नयना आणि रविश कुमारची लव्हस्टोरी बॉलिवूडच्या सिनेमापेक्षा भन्नाट आहे.

रविश एक संवेदनशील मनाचा माणूस आहे त्याच्या कविता, पुस्तकांमधून, ब्लॉग मधून ते प्रतीत होते. पत्रकारितेच्या सुरवातीला जेव्हा तो नियमित ‘रविश की रिपोर्ट’ करायचा तेव्हा सहज सामान्य लोकांमध्ये तो मिसळायचा त्यात कोणताच नाटकीपणा नसायचा. लोकांच्या अडचणी,भावना तो लोकांमध्ये जाऊन टीव्हीवर दाखवायचा. त्यामुळे त्याची विश्वासर्हता वाढायची.

पत्रकारिता जगात असं म्हटल जात की रविशने नेहमीच टी.आर.पी पेक्षा मुद्याला महत्व दिले आहे आणि त्याच्या या हटके स्टाइल मुळेच तो आज भारतातला आघाडीचा पत्रकार आहे. रविश म्हणतो,

” पत्रकारिता ही प्रस्थापित सरकार आणि व्यवस्थेला प्रश्‍न विचारण्यासाठी असते ना की त्यांच्या मांडीवर बसून त्यांचेच उदो उदो करण्यासाठी.”

आज रविश कुमार त्याच्या करियरच्या उंच शिखरावर आहे असेच म्हणावे लागेल. त्याला पत्रकारितेतील अनेक मानाचे पुरस्कार ही मिळाले आहेत.

तर भिडूनों मनाने इतका संवेदनशील माणूस कॉलेज जीवनात प्रेमात पडला होता, ही त्याचीच स्टोरी. 

रविशने बिहार मध्ये  हायस्कूल पूर्ण होताच पुढील शिक्षणा साठी दिल्ली गाठली. दिल्लीच्या देशबंधू कॉलेज मध्ये त्याने ग्रॅज्युएशन पूर्ण केले त्याचवेळेस तो केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास करू लागला होता. त्याने किती अटेम्पटस दिले काही कल्पना नाही, पण तो पास नाही झाला हे एका अर्थाने बरेच झाले, देशाला एक हाडाचा पत्रकार मिळाला. नंतर त्याने m.phil ला ॲडमिशन घेतले. पुढे जाऊन डॉक्टरेट चे प्रबंध लिहु इच्छिणाऱ्या रविशला मधेच प्रेमाचा अध्याय लिहावा लागला.

तर किस्सा आहे रविशच्या ते संघर्षाच्या दिवसांचा. तेव्हा त्याला आयुष्या बद्दलची स्पष्टता इतकीशी नव्हती.

रविशची युनिवर्सिटीतच कॉमन मित्रांमुळे एका मुलीशी ओळख झाली. तिचे नाव नयना दास गुप्ता ती इंद्रप्रस्थ कॉलेज मध्ये शिकत होती. या बंगाली मुलीने आपल्या बिहारी बाबुला पहिल्याच भेटीत घायाळ केले. रविशला पहिल्याच भेटीत नयना प्रचंड आवडली. रविश आणि नयना एकमेकांशी भरपूर बोलले. रविश म्हणतो,

” मी पहिल्यांदा एकाद्या मुलीशी इतका वेळ बोललो असेन.”

पुढे मैत्री वाढत गेली म्हणजे रविशनेच पुढाकार घेतला. तो नेहमी काहीतरी काम काढून नयनाला भेटत असे. रविशचे इंग्लिश कच्चे होते तर नयनाची इंग्लिशवर चांगली पकड होती. रविशने नयनाला इंग्लिश शिकवण्याची गळ घातली नयनाने होकार दिला. या इंग्लीश शिकण्याच्या काळातच दोघे एकमेकांच्या अत्यंत जवळ आले. रविशचा मुळ स्वभाव प्रचंड लाजरा आहे. नयनाला या काळात ते सतत जाणवायचे. मुलींशी  बोलताना तर त्याला खूपच अस्वस्थ वाटत असे. नयनाने ते अनेकदा पाहिलं होतं ती रविशवर खूप हसायची.

नयनाच्या बाबतीत मात्र रविश निवांत असे त्याला तिच्याशी बोलायला आवडायचे. हळू हळू मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. लाजरा बुजऱ्या रविशने नयनाचे मन अखेर जिंकलेच. नयनाला ही रविशची निरागसता आवडायची.

आणि मग या प्रेमप्रकरणाला सुरवात झाली. दिल्लीत टेकडी नसल्याने दोघेही एखाद्या कॉफी हाउस मध्ये भेटायचे. रविशकडे तेव्हा खूप कमी पैसे असायचे त्यामुळे त्याची आपल्यासारखीच अडचण व्हायची.

आपल्या प्रिया व्यक्तीला प्रत्येकालाच काही न काहीतरी देऊ वाटतं. फिरायला घेऊन जाऊ वाटते आपसूक रविशला ही ते वाटायचे. त्यावर त्याने वॉकला जाण्याचा पर्याय काढला. रविश आणि नयना जवळपास दिल्लीतील अनेक एरियात चालत फिरले आहेत. कधी दिल्ली हट, कधी जामा मस्जिद ,कधी लोधी गार्डन तर एखाद्या मेट्रोच्या खंाबाखाली सुद्धा दोघांनी वेळ घालवला आहे.

प्रेमात काय हो  जिथे ती तिथेच माणसाचे विश्व आकार घेत असते. पुढे रविशने याच अनुभवातूनच “इश्क मै शहर होना” हे पुस्तंक लिहिले.

मधल्या काळात  यमुनेच्या  प्रवाहातून बरेच  पाणी वाहून गेले या नात्याला सुरु होऊन सात वर्ष झाली होती. इतक्या मोठ्या काळात दोघांनी एकमेकांना आंतर्बाह्य ओळखले होते आणि स्वीकारले ही होते. रविश ने ही indian institute of mass communication मधून पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण केला होता आणि १९९६ ला NDTV मध्ये तो कामाला ही लागला होता.

download

दोघांना आत्ता लग्न करायचे होते. रविशने घरी सांगायचे ठरवले रविशचे कुटुंब प्रचंड रूढीवादी आणि परंपरागत विचारांचे आहे. रविशने घरी सांगितले आणि घरात एक वादळच आले. घरच्यांनी साफ नकार दिला. त्याची प्रचंड घालमेल झाली जशी अनेकांची होते. एकीकडे जन्मदाते असतात तर एकीकडे जिच्यावर जिव लावला असतो ती प्रेयसी असते.

उगाचच जिगर मुरादाबादींचा तो शेर इतका लोकप्रिय नाही

“ये इष्क नाही आसान इतना समझ लीजीए

एक आग का दर्या है और डूब के जाना है”

हा शेर या काळात रविशला कितीतरी वेळा आठवला असेल. नयनाचे कुटुंब मात्र मॉडर्न होते. रविशने निर्णय घेतला नयनाची साथ देण्याचा. आणि घरच्यांच्या विरोधात जाऊन दोघांनी लग्न केले. दोघांनी आपल्या प्रेमाला जिंकवले. घरच्यांनी मात्र रविशशी पूर्णच संपर्क तोडला. आजही नयना रविशच्या मूळ गावी गेलेली नाही.

अनेक वर्ष घरातून रविश बरोबर कोणीच बोलले नाही, अलीकड मात्र तो त्याच्या आई वडिलांच्या संपर्कात असतो. आज या जोडप्याला दोन मुली आहेत. नयनाही दिल्ली विद्यापिठातील लेडी श्री राम कॉलेज मध्ये इतिहासाची प्राध्यापक आहे. रविशही आज एनडीटीव्ही चा सिनियर एक्झिक्युटिव्ह एडिटर आहे. दोघेही आज स्वतःच्या क्षेत्रात यशस्वी आहेत आणि एक सुंदर आयुष्य जगत आहेत.

हे ही वाच भिडू.

3 Comments
  1. RAHUL MORE says

    आमच्या जाणदार आणि हळवे व्यक्ती बद्दल वाचून आनंद झाला

  2. विशाल says

    व्याकरणाच्या प्रचंड चुका ह्या लेखात आहेत. कृपया नीट लिहा.

Leave A Reply

Your email address will not be published.