राजीव गांधींनी राजकारणात येण्याचा निर्णय ओशोंच्या प्रभावातून घेतला होता ?

‘द ओनली लाइफ: ओशो, लक्ष्मी एंड द वर्ल्ड इन क्राइसेस’ राशिद मॅक्सवैल यांच्या पुस्तकात राजीव गांधी हे ओशोंच्या प्रभावानेच राजकारणात आल्याचा दावा करण्यात आला होता. ओशो यांच्या सचिव राहिलेल्या लक्ष्मी यांच्या जीवनावर राशिद मॅक्सवेल यांनी पुस्तक लिहलं असून त्यामध्ये राजीव गांधी नेमके राजकारणात कसे आले याबाबात भाष्य करण्यात आलं आहे.

राशिद मॅक्सवैल लिहतात की, जनता पक्षाच्या लाटेनंतर इंदिरा गांधी अचानकपणे सक्रिय राजकारणातून बाहेर पडू लागल्या. याच काळात इंदिरा गांधी यांना नैराश्य आलं होतं. या दरम्यान त्यांची ओळख ओशो यांच्या सचिव असणाऱ्या लक्ष्मी यांच्याशी झाली होती. ओशो हे विवादास्पद व्यक्ती असल्याने इंदिरा गांधी यांनी त्यांना भेटण्याच टाळलं मात्र लक्ष्मी यांना त्यांनी कधीही घरी येण्याची, त्यांच्याशी बोलण्याची परवानगी दिली होती. 

कालातंराने लक्ष्मी या इंदिरा गांधीच्या एकप्रकारच्या आध्यात्मिक सल्लागारच बनत गेल्या. त्यानंतरच्या काही काळात संजय गांधी यांचा अकस्मात मृत्यू झाला. संजय गांधी यांच्या मृत्यूनंतर राजीव गांधी यांनी राजकारणात सक्रिय व्हावं अस मत इंदिरा गांधी यांच होतं मात्र राजीव गांधी राजकारणात येण्यासाठी तितके उत्सुक नव्हते. 

यापुढे लिहताना ते सांगतात, “लक्ष्मी तेव्हा इंदिरा यांच्या घरी होत्या. संजय यांच्या जाण्याने इंदिरा एकाकी पडल्या होत्या व राजीव त्यांच्या सोबतच असत. इंदिरा यांनी लक्ष्मी यांना राजीव गांधीची समजूत घालण्याबद्दल विचारले तेव्हा लक्ष्मी यांनी राजीव गांधीची भेट घेतली. आपण राजकारणात आलात तर नेमका कोणता फरक पडू शकतो याबाबत लक्ष्मी यांनी राजीव गांधीना समजावून सांगत राजकारणात येण्याबाबत सांगितल” 

लक्ष्मी या ओशो यांच्या पहिल्या सचिव होत्या. त्यांच्या जीवनावर लिहलेल्या या पुस्तकात राजीव लक्ष्मी यांच तत्वज्ञान ऐकून ओशोंच्या प्रभावातून राजकारणात आल्याचा दावा या पुस्तकात आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.