पुण्याच्या चाकरमान्यांची जीवनवाहिनी असलेली पीएमपीएल पूर्ण क्षमतेने कधी धावणार?

कोरोनाचे निर्बंध शिथिल झाले… शाळा-कॉलेज सोडले तर इतर सर्व क्षेत्रे अनलॉक झाली आहेत. असं  असताना देखील पुणे शहरातील परिवहन महामंडळाची सेवा अद्यापही पूर्ण क्षमतेने धावताना दिसत नाही आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मार्च- एप्रिल महिन्यात सर्व सामान्य पुणेकरांसाठी असणारी पीएमपीची बस सेवा बंद करण्यात आली होती. तेंव्हा केवळ अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींसाठीच हि बस सेवा देण्यात येत होती.

त्यानंतर जवळपास महिन्यानंतर बाजारपेठ मर्यादित वेळेत खुली करायला परवानगी दिली गेली. 

पीएमपीला एकूण ताफ्यातील २५% बसद्वारे आसन क्षमतेच्या ५०% क्षमतेने सेवा सुरू करायला परवानगी दिली होती. कालांतराने या मार्गावरील बसची संख्या वाढवण्यात असली तरीही मात्र अद्यापही ७० टक्केच बस शहरात धावत आहेत.

बाजारपेठातील इतर सर्व निर्बंध हटवले गेले आहेत. रात्री उशिरापर्यंत हॉटेल सुरू राहणार आहेत. सगळ्या प्रकारची दुकाने चालून असणार आहेत. तसेच एसटी, रेल्वेचे रात्रीची वाहतूक सुरू झालेली आहे. परंतु पीएमपीची सेवा मर्यादित असल्याने प्रवाशांना त्याचा फटका बसतोय.

पीएमपीएमएल बस कमी असल्यामुळे लोकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. लोकं म्हणतायेत  की, जिथे पूर्वी एक तास लागत असे, आता दोन ते तीन तास लागत आहेत. ऑटो लोकही अधिक पैशांची मागणी करत आहेत.

पुणे शहरातल्या सध्याच्या दैनंदिन प्रवाशांची संख्या पाहायला गेलं तर, ५ लाख, २० हजार इतकी आहे.

आणि पुण्यामध्ये बस धावत आहेत फक्त १,१३३ म्हणजेच इतक्या प्रवाशांचे ओझं फक्त इतक्या बसेस आहे.

सध्या शहरांमध्ये जिकडेतिकडे धावणाऱ्या बसेस ह्या खूप कमी प्रमाणात दिसतात. तसेच लॉंग रूट च्या बसेस देखील अगदी थोडक्या आहेत. त्यामुळे या मार्गावर जाणाऱ्या प्रवाशांना याचा ताण सहन करावा लागत आहे. कित्तेक तास बसची वाट पाहण्यासाठी प्रवासी बस स्टॉप वर असतात. महत्त्वाच्या आणि रोजच्या कामावर जायला उशीर होतो, अशा अनेक समस्यांना प्रवासी तोंड देत आहेत.

त्यात बसेसची संख्या कमी असल्यामुळे एकाच मार्गावरची एखादीच बस असते. परिणामी त्या बसमध्ये प्रवाशांची संख्या देखील अतिरिक्त असते. कोरोनाचे नियम म्हणून ५० टक्के आसनक्षमता तर सोडाच बसमध्ये शंभर टक्के आसनव्यवस्था भरून देखील अजून प्रवाशांना उभ्याने तसेच प्रसंगी दरवाज्यात उभे राहून प्रवास करावा लागतोय.

यातून कोरोनाच्या संसर्गाचा धोका तर आहेच, पण अतिरिक्त गर्दीमुळे प्रवासी दरवाजात उभे राहून, लटकून प्रवास करतात त्यामुळे अपघाताचा धोका देखील आहे.

हा धोका टाळण्यासाठी आणि तसेच कोरोनाच्या अनुषंगाने गर्दी टाळण्यासाठी का होईना प्रत्येक मार्गावरील बसची संख्या वाढवणं आत्ताच्या काळात अगदी गरजेचं झालं आहे.

पुणे प्रशासनाला ‘जाण’ नाही का ?

उठसुठ कोरोनाची पार्श्वभूमी सांगत इतर सर्व निर्णय घेतले जात आहेत, राजकारण्यांच्या यात्रा, दौरे होत आहेत, सभा होत आहेत, धनदांडग्यांच्या घरी मोठाली लग्न होत आहेत, निवडणुका घेतल्या जात आहेत मात्र इथे प्रवाशांना अगदी आवश्यक असणारी बससेवा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमी सांगून चालू केली जात नाही. हा कुठला न्याय ?

अनलॉक झालं असलं तरही जरी काही कार्यालय चालू झाली असतील आणि काही नसतील चालू झाली तरीही इतर कर्मचारी वर्ग किंवा प्रवासी वर्ग, नागरिक यांना या बससेवेची आवश्यकता असते. त्यामुळे बसची संख्या वाढवणे अत्यावश्यक झाले. पण यासाठी मात्र पुणे प्रशासनाकडे कोणतेही ठोस धोरण नसल्याचं आत्तापर्यंतच्या नियोजनावरून तरी दिसून आलंय.

त्यांच्याकडे खरंच धोरण नाही? की प्रवाशांची होत असलेली हेळसांड पाहण्याची जाण नाही असे प्रश्न आता नागरिक करत आहेत.

नागरिकांच्या शा प्रश्नांवर पीएमपीचे वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रेय झेंडे यांनी स्पष्टीकरण  दिले कि,  सध्या ७०% बसेस रस्त्यावर आहेत.  त्यात आणखी दहा ते वीस टक्क्यांनी वाढ करण्याचा प्रशासनाचा विचार चालू आहे. अध्यक्षांशी चर्चा करून येत्या दोन दिवसात त्याबाबतचा निर्णय घेतला जाईल असंही ते म्हणाले.

मागच्या महिन्यात राखी पौर्णिमेच्या दिवशी पीएमपीने शहरात तब्बल चौदाशे बस मार्गावर आणल्या होत्या. याआधी केवळ अकराशे बसद्वारे सेवा दिली जात होती आता याच बसची संख्या वाढून किमान चौदाशे पर्यंत करायचा विचार पीएमपी प्रशासनाचा चालू होता पण त्या विचाराची कृती काही अजून तरी दिसलेली नाहीये..

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.