राजेश खन्नाला दुखणं देणारा तो वजनदार शॉट ‘रोटी’च्या पोस्टरवर झळकला होता…

सिनेमाच्या शूटिंगच्या दरम्यानच्या गमती जमती रसिकांना अनेक वर्ष वाचायला आवडतात त्यातून कलावंतांचे परस्परांमधील संबंध लक्षात येतात. तो काळ आठवतो. नकळतपणे आपण देखील त्या काळाशी कोरिलेट करत असतो आणि यातूनच स्मृतिगंधाचा आनंद आपल्याला मिळत राहतो. हा किस्सा आहे १९७४ साली प्रदर्शित झालेल्या मनमोहन देसाई दिग्दर्शित एका चित्रपटाचा. 

चित्रपटाचे नाव होतो ‘रोटी’. यात राजेश खन्ना आणि मुमताज यांच्या प्रमुख भूमिका होत्या. 

सुपरस्टार राजेश खन्नाच्या काळातील त्याची मुमताज ही सर्वात लोकप्रिय नायिका होती. मुमताजच्या सोबत त्याचे तब्बल नऊ सिनेमे या काळात प्रदर्शित झाले होते आणि बहुतेक सर्व चित्रपटांना चांगले यश मिळाले होते. दो रास्ते, प्रेम कहानी, आप की कसम, रोटी, बंधन, अपना देश, सच्चा झूठा, दुश्मन, बंधन हे या दोघांचे एकत्रित सिनेमे!  या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या दिवशीच १८ ऑक्टोबर १९७४ या दिवशी ‘रोटी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या दिवशीच १८ ऑक्टोबर १९७४ या दिवशी मनोज कुमारचा ‘रोटी कपडा और मकान’ आणि अमिताभ बच्चन यांचा ‘बेनाम’ हा चित्रपट देखील प्रदर्शित झाले होते.  राजेश खन्नाच्या सुपर हिट चित्रपटाच्या रांगेतला हा कदाचित शेवटचा सिनेमा असावा. 

’रोटी’ या सिनेमाला चांगले यश मिळाले कारण यानंतर अमिताभ बच्चन यांचा करिष्मा सुरू झाला होता.

या सिनेमातील ‘ये जो पब्लिक है सब जानते है’ या गाण्यात काही सेकंदासाठी जितेंद्र दिसला होता. यातील ‘ यार हमारी बात सुनो ऐसा एक इन्सान चुनो जिसने पाप न किया हो वो पापी न हो….’ या गाण्याच्या ओळी बायबल मधील एका प्रसिध्द वचनावर बेतल्या  होत्या.

मुमताज खरंतर सी ग्रेड सिनेमातून रुपेरी पडद्यावर आली होती पण अतिशय मेहनतीने तिने स्वतःला सिद्ध केले आणि देव आनंद (तेरे मेरे सपने), दिलीप कुमार(राम और श्याम), अमिताभ बच्चन (बंधे हाथ), राजेश खन्ना (दो रास्ते) या सर्व आघाडीच्या अभिनेत्यांसोबत तिने नायिकेच्या भूमिका केल्या.

आता येऊत मूळ किस्याकडे. मनमोहन देसाई यांच्या ‘रोटी’ या चित्रपटातील क्लायमॅक्सच्या शॉटला राजेश खन्नाला मुमताजला घेऊन बर्फातून पळत जायचे असते. याचे चित्रीकरण काश्मीरमध्ये होणार आहे. दिग्दर्शकाने राजेश खन्ना, मुमताजला सर्व शॉट मध्ये कसे एकमेकांना कोऑपरेट करायचे याबाबत ‘ब्रीफ’ केले. मुमताज त्यावेळी बऱ्यापैकी सुदृढ गटात मोडणारी होती. तिला खांद्यावर घेऊन जायचे तसे कठीण काम होते. 

राजेश खन्ना मुमताजला प्रेमाने  ‘मोटी’ म्हणून बोलवायचा.

ती देखील त्याच्या या विशेषणाने खूष असायची. या शॉटच्या वेळी राजेश खन्ना ना मुमताजला आपल्या खांद्यावर घेऊन पळायचे होते. पोलीस त्यांच्या मागावर असतात. एक कुत्रा देखील त्यांचा पिछा करत असतो. या सगळ्यांपासून सुटका करून घेण्यासाठी जीवाच्या आकांताने त्यांना पळायचे असते. राजेश खन्नाला वाटले हा शॉट आपण एका दिवसात पूर्ण करू. पण ज्या वेळेला शूटिंग सुरू झाले त्यावेळी त्याला खरी परिस्थिती लक्षात आली. 

राजेश खन्ना मुमताजला म्हणाला ‘चल आजा मोटी..’ त्यावेळेला मुमताज त्याला म्हणाली ,”आज तुम्ही सौ किलो का वजन उठाना है!”  त्यावर राजेश म्हणाला ,” चलो देखा जायेगा..!”  अशा प्रकारे शॉट सुरू झाला. बर्फातून मुमताजला घेऊन पळणे खूप अवघड होत होते. 

एक तर तिचे वजन भरपूर होते आणि बर्फातून त्यांचे पाय घसरत होते त्यामुळे अडखळत अडखळत शूटिंग सुरू झाले! मनमोहन  देसाई यांनी या शॉटचे चित्रीकरण वेगवेगळ्या आठ लोकेशन वर केले होते. त्यामुळे तब्बल आठ दिवस राजेश खन्ना मुमताज चे ते ‘अवघड’ ओझे घेऊन पळत होता! 

आठव्या दिवशी त्याचा खांदा दुखू लागला होता आणि तिला सतत खांद्यावर घेऊन तिथे लाल रंगाचे चट्टे देखील पडले होते !११ ऑक्टोबर १९७४ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘रोटी’ या सिनेमातील हा शॉट खूपच गाजला. सिनेमाच्या पोस्टरवर देखील झळकला! मनमोहन देसाई यांचा हा एकमेव चित्रपट असावा ज्यात मुख्य नायकाचा सिनेमाच्या शेवटी मृत्यू दाखवला आहे.

-भिडू धनंजय कुलकर्णी 

हे वाच भिडू 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.