बापाच्या छायेतून बाहेर पडून पुनीत राजकुमार कन्नडचा पॉवरस्टार बनला होता..

सुपरस्टार अभिनेता पुनीत राजकुमारचे आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना बंगळुरू येथील विक्रम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार करूनही त्याला वाचवता आलं नाही. पुनीत गेल्याचे वृत्त समोर येताच इंडस्ट्रीत खळबळ उडाली आहे. त्याचे कारण देखील तितकेच भयंकर आहे ते म्हणजे पुनीत चा मृत्यू हा जिममध्ये व्यायाम करताना झाला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, वर्कआउट करत असताना पुनीत राजकुमारला हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी सर्व प्रयत्न करूनही त्याला वाचवता आले नाही. शिवराजकुमार यांची मुलगी निवेदिता ही बातमी समजताच रुग्णालयात पोहोचली. पुनीतची प्रकृती पाहण्यासाठी स्टार रविचंद्रन आणि निर्माते जयन्ना आणि केपी श्रीकांतही रुग्णालयात पोहोचले. पुनीतच्या मृत्यूच्या वृत्ताने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

अभिनेता पुनीत राजकुमारच्या ‘मृत्यू’ची बातमी कळताच चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती. रुग्णालय आणि घराबाहेर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यांचे पार्थिव कांतीवारा स्टुडिओत ठेवण्यात येणार आहे.

अलीकडेच सिद्धार्थ शुक्ला या प्रसिद्ध अभिनेत्याचे देखील हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते.  सिद्धार्थला देखील जिम आणि वर्कआउटची खूप आवड होती. गेल्या काही दिवसांमध्ये हेव्ही वर्कआउट करणाऱ्यांना हृदयविकाराच्या झटका येऊन मृत्यू झाल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत.

अगदी काहीच तासांपूर्वी पुनीतने ट्विट केले होते……

पुनीत राजकुमारने आज सकाळी ट्विट करून एका चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. काहीच तासांपूर्वीचे त्याचे शेवटचे ट्विट पाहून, पुनीत आता या जगात नाही यावर विश्वास बसत नाहीये. पुनीतच्या निधनावर क्रिकेटर सेहवाग पासून ते अभिनेता सोनू सूद पर्यंत सर्व दिग्गज सेलिब्रिटींनी शोक व्यक्त केला आहे.

पुनीत राजकुमार हे नाव म्हणजे कन्नड चित्रपटसृष्टीतील सर्वात बँकिंग स्टारपैकी एक आहे हे सत्य नाकारता येणार नाही. एक प्रामाणिक अभिनेता, त्याच्या प्रभावी स्क्रीन प्रेझेन्समुळे आणि भूमिकेंमुळे  त्याचा एक मजबूत चाहता वर्ग आहे. 

पुनीत २००२ मध्ये देशभरात अप्पूच्या नावाने प्रसिद्ध झाला. पुनीतला चाहते प्रेमाने अप्पू म्हणत.. त्याने २९ हून अधिक कन्नड चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘अभि’, ‘वीरा कन्नडिगा’, ‘अजय’, ‘अरसू’, ‘राम’, ‘हुदुगारू’ आणि ‘अंजनी पुत्र’ यांसारख्या प्रसिद्ध चित्रपटांसाठी तो ओळखला जातो.

अभिनेता असण्यासोबतच ते दोन मुलींचा वडीलही होता. १९९९ मध्ये त्यांनी अश्विनीसोबत प्रेमविवाह केला होता.

त्याची दुसरी ओळख म्हणजे,  तो दिग्गज अभिनेता राजकुमार आणि पर्वतम्मा यांचा मुलगा आहे.

राजकुमार कन्नडचे मोठे सुपरस्टार होते. त्यांचा दबदबा इतका होता कि एकदा चक्क चंदन तस्कर वीरप्पनने राजकुमार यांचं अपहरण केलं होतं.

राजकुमार यांच्यामुळेच पुनीत राजकुमारने बालकलाकार म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि त्यांना सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला आहे. १९८५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बेट्टाडा हूवू’ चित्रपटाचे नाव होते. एवढेच नाही तर चालिसुवा मोडागालू आणि येराडू नक्षत्रगालू या चित्रपटातील अभिनयासाठी कर्नाटक राज्य पुरस्कारात सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार मिळाला होता.

पुनीतने आपल्या कारकिर्दीत अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये भूमिका केल्यात. त्याच्या एकूण भूमिकेंवरूनच बॉक्स ऑफिसवरील तग धरण्याची त्याची क्षमता सर्वांनाच ठाऊक झालीये, परंतु अनेकांना हे आठवत नसेल की तो कन्नड हिट प्रेमदा कनिके (१९७६) चा एक भाग होता.  ज्यामध्ये त्याचे वडील राजकुमार मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटात चित्रीकरण झाले तेव्हा लहान असलेला पुनीत चित्रपटाच्या एका महत्त्वाच्या दृश्यात दिसला आणि त्याने आपल्या निरागस लूकने प्रेक्षकांचे मनं जिंकली होती.

कन्नड चित्रपटांचा सुपरस्टार शेवटचा ‘युवारत्ना’ चित्रपटात काम करताना दिसला होता. पुनीत यांच्या आकस्मिक निधनाने चित्रपटसृष्टीला धक्का बसला आहे कारण तो नुकताच शिवराजकुमार यांच्या ‘बजरंगी’ २ या चित्रपटाचे प्रमोशन करतांना दिसला होता.

हे हि वाच भिडू :

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.