अहमदनगरच्या फिरोदियांनी एक नवीन वाहन तयार केलं, ज्याला आज आपण रिक्षा म्हणतो.

१४ ऑगस्ट च्या मध्यरात्री देशाचा नियतीशी केलेला करार संपला. भारत स्वतंत्र झाला. त्या दिवशी स्वातंत्र्यसैनिकांच एक कार्य संपल आणि राष्ट्रउभारणीच दूसरं कार्य सुरु झालं. अनेकांना आपल्या देशाबद्दलची जी काही स्वप्नं होती ती पुर्ण करायला त्यांनी आपापल्या परीने सुरवात त्यांनी केली.

अशातलच एक प्रमुख नांव म्हणजे नवलमल कुंदनमल फिरोदिया.

अहमदनगरचे नवलमल फिरोदिया हे गांधीवादी होते. १९४२ च्या चले जाव आंदोलनात त्यांनी भाग घेतला होता. त्याबद्दल त्यांना कारावास सुद्धा सहन करावा लागला होता.

स्वातंत्र्यानंतर देशाला स्वतः च्या पायावर उभे राहायचे झाले तर औद्योगिकीकरण हाच उपाय होता हे त्यांनी वेळीच ओळखलं होतं. त्याकाळातल्या बॉम्बे विधानसभेमध्ये झालेल्या चर्चेत त्यांनी हाताने सायकल रिक्षा ओढणाऱ्या माणसांच्या व्यथाबद्दल प्रश्न ऐकले.

रिक्षाला माणसाने ओढण्या ऐवजी तीला मोटर बसवली तर ?

मोटर असणारी रिक्षा असा विचार त्यांच्या मनात सुरु झाला. एक दिवस विदेशी मॅगझीन चाळत असताना त्यांना माल वाहतूक करणाऱ्या तीन चाकी गाडीचा फोटो दिसला. त्यांनी इंजिनियर असलेल्या आपल्या छोट्या भावाला हस्तीमल फिरोदियाला घेऊन त्याच प्रकारचे मॉडेल भारतात बनवलं.

१९४८ च्या मुंबई काँग्रेस अधिवेशनात ते मॉडेल पंतप्रधान नेहरुंना दाखवण्यात आलं.

Screen Shot 2018 09 09 at 2.54.46 PM
Force motor

प्याजीओ कंपनीच्या एप गाडीच्या चेसीस वर लोकल बनवलेली बॉडी बसवलेले हे मॉडेल होते. खरं तर प्याजीओ ने त्यांच्याच वेस्पा स्कूटरला आणखी एक चाक जोडून ही तीन चाकी मालवाहू गाडी बनवली होती. फिरोदियांनी बनवलेल्या मॉडेल मध्ये काही त्रुटी होत्या. पुढे त्यात संशोधन करून अनेक बदल करण्यात आले.

अखेर १९५९ साली भारत सरकारने हिरवा झेंडा दाखवल्यावर पुण्यामध्ये या रिक्षाचं प्रोडक्शन सुरु झालं. नवलमल फिरोदियानी त्याला नांव दिल ऑटो रिक्षा. आजही जगात कुठेही या गाडीला फिरोदिय नी दिलेल्या नावानेच ओळखलं जात.

बजाज आणि टेम्पो या दोन कंपन्याच्या सहकार्याने बनवलेल्या बजाज टेम्पो या कंपनीमध्ये ही निर्मिती सुरु झाली.

फिरोदिया यांच्याच प्रमाणे स्वातंत्र्यसैनिक घराणे असलेल्या बजाज यांना स्कूटर बनवण्याचे लायसन्स मिळाले होते. पुण्यात शेजारी शेजारी असलेल्या या कंपन्यांनी हातात हात घालून देशाला वेगाने प्रगतीपथावर नेण्याचं काम सुरु केलं होत.

नवलमल फिरोदिया फक्त रिक्षा बनवून थांबले नाहीत.

त्यांनी मालवाहतूक गाडी भारतात लॉंच केली. आजही अशा गाड्यांना भारतात टेम्पो याच नावाने ओळखले जाते. छोट्या वस्तूंच्या मालवाहतुकीसाठी तीन चाकी मिनीडोर असेल की मिनीबसच्या रुपातली मॅटेडोर असेल या सर्व गाड्या बनवताना कष्टकरी गरीब जनतेचा विचार सर्वप्रथम केला गेला.

नवलमल फिरोदिया यांच सच्चा गांधीवादी असणं यातून अधोरेखित होते.

पुढे बजाज यांच्या सोबत झालेल्या वादातून त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. आजही फोर्स मोटर्सच्या टेम्पो ट्रॅव्हलर असेल त्यांचे ट्रॅक्टर असेल, कार्गो असतील ट्रॅक्स असतील किंवा जगभर धावणाऱ्या बजाज ऑटोरिक्षा असतील त्यांना पाहिलं की भारताच्या ऑटो इंडस्ट्रीचे जनक नवलमल फिरोदिया यांच देशकार्य पूर्णत्वास गेलं असं मानता येऊ शकत.

हे ही वाचा – 

Leave A Reply

Your email address will not be published.