पाकिस्तानमध्ये हिंदूचा वेगळा पक्ष होता आणि त्याचा झेंडा भगवा होता !!

गोष्ट आहे १९४६ची. ब्रिटीशांचं भारताला स्वातंत्र्य द्यायचं फायनल झालं होत. फक्त कस आणि कशा स्वरुपात भारताला स्वांतत्र्य मिळणार हे अजून स्पष्ट नव्हतं. जिना आणि त्यांची मुस्लीम लीग वेगळ्या पाकिस्तानसाठी अडून बसली होती. कॉंग्रेसचे नेते यासाठी तयार नव्हते. अशातच वेव्हेल कमिशनने सांगितलेल्या प्रांतिक कायदेमंडळाच्या निवडणुका आल्या.

या निवडणुका म्हणजे स्वातंत्र्यापूर्वी भारतात कोणाचे किती वजन आहे हे दाखवून देणारया होत्या. म्हणजे कॉंग्रेसने ठरवलेलं की आपण फक्त हिंदूची पार्टी नाही पण संपूर्ण देशाची पार्टी आहे. यामुळेच त्यांनी मुसलमान मतदारसंघातही चांगली तयारी केली होती.

राजस्थानच्या वाळवंटाच्या उत्तरेला सिंधमध्ये एक अमरकोट म्हणून संस्थान आहे. तिथे राजा होता राणा अर्जुनसिंह.

त्याच त्या भागात चांगल वजन होतं. त्याला निवडणुकीला उभ करन्यासाठी मनवायच म्हणून स्वतः जवाहरलाल नेहरू अमरकोटला आले होते. पण तिथे त्यांना कळाल की हा राजपूत राजा मुस्लीम लीग कडून उभा राहतोय.

नेहरूंसाठी हा धक्का होता. भावी पाकिस्तान जर बनला तर तो मुस्लीम लीगचे उमेदवार जिथे निवडून आले आहेत ते मतदारसंघ मागण्याची जास्त शक्यता होती आणि अर्जुनसिंग सारखं तगडा नेता तिथून उभा राहात होता म्हणजे त्याच्या विजयाची शक्यता जास्त होती.

शिवाय कॉंग्रेस सगळीकडे ठसवण्याचा प्रयत्न करत होती की मुस्लीम लीग हा जातीयवादी पक्ष आहे पण अर्जुनसिंह सारखा हिंदू व्यक्ती मुस्लीम लीग कडून उभा राहतोय ही कॉंग्रेससाठी शरमेची गोष्ट होती.

पण तरी राणा अर्जुनसिंग मुस्लीम लीग कडून उभे राहिले आणि निवडणून देखील आले. त्यांची आणि मोहम्मद आली जिना यांची मैत्री यासाठी कारणीभूत ठरली.

पुढच्याच वर्षी फाळणी झाली. ब्रिटिशानी स्वतंत्र भारत आणि पाकिस्तान असे दोन देश केले आणि संस्थानानां कोणत्याही एका देशात सामील होण्याचे अधिकार दिले. बहुतांश हिंदू संस्थाने भारतात विलीन झाली. एक संस्थान सोडून.

अमरकोट उर्फ उमरकोट

तोपर्यंत राणा अर्जुन सिंह यांचं निधन झालं होतं पण त्यांचा मुलगा राणा चंदरसिंग हा सोळा वर्षाचा युवराज गादीवर आला. त्याने वडिलांची आणि जीनांची मैत्री जपली आणि आपले संस्थान पाकिस्तानात विलीन केले.

खरं तर अमरकोट मध्ये ८०% जनता हिंदू होती. पण कोणीही देश सोडायचा प्रयत्न केला नाही. कराची वरून हिंदू निर्वासितांनी भरून आलेल्या रेल्वे अमरकोटवरूनच जात होत्या मात्र तिथल्या लोकांनी आपली घरे सोडून जाव असा विचार देखील केला नाही.

कारण त्यांचा आपल्या राजावर विश्वास होता.

हा राणा चंदरसिंगसुद्धा आपल्या जनतेत फेमस होता. त्यांचे वास्तव्य ज्या अमरकोट किल्ल्यात होते तिथे एकेकाळी अकबर बादशाहचा जन्म झाला होता. चंदरसिंगने आपली सिंधी ओळख जपली. सुफी संतांची भूमी असणाऱ्या अमरकोटला हिंदू मुस्लीम एकतेचे प्रतिक मानले गेले.

इथेच अमर झालेल्या उमर-मारवी प्रेमकथेतील उमरवरून गावाला उमरकोट म्हणून ओळखले जाऊ  लागले.

कालांतराने राणा चंदरसिंग सुद्धा आपल्या वडिलांप्रमाणे राजकारणात आले. झुल्फिकार अली भुट्टो त्यांचे खास मित्र होते. या मित्राच्या आग्रहास्तव त्यांनी निवडणूक लढवायच ठरवलं. त्या आधी पाकिस्तान पीपल्स पार्टी या पक्षाची स्थापना केली. राणा चंदरसिंग यांना देखील या पक्षाच्या संस्थापकापैकी एक म्हणून ओळखल जात.

राणा चंदरसिंग ७ वेळा अमरकोट मधून निवडून गेले. सिंध प्रांताचे उपमुख्यमंत्री बनण्याचा मान त्यांना मिळाला.

भुट्टो पंतप्रधान झाल्यावर त्यांच्या मंत्रीमंडळात हा हिंदू राणा पाकिस्तानचा विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री बनला. पुढे  भुट्टोंच्या फाशी नंतर राणा पक्षात मध्ये वेगळे पडले. त्यांनी सोढा राजपूत कम्युनिटीच्या माध्यमातून पाकिस्तानातील हिंदू समाजावर पकड निर्माण केली होती. पाकिस्तानमधला सगळा अल्पसंख्यांक हिंदू समाज पीपीपी या पक्षाच्या पाठीशी होता त्याला आपल्या बरोबर करण्याचा रानांचा प्रयत्न होता.

१९९० मध्ये त्यांनी थेट पाकिस्तान हिंदू पार्टी नावाचा पक्षच स्थापन केला. या पक्षाचा झेंडा भगवा होता आणि त्यावर त्रिशूल ओम ही हिंदू धर्मातील पवित्र चिन्हे वापरली होती. पक्षाचे संविधान बनवले.

संपूर्ण पाकिस्तानमधील हिंदूंचे हात बळकट करायचा मानस राणा चंदरसिंग यांचा होता.

पण हा पक्ष काही यशस्वी ठरला नाही. हिंदुनी त्याला साथ दिली नाही. पुढे जेव्हा झुल्फिकार भुट्टोची मुलगी बेनझीर भुट्टो पाकिस्तानची दुसऱ्यांदा पंतप्रधान बनली तेव्हा राणा चंदरसिंग यांना पक्षात परत बोलावण्यात आले. त्यांना कृषीमंत्रालयासारखे महत्वाचे मंत्रीपद दिले.

राणा चंदरसिंग यांचे वजन पक्षाची सत्ता गेल्यावर देखील कायम होते. जेव्हा नवाज शरीफ पंतप्रधान बनले तेव्हा भारताच्या अटलबिहारी वाजपेयींना पाकिस्तान दौऱ्यावर येण्यासाठी राजी करायला राणा चंदरसिंग यांनाच पाठवून देण्यात आले. राणानी ही कामगिरी फत्ते केली.

भारत पाकिस्तान मैत्रीचा नवा अध्याय लिहिला गेला आणि यासाठी हा पाकिस्तानचा राजा कारणीभूत ठरला होता.

पुढे २००९ साली त्यांचं निधन झालं. त्यांच्यानंतर त्यांचा मुलगा राणा हमीर सिंग अमरकोटचा राजा बनलाय. त्याची इमेज एक द्बंग नेता अशी आहे. उमरकोटच्या हिंदू मुस्लीम जनतेमध्ये हमीरसिंगची पॉप्युलरारीटी भयंकर आहे.

रण हमीर सिंग हे सुद्धा तीन वेळा उमरकोटची निवडणूक जिंकून गेले आहेत. त्यांचे अर्ध्याहूनही जास्त नातेवाईक भारतात आहेत. त्यांची पत्नी, सून हे सगळे भारतीय आहेत. पण तरीही त्यांना भारतात जाण्याची इच्छा नाही. ते म्हणतात,

“पाकिस्तान हमारी जन्मभूमी है. ये सिंध की मिट्टी हमारी है. इसे छोडके क्यू जाऊ. मै पाकिस्तानी हु और मेरे बाप दादा की तरह पाकिस्तानीही मरुंगा !!”

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.