त्यांना सांगण्यात आलं होतं, भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत थांबायचं नाही, भाषण करत राहायचं…

भारतरत्न माजी राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन. ते एक शिक्षक होते, लेखक होते, तत्वज्ञ होते पण राजकारणी नव्हते. जगभरात त्यांच्या ग्रंथांची ख्याती पसरली होती. स्वतः जवाहरलाल नेहरू त्यांचे चाहते होते. गांधीजींशी त्यांची मैत्री होती पण काँग्रेसच्या राजकारणाशी कोणताही संबन्ध त्यांचा आला नाही. अगदी  स्वातंत्र्यलढ्याच्या काळात आणि स्वातंत्र्यानंतरही त्यांनी राजकारणात प्रवेश केला नाही.

राजकारणाबाहेरच्या राधाकृष्णन यांना राष्ट्रपती बनविण्यामागे एकप्रकारे पंडित नेहरू यांचा हात होता.

वास्तविक, भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद आणि देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांच्यातील ताणलेले संबंध क्वचितच कोणापासून लपून राहिले असतील. यामागचे एक कारण म्हणजे राजेंद्र प्रसाद यांची धार्मिक वृत्ती. त्यांच्या याच स्वभावामुळे नेहरूंना १९५७ मध्येच प्रसाद यांच्याऐवजी राधाकृष्णन यांना राष्ट्रपती बनवायचे होते. जे त्यांनी पुढच्या पाच वर्षांनी करून दाखवले.

हिंदू तत्ववेत्ता म्हणून ओळखले जायचे राधाकृष्णन

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन आपल्या विद्ववत्तेसाठी प्रचंड प्रसिद्ध होते. त्यांची भाषणावर चागंलीच पकड होती. त्यांच्या व्याख्यानाचा एक अनोखा इतिहास आहे. १४ ऑगस्ट १९४७ रोजी मध्यरात्री भारत अखेर स्वतंत्र होण्यास पूर्णपणे तयार होता.

संविधान सभेची ही ऐतिहासिक बैठक होती. राधाकृष्णन या बैठकीस उपस्थित होते.

बैठक सुरू झाली. नेहरूंनी अचानक राधाकृष्णन यांच्याकडे जाऊन एक विनंती केली. त्यांनी राधाकृष्णन यांना स्वातंत्र्यदिनानिमित्त भाषण करण्यास सांगितले. राधाकृष्णन यांची कोणतीही तयारी नव्हती. तरी त्यांनी नेहरूंच्या आग्रहाखातर  व्यासपीठावर चढून आपले ऐतिहासिक भाषण केले.

नेहरूंनी त्यांना सांगितलं होत की बरोबर ११.५९ वाजता आपले भाषण पूर्ण करा जेणेकरुन नवीन सरकार शपथ घेईल.

एस गोपालनच्या शब्दांत, ही “भाषण की समय सीमा में बंधी रिले दौड़ थी.”

राधाकृष्णन त्यादिवशी फक्त संसदेच्या व्यासपीठावरून भाषण देत नव्हते, तर शब्दांच्या माध्यमातून या नव्या लोकशाहीचा पाया रचला होते. आपल्या भाषणात त्यांनी स्वराज्याचा संदर्भ एका संस्कृत श्लोकात सांगितला-

सर्वभूता दिशा मात्मानम, सर्वभूतानी कत्यानी
समपश्चम आत्म्यानीवै स्वराज्यम अभिगछति

अर्थात स्वराज अशा सहनशील स्वभावाचा विकास आहे, जो आपल्या मानवी बांधवांमध्ये देवाचे रूप पाहतो. असहिष्णुता हा आमच्या विकासाचा सर्वात मोठा शत्रू आहे. एकमेकांच्या विचारांना सहिष्णुता हा एकमेव स्वीकार्य मार्ग आहे.

राधाकृष्णन यांनी ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत खिंड लढवली आणि १२ वाजता नेहरूंकडे माईक सोपवला. नेहरूंनी भारताचा पंतप्रधान म्हणून सत्ता स्वीकारली आणि आपले ऐतिहासिक भाषण केले,

“बऱ्याच वर्षांपूर्वी आम्ही नशीबाला वाचन दिलं, आणि आता अशी वेळ येत आहे जेव्हा आपण आमच्या प्रतिज्ञेची पूर्तता करू, पूर्णपणे किंवा पूर्ण प्रमाणात नव्हे तर खूपच मोठ्या प्रमाणात. मध्यरात्रीच्या झोपेच्या वेळी, जेव्हा जग झोपेल तेव्हा भारत जीवन आणि स्वातंत्र्यासाठी जागृत होईल. “

अशा रीतीने नेहरूंनी नियतीशी करार म्हणून प्रसिद्ध असलेले आपले भाषण केले आणि भारत स्वतंत्र झाल्याची घोषणा केली. या त्यांच्या भाषणाचा पाया राधाकृष्णन यांच्या मॅराथॉन भाषणावेळी रचण्यात आला होता.

राधाकृष्णन यांच्यावर नेहरूंचा विश्वास तेव्हापासून होता. 

राधाकृष्णन हे एकमेव राष्ट्रपती होते, जे त्यांच्या कार्यकाळात दोन पंतप्रधानांच्या मृत्यूचे साक्षीदार होते. ११ जानेवारी १९६६ रोजी ताशकंद येथे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे निधनही त्यांच्या कारकिर्दीत झाले.

१९६२ च्या भारत चीन युद्धाचे आणि १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धाचे राष्ट्रपती म्हणून ते साक्षीदार होते. या राष्ट्रपतींबद्दल आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे त्यांना काही गुन्हे सोडून आणि फाशीची शिक्षा काढून टाकायची होती. आपल्या कारकिर्दीत त्यांनी फाशीच्या शिक्षेविरूद्धची प्रत्येक दया याचिका स्वीकारली.

राष्ट्रपती होण्यापूर्वी १९५४मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.