ओमायक्रॉनला नंतर घाबरा आधी त्याची टेस्ट करायची कशी ते वाचा !

पत्रकाराला सगळंच माहीत असतं….

या उक्तीप्रमाणे एका मित्राने विचारलं की

ओमायक्रॉनची टेस्ट कशी करतात ?

उत्तर मला पण माहीत नव्हतं. बेसिक डोक्यात होतं की, SARS-CoV-2 RT-PCR या टेस्टद्वारे समजतं, कारण ही कोरोनाची टेस्ट आहे. पण मग हीच का ? ओमायक्रॉन तर नवा व्हेरियंट आहे. मग नवी टेस्ट पाहिजे.

तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील. फक्त हे आर्टिकल वाचा..

तर शास्त्रज्ञ SARS-CoV-2 RT-PCR या टेस्टनेच ओमायक्रॉन या नव्या कोविड-19 व्हेरियंटची पडताळणी करत आहेत.

मग यात हे पाहिले जातय की लस देऊन रुग्ण बरा होऊ शकतो की नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढवून तो बरा होऊ शकतो ? हा व्हेरियंट खूप वेगाने पसरू शकतो का ? या सगळ्या दरम्यान, तुम्हाला ओमिक्रॉनमधल्या हरवलेल्या S जीनबद्दल माहीत नसेल. कारण हाच नवा फॅक्टर आहे.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने आपल्या एका अहवालात म्हटलय की,

S जीन ओमिक्रॉन या नव्या व्हेरियंट मध्ये दिसत नाही. म्हणजे याआधीच्या कोरोनाच्या व्हेरियंट मध्ये तो दिसला होता. SARS-CoV-2 साठी डब्ल्यूएचओचा एक तांत्रिक सल्लागार गट आहे. TAG-VE यांनी हा अहवाल देताना सांगितलं की RT-PCR मध्ये तीनपैकी एक जीन्स गायब आहे.

रॉयटर्सच्या अहवालानुसार, नोव्हेंबर 2019 मध्ये, दक्षिण आफ्रिकेतील सर्वात मोठी खाजगी लॅब Raquel Viana यांनी कोरोनाव्हायरसच्या 8 नमुन्यांमधून जीन्सचे अनुक्रम काढले.

पुढं या जीन्सचं सॅम्पल टेस्टिंग लॅन्सेट लॅब मध्ये करण्यात आलं. तोपर्यंत या कोरोनाच्या जीन्स मध्ये मोठ्या प्रमाणात म्यूटेशन झालं होतं. हा वायरस स्पाईक प्रोटिनच्या रुपात ह्युमन बॉडीमध्ये एन्ट्री करतो. आणि त्याच्या या रुपामुळे त्याला ह्यूमन सेल मध्ये लगेच एन्ट्री मिळते.

ज्यावेळी आफ्रिकेत हा रिसर्च सुरु होता तेव्हाच PCR Lab ने काही महत्वपूर्ण माहिती बाहेर काढली. त्यावेळी त्यांना कोरोनाच्या एका म्युटेशन मध्ये S जीन सापडलाच नाही. आता हा जीन सापडला म्हणून टेस्ट निगेटिव्ह आल्या का ? तर नाही बाकीच्या जीन्स मध्ये कोविडची नवी लक्षण दिसतच होतीत.

PCR टेस्ट प्रत्येक प्रकारच्या कोविडच्या व्हेरियंटला पकडू शकतो.

ही टेस्ट हे सांगू शकत नाही की हा कोणत्या प्रकारचा म्युटेशन सॅम्पल आहे. पण एवढं आहे की हा कोरोना आहे हे त्यावरून कळत. ही टेस्ट बेसिकली जिनोम सिक्वेन्सिंग करते. जर यात S जिनोम आढळला नाही तर तो ओमीक्रोन पेशंट आहे हे समजतं.

ThermoFisher Scientific या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार,
ओमायक्रॉन व्हेरियंट मध्येच आत्ता पर्यंत 60 ते 70 प्रकारच्या जिनोमचं म्युटेशन झालं आहे. या सगळ्या म्युटेशन मध्येच तो S जिनोम गायब झाला आहे. बाकी कोरोनाच जसं आहे अगदी तसंच आहे.

म्हणून महाराष्ट्र सरकारने या टेस्टिंगने शोध मोहीम सुरू केली. महाराष्ट्रात जेवढ्या RT-PCR लॅब्स आहेत त्यांना निर्देश देण्यात आले की, S-gene ड्रॉप डिटेक्शन किट वापरुन ओमायक्रॉनची टेस्ट करा.

मग आता तुम्हाला समजलं असेलच की, RT-PCR करूनच ओमायक्रॉन नावाच्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची टेस्ट करायची.

हे ही वाच भिडू

 

English Summary:

Swabs from polymerase chain reaction (PCR) tests, which are sent to labs for analysis, can show if the variant causing the infection looks like Omicron, Delta or something else.

Between a third and a half of UK labs – but not all – have the required technology to detect suspected Omicron cases. That means some parts of the country may identify more Omicron cases more quickly.

WebTitle: omicron update: How to test a new Corona variant Omicron

Leave A Reply

Your email address will not be published.