पंतप्रधानांनी कलामांना नकाशा दाखवून विचारलं यांना लक्ष्य करण्यासाठी मिसाईल कधी तयार होणार

भारताचे माजी पंतप्रधान आणि अंतराळ शास्त्रज्ञ डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी उपग्रह प्रक्षेपणात अतुलनीय कामगिरी केली. त्यामुळेच त्यांना मिसाईल मॅन म्ह्णून ओळखलं जात.  या कारणास्तव, भारत सरकारने त्यांना संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळेत (डीआरडीएल) पाठवले आणि क्षेपणास्त्र प्रणाली विकसित करण्याचे महत्त्वाचे काम दिले.

९० च्या दशकाच्या सुरुवातीस, जुनी डेव्हिल मिसाईल सिस्टीम सुधारित केली गेली. त्याच्या यशस्वी चाचणीने इंटिग्रेटेड गायडेड मिसाईल डेव्हेलोपमेंट प्रोग्रॅमला (IGMDP) पंख दिले. 

यानंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी घाईघाईने यासाठी ३०० कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पात तरतूद केली. याबद्दल इंदिराजी इतक्या उत्साहित झाल्या की, एक दिवशी त्या डीआरडीएलच्या हैदराबाद कार्यालयात पोहोचल्या आणि त्यांनी कलाम यांचा हात पकडून विचारले, ‘कलाम, क्षेपणास्त्राची पहिली चाचणी कधी होणार?’ यावर कलाम यांनी उत्तर दिले, ‘जून १९८७.’

ही घटना आठवून अब्दुल कलाम ‘टर्निंग पॉईंट्स’मध्ये लिहितात की,

खोलीत लटकलेल्या नकाशाकडे बोट दाखवत इंदिराजी मला म्हणाल्या कि ‘रंगांनी हायलाईट केलेली शहरे बघा आणि मला सांगा तो दिवस कधी येईल जेव्हा ही शहरं आपल्या मिसाईलच्या टप्प्यात येतील.’ इंदिराजी ३००० किमी लांब असलेल्या शहरांकडे निर्देश करत होत्या. संकेत स्पष्ट होते, देशाला इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाइल बनवण्याच्या दिशेने वाटचाल करायची आहे.

IGMDP वर २८० शास्त्रज्ञांची टीम रात्रंदिवस काम करत होती. सप्टेंबर १९८५ मध्ये श्रीहरिकोटा येथे पहिली चाचणी घेण्यात आली जी यशस्वी झाली. यानंतर पायलटविरहित विमानाचीही यशस्वी चाचणी घेण्यात आली. पृथ्वी मिसाईलचे अल्गोरिदम जाधवपूर विद्यापीठात विकसित करण्यात आले. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आणि इस्रोसारख्या संस्था महत्त्वाच्या प्रकल्पांच्या वेगवेगळ्या भागांवर काम करत होत्या. कलाम हे या सगळ्याच्या केंद्रस्थानी राहिले कारण त्यांची डीआरडीएलमध्ये संचालक म्हणून नियुक्ती झालेली.

१९८०च्या दशकाच्या पूर्वार्धात भारताने इंटिग्रेटेड गाईडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्रॅम अर्थात आयजीएमडीपी अंतर्गत आण्विक क्षेपणास्त्रविकासाचा कार्यक्रम हाती घेतलेला होता. त्यानुसार, डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन अर्थात डीआरडीओने १९८३ मध्ये ‘पृथ्वी’ या क्षेपणास्त्राच्या निर्मितीला सुरुवात केली होती.

त्यानंतर पाच वर्षांनी म्हणजे २५ फेब्रुवारी, १९८८ रोजी ‘पृथ्वी’ क्षेपणास्त्राची पहिली चाचणी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून करण्यात आली आणि ती चाचणी यशस्वी ठरली. त्यापाठोपाठ म्हणजे १९८९ ‘अग्नी’ या क्षेपणास्त्राची चाचणी ओरिसातील चंडीपूर येथून करण्यात आली. या दोन्ही चाचण्या यशस्वी ठरल्या आणि त्याद्वारे शेजारी देशांना व जगाला भारताच्या आण्विक क्षेपणास्त्र –  विकासाच्या क्षेत्रातील प्रगतीची व सामर्थ्याची ग्वाही मिळाली.

१९७४ मध्ये भारताने पोखरण येथे पहिली अणुचाचणी केल्यावर अंतराळ संशोधन संदेशयंत्रणा आणि क्षेपणास्त्र- विकासासारख्या संरक्षणाशी संबंधित क्षेत्रातील तंत्रज्ञान भारताला देण्यास अमेरिकेने नकार दिला.

त्यामुळे अमेरिकेवर विसंबून न राहता स्वबळावर क्षेपणास्त्र-विकासाचा कार्यक्रम आखण्याचं धोरण भारताने स्वीकारलं. डीआरडीओची सूत्र डॉ. ए.पी.जे. कलाम यांच्या हाती दिली गेली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली डीआरडीओचे शास्त्रज्ञ व तंत्रज्ञांच्या अथक प्रयत्नांतून १९८८-८९ मध्ये ‘पृथ्वी’ व ‘अग्नी’ सारख्या आण्विक क्षेपणास्त्रांचा विकास साध्य झाला. 

यापूर्वी अमेरिका, सोविएत रशिया, फ्रान्स, चीन आणि जर्मनी या पाचच देशांकडे आण्विक क्षेपणास्त्रांचं तंत्रज्ञान होतं. ‘पृथ्वी’ व अग्नी’च्या यशामुळे असं सामर्थ्य विकसित करणारा भारत हा जगातील सहावा देश ठरला.

१९८८ मधील चाचणीत यशस्वी ठरलेल्या ‘पृथ्वी’ क्षेपणास्त्राची पाचशे ते हजार किलो आण्विक विस्फोटक वाहून नेण्याची क्षमता होती आणि या न्यूक्लिअर बॅलिस्टिक मिसाईलद्वारे १५० ते ३०० किलोमीटर अंतरापर्यंतचा पल्ला साधणं शक्य झालेलं होत

यात काही सुधारणा करून ‘पृथ्वी- १’ हे जमिनीवरून जमिनीवर अर्थात सरफेस टू सरफेस मारा साधणारं क्षेपणास्त्र भारतीय सैन्यदलाकडे सोपवण्यात आलं. सैन्यदलासोबतच हवाईदल आणि नौदलासाठीही ‘पृथ्वी’ क्षेपणास्त्राची सेवा उपलब्ध करून देण्याची पृथ्वी-मालिकेची योजना होती.

त्याानुसाार वायुदलासाठीच्या ‘पृथ्वी- २’ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी  २७ जानेवारी, १९९६ रोजी साध्य केली गेली. दोनशे कि.मी.चा पल्ला गाठू शकणाऱ्या या क्षेपणास्त्राची पेलोड-क्षमता ३०० किलो इतकी होती. त्यानंतर पुढे २००० मध्ये नौदलासाठीच्या ‘पृथ्वी-३’ या क्षेपणास्त्राचा विकास साध्य झाला. याद्वारे जहाजावरून जमिनीलगत मारा करणं साध्य झालं. 

पुढे नौदलासाठीच्या या क्षेपणास्त्राचं ‘धनुष्य’ असं नामकरण करून २३ जानेवारी, २००४ रोजी हे क्षेपणास्त्र नौदलाकडे सोपवण्यात आलं. ५०० ते १००० पेलोड-क्षमता असलेल्या या क्षेपणास्त्राद्वारे ३५० ते ६०० कि.मी. चा पल्ला गाठणं साध्य झालं.

अग्नी मालिकेतील क्षेपणास्त्रांचा विकास 

भारताच्या सीमेलगतच्या विशेषत: पाकिस्तान व चीन या शेजारी राष्ट्रांकडून देशाच्या सुरक्षिततेला असलेला संभाव्य धोका लक्षात घेता जमिनीवरून लगतच्या भूप्रदेशावर थेट मारा करण्यासाठी वा सीमाभागात वचक निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘अग्नी’ या सशक्त क्षेपणास्त्राचा विकास साध्य केला गेला. आयजीएमडीपी अंतर्गत ‘पृथ्वी’ सोबतच ‘अग्नी’ मालिकेच्या विकासाचंही कार्य सुरू होतं.

 १९८९ मध्ये ओरिसा येथील चंडीपूर येथून ‘अग्नी’ची यशस्वी चाचणी साध्य झाली. एक हजार पे-लोडक्षमता असलेल्या या ‘स्ट्रॅटेजिक’ क्षेपणास्त्राचा पल्ला ७०० कि.मी. इतका होता. पुढील काळात २ हजार कि.मी. पेक्षाही अधिक अंतरावरील मारा साध्य करणाऱ्या आणि अधिक क्षमता असलेल्या ‘अग्नी-२’ व ‘अग्नी- ३’ आदी या मालिकेतील अधिक प्रभावी क्षेपणास्त्रांची निर्मिती साध्य केली गेली.

‘आकाश’, ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्रांची निर्मिती

सरफेस टू सरफेस मारा करणाऱ्या ‘पृथ्वी’, ‘अग्नी’ या क्षेपणास्त्रांनंतर पुढे डीआरडीओने जमिनीवरून आकाशात मारा करणाऱ्या ‘आकाश या क्षेपणास्त्राची निर्मिती केली. १९९० मध्ये त्याची पहिली चाचणी केल्यावर १९९७ पर्यंत त्याचा विकास साधला गेला. ३० किलोमीटरचा पल्ला असलेल्या या क्षेपणास्त्राची ७२० किलोची विस्फोटकं सुपरसॉनिक वेगाने नेण्याची क्षमता आहे.

 त्यानंतर ‘त्रिशूल’ व त्याचप्रमाणे शत्रूचे रणगाडे नष्ट करण्यासाठी ‘फायर अँड फरगेट’ स्वरूपाच्या ‘नाग या क्षेपणास्त्राची निर्मिती केली गेली. शत्रूच्या रणगाड्याचा दिवसा ४ किलोमीटर व रात्रीच्या वेळी सतत दोन तास पाठलाग करण्याची ‘नाग’ची क्षमता आहे. पुढील काळात ‘अग्नी’, ‘पृथ्वी’ या प्रकारच्या क्षेपणास्त्रांचा अधिकाधिक विकास सुरू राहिला. त्याचप्रमाणे ‘ब्रह्मोस’, अस्त्र’ आदी प्रगत क्षेपणास्त्रांचाही विकास केला गेला. 

हे ही वाच भिडू :

1 Comment
  1. Prashant Netake says

    भाऊ कलाम साहेब माजी पंतप्रधान नव्हते तर तर भारताचे माजी राष्ट्रपती होते

Leave A Reply

Your email address will not be published.