंगळावरचे केवळ मनोरंजनाचे साधन असते, एकवेळी हबमधून बाहेर पडताना स्पेस सूट चे हेल्मेट घालायला विसरलेला वॉटनी, नासाशी संभाषण करताना त्यांनं दिलेल्या शिव्या ज्या सगळीकडे प्रसारित होत असतात असे अनेक प्रासंगिक विनोद चित्रपट एकांगी होऊ देत नाहीत.

मनुष्य आणि निसर्ग यांच्यातील हे द्वंद्व असल्याचा भास कायम चित्रपट पाहताना मनाला होत राहतो. विज्ञान तंत्रज्ञानातील प्रगती वगेरे निसर्गाच्या गूढतेपुढे किती कस्पटासमान आहे याची जाणीव सतत बघणार्याला होत राहते.

शेवटच्या एका दृश्यात वॉटनी स्पेस सूट ला छिद्र पाडून त्याच्या हवेच्या दाबाच्या जोरावर कसाबसा कमांडर लुईसजवळ पोहोचतो. म्हणजे सगळे प्रयत्न संपल्यावर दैवाची साथ असल्याशिवाय मनुष्याला यशस्वी होणं कायम शक्य नाही असं दिग्दर्शकाला दाखवायचं आहे.

कदाचित दिग्दर्शकाच्या मनातील दैवी शक्तीची कल्पना निसर्गाशी निगडित असावी, जी विज्ञान आणि चमत्कार यांना जोडणारा दुवा राहिलेली आहे आणि मोठा वादाचा विषयदेखील राहिलेली आहे.

 तर भिडूंनो एकूणच कथानक, कलाकारांचा अभिनय, सादरीकरण ही भट्टी कमाल जमली आहे. सगळ्यांनी 21 दिवसांच्या काळात मंगळावरचा वॉटनीचा एकांत जरूर अनुभवावा असाच आहे.

Screenshot 2020 04 05 at 12.01.48 PM

६. विराज सोनवणे ( पहिला) यांचा लेख

 

The martian picture हा 2015 मध्ये प्रदर्शित झाला आहे आणि ridley scott यांनी दिगदर्शन केले आहे.
The Martian पिक्चर मध्ये matt demon यांनी mark watney या कॅरॅक्टरचा रोल प्ले केला आहे खरं सांगायचं झालं तर हा माझा दुसरा आवडीचा hollywod पिक्चर आहे या पिक्चर ची स्टोरी line जबरदस्त आहे आणि ग्राफिक्स तर कमालीचे आहेत याची स्टोरी अशी 2035 मध्ये, मंगळावर एरीस 3 मिशन असते मिशन 31 मंगळ सौरदिनाचे (सोल) असते सोल 18 रोजी अॅ सीडलिया प्लॅनिटियाचा तीव्र धूळीचे वादळ येते मंगळावरील त्यांचे वाहन एमएव्ही पाडण्याची शक्यता असते.
या मोहिमेला रद्द करण्यात येते आणि अंतराळवीर हबमधून बाहेर पडतात अंतराळवीर मार्क वाटणी वादळात हरवतात. त्याच्या सूटच्या बायोमोनिटरवरील टेलीमेट्री खराब होतो आणि वॅटनी मृत असल्याचे समजले जातात. कोसळण्याच्या मार्गावर असलेल्या एमएव्ही निघून जातात.
वादळानंतर, जखमी झालेला मार्क वॅटनी ऑक्सिजनच्या कमी चेतावणीच्या अलरम मुळे जागृत होतो. तो हब मध्ये परत येतो आणि त्याच्या जखमेवर उपचार करतो. वॅटनी ठीक होताच, त्याने व्हिडिओ डायरी सुरू करतो.
पृथ्वीशी संवाद नसणे, बचावाची त्याची एकमेव संधी पुढील मंगळ मोहिमेद्वारे आसते, चार वर्षांनंतरः अरीस 4, २०० किलोमीटर (२,००० मैल) दूर खड्ड्यात उतरणार असते. वॅटनीची चिंता अन्न आहे;  मिशनचा वनस्पतिशास्त्रज्ञ म्हणून, तो मातीचा वापर करून हबच्या
आत बाग तयार करतो आणि उरलेल्या रॉकेट इंधनातून पाणी तयार करतो.  त्यानंतर तो त्याच्या अन्न पुरवठ्यास पूरक म्हणून क्रूचा न वापरलेले थँक्सगिव्हिंग डिनर बटाटे लावतो.  त्याने एरीस 4 लँडिंग साइटवर लांब पल्ल्याच्या ट्रेकसाठी रोव्हरमध्ये बदल करण्यास सुरूवात केलेले असते.
नासा उपग्रह नियोजक मिंडी पार्क, एरियल हब प्रतिमांचा आढावा घेतात. हलवलेली उपकरणे ही मार्क जिवंत आहे याची जाणीव करतात. नासाचे संचालक, टेडी सँडर्स यांनी सार्वजनिकपणे ही बातमी प्रसिद्ध केलेली असते, जरी एरीस 3 चे चालक दल (अजूनही पृथ्वीकडे जाण्याच्या मार्गावर) त्यांना सांगण्यात येत नाही जेणेकरून ते त्यांच्या मोहिमेवर लक्ष केंद्रित करत राहवे.
क्रूला माहित असावे असा विश्वास असणार्या हर्मीसचे उड्डाण संचालक मिच हेंडरसन यांना सँडर्सने क्रूला सांगण्यास मनाई करतात.
 1997 मध्ये मूक पडलेल्या जवळच्या पाथफाइंडर चौकशीसाठी वॉटनी रोव्हर घेतो. पाथफाइंडरचा कॅमेरा आणि मोटर वापरुन, तो पृथ्वीशी प्राथमिक द्वि-मार्ग संप्रेषण करतो, प्रथम हाताने लिखित चिन्हे वापरतो आणि नंतर हेक्साडेसिमलमध्ये संदेश पाठवितो आणि प्राप्त करतो.
रोव्हरला पाथफाइंडरशी लिंक करण्यासाठी आणि मजकूराद्वारे संवाद साधण्यासाठी नासा सॉफ्टवेअर पॅच प्रसारित करतो. अरीस 3 च्या क्रूला तो जिवंत आहे याची जाणीव नसल्यामुळे वॅटनीला राग येतो;  सँडर्स शेवटी हेंडरसन यांना त्यांची माहिती देण्यास परवानगी देतो.
मंगळ मोहिमेचे संचालक, व्हिन्सेंट कपूर आणि जेट प्रोपल्शन लॅबोरेटरी (जेपीएल) चे संचालक ब्रूस एनजी व्हेटनीला एरीस 4 येईपर्यंत टिकण्यासाठी पुरेसे अन्न पुरवण्यासाठी आयरिसच्या जागेची चौकशी तयार करतात. 
दरम्यान, हॅबच्या एरोलॉकमध्ये बिघाड निर्माण झाला, ज्यामुळे एक प्रवेग उद्भवला आणि संरचनेस हानी पोहोचली. हबमध्ये दबावामुळे स्फोट होतो, परंतु मंगळाच्या वातावरणाने बटाट्याचे सध्याचे पीक नष्ट होते आणि माती जंतुरहित होते. कमी जोखीम असल्याचा विश्वास ठेवून सॅन्डर्स चौकशीच्या सुरूवातीला वेग देण्यासाठी नियमित उड्डाण-पूर्व सुरक्षा तपासणीला बायपास करण्याचे आदेश देतात. लिफ्ट ऑफनंतर 40 सेकंदानंतर रॉकेटचा स्फोट होतो.
मंगळावरील मृत्यू अटळ आहे, असा आता वॅटनीचा विश्वास बसायला लागतो.
चायना नॅशनल स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन ताइयांग शेन हा शक्तिशाली वर्गीकृत बूस्टर रॉकेट विकसित करीत असतात. नासाच्या शास्त्रज्ञांसमवेत कॅमेरेडी असल्यासारखे ते त्यांच्या सरकारच्या गोपनीयतेचे उल्लंघन करतात आणि आयरिस मिशनची पुनरावृत्ती करण्याची ऑफर देतात. जसजशी वेळ निघेल तसतसे वॅटनीची परिस्थिती अधिक धोकादायक होते, जेपीएल ज्योतिषशास्त्रज्ञ रिच पुर्नेल यांनी एक पर्यायी योजना आखलीः तैयांग शेन हर्मीसला जोडणी करुण पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा वापर करेल.
सँडर्सने ही कल्पना नाकारतात, हर्मीसच्या क्रूसाठी ती खूप जोखमीची आहे;  हँडरसनने पर्नेलची योजना गुप्तपणे कर्मचार्यांकना पाठवतात जे एकमतपणे ते अंमलात आणण्यासाठी मतदान करतात.  ते नासाचे रिमोट कंट्रोल अक्षम करतात आणि कोर्स बदलतात. आणि मार्क घरी म्हणजेच पृथ्वीवर परत येतो
पृथ्वीवर परतल्यानंतर वॅटनी अंतराळवीर उमेदवारांसाठी सर्व्हायव्हल इंस्ट्रक्टर बनतो.
–  विराज सोनवणे (पहिला) 
Screenshot 2020 04 05 at 12.02.15 PM

७. निखिल फेंगंसे यांचा लेख.

The martian बद्दल लिहितोय भिडू मी. या चित्रपटा बद्दल काय बोलणार
एक साधारण astronaut  एका ग्रहावर दीड वर्षहून अधिक काळ राहतो
एकटा आपण सर्व एकटे राहू शकतो काहीं लोक असा प्रयत्न पण करतात पण या चित्रपटात नायकाला Mark Wotony ला त्याचे साथी तो मृत झाला असा समजून त्याला सोडून जातात.
मंगळ ग्रहावर अर्थात त्याचा अपघात होतो आणि त्या वेळी कोणीही असत त्या परिस्थिती मध्ये कोणीही हेच म्हणलं असत की तो जिवंत नाही पण यातून ही तो मार्ग काढत जखमी अवस्थेत एक ग्रहावर तो काही काळचा खाद्यसाठा
पाहून तो सर्व चाचपणी करतो पुढील mission नासा चे उशिरा असताना सुद्धा तो हे धाडस करतो की जिवंत राहायाचे आहे.
आणि त्याचा पुढील प्रवास चालू करतो.
एक rover, एक lab, आणि काही computer यातच त्याचे आयुष्य असते
(आज कोरोना मुळे जी परिस्तिथी आहे त्यावर पाहण्यासारखा चित्रपट हा आहे कारण दीड वर्ष पेक्षा अधिक एलच जागी राहणं सोप्पं नाही भिडू)
एक scene असा की तो स्वतःच्या bio data मध्ये पाहतो की तो एक bootony तज्ञ आहे हा scene सर्वात आवडीचा आहे माझा
तो मंगळावर शेती करायचा निर्धार करतो ती लॅब तो शेती साठी विकसित
करतो मंगळावरील मातीतुन तो lab मध्ये बटाट्याची शेती चालू करतो
आणि त्याला खत म्हणून स्वतःचे आणि साथी चें शौच वापरतो हा एक मस्त scene चित्रित झाला आहे
आणि त्या नंतर तो पाऊस पडण्या करता लॅब पूर्ण प्लास्टिक ने झाकतो यामध्ये मुद्दा असा की अंतराळात कधीच ज्वलनशील पदार्थ किव्वा वस्तु नेता येत नाही
तरी देखील मित्राच्या राहिलेल्या अतरंगी वस्तूपासून तो एक gas fire  तयार करतो आणि ते पण असं की प्लास्टिक मध्ये Moisture तयार होऊन ते खाली असलेल्या बीजांवर पडतात,
मंगळावर पाऊस पडतो
त्यानंतर नासा चा उपग्रह त्याच्या हालचाली पाहतात आणि नासा ला कळत की mark  wotney जिवंत आहे त्यात एक असं की जो वैज्ञानिक त्याला परत आणण्या साठी प्रयत्न करताना दाखवलाय त्याचे आडनाव कपूर दाखवला आहे. Indian things
मी एक computer science student आहे आम्हाला hexadecimal numbers असा concept आहे त्यात A पासून F पर्यंत numerical codes आहे त्याचा वापर करून तो उपग्रहामार्फत तो संवाद साधतो यात त्याची शेती चालूच असते तो इतकी शेती करतो की त्याच्याकडे अजून 1 वर्ष पुरेल इतका बटाटा असतो.
पण हे सर्व घडत असताना त्याची lab जिथं शेती असते ते एका क्षणात स्फोट होऊन फुटते वाईट वाटतं ते पाहून तो nasa ला तसा Msg देतो nasa त्यासाठी तयारी करते खाद्य पदार्थ देण्याकरता पण ते rocket  fail होता आणि ते आशा निघून जाते की त्यापर्यंत सेवा पोहचेल मग चित्रपटात नवीन वळण येते त्याच्या साथी दारांना कळवण्यात येते की तो जिवंत आहे.
आणि तो साथीदारांसोबत बोलू लागतो,  Msg द्वारे यात असं आहे की त्याला जेव्हा कळते की तो जिवंत आहे हे साथीदारांना माहीत नाही तेव्हा त्याला वाईट वाटते कारण आपल्या मित्रांना ठाऊक नाही की तो जिवंत आहे असो चित्रपट नंतर वळण घेतो नायकाने वजन खूप घटवलेलेलं आहे हे कळून जाते त्याचा खायचा प्यायचा साठा संपायला येतो.
पण nasa शक्कल लढवते त्याच्याच साथीदारांना त्याला घेयला पाठवते
त्यासाठी त्यांना इंधन पुरवले जाते चीन मार्फत आणि nasa चे एक विमान जे मंगळाच्या वेगळ्या टोकावर असते आणि wontony दुसऱ्या टोकाला पण त्याला कळवले जाते की त्याला त्या विमानातून उड्डाण करून मंगळाच्या कक्षे बाहेरील विमानात यायचे आहे.
त्याचा परतीचा प्रवास चालू होतो आणि तो रोज 3 तास  rover charge करून मंगळाच्या दुसऱ्या टोकाकडे प्रस्थान करतो शेवटी तो nasa च्या त्या विमानापर्यंत पोहचतो. पण त्यासमोर एक आव्हान असते की कमी वजनात च विमान जास्त अंतर कापणार असते म्हणून विमानाचे वजन कमी करावे लागणार असते.
त्यानुसार तो विमानातील वरचे टोक खुर्च्या cockpit सर्व काढून फक्त विमान साथीदाराला कसे control होईल असे तयार करतो ठरलेल्या वेळेत साथीदार मंगळाच्या कक्षेत पोहचतात आणि wontony च विमान तिथून झेपावते पण मध्ये अंतर वाढते 2 विमानातील आणि wontony चे विमान भरकटण्यास सुरवात होते तरीही wontony हार मानत नाही आणि आपल्या हाताला छिद्र पाडून त्या हवेच्या साहयाने तो कॅप्टन पर्यंत पोहोचतो.
त्याचे साथीदार  त्यास वाचवतात अर्थात ते विमान सुद्धा slowdown करण्या करता एक स्फोट करून ते स्लो करतात पण ते wontony ला सुरक्षित पणे पृथ्वीवर पोचवतात.
या चित्रपटातून एक गोष्ट मी नक्की घेतली ती म्हणजे अफाट महत्वाकांक्षा.
The martian great movie i ever seen
– निखिल फेंगसे.
Screenshot 2020 04 05 at 12.02.25 PM

८. विराज सोनवणे ( दूसरा)  यांचा लेख

2035 मध्ये, मंगळावर एरेस तिसरा मिशनचा दल त्यांच्या 31-सोल मोहिमेपैकी मंगळ सौरदिनी (सोल) 18 रोजी अ‍ॅसीडलिया प्लॅनिटियाचा शोध घेत आहे.  तीव्र धूळ वादळ त्यांच्या मंगळावरील उन्नत वाहन (एमएव्ही) पाडण्याची धमकी देते.  या मोहिमेला घासून काढण्यात आला आहे आणि ज्यात खलाशी बाहेर पडले तसतसे अंतराळवीर मार्क वॅटनी भंगारात अडकले आणि वादळात हरवले.
त्याच्या सूटच्या बायोमनिटरवरील टेलीमेट्री खराब झाली आहे आणि वॅटनी मृत असल्याचे समजले आहे.  कोसळण्याच्या मार्गावर असलेल्या एमएव्हीसह, हर्मेस या परिभ्रमणवाहिनीसाठी हयात असलेले जहाज सोडून गेले.
वादळानंतर, जखमी झालेल्या आणि ऑक्सिजनच्या कमी चेतावणीसह वॅटनी जागृत होते.  तो क्रूच्या पृष्ठभागाच्या अधिवासात (“हब”) परत येतो आणि त्याच्या जखमेवर उपचार करतो.
वॅटनी ठीक होताच, त्याने व्हिडिओ डायरी सुरू केली.  पृथ्वीशी संवाद नसणे, बचावाची त्याची एकमेव संधी पुढील मंगळ मोहिमेद्वारे आहे, चार वर्षांनंतरः अरेस चौथा ,२०० किलोमीटर (२,००० मैल) दूर शियापरेली खड्ड्यात उतरणार आहे.  वॅटनीची त्वरित चिंता अन्न आहे;  मिशनचा वनस्पतिशास्त्रज्ञ म्हणून, तो क्रबच्या जैव-कचरासह सुगंधी मट्लियन मातीचा वापर करून हबच्या आत बाग तयार करतो आणि उरलेल्या रॉकेट इंधनातून पाणी तयार करतो.
त्यानंतर तो त्याच्या अन्न पुरवठ्यास पूरक म्हणून क्रूचा न वापरलेले थँक्सगिव्हिंग डिनर बटाटे लावतो.  त्याने एरेस चौथा लँडिंग साइटवर लांब पल्ल्याच्या ट्रेकसाठी रोव्हरमध्ये बदल करणे देखील सुरू केले.
एर एथ, नासा उपग्रह नियोजक मिंडी पार्क, एरियल हब प्रतिमांचा आढावा घेत, नोटिस हलवलेल्या उपकरणे आणि मार्क जिवंत आहे याची जाणीव करते.  नासाचे संचालक, टेडी सँडर्स यांनी सार्वजनिकपणे ही बातमी प्रसिद्ध केली आहे, जरी एरेस तिसरा चालक दल (अजूनही पृथ्वीकडे जाण्याच्या मार्गावर) त्यांना सांगण्यात आले नाही जेणेकरून ते त्यांच्या मोहिमेवर लक्ष केंद्रित करत राहिले.
क्रूजला माहित असावे असा विश्वास असणार्‍या हर्मीसचे उड्डाण संचालक मिच हेंडरसन यांना सँडर्सने ओव्हरल केले.
 1997 मध्ये मूक पडलेल्या जवळच्या पाथफाइंडर चौकशीसाठी वॉटनी रोव्हर घेते. पाथफाइंडरचा कॅमेरा आणि मोटर वापरुन, तो पृथ्वीशी प्राथमिक द्वि-मार्ग संप्रेषण करते, प्रथम हाताने लिखित चिन्हे वापरतो आणि नंतर हेक्साडेसिमलमध्ये एएससीआयआय पाठवितो आणि प्राप्त करतो.
रोव्हरला पाथफाइंडरशी लिंक करण्यासाठी आणि मजकूराद्वारे संवाद साधण्यासाठी नासा सॉफ्टवेअर पॅच प्रसारित करतो.  हॅटिसच्या क्रूला तो जिवंत आहे याची जाणीव नसल्यामुळे वॅटनेला राग आहे;  सँडर्स शेवटी हेंडरसन यांना त्यांची माहिती देण्यास परवानगी देतो.
 मंगळ मोहिमेचे संचालक, व्हिन्सेंट कपूर आणि जेट प्रोपल्शन लॅबोरेटरी (जेपीएल) चे संचालक ब्रूस एनजी व्हेटनीला एरेस चौथा येईपर्यंत टिकण्यासाठी पुरेसे अन्न पुरवण्यासाठी आयरिसच्या जागेची चौकशी तयार करतात.  दरम्यान, हॅबच्या एरोलॉकमध्ये बिघाड निर्माण झाला, ज्यामुळे एक प्रवेग उद्भवला आणि संरचनेस हानी पोहोचली.
वॅटनी हब दुरूस्त आणि दबाव आणते, परंतु मंगळाच्या वातावरणाने बटाट्याचे सध्याचे पीक नष्ट केले आणि माती निर्जंतुक केली.  कमी जोखीम असल्याचा विश्वास ठेवून सॅन्डर्स चौकशीच्या सुरूवातीला वेग देण्यासाठी नियमित उड्डाण-पूर्व सुरक्षा तपासणीला बायपास करण्याचे आदेश देते.  लिफ्ट ऑफनंतर 40 सेकंदानंतर रॉकेटचा स्फोट होतो.  मंगळावरील मृत्यू अटळ आहे, असा आता वॅटनीचा विश्वास आहे.
चायना नॅशनल स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन ताइयांग शेन हा शक्तिशाली वर्गीकृत बूस्टर रॉकेट विकसित करीत आहे.  नासाच्या शास्त्रज्ञांसमवेत कॅमेरेडी असल्यासारखे ते त्यांच्या सरकारच्या गोपनीयतेचे उल्लंघन करतात आणि आयरिस मिशनची पुनरावृत्ती करण्याची ऑफर देतात.
जसजशी वेळ निघेल तसतसे वॅटनीची परिस्थिती अधिक धोकादायक होते, जेपीएल ज्योतिषशास्त्रज्ञ रिच पुर्नेल यांनी एक पर्यायी योजना आखलीः तैयांग शेन हर्मीसचे प्रतिपादन आणि पुनर्स्थापना करा, जे नंतर एरेस चतुर्थांशपेक्षा दोन वर्षांपूर्वी मंगळावर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा वापर करेल.  सँडर्सने ही कल्पना नाकारली, हर्मीसच्या क्रूसाठी ती खूप जोखमीची आहे;
हँडरसनने पर्नेलची योजना गुप्तपणे पाठविलेल्या कर्मचायांना पाठवते जे एकमतपणे ते अंमलात आणण्यासाठी मतदान करतात.  ते नासाचे रिमोट कंट्रोल अक्षम करतात आणि कोर्स बदलतात.  त्यांना रोखण्यात अक्षम, नासाने या प्रकरणाची कबुली दिली.
वॅटनीने शियापरेलीचा 90-सोल प्रवास सुरू केला, जिथे एरेस IV साठी एमएव्ही पूर्व-स्थितीत आहे.  त्याच्या नवीन कोर्सवर हर्मीससह रोखण्यासाठी एमएव्हीला हलके करणे आवश्यक आहे.  वॅटनी बरेच घटक काढून टाकते आणि कॅनव्हाससह नाक शंकूची जागा घेते.
टेकऑफनंतर, एमएव्ही आवश्यक वेगापर्यंत पोहोचण्यात अयशस्वी होतो.  कमांडर लुईस हर्मीस कमी करण्यासाठी कुशलतेने हाताळतो, जास्त इंधन वापरतो.  ती जहाज योग्य प्रकारे संरेखित करण्यासाठी अंतर्गत वातावरणाचा दिशात्मक स्फोटक विघटन करण्याचा आदेश देते. मॅनेड मॅन्युव्हरिंग युनिटमध्ये, टेदर लहान झाल्यावर लुईस वॉटनीला पोहोचू शकत नाही.
वॉटनीने आपल्या दाबाचा खटला भोसकून, सुटलेली हवा वापरुन लुईसला यशस्वीरित्या ढकलले.  मार्कवर मार्कच्या 560 एकट्या सोडल्यानंतर तो आणि क्रू एकत्र आले.
पृथ्वीवर परतल्यानंतर वॅटनी अंतराळवीर उमेदवारांसाठी सर्व्हायव्हल इंस्ट्रक्टर बनते.  पाच वर्षांनंतर, एरेस व्ही सुरू होणार असल्याने वॅटनीच्या बचावमध्ये सामील असलेले लोक त्यांच्या सध्याच्या जीवनात दिसतात.
 विराज सोनवणे (दूसरा) 
विराज सोनवणे या एकसारख्या नावाच्या दोन व्यक्तिंचे लेख आल्याने पहिला व दूसरा असे टोपण नाव प्रेमापोटी देण्यात आले आहे. राग मानून देवू नये.

 

Screenshot 2020 04 05 at 12.02.35 PM

९. शेखर कौटकर यांचा लेख

 

THE MARTIAN” हा मूवी मी 2 ते 3 वर्षा पूर्वी पहिला.असा हा अद्भुत मूवी पाहून पहिल्यांदा मला वाटल असले ग्रेट मूवी आपल्या देशात का तयार होत नसतील.नंतर मला त्या मूवी बद्दल जाणून ग्यावी वाटल तर मी गूगल केल मला त्यातून कळलं कि ही मूवी 2015 ला ridley scoot या डायरेक्टर न बनवली.

Matt Damon या कलाकारांना खूपच चांगली कला दाखवली यात… ह्या मूवी 108 मिलियन मध्ये बनला आणि याने 630 मिलियन कमावले या अर्थी हा मूवी खूप success फुल्ल झाला.

या मूवी ची कथा मी मला आठवेल तशी सांगण्याचा प्रयन्त करतो.

मंगल ग्रह वर nasa चे काही लोक जातात. तिथं उतरल्यावर निरीक्षण चालू असताना वादळ येते त्यामुळं सर्व जण याना  मध्ये जातात पण हिरो चुकून याना प्रयन्त पोहचू शकत नाही खूप try करून पण त्याला यश येत नाही.

तेव्हड्या अवघड परिस्तिथी असताना पण हिरो स्वतः वर विश्वास ठेवतो त्याच्या याना मध्ये त्याला खाण्या करता फक्त एक बटाटा असतो तो तो खाऊन स्वतःची भूक मिटवून शकत होता पण तो  पुढचा विचार करतो आणि तो त्या बटाटा च एक झाड लावतो.

काही दिवसांनी त्याचे खूप सारे बटाटा भेटता आणि तो त्या बटाटा खाऊन खूप सारे वर्ष पण तिथं जिवंत राहतो.त्याला त्याच्या याना मध्ये ऑक्सिजन, बाथरूम सगळं काही सुविधा असतात…

असा प्रकारे एव्हड्या अवघड परिस्थिती मध्ये तो हिरो परिस्थिती चा सामना करतो आणि जिवंत राहतो हे पाहणं खूपच छान वाटत तिथं खूप सारे वाढले येतात तरी तो जगण्या साठी धडपड करतो आणि एक म्हणजे खूप आवडलं गोस्ट म्हणजे त्याच्या त्याच्या मित्रा वर असलेला विश्वास त्याला ठाम माहिती होत कि आपल्याला आपले सहकारी नक्कीच घ्यायला येणार आणि हीच उम्मेद त्याला जिवंत ठेवायला मदत करते…

आणि मी हॉलिवूड च्या खूप साऱ्या मूवी पहिल्या पण या मूवी चा एन्ड एव्हडा भारी एन्ड कोणतंच सापडला नाही खूपच अविस्मरणीय शेवट दाखवला आहे यांनी शेवटी त्याचे सहकारी त्याला घेण्या करता येतात तेव्हा खूप भारी पद्धतीने त्याचे सहकारी परिस्थिती सांभाळून घेतात असा प्रकारे हा मूवी न खरंच माझं हॉलिवूड मूवी बद्दल च प्रेम खूपच वाढवला..

एव्हढच म्हणाल मला काही बोलण्याची संधी दिली त्या बद्दल थँक्स…

तुमचं प्राईझ भेटू न भेटू पण माझ्या आवडत्या मूवी बद्दल काही लिहून खूप छान वाटल…

मी एक बॉलीवूड चा चाहता एव्हढच म्हणलं लवकर भारतात पण अशा प्रकारच्या मूवी याव्यात. या मूवी न खरंच शिकवलं पण मनात असाल तर माणूस काही करू शकतो फक्त जगण्याची इच्छा असावी…

तो माणूस फक्त बटाटा वर जिवंत राहतो एव्हड्या प्रतिकूल परिस्थिती मध्ये पण…

  • शेखर कौटकर 

Screenshot 2020 04 05 at 12.02.25 PM

१०. विशाल चौधरी यांचा लेख

2035 मध्ये, मंगळाच्या एस्डलिया पठारावर एरिस III ची मानवी मोहीम, 18 व्या सोल रोजी 31-सोल दिवस (मंगळ सौर दिवस) पर्यंत ही शोधमोहीम चालू ठेवते.  प्रचंड धूळ वादळामुळे मिशन थांबवत त्यांना हर्मीसभोवती फिरणाb्या मंगळावर परत जाण्याची योजना करावी लागेल. 

या निकालादरम्यान, अंतराळवीर मार्क वॅटनी उड्डाण करणारे हवाई परिवहनच्या मोडतोडमध्ये अडकून वादळात अडकले;  त्या शेवटच्या मेसेजमध्ये त्याच्या खटल्यातून जीवनाची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. 

क्रू त्याला वाचविण्याचा धोका घेण्यापूर्वी मिशन कमांडर मेलिसा लुईस या सर्वांना मार्कविना माव (एमएव्ही – मार्स Asसेन्ट व्हेकल / मार्केटच्या कक्षाभोवती फिरणारा रॉकेट) जाण्याचे आदेश देते.

वादळ शांत झाल्यानंतर, जखमी मार्क, खटल्यात ऑक्सिजनचे प्रमाण कमी असल्याचे सांगत जागे झाल्यावर, त्याच्या गटाच्या मंगळ मोहिमेसाठी खास ठेवलेल्या “हब” या त्याच्या बेस क्वार्टरकडे परत आला.

वॉटनीने तिच्या बायोमनिटर खटला फाडून तिच्या पोटात भोसकलेल्या अँटेनाचा शेवटचा भाग बाहेर टाकला.  हा तुटलेला अँटेना आणि रक्ताच्या गुठळ्यामुळे खटल्याच्या छिद्रेवर तात्पुरते शिक्का मारून त्याने आपला जीव वाचविला, ज्याचा पुरावा म्हणून त्याने व्हिडिओ डायरीत नोंद केला आहे.

आपला जीव वाचविण्याच्या एकाच संधीवर, त्याने असे भाकीत केले आहे की एरिस चतुर्थ बचावात परत आला, तर चार वर्षांनंतर, तो त्याच्या तळापासून 3,200 किमी अंतरावर शियापरेली खड्ड्यात उतरेल.

मर्यादित रेशनमुळे तो 300 सोल (सुमारे 30० days दिवस) पर्यंत जगू शकतो, व्हेटनी हे वनस्पतिशास्त्रज्ञांचे तज्ञ असून मंगळाच्या मातीतील कापणीचे पहिले खत म्हणून, ते व्हॅक्यूम पॅकेटमध्ये उपस्थित आहे.

विष्ठा, पाण्याची उपलब्धता, इतर रॉकेट इंधनांमध्ये ऑक्सिजनसह बर्न करून पिकाच्या नावाखाली बटाटे लावून वापरल्या जाणार्‍या हायड्रोजनचे जळण कमी करते.  प्राप्त आहे.  मग एकमेव कार्यरत रावर्स वाहनाची दुरुस्ती करतात जेणेकरुन त्यांना मंगळाच्या अफाट प्रदेश ओलांडून लांब प्रवास करण्याची आवश्यक क्षमता मिळू शकेल.

मंगळाचे ताजे उपग्रह फोटो पाहताना मिशनचे संचालक व्हिन्सेंट कपूर आणि उपग्रह नियोजक मिंडी पार्क यांना हे लक्षात आले की वॅटनी अद्याप जिवंत आहे.  परंतु हर्मीसच्या उड्डाण संचालक मिच हेंडरसनच्या समजण्यापलीकडे, नासाचे संचालक टेडी सेंडर्स निर्णय घेत आहेत की तो व्हेनेच्या पळून जाणा Arया एरिस तिसर्‍याच्या उर्वरित सदस्यांना जिवंत पळवून लावण्याची माहिती देणार नाही, अन्यथा तो मिशनपासून भटकून स्वत: ला धोका पत्करेल.  .

 1997 पासून निष्क्रिय असलेला पाथफाइंडर प्रब शोधण्यासाठी वॉटनी रोव्हरवर स्वार झाला. 

लँडरच्या फिरणार्‍या स्थिर चित्रपटाच्या कॅमेर्‍याच्या सहाय्याने वॅटनी आणि जेपीएल टीममधील जोडणी आता मूलभूत संवादांसाठी सुरू आहेत.

नासा टीमच्या सूचनेनुसार वॅटनी आता पाथफाइंडरला राउटरशी जोडते, जेणेकरून ते टाइप-टेक्स्ट संदेशांमध्ये संवाद साधू शकतील.  संघाला त्याच्या अस्तित्वाबद्दल माहिती देण्यात आलेली नाही म्हणून वॅटनी अत्यंत अस्वस्थ झाला आणि नंतर हँडरसनने सँडर्सच्या परवानगीने ही माहिती संघाकडे दिली.

हँडरसन आणि जेपीएल (जेट प्रोपल्शन लॅब) चे संचालक ब्रूस एनजी यांनी मंगळवारी एरिस चतुर्थ पाठविण्यापूर्वी वॅटनीला आवश्यक शिधा प्रदान करण्यासाठी स्पेस चौकशी देण्याची योजना आखली.

परंतु एचएबीची हवाई प्रणाली हवेच्या दबावामुळे विस्फोटित होते, वॉटनची कापणी नष्ट होते, तर प्रेषकांच्या त्वरित ऑर्डरनुसार, पथके तपासणी न करता ही पुरवठा अभियान (पुरवठा मोहीम) सुरू करतात.  परिणामी, उड्डाण दरम्यान तपासणी नष्ट होते.

पण सुदैवाने नासाला चीनच्या राष्ट्रीय अंतराळ प्रशासनाकडून ताययांग शेन नावाच्या रेडीमेड क्लासिफाइड बूस्टर मिळते जे मंगळावर मालाची वाहतूक करण्यास सक्षम आहे. 

दरम्यान, जेपीएलचे खगोलशास्त्रज्ञ रिच पर्नेल यांनी एक प्रवासी योजना आखली ज्यामुळे प्रबला मंगळावर लवकर पोहोचता येते.  यासाठी हर्मीससह चिनी बूस्टरमार्फत आवश्यक वस्तू पाठवून आपण आणखी 18 महिने ते अवकाशात काढू शकता.

परंतु प्रेषक हे पूर्णपणे खोडून काढतात कारण तो हर्मिसच्या सदस्यांना कोणत्याही जोखमीवर ठेवू शकत नाही, परंतु हेंडरसन ही माहिती हर्मिसला गुप्तपणे पाठवते.  कमांडर लुईस आणि त्याचे दल हे एकत्रीतपणे या बचाव योजनेच्या निवडीचा निर्णय घेतात आणि नासाच्या नियमांविरूद्ध – हर्मीसवर माल पाठवतात आणि मंगळाच्या दिशेने जातात, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीला त्याच्या कक्षेत फिरत असतात.

 1461 सोल डे संपल्यानंतर वॅटनी 90 ०-सोल दिवसाच्या प्रवासातून शियापरेली खड्ड्याच्या दिशेने निघाले, जेथे तो एरिस चतुर्थ मिशनसाठी माव (एमएव्ही) चढणार आहे.  परंतु हर्मीसच्या निश्चित उड्डाणांसाठी वॅटनीला वेग वाढविण्यासाठी वाहनाचे अतिरिक्त वजन कमी करण्यासाठी वाहनाची अनावश्यक उपकरणे, त्यांचे खिडक्या, नोजकन्स (वाहनाची छप्पर) आणि बाहय बाहेर काढणे आवश्यक आहे.  आता पाण्याच्या जवळजवळ रिक्त मावळ्यावर स्वार होऊन हर्मिसने तिला दूरवरच्या लाटांनी चालवलेली लॉन्चिंग चालू केली पण या योजनेमुळे तिचा वेग व अंतर नियंत्रित होत नाही.

यावर उपाय म्हणून ते हर्मीसमधील अंतर्गत स्फोटाच्या स्फोटात वाहनात एअर करंट टाकून वेग वाढवतात.  कमांडर लुईस एमएमयूमध्ये उपस्थित नायट्रोजन वायूचा वापर करून मार्कच्या वाहनापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो, परंतु अयशस्वी होतो.  वॅटनी त्याच्या दाबांचे हातमोजे कापून कॅप्सूलमधून बाहेर पडतात आणि या सूक्ष्म थ्रस्टरच्या मदतीने जोरदार वारा त्याला लुईस पर्यंत पोहोचवते.  या बैठकीवर सर्व पक्षांचे लोक खूपच भावनिक होतात, उर्वरित जगातील लोक देखील या वृत्ताचा आनंद साजरा करतात.

पृथ्वीवरील मागे, वॅटनीने त्याच्या जीवनाचा “पहिला दिवस” ​​सुरू केला आणि सर्व्हायव्हल इन्स्ट्रक्टर म्हणून त्यांनी या अंतराळवीर प्रशिक्षण कार्यक्रमात अत्यंत नवीन परिस्थितीत समस्या सोडवणे आणि सर्जनशील अभियांत्रिकी यांचे अनुभव सामायिक केले.

पाच वर्षांनंतर वॅटनीची बचावकार्य सुरू होते तेव्हा एरिस व्ही (पाच) लाँच केले जाते आणि आता नवीन लोक या मोहिमेस प्रारंभ करतात.

Thanking you.

Vishal chaudhari

7972633250

११. निलेश पवार यांचा लेख  

 

हॉलिवुडचं मंगळाशी सुत जमवणारा “द मार्शियन”

“मंगळ” ग्रह म्हणजे भारी खतरनाक मानतात. आपल्याकडे कुणाला मंगळ असेल तर मग त्याचे/तिचे लग्न होणे महाकठीण. तर अशा या मंगळाचे व हॉलिवूडचे कधी जमलेच नाही. त्यांनाही या ग्रहाचे मोठे आकर्षण परंतु त्यांनी बनवलेले “रेड प्लानेट”, “मिशन टु मार्स” असे अनेक चित्रपट येऊन गेले पण तितक्याच दणक्यात आपटले होते. 

त्यातच आणखी एका नवीन चित्रपटाची घोषणा झाली “द मार्शियन”. यापुर्वीचा इतिहास एवढा खराब असताना मंगळावर चित्रपट बनवण्याचं धैर्य नावजलेले दिग्दर्शक ग्रिडली स्कॉट यांनी दाखवले. त्यांचे यापुर्वी सायन्स फिक्शन असलेले एलियन, ब्लेड रनर असे बरचशे चित्रपट गाजलेले होते.

हा चित्रपट याच नावाच्या कादंबरीवर आधारित आहे. या चित्रपटात हॉलिवुडचा नावाजलेला मॅट डेमन याने मुख्य भुमिका साकरली आहे. “ब्रिंग हिम होम” अशी या चित्रपटाची प्रेक्षकांना साद घालणारी व त्यांना भावलेली टॅगलाईन होती.

तर चित्रपटाची कथा अशी आहे की,

मंगळावर गेलेली नासाची टिम मातीचे नमुने गोळा करत असताना अचानक वादळ येते. या वादाळातून घाई घाईमध्ये यानात जात असताना त्यांच्यातील एक सहकारी व वनस्पती शास्त्रज्ञ असलेला मार्क वॉटनी(मॅट डेमन)  हा पाठी राहतो. इतका वेळ होऊनही तो परत आला व त्याचा मृत्यु झाला हा विचार करुन ती टीम परत पृथ्वीवर येण्याचा प्रवास सुरु करते.

त्यानंतर अपुर्‍या साधनांसोबत व आपल धैर्य न सोडता त्या परग्रहावर जगण्याची त्याची झुंज अतिशय थरारक तेवढीच मजेशीरपणे या चित्रपटात मांडण्यात आली आहे. 

त्याच्या टिमला तो जिवंत आहे समजल्यावर त्याला परत आणण्यासाठीची धडपड, नासा व तेथील शास्त्रज्ञांची पराकाष्ठा व नायकाने परग्रहावर जिंवत राहण्यासाठी आपल्या ज्ञानाचा केलेला वापर हे सर्व चित्रपटात सोप्या पध्दतीने मांडले आहे. 

नासाच्या दुसर्‍या मोहिमेपर्यंत किती दिवस येथे रहावं लागेल याचा नायकाने मांडलेला हिशोब तसेच खाण्यासाठी पुरेल त्यासाठी बटाट्यांची केलेली लागवड त्यांची वाढ होतानाचे चित्रीकरण ते अप्रतिमच आहे.

या चित्रीकरणाचा किस्सा असा की चित्रीकरणादरम्याने खर्‍या बटाट्यांची लागवड करण्यात आली होती. व वाढ दाखवण्यासाठी वेगवेगळ्या कालावधीत लावलेल्या बटाट्यांचे चित्रीकरण करण्यात आले.

या चित्रपटात एकटा असूनही नायकाची विनोदीवृत्ती तशीच ठेवण्यात आली आहे त्यामुळे चित्रपट कुठेही कंटाळवाणा होत नाही. 

दिग्दर्शक व निर्मात्यांनी यासाठी नासाचे सुध्दा मार्गदर्शन घेतले होते. नासानेही अंतराळाची माहीती लोकांपर्यंत पोहचण्यासाठी चित्रपटाचा वापर होईल यासाठी विज्ञान व मंगळावरील वातावरण याची माहीती देऊन त्यानुसार पटकथेत सुधारणा करण्याबद्दल मार्गदर्शन केले.

ऑक्टोबर २०१५ ला नायकाची मंगळावरील सफर व नासाच्या पुढच्या योजना याबद्दल एक नवीन वेब टुल बनवले.

तर असा हा चित्रपट २ ऑक्टोबर २०१५ ला चित्रपटगृहात लागला.

समिक्षकांनी तर त्याला डोक्यावर घेतला. मजेशीर, थरारक सफर, रिडली स्कॉटच दणक्यात पुनरागमन वगैरे शब्दात स्तुती केली. चित्रपटाची कथा, संगीत, पटकथा, चित्रीकरण व वैज्ञानिक अचुकता याबद्दल सर्वत्र कौतुक झाले. त्यावेळेचे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामांनी तर मी आजवर पाहिलेला सर्वोत्कृष्ट सायन्स फिक्शन असे कौतुक केले. 

या चित्रपटाची नासाच्या शास्त्रज्ञांनीही स्तुती केली. तीन वेळा अंतराळाची सफर करणारे गॅरेट रेसमन म्हणतात “अंतराळावीरांची निवड ही एकाग्रता व निर्णय घेण्याची क्षमता यावर होते.

चित्रपटात दाखवल्याप्रमाणे कठीण प्रंसगी आपण भान राखत जगण्यासाठी किती पटकन निर्णय घेतो यावरच आपलं जगणं अवलंबून असते”. नासाही एक दिवस माणूस मंगळावर पोहचेल याची आशा बाळगून आहे. 

हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. तब्बल ६३० दशलक्ष अमेरिकन डॉलरची कमाई चित्रपटाने केलीच शिवाय चित्रपटाला अॉक्सरमध्ये तीन नामांकन मिळाले व गोल्डन ग्लोबचा सर्वोत्तम चित्रपट (संगीत/विनोदी) व मॅट डेमनला सर्वोत्तम नायक पुरस्कार मिळाला तसेच चित्रपटाला इतर अनेक पुस्कारही मिळाले. 

.आणि याचबरोबर मंगळ आणि हॉलिवूडचं सुत एकदाच जमलचं!

– निलेश पवार 

@nileshpawars

आपल्या पसंतीचा लेख कमेंटमध्ये कळवा. 

Leave A Reply

Your email address will not be published.