बडोद्याच्या राजघराण्याने राजा रवि वर्माच्या जीर्ण झालेल्या स्टुडिओला नवीन रूप दिलंय.

सरस्वती, महालक्ष्मी तसेच कृष्ण, विष्णू, शीव, गणपती, गौरी, काली, विष्णूचे अवतार, कृष्ण जन्म, कालिया मर्दन, कंस वध, राधा गोपिकांसह कृष्ण, राम तसेच गोवर्धन हि हिंदू देवं- देवता नजरेसमोर येताच त्यांची लोभस आणि शांत मुद्रेच्या प्रतिमा आपल्याला दिसतात. बरं हे हिंदू देव देवता दिसायला अशाच दिसतात हे कळलं ते एका कलाकारामुळेच ! महान चित्रकार राजा रवि वर्मा यांच्यामुळे !

महान चित्रकार राजा रवि वर्मा याचं आणि बडोद्याचे गायकवाड घराण्याच्या संबंधाचा इतिहास आपण जाणतोच.  राजा रवि वर्मा, हे भारताच्या त्रावणकोरच्या राजघराण्यातील एक मानाचे चित्रकार होते. 

१८८१ मध्ये बडोद्याचे सयाजीराव गायकवाड यांनी राजा रवी वर्मा यांना चित्रे काढण्यासाठी आमंत्रित केले आणि त्यांचे तिथे त्यांची एका विशेष राजमहालात राजेशाही व्यवस्था ठेवण्यात आली होती.

त्यानंतर त्यांनी मैसूर, भावनगर, बिकानेर, जयपूर राजघराण्याच्या राजमहालांच्या भिंती आपल्या अमूल्य चित्रांनी चित्रांकित केल्या आहेत. त्यातलीच एक म्हणजे बडोद्याच्या लक्ष्मीविलास राजमहालात रामायण, महाभारत आणि राजपरिवारातील व्यक्ती यांची सुंदर चित्रे त्यांनी काढली आहेत. नल-दमयंती, राधा-माधव, अर्जुन-सुभद्रा, भरत, शंतनू आणि गंगा, वृंदावनात कृष्णाची प्रतीक्षा करणारी राधा, शकुंतला पत्रलेखन, प्रियंवदा, उर्वशी, लक्ष्मी, सरस्वती…

ही सर्व चित्रे बडोदा संग्रहालय व राजमहालात सुरक्षित आहेत

आत्ता हे सर्व सांगण्याचे निमित्त म्हणजे, त्यांच्या याच पवित्र पेंटिंग्ज असलेल्या पवित्र खोली म्हणजेच त्यांचा स्टुडिओ पाहण्याची संधी लवकरच आपल्यासाठी एक अनुभव असणार आहे. 

लक्ष्मी विलास पॅलेस कंपाऊंडमध्ये हिरव्यागार वातावरणात वसलेला प्रशस्त स्टुडिओ जेथे वर्मा पेंटिंग करायचे ते शाही गायकवाड कुटुंबाने पूर्णपणे नूतनीकरण केले आहे. यासाठी कि त्यांना ते एक पर्यटन स्थळ बनवायचे आहे. राजा रवि वर्मा यांनी त्यांच्या प्रमुख कलात्मक कारकीर्दीची बारा वर्षे लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये त्यांच्या काही महत्त्वाच्या आणि प्रशंसनीय चित्रांच्या निर्मितीसाठी घालवली आहेत.

हा स्टुडिओ जपणे वारशाचा एक भाग आहे कारण वर्मा, महान कलाकारांपैकी एक, या स्टुडिओमध्ये आपली चित्रे बनवण्यासाठी वापरत असे. अनेक पर्यटक मोतीबाग मैदानाजवळील फेटेंसिंगराव संग्रहालयाला भेट देतात आणि हा स्टुडिओ काही शंभर मीटर अंतरावर आहे. लोकांनी यावं आणि त्यांनी हा स्टुडिओ पाहावा म्हणून त्याचे रिनोवेशन केले आहे.  स्टुडिओ अनेक वर्षांपासून जीर्ण अवस्थेत होता आणि त्याचे छत जवळजवळ कोसळले होते.

२०१४ मध्येच गायकवाड घराण्याने या स्टुडिओचे नूतनीकरण करण्याचे ठरवले होते. नूतनीकरण इंदिरा गांधी नॅशनल सेंटर ऑफ आर्ट (IGNCA) द्वारे केले गेले ज्याचे कार्यालय महाराजा फतेहसिंहराव संग्रहालयात आहे. शाही वंशज समरजितसिंह गायकवाड म्हणाले, “आम्हाला ते पर्यटन स्थळ बनवायचे आहे, कारण राजा रवि वर्मा यांच्या उत्कृष्ट कलाकृतींचा यात समावेश आहे”.

भविष्यात ते या स्टुडिओमध्ये कला प्रदर्शन आयोजित करण्याचाही विचार करतील.

त्यांनी याबाबतचा अनुभव सांगताना गायावाद घराण्याचे वंशज म्हणाले कि, “आम्हाला मूळ रचना टिकवून ठेवायची होती आणि त्याचे नुतनीकरणहि करायचे होते त्यामुळे हे काम मोठ्या जोखमीचे होते. पूर्वीच्या संरचनेतील काही साहित्य नूतनीकरणादरम्यान देखील वापरले गेले होते आता स्टुडिओ खरोखरच चांगल्या स्थितीत दिसत आहे”.

रिनोवेट केलेल्या स्टुडिओचे डिझाईन पाहायला गेलं तर स्टुडिओमध्ये बऱ्यापैकी नैसर्गिक प्रकाश येतो.  या स्टुडिओचे नूतनीकरण गेल्या वर्षीच्या फेब्रुवारीमध्ये सुरू झाले होते परंतु कोविड साथीच्या रोगामुळे या प्रोजेक्टला उशीर लागला होता.

हे हि वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.