घरात आधी वाटण्यांमुळे झालेला राडा नको म्हणूनच अंबानींनी रिलायंसच्या अशा वाटण्या केल्यात

सोमवारी रिलायन्स कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी त्यांनी  रिलायन्स समुहाच्या रिटेल व्यवसायाची प्रमुख म्हणून मुलगी ईशा तर अनंत अंबानी यांच्याकडे न्यू एनर्जीचा प्रमुख म्हणून ओळख करून दिली. 

काही वर्षांपूर्वी मुकेश आणि त्यांचे बंधु अनिल अंबानी यांचा संपत्तीच्या वाटपावरून झालेला कलह सगळ्या देशाने पाहिला होता. कदाचित यातूनच धडा घेऊन भविष्यात अशी परिस्थिती आपल्या मुलांच्या बाबतीत निर्माण व्हायला नको म्हणून ६४ व्या वयात मुकेश अंबानी यांनी कंपन्यांच्या  कार्यभार आपल्या मुलांकडे सोपवताना दिसत आहेत. 

आपला रिलायन्स हा उद्योह समूह हळू हळू तीनही मुलांकडं सोपवणार असल्याचं त्यांनी या आधीच जाहीर केल होत. मागे धीरूभाई अंबानी यांच्या जयंती निमित्त बोलताना मुकेश अंबानी म्हणाले होते,

तरुण पिढी आता नेतृत्व करण्यासाठी सज्ज झाली आहे, अशावेळी आपण मार्गदर्शकाच्या भूमिकेत जाणं गरजेचं आहे, आपण आता त्यांना प्रोत्साहन द्यायला हवं.

पुढे ते म्हणतात, “माझ्या मुलांची रिलायन्स समुहाबद्दल असणारी कमिटमेंट मी नेहमी बघतो, लोकांच्या जीवनात अमुलाग्र बदल घडवून आणण्याची जी इच्छा माझ्या वडिलांमध्ये असायची तीच इच्छा मला माझ्या या मुलांमध्ये दिसते”.

अंबांनींना आपल्या तीनही मुलांच्या बाबतीत हा विश्वास वाटतो की ते रिलायन्स उद्योग समूहाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतील. म्हणूनच त्यांनी आपल्या मुलांकडे आपल्या व्यवसायातील वेगवेगळे विभाग सोपवलेले दिसतात. 

तेल शुद्धीकरण आणि पेट्रोकेमिकल्स, रिटेल आणि डिजिटल सेवा ज्यात टेलिकॉमचा समावेश आहे. हे तीन मोठे व्यवसाय रिलायन्स कंपनीचे आहेत. 

 

मुकेश अंबांनींना एकूण ३ मुले आहेत ईशा, आकाश आणि अनंत. अंबानींची ही तीनही मुलं बर्‍याच काळापासून आपल्या कंपनीतल्या वेगवेगळ्या जबाबदार्‍या पार पाडत आहेत. जूनमध्येच अंबानी यांनी त्यांचा मुलगा आकाश याला समूहाच्या टेलिकॉम शाखा, रिलायन्स जिओचे अध्यक्ष केले.

ईशा अंबांनीचं रिलायन्स उद्योग समूहातलं योगदान:

ईशा आणि आकाश अंबानी ही दोन भावंडे २०१४ पासूनच रिलायन्स जिओ इन्फोकॉम आणि रिलायन्स रिटेलच्या संचालक मंडळात काम करतात.

ईशाने २०१३ मध्ये येल विद्यापीठातून सायकोलॉजी आणि साऊथ एशियन स्टडीजमध्ये पदवी घेतली आहे. रिलायन्समध्ये येण्यापूर्वी तिने काही काळ मॅकेन्झीमध्ये देखील काम केलंय. त्याशिवाय फॅशन पोर्टल अजियोच्या लॉन्चिंगमध्येही ईशाची मुख्य भूमिका होती. आणि या पोर्टलचा सगळा कार्यभार ईशाच पाहते.

२०१४ मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये जिओ आणि रिलायन्स रिटेलच्या संचालक टिम मध्ये ती रुजू झाली.  ईशा अंबानी रिलायन्स फाउंडेशनची अतिरिक्त संचालक आणि रिलायन्स जिओची सहसंचालक आहे.

जिओ प्लॅटफॉर्मचे ९.९९ टक्के हिस्सेदारी फेसबुकला विकण्याच्या चर्चेत ईशा अंबानी हिचं योगदान होतं असं म्हटलं जातं.

जिओसोबतच नव्याने स्थापन केलेल्या रिलायन्सच्या ई-कॉमर्स जिओ मार्टचेही काम ईशाच पाहते. रिलायन्स जिओ आणि रिलायन्स रिटेलच्या ब्रँडिंग आणि मार्केटिंगचीही मोठी जबाबदारी ईशा पार पाडते. 

यावेळी इशा अंबानी यांनी प्रेजेंटेशन केले. त्यावेळी त्यांनी व्हाट्सएपचा वापर करून ऑनलाइन किराणा ऑर्डर देण्याबाबत सांगितले. 

रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड (RRVL) या वर्षी आपला किराणाचा व्यवसाय सुरू करणार असल्याचेही इशा यांनी जाहीर केले. या व्यवसायाचा उद्देश उत्पादने तयार करण्याबरोबर आणि प्रत्येक भारतीय नागरिकाला चांगल्या वस्तू परवडणाऱ्या किमतीत मिळालाय हव्यात असेही त्यांनी सांगितले. याशिवाय रिलायन्स रिटेल भारतीय कारागिरांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे मार्केटिंग सुरू करणार आहे. 

अनंत अंबानीचं रिलायन्स उद्योग समुहातलं योगदान:

मुकेश अंबानींचा तिसरा मुलगा २६ वर्षीय अनंत अंबानी यानेही ब्राउन युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेतलय. अनंत हा रिलायन्स जिओचा अतिरिक्त संचालक म्हणून जिओ प्लॅटफॉर्मच्या संचालक मंडळावर आहे. अनंत अंबानी रिलायन्सच्या जामनगर रिफायनरीच्या सोशल अँड इन्फ्रास्ट्रक्चरचं काम पाहतो.

रिलायन्सच्या ग्रीन एनर्जी उपक्रमांतर्गत, सोलर कंपनीच्या बोर्डवरचं काम आकाश कडे आहे. आगामी काळात कंपनी ग्रीन एनर्जीमध्ये दहा अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे असं सांगितलं जातं.

जिओ देशातील सर्वात मोठी टेलिकॉम ऑपरेटर कंपनी आहे. कंपनीने नुकतेच त्यांचे दर वाढवले ​​आहेत, ज्यामुळे कंपनीला भविष्यात अधिक नफा मिळण्याची अपेक्षा आहे. त्याचबरोबर स्वस्त मोबाईल बनवण्यासाठी रिलायन्सने गुगलशी करार सुद्धा केला आहे.

सध्या रिटेल उद्योगात सुद्धा कंपनी चांगलं काम करत आहे. रिलायन्स ट्रेंड, रिलायन्स स्मार्ट, रिलायन्स फ्रेश, 7 एलेवन आणि आता नव्याने सुरू केलेली जिओ मार्ट या रिलायन्स च्या रिटेल क्षेत्रातल्या कंपन्या आहेत. या कंपन्यांची सुद्धा बाजारतली कामगिरी चांगली आहे, ही कामगिरी सुधारवण्यात सुद्धा त्यांच्या तिन्ही मुलांचा वाटा आहे.

आकाश अंबानी यांचं योगदान:

आकाशने ब्राउन युनिव्हर्सिटीमधून अर्थशास्त्रात पदवी मिळवलीये आणि आपली कंपनी जिओसोबत तो काम करतो. जिओ स्ट्रॅटेजीचे प्रमुख असण्यासोबतच आकाश अंबानी रिलायन्स जिओच्या कार्यकारी समितीचा सदस्य देखील आहे. याशिवाय तो रिलायन्स जिओच्या गव्हर्निंग आणि ऑपरेटिंग बॉडीचा सदस्य आहे. आकाश अंबानी सुद्धा २०१४  पासून बहीण ईशा अंबानी सोबतच जिओ कंपनीचा संचालक म्हणून काम पाहतो.

रिलायन्स जिओमध्ये प्रोडक्ट डेवलपमेंट, मेसेजिंग आणि डिजिटल सर्विसेस अॅप्लीकेशनचं काम आकाश बघतो.

 

सोबतच मुंबई इंडियन्स या आपल्या आयपीएल टिम चं सगळं कामकाज सुद्धा आकाशच पाहतो. जिओ प्लॅटफॉर्मचे शेअर्स विकण्यात ईशा अंबानीसोबत आकाश अंबानीचाही महत्त्वाचा वाटा होता.

या पद्धतीने भविष्यात आपल्या मुलांनी आपला व्यवसाय व्यवस्थितपणे सांभाळावा म्हणून मुकेश अंबानी यांनी व्यवसायातल्या वेगवेगळ्या जबाबदार्‍या आपल्या तीन्ही मुलांना देऊन ठेवल्या आहेत. पुढे जाऊन त्या त्या क्षेत्रातली मालकी ते त्यांना बहाल करतील. जेने करून त्यांचे बंधु अनिल आणि त्यांच्यात संपत्तीच्या मालकी हक्कावरून जो वाद झाला होता, तसा वाद आपल्या मुलांमध्ये होऊ नये हाच त्यांचा उद्देश असावा.

 

हेही वाच भिडू 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.