वजन कमी करून वर्ल्ड रेकॉर्ड केला होता, आता इम्रानला चॅलेंज देऊन पंतप्रधान होणार म्हणतायत..
पाकिस्तानची परिस्थिती आधीपासूनच खराब आहे, त्यात आता महागाईच्या दररोजच्या नव्या आकड्यामुळं तर लुळं – पांगळ व्हायची वेळ आलीये. पेट्रोल, लाईट, गॅस बरोबर साखर, पिठं आणि भाजीपाल्या सारख्या गरजेच्या गोष्टींच्या किमती सुद्धा खिशाला न परवडणाऱ्या झाल्यात. हद्द म्हणजे सध्या कोरोनाची परिस्थिती डोक्यावर असताना औषधं सुद्धा महाग झालीये. जनता इम्रान खानच्या नावानं बोट मोडायला लागलीत. म्हणजेच काय तर परिस्थतीतला वैतागलेल्यांनी पंतप्रधान बदला अशी उघड -उघड मागणी सुरु केलीये. या हालाखीच्या परिस्थतीत, पाकसाठी एक मसीहा समोर आलाय. नाम है “मोअज्जम महमूद खान नियाजी”.
या नियाजीला पाकिस्तानचा पुढचा पंतप्रधान म्हंटल जातंय. ज्याच्यात पाकचं भविष्य उज्वल करण्याच्या सगळ्या क्वालिटी आहेत. लोक त्याला इम्रानच्या जागी दुसरा पर्याय असल्याचे म्हणतायेत. पण खरं म्हणायचं तर आपल्या सख्ख्या शेजाऱ्यांची सध्याची परिस्थती पाहता हा एकमेव पर्याय आहे, असं म्हणायला वावगं ठरणार नाही.
आता या मोअज्जम महमूद खान नियाजीची ओळख करून द्यायची म्हंटल, तर हा भिडू स्वतःला एक महान वैज्ञानिक, स्किन स्पेशलिस्ट, डाएट स्पेशालिस्ट, केमिकल इंडस्ट्रीचा चीफ एक्सिक्युटीव्ह आणि राजकीय पक्ष पाकिस्तान अमन लीगचा अध्यक्ष म्हणवून घेतो.
— Dr.Moazzam Mahmood Niazi (@DrMoazzamMahmo3) June 29, 2021
‘इनके पास चिनी है, पेट्रोल है, इम्रान के पास क्या है’
आता हे जरा पाणचट जोक मारल्यासारखं वाटेल पण, मोअज्जम महमूद खान नियाजीला वाटतं कि, पाकचा २३ वा पंतप्रधान बनण्यासाठी त्यात प्रत्येक प्रकारची क्षमता आहे. महत्वाचं म्हणजे तो अविवाहित आहे, जे त्याला देशातला सगळ्यात परफेक्ट बॅचलर बनवत.
त्याच्या पर्सनल लाईफमध्ये डोकवायलं तर त्याला जेमिमा खान फार आवडते. भारतावर राग असला तरी हेयरस्टाईल मात्र आपल्या शाहरुख सारखी, तर अंदाज मार्टिन लूथर किंग सारखा. वजन कमी करण्यात त्यानं वर्ल्ड रेकॉर्ड बनवून ठेवलाय. आता एवढं सगळं असताना त्याच्या ट्विटरवर फक्त १२०० फॉलोवर्स असल्यानं काय फरक पडतो.
त्याचे जबरदस्त असे टू-इन-वन दावे बुचकाळयात पाडणारे आहेत. त्याच्या म्हणण्यानुसार तो पाणी आणि सौर उर्जेला पेट्रोल आणि साखरेत बदलू शकतात. आणि या सोलर प्रक्रियेनं बनणारी साखर डायबेटिज पेशंटसाठीही सुरक्षित असेल. आता या पठ्ठ्याच्या बोलण्यावरून एक गोष्ट तर पटली कि, तो पंतप्रधान बनेल नाही तर नाही, पण एक महान वैज्ञानिक मात्र शंभर टक्के बनणार. त्यांच्या या आश्वासनानंतर तर भिडू कोणीही वोटिंग करतंय.
Great Scientist Chairman Pakistan Aman League Future Prime Minister Of Pakistan Dr.Moazzam Mahmood Khan Niazi Address To Nation pic.twitter.com/9ShzBz1kGS
— Dr.Moazzam Mahmood Niazi (@DrMoazzamMahmo3) June 29, 2021
पाकिस्तानमध्ये अश्या महान संशोधकांची काही कमतरता नाही. तुम्हाला पाण्याने कार चालवण्यासाठी आगा वकारची वॉटर किट आयडिया आठवतेय. ज्याचं पाकिस्तानात अणुबॉम्बचे जनक ए.क्यू. खानने सुद्धा स्वागत केलं होत. पण पाकिस्तानच्या रहिवास्यांना फुकटात पेट्रोल आणि साखर देण्याच्या विचारला तर शंभर तोफांची सलामी, जे नियाजीला पंतप्रधान बनवणारच. आणि ह्याच आयडिया जर
तर पेट्रोलच्या बाबतीत तरी पाक महाशक्ती बनणार हे फिक्स.
सोशल मीडियावर या नियाजीचे मोठ्या प्रमाणात कौतुक होतंय. दरम्यान त्यानं २०१८ च्या निवडणुकीपासूनच पंतप्रधान पदावर डोळा ठेवला होता. आपल्या आक्रमक भाषणापासून ते ट्विटर क्रॅश करणाऱ्या सध्याच्या एन्ट्रीमुळे हे स्पष्ट आहे कि, पाकिस्तानात हवेची बदलणारे.
The last hope…🙌🥰 pic.twitter.com/asDl5dcylv
— Ali Axhar (@ali_axhar) June 29, 2021
नियाजीच्या दाव्यानुसार त्याचा पक्ष अमन लीग निवडणुकीत पाकिस्तानचा सगळ्यात मोठा पक्ष म्ह्णून समोर येईल. आता या सगळ्यानंतर नियाजीला एक मौका देना तो बनता है ना बॉस. पण यासाठी नियाजीला सगळ्यात आधी आपला पक्ष पाकिस्तान निवडणूक आयोगात रजिस्टर करावा लागेल. नाहीतर पाकच्या भविष्याच्या पंतप्रधानाला निराश व्हावं लागू शकत. मात्र आता हा वाद तर मिटलाय कि, इम्रानच्या जागी कोण ?
हे ही वाच भिडू :
- तीन बेगम और एक प्लेबॉय उर्फ इम्रान खान
- हाफिज सईदच्या घराबाहेर बॉम्ब फुटला अन पाकिस्तानचे पंतप्रधान थेट ISI च्या ऑफिसमध्ये गेले..
- ज्या प्रोजेक्टमूळ चीन बेंडकुळ्या दाखवतं हुतं त्यासाठी पाकिस्तानचं पाय धरायची वेळ आलीय