टाटांनी आरोग्य क्षेत्रात इतकं काम केलय की त्यांची तुलना एखाद्या देशासोबतच होवू शकते

रतन टाटांनी आसाम मध्ये ७ कॅन्सर हॉस्पिटल्स उभारण्यात येणार आहेत अशी घोषणा केली, पंतप्रधान मोदींच्या हस्ते या हॉस्पीटलच्या पायाभरणीचा समारंभ नुकताच पार पडला. या दरम्यान रतन टाटांनी केलेले भाषण चांगलेच व्हायरल झाले, 

कारण या भाषणादरम्यान रतन टाटा म्हणाले,

माझं शेवटचं एक मिशन म्हणजे, शेवटची वर्षे मी आरोग्यासाठी समर्पित केली आहेत

आपल्या संपूर्ण आयुष्यात रतन टाटांनी आरोग्यासाठी बरच काम केलं आहे. इतकं की एखादा देश करू शकत नाही इतकं काम एखाद्या संस्थेमार्फत पार पडलं आहे. यात महत्वाचं नाव म्हणजे टाटा मेमोरियल सेंटर.

हे सेंटर सुरु होण्यामागचं कारण होतं ते म्हणजे,

दोराबजी टाटा यांच्या पत्नी लेडी मेहेरबाई टाटा यांचं १९३२ मध्ये ब्लड कॅन्सरमुळे निधन झालं होतं. त्यानंतर दोराबजी टाटा यांनी भारतात कॅन्सर हॉस्पिटल उभारण्याचं स्वप्न पाहिलं. ते स्वप्न जेआरडी टाटा यांच्या प्रयत्नांनंतर साकार झालं आणि टाटा मेमोरियल सेंटर उभा राहिलं.

जगभरातील कॅन्सरच्या रुग्णांवर येथे उपचार केले जातात. जी उपचारपद्धती खर्चिक मानली जाते, जी फक्त अमेरिकेसारख्या प्रगत देशामध्येच उपलब्ध आहे ती टाटांच्या कॅन्सर हॉस्पिटल्समध्ये उपलब्ध असते.

टाटा मेमोरियलच्या देशभरात अनेक ठिकाणी ब्रॅन्च आहेत. मुंबई, नवी मुंबई, विशाखा पट्टणम, पंजाब, वाराणसी, गुवाहाटी…

त्यातलचं एक म्हणजे कोलकात्यातील टाटा मेडिकल सेंटर.

हे सेंटर रतन टाटा यांच्या आरोग्य क्षेत्रातील निस्वार्थी योगदानाचा जिवंत पुरावा म्हणायला लागेल. २०११ मध्ये हे सेंटर सुरु झालं. इथे गरीब लोकांच्या कॅन्सरवर उपचार केले जातात. इतरही लोकांवर उपचार केले जातात आणि त्यातून मिळालेले पैसे गरिब कॅन्सर पेशंटवर मोफत उपचार करण्यासाठी वापरले जातात.

याशिवाय

दक्षिण आशियातील सर्वात मोठं आणि परवडणारं कॅन्सर केअर नेटवर्क तयार करण्यासाठी टाटा ट्रस्ट आणि टाटा ग्रुप प्रयत्न करतोय. यासाठी टाटा ट्रस्ट राज्य सरकारांसोबत भागीदारी करतंय. 

उत्तर प्रदेश, कर्नाटक, आसाम, ओडिसा, झारखंड, तेलंगणा, आंध्र प्रदेश, नागालँड या राज्यांचा समावेश आहे. यातल्या आसाममध्ये १७ कॅन्सर केअर हॉस्पिटल्स उभारले जातायेत त्यातल्या ७ हॉस्पिटल्सचं बांधकाम पूर्ण झालं आणि इतर हॉस्पिटल्सचं बांधकाम चालू आहे. 

टाटा ट्रस्ट रिसर्च आणि ट्रेनिंगमध्ये देखील आघाडीवर आहे…

मागील २ वर्षांत टाटा मेमरिअल हॉस्पिटल्सच्या डॉक्टरांनी १२,००० ब्रेस्ट कॅन्सर रुग्णांचा अभ्यास करून एक महत्वाचं संशोधन समोर आणलं. या संशोधनामुळे ब्रेस्ट कॅन्सरचा कालावधी आणि खर्च अर्ध्याहून कमी झाला आहे. या रिसर्चनुसार, ब्रेस्ट कॅन्सरच्या ट्रीटमेंटला जो ६ लाखांचा खर्च लागत होता तो आता १ ते २ लाखांचा लागणारे. जे उपचार १ वर्ष घ्यावे लागत होते ते आता ३ ते ६ महिन्यांमध्ये घेता येणार आहेत.

तसेच २०१८ मध्ये टाटा मेमोरिअल सेंटरने टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स यांच्या सहकार्याने एक वर्षाचा ‘अ‍ॅडव्हान्स डिप्लोमा इन पेंशट नेव्हीगेशन’ सुरू करण्याचा निर्णय घेतला. थोडक्यात मेडिकल सेक्टरमध्ये असं पहिल्यांदाच घडलं की, कॅन्सर पेशंट्सला कसं हाताळायचं याचं ट्रेनिंग देण्याचा डिप्लोमा तयार करण्यात आला. 

आता कोरोनाच्या काळातलं बोलायचं तर….

ऑक्सिजन पुरवठयासाठी असेल किंव्हा इतर सुविधांसाठी देखील टाटा ट्रस्टने मोठीच कामगिरी बजावली होती. आवश्यक त्या सुविधा मिळवण्यासाठी रतन टाटा यांनी सरकारला १५०० कोटी रुपयांचा फंड दिला होता. 

यात आणखी भर म्हणजे, टाटा ग्रुपच्या सर्व कंपन्यांनी मिळून कोरोनाच्या दोन्ही लाटांच्या काळात  अडीच हजार कोटींची मदत केली होती. 

टाटा सन्सचे चेअरमन चंद्रशेखरन यांनी दिलेल्या माहितीनुसार,

कोरोना काळात टाटा ग्रुपने विविध रुग्णालयांमध्ये साडेतीन हजार खाटा जोडण्यास मदत केली होती. त्याचबरोबर या काळात नव्याने  रुग्णालयांच्या बांधकामात भाग घेतला होता. 

तसेच या दरम्यान ऑक्सिजन पुरवठ्याची क्षमता दिवसाला १,१०० मेट्रिक टनने वाढवली होती, जी राष्ट्रीय स्तरावरील एकूण ऑक्सिजन पुरवठ्याच्या क्षमतेच्या १० टक्के इतकी होती.

प्राथमिक आरोग्य 

भारताचा आरोग्याचा मापदंड सुधारण्यासाठी प्राथमिक आरोग्यसेवा खूप महत्त्वाचा आहे त्यातही टाटा ट्रस्टचा सहभाग आहे.

असंसर्गजन्य रोगांमध्ये कँसर, कर्करोग, उच्च रक्तदाब, मधुमेह इत्यादींच्या उपचारांसाठी ट्रस्ट डेल फाऊंडेशनच्या वतीने आयुष्मान भारतला सहकार्य करते.

तसेच टाटा ट्रस्ट ग्रामीण भागातील आरोग्य सेवांवर देखील फोकस करत आहे.

Tata Trusts आणि The India Nutrition Initiative (TINI) ने भारत सरकारने बालकांचे कुपोषण रोखण्यासाठी १९७५ मध्ये एकात्मिक बाल विकास सेवा योजना सुरू केली. भारतासारख्या देशात ६.५ लाख गावे आहेत, जिथे अंगणवाड्यांची संख्या दुप्पट आहे.

अशा परिस्थितीत ICDS सारखे कार्यक्रम राबविणे एक मोठं आव्हान असते. ही योजना चालविण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर असते. 

मात्र या सर्व अंगणवाडी केंद्र आणि महिला अंगणवाडी सेविकांना ट्रेनिंग देण्यासाठी टाटा ट्रस्ट विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करत असते.  

टाटा ट्रस्ट झपाट्याने गावोगाव आरोग्य सुविधा पुरवण्यात गुंतले आहे. 

ग्रामीण भागातील, कुपोषण आणि ऍनिमिया सारख्या समस्यांवर, गरोदर मातांसाठी आहार आणि पोषण, प्राथमिक शिक्षणावर देखील टाटा ट्रस्टने उपाययोजना राबवल्या. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान सारख्या राज्यात ट्रस्टने बालकांच्या कुपोषणावर यशस्वी उपचार केले.

तसेच मासिक पाळीच्या स्वच्छता व्यवस्थापनावर देखील टाटा ट्रस्ट काम करतंय.

टाटाचे Menstrual Hygiene Management programme अनेक राज्यांच्या जिल्ह्यांत ऍक्टिव्ह आहेत. पॅड मॅनिफॅक्चुअरींग युनिट असो वा सॅनिटरी अवेअरनेस प्रोजेक्ट असोत यात टाटा ट्रस्ट सक्रिय आहे.

सार्वजनिक आरोग्य

सार्वजनिक आरोग्यात सर्वात मोठा धोका म्हणजे संसर्गजन्य रोग, टीबी, मलेरिया वैगेरे वैगेरे.

या संसर्गजन्य रोगांवर नियंत्रण ठेवण्याची तशी बरीच आव्हाने आहेत त्यात नियोजन, वित्तपुरवठा, संसाधने, पायाभूत सुविधा, पुरवठा प्रणाली, प्रशासन यामध्ये बरीच तफावत आढळत असते. 

गंभीर बाब म्हणजे, २०१५ मध्ये टीबीमुळे ४ लाख ८० हजार लोकं मरण पावली होती. 

टीबी, मलेरिया सारखे संसर्गजन्य रोग हाताळण्यासाठी आणि निर्मूलनासाठी टाटा ट्रस्ट उपक्रम राबवते..

टाटा ट्रस्टच्या नेतृत्वाखालील इंडिया हेल्थ फंड या प्रोजेक्टचं २०२५ पर्यंत टीबी आणि मलेरियाचे समूळ निर्मूलन करण्याचे टार्गेट आहे. टीबी पेशंट आणि त्यांच्या कुटुंबाला पूरक पोषण पुरवणे सारख्या उपक्रमांचा त्यात समावेश आहे.

आता मुद्दा येतो भारतातील वयोवृद्ध गटाच्या आरोग्याचा…

चिंतेची बाब अशी आहे की या वृद्ध लोकसंख्येकडे सरकारचं, संस्थेचं आणि अगदी त्यांच्या मुलांचंही दुर्लक्ष होत असते. टाटा ट्रस्ट याबाबतच्या काही प्रोजेक्ट्सवर काम करतंय. ही सगळी माहिती जी अगदी थोडक्यात आहे मात्र टाटा ट्रस्टचं आरोग्य क्षेत्रातलं सविस्तर योगदान सांगायला गेलं तर वेळ पुरणार नाही. 

 हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.