बेंबीत कापूस कसा तयार होतो, या फंटरने छोट्या सुतगिरणीचं कोडं सोडवलय.. 

हायला… मला हेच पाहीजे होतं. खरच राव बेबीत कापूस तयार होतोय पण कोणाला सांगता पण येत नाही. माहिताय भावांनो (आणि बहिणींनो) जगातल्या सगळ्या मानवांचा हा सेम प्रॉब्लेम आहे. रोज एक कापसाचा गोळा बेंबीतून बाहेर काढणं ही लय जणांसाठी कॉमन गोष्ट आहे. आत्ता तुमचा दावा असला आमच्या बेंबीतून असलं काही निघत नाही तर त्याबद्दल तीन शक्यता निर्माण होतात. 

  1. पहिली शक्यता तुम्ही लाजताय, खोटं बोलताय 
  2. दूसरी शक्यता, तुम्ही कशी आपल्या बेंबीपर्यन्त पोहचलाच नाही 
  3. तिसरी शक्यता, तूम्ही पोटाची गुळगुळीत शेव्ह केलीय

या पलिकडे एकही कारण नसणार. फिक्सय. अर्थात बेंबीतून कापूस न निघणारा माणूस जगात नाही. पण हा कापूस निघतो कसा, सुतगिरण असते तरी नेमकी कुठं आणि या गोष्टीवर कुठल्या मोठ्या माणसानं रिसर्च वगैरे केलाय का.. 

तर याचं उत्तर होय अस आहे. जगात वाट्टेल ते करणारी माणसं आहेत. चार वर्ष झटून सॅम्पल गोळा करून एका डॉक्टरेट मिळवलेल्या प्राध्यापकांनं यावर रिसर्च केलाय.

बर इतक्यावरच तो थांबलेला नाही तर या शोधाबद्दल त्याला नोबेल देखील मिळालाय, पण हा नोबेल आपल्या सध्या गल्लीगल्लीत देण्यात येणाऱ्या दादासाहेब फाळके पुरस्कारासारखा आहे. म्हणजे नाव नोबेल आहे पण खरावाला नोबेल नाही तर एलजी नोबेल प्राईज मिळालाय. आत्ता एलजी नोबेल काय असतोय तर असा पुरस्कार जो पहिल्यांदा लोकांना हसवतो फालतू वाटतो पण डिपमध्ये गेल्यानंतर लोकांना विचार करायला भाग पाडतो. हा पुरस्कार बेंबीतल्या सुतगिरणीचा शोध लावणाऱ्याला मिळाला आहे. 

तर या माणसाचं नाव आहे डॉ. कार्ल कुशेलव्हिन्स्की.

हा माणूस सिडनी विद्यापीठात प्राध्यापक होता. गड्याला रोज बेंबीत साठणाऱ्या कापसाचा त्रास होत होता. पण त्याने विचार केला सुतगिरण नक्की कुठे असेल. त्याला अंदाज आला की आपण जे कपडे घातलो तोच कापूस बेंबीतून निघत असणार.  पण रिसर्चला लागतो पुरवा. पठ्याने चार वर्षात हजारो लोकांकडून बेंबीत साठलेला कापूस मागवून घेतला.

लावून धरलं आणि या कापसावर रिसर्च करायला सुरवात केली. कापसासोबत यामध्ये धुळ, केस, आणि डेड स्किन मिळायची. मग अजून डिप संशोधन केलं. काही लोकांना आपल्या पोटावरचे केस काढायला सांगितले, अशा लोकांच्यात तुलनेत कमी कापूस तयार होवू लागला… 

अगदी पुराव्यानिशी संशोधन करून डॉ. कार्ल यांनी काही निष्कर्ष मांडले, ते असे होते… 

  1. बेंबीतून निघणारा कापूस हा दूसरी तिसरीकडून तयार होत नसून आपण जे दिवसभर कपडे घातलो त्यातून निघणारा कापूसच असतो. 
  2. बेंबीमुळे नाही तर बेंबीच्या भोवती असणाऱ्या केसांमुळे हा कापूस तयार होतो. कापड व पोटाच्या केसांच्या घर्षणामुळे कापूस तयार होवून तो भोवऱ्याप्रमाणे बेंबीकडे जावून त्यात साठतो. 
  3. जे जास्त जाड असतात, ज्यांच्या पोटावर जास्त केस असतात त्यांची सुतगिरण मोठ्ठी असते. तुलनेत ज्यांच पोट प्लॅट असतं. पोटावर केस असतात त्यांची सुतगिरण कमी असते. 

या निष्कर्षामुळे डॉ. कार्लला लोकांनी येड्यात काढलं पण डोक्यातला विशेषत: बेंबीचा प्रश्न कायमचा निकालात लावल्याबद्दल पुरस्कार देखील दिला. आत्ता जाता जाता शेवटचा प्रश्न तो म्हणजे बेंबीतला कापूस साठवून तुम्ही श्रीमंत होवू शकता का.. तर नाही.

साधारण 503 गोळ्यांच वजन हे 1 ग्रॅम इतकं भरलेलं त्यामुळे आयुष्यभर कापूस साठवला तरी तुम्हाला त्यावर साधी भांडी देखील मिळू शकणार नाहीत. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.