प्लेयर माघारी निघाले, पेपरवाल्यांनी बातम्या द्यायचं बंद केल. IPL बद्दल जगाचं काय म्हणणं आहे ?

कोरोना महामारीच्या बाबतीत भारत सध्या रेड लिस्ट मध्ये आहे. रोजचे वाढते आकडे काळजात धडकी भरवणारे आहे. अशा गंभीर परिस्थितीत आयपीएल खेळवली जाऊ नये इथपर्यंत प्रकरण आलं होतं.

आयपीएल सुरु होण्याअगोदरच काही संघांचे खेळाडू आणि मॅनेजमेंट मधील काही लोकं कोरोना पॉझीटीव्ह आले होते तेव्हा मात्र आयपीएलवर टांगती तलवार होती. या प्रकारामुळे आयपीएल प्रशासनाने अधिकाधिक काळजी घेत आयपीएल स्पर्धा खेळवली मात्र वैयक्तिक कारणे देऊन खेळाडू मायदेशी परतत आहे. अनेक मोठ्या क्रिकेटपटूंनी आयपीएल स्पर्धेवर ताशेरे ओढले आहे.

भारतातली कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस बळावत असताना आयपीएल स्पर्धा होऊच कशी शकते असा सवाल ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ऍडम गिलख्रिस्टने केला आहे.

इतक्या भयंकर संकटाचा सामना जग करत असताना खरंच आयपीएल खेळवणं गरजेचं आहे का ? कि मूळ मुद्द्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी आयपीएल भरवली गेली आहे ? तरीही सगळ्यांनी काळजी घ्या…अशा आशयाचं ट्विट गिलख्रिस्टने केलं.

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तरनेही संतप्त सवाल केला कि खेळाडूंच्या जिवापेक्षा आयपीएल महत्वाची आहे का ? परिस्थिती बघून तरी निर्णय घ्यावेत. पाकिस्तानी पीएसएल सुद्धा खेळवू नका असं तो सांगतोय.. 

सुरवातीला अनेक महत्वाच्या लोकांनी आयपीएल रद्द करावी अशी मागणी केली होती , मात्र बीसीसीआयला आर्थिक गणितं जुळवण्यासाठी आयपीएल घ्यावीच लागली. मात्र याचे परिणाम पुढे खेळाडू आणि देशांच्या लोकांना भोगायला लागू नये अशी चिंता व्यक्त केली जात होती.

मागच्या वर्षी कोरोनामुळे आयपीएल युएईमध्ये खेळवण्यात आली मात्र यावर्षी कोरोनाचा विस्फोट झाला असतानाही आयपीएल जोरात सुरु आहे. मुंबई, चेन्नई, बँगलोर आणि अहमदाबाद मध्ये हि स्पर्धा खेळवली जात आहे.  कोविड काळात आयपीएल हे मनोरंजनाचं साधन आहे असं चाहत्यांचा म्हणणं आहे.

द न्यू इंडियन एक्सप्रेस या वृत्तवाहिनीने आयपीएलच्या बातम्या देणं बंद केलं आहे, आयपीएलमुळे कर्मचाऱ्यांना रात्री उशिरापर्यंत काम करावं लागत आणि सध्याच्या परिस्थितीत ते हानिकारक आहे असं स्पष्टीकरण इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.

बॉयकॉट आयपीएल अशी मागणीही केली जात आहे.

अनेक वृत्तवाहिन्यांनी आयपीएलचं कव्हरेज करणं कमी केलं आहे. केवळ खेळाडूच नाही तर वृत्तपत्र वाहिन्याही आयपीएल थांबवावी या मुद्द्यावर अडून आहेत.

या सर्वांआधी अँड्र्यू टाय या ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूने आयपीएलमधून माघार घेतली होती. याच कारण देताना त्याने सांगितलं होतं कि भारतातली कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे , आणि ज्या ठिकाणी हॉटेलमध्ये आमचा मुक्काम होता तिथे पुरेशी काळजी न घेता लोकं विनामास्क फिरत होते एकूण अंदाज बघता मला परत मायदेशी जाणे योग्य वाटले.

दिल्लीचा स्टार खेळाडू रविचंद्रन अश्विन यानेही काल आयपीएलमधून माघार घेतली आणि सांगितलं कि माझ्या घरचे आणि जवळचे नातेवाईक कोरोनासोबत लढत आहे त्यामुळे मला त्यांच्यासोबत राहणे गरजेचं आहे, परिस्थिती निवळल्यावर मी पुन्हा संघात परतेन.

कोलकाता नाईट रायडर्स संघाचा असिस्टंट कोच डेव्हिड हसी यानेसुद्धा सांगितलं कि, परिस्थिती गंभीर आहे आणि ऑस्ट्रेलियन खेळाडू मायदेशी परतावं कि खेळावं या विवंचनेत सध्या आहेत.

आज पुन्हा यात भर पडली ती रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाच्या ऍडम झाम्पा आणि केन रिचर्डसन यांची. या दोघांनी वैयक्तिक कारण असल्याचं सांगून ते मायदेशी परतले आहे, पण कोरोनामुळे ते गेले असावे अशा चर्चा रंगल्या आहे.

एकूणच आता पुढील उर्वरित सामने वाढत्या कोरोनामधेही खेळवले जातील का ? असा प्रश्न उपस्थित होतो. परदेशातून आयपीएल खेळायला आलेल्या खेळाडूंवर त्यांच्या देशाचा प्रेशर आहे म्हणून हि खेळाडू मायदेशी परतत आहे असा एकूण अंदाज लावला जातोय.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.