INTO THE WILD : इथं प्रत्येकजण स्वत: बनवलेल्या पिंजऱ्यात बंदिस्त आहे

तुम्हाला कदाचित या गोष्टीची जाणिव नसेल पण लिहण्याची देखील मक्तेदारी आहे. तेच तेच लोक लिहीत राहतात आणि आपण वाचत राहतो. पण आपण कधी लिहायचं धाडस करत नाही.

लिहायचं धाडस करायला हवं म्हणून “बोलभिडू” मार्फत या पाच सिनेमांवर लिहण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली.

याचा उद्देश सिनेमांहून अधिक कधी न लिहणाऱ्या भिडू लोकांनी मनमोकळेपणाने लिहावं हाच होता. आपण लिहते झाला. या पाच पैकी एक सिनेमा हा इन टू द वाईल्ड. या सिनेमाबद्दल जे लेख आले ते सर्व लेख खाली दिलेले आहेत.

आत्ता एक काम करायचं, ज्यांचा लेख उत्तम आहे अस वाटतं त्यांना तुम्हीच मार्क द्यायचे. लोकप्रिय असणाऱ्या लेखांना दोन महिन्यांसाठी नेटफ्लिक्स देणार आहोत. एका सिनेमावरचा एक सर्वोत्तम लेख.

वाचा आणि तुम्हीच सांगा यापैकी सर्वात्तम लेख कोणता. ज्याच्या नावाने अधिक कमेंट असतील तो व आमच्या परिक्षकांच मत याचा विचार करुन नंबर काढूया.

विशेष सुचना.

लेख वाचताना घ्यायची काळजी इतकची की, बरेच जण नवीन लिहणारे आहे. तथाकथित समिक्षक लिहणाऱ्यांनी सिनेमाचे स्पॉयलर दिले वगैरे सारख्या गोष्टी करुन वाद घालू नयेत. शिवाय हे लेख ज्या क्रमाने आम्हाला आले त्याच क्रमाने देण्यात आले आहेत. 

1. राहूल नवले यांचा लेख. 

Sean Penn दिग्दर्शित Into The Wild एक सिनेमा. खरतर सिनेमा आहे कि डिस्कवरी चॅनेल वरचा कार्यक्रम कळत नाही. त्यातल्या त्यात अभिनय हा खूप उत्तम. मला हा सिनेमा का पहायला मिळाला तर मी यूट्यूब वर सर्च केलं कि “Best movie for introvert people”.

तर त्यात Forrest Gump, Amelie, Shape of Water, Into The Wild असे अनेक सिनेमे होते.

सगळे सिनेमे सुपरहिट. पण खरी कथा, जंगलसफारी, एकटेपणा, जगाचे वाईट अनुभव, मी आपण स्वतः यात गुंतवणारा जर कोणता सिनेमा असेल तर Into The Wild. हि झाली पार्श्वभूमी.आता सिनेमाकडे येऊया.

Christopher Mccandless म्हणजे सिनेमातील Emile.

हुशार पोरगं चांगल्या Graduation झालं कूठेही चांगल्या पगाराची नोकरी केली असती, नातेवाईकांनी कुठंतरी चिटकवलं असतं नाहीतर त्याच्या देशातील MPSC UPSC केली असती. पण त्याला किडे खूप. बाप रागीट, महत्त्वाकांक्षी पण ते बापाला म्हणे मला जग हिंडायच. थोडी बाचाबाची झाली. नेहमीसारखी आई मध्ये आली चला मिटलं.

इथपर्यंत आपल्याला वाटेल कि हे असं का वागतय याला पेपर अवघड गेले असतील म्हणून असं करतय कि कूणी नाही म्हणली कि दुसऱ्याबरोबर दिसली तर असं काही नव्हतं. पुढे सगळी उत्तरं मिळतील. असो.

शेवटी चारचाकी घेऊन अलास्काच्या जंगलात निघालं.खिशात थोडेफार पैसे. शिकारी बंदुक. आणी पाठीवर एक बॅग. जेव्हा तो गाडी चालवत निघतो तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर एक हलका आनंद दिसतो पण त्यात एक गोष्ट कळून जाते कि तो किती तूटलेला आहे. शेवटी रात्र होते. मुसळधार पाऊस. अचानक पूर येतो गाडी पाण्यात पण तो वाचतो.

सकाळी तो गाडीला श्रद्धांजली देतो आणि पायी निघतो. इथेच वाटतं कि हा सिनेमा पूर, वादळ, जंगली प्राणी यांच्याशी संघर्ष करण्याचा नक्किच नाही.

तर मनात असणारे वादळ, घालमेल, एकटेपणा, दूनियादारी, स्वतःशी असणारा संघर्ष यावरच असणार आणि का नसावा. माणसावर कुणी विचार थोपवू शकत नाही. कारण माणूस जन्माला येताना काही तरी नैसर्गिक घेऊन येतो. कुणाला एकटेपणा आवडतो, कुणाला लोकांमध्ये रमायला.

दोनही गोष्टी वाईट बिलकुल नाही परंतु लोकांमध्ये रमणारा माणूस जर एकटं रहायला लागला आणि एकटा राहणारा माणूस लोकांमध्ये रहायला लागला तर यामागे नक्की काहितरी कारण असते.

सिनेमातील Emile लहानपणापासून एकलकोंडा असतो त्याला जगापासून दूर असणारा एकटेपणा आणि अनोळखी माणसांशी मैत्री करायला आवडतं.

चला सिनेमाकडे येऊया. तर हा पठ्ठ्या असाच फिरत फिरत जंगलात एका ठिकाणी पोहचतो. बंदूकिने प्राणी मारायचे आणि खायचे. सकाळी नदीवर जायचं रात्री आग करून काहितरी बडबडायचं. खरी मजा इथे आहे. बडबडायचं? तर तो जे काही बडबडला ते खरंतर Inspired आहे.

हा सिनेमा त्यातील काही Quote म्हणजे सुविचार यावर जास्त प्रकाश टाकतो. मला आवडलेला एक म्हणजे “The core of man’s spirit comes from new experience”. यावर खूप काही लिहिता येईल एवढा अर्थ यात आहे. असे अनेक Quote या सिनेमात आहे.

सिनेमा नुसता तो एकटा फिरतो यावर नाही. तर त्याला वाटेत अनेक अनोळखी लोक भेटतात. आपल्याला घरचे सांगतात कि अनोळखी लोकांपासून दूर रहा. पण अनोळखी लोक खरच चांगले वाटतात फक्त नशीब थोडंसं चांगलं हवं.

कारण अनोळखी लोकांना आपला भूतकाळ माहित नसतो आणि आपल्या भविष्यकाळाशी त्यांना काही घेणंदेणं नसतं.

त्यालाही अनेक लोक भेटतात. त्याला एक कळत कि या जगात आपल्यापेक्षा जास्त दूःख इतरांना आहे. यात एक जोडपं त्याला भेटतं तो भावनिकदृष्ट्या त्यांना जोडला जातो पण कूणाशीही असे जोडले जाणे म्हणजे त्रासदायक. पूढे खूप लोक भेटतात. पण सगळं सांगितलं तर सिनेमा पहायला मजा येणार नाही.

शिकायला काय मिळालं तर आपल्याला जसं वाटतं तसं जगा. सरतेशेवटी आपला शेवट कधी व कसा असेल हे नक्की माहित नसतं. लहान गोष्टींमध्ये आनंद शोधायला हवा. अपेक्षा, हव्यास, अतिमहत्वांकाक्षा या काही कामाच्या नाही. कोरोनाने जगाला असं वठणीवर आणलं नाही !

पठ्ठ्याने त्याचा आनंद जंगलात, एकांतवासात शोधला, जगला, संपला. कधी कुणाला कसे दिवस‌ येतील ना सांगता येणार नाही. नेहमी आनंदात असणारा यशस्वी माणुस छोटे दूःख पण पचवू शकत नाही तसंच नेहमी अडचणी असणारा माणूस छोट्या गोष्टीत पण आनंद व्यक्त करतो आणि लोकांना हाच माणूस सगळ्यात सूखी वाटतो. सत्य काही असो. सिनेमा अप्रतिम आहे.

हा सिनेमा असं बिलकुल सांगत नाही कि तुम्ही त्यांच्यासारखे जगा. पण सिनेमा एक सुंदर घर बांधून देतो त्यात आपण कसं राहायचं हे आपल्या मनावर आहे.

राहुल नवले ७७०९८०९००२. 

Screenshot 2020 04 01 at 3.02.49 PM


2. रघुनंदन पाटील यांचा लेख. 

खऱ्या आनंदाचा साक्षात्कार (Into the Wild movie)

भिडूलोक आपल्या प्रत्येकामध्ये एक भटक्या, एक जंगली दडलेला असतो ज्याची स्वतःची एक bucket list असते. प्रत्येकाला आयुष्यात एकदा तरी स्वतःच अस्तित्व विसरावे असा एक तरी प्रवास करावा असं वाटतं असत. पण सांगू का आपली पहुंच खूप छोटी आहे…हो हो नक्कीच.. तुम्ही जर “जिंदगी ना मिलेगी दोबारा” बघितला असेल तर एक दोन जागा परदेशातल्या असतील.

तरीही जिथं तुमचं स्वप्न पूर्ण होत तिथं अलेक्झांडर सुपरट्राम्प चा संघर्ष चालू होतो ( हे वाक्य अनन्या पांडे च चोरून मारलेल आहे तर तेवढं समजून घ्या.).

तुम्ही म्हणाल हा अलेक्झांडर कोण?

हा असा विचित्र माणूस आहे ज्याला पैसा, सत्ता सब कुछ मोहमाया वाटते. याला समाजाने माणसावर लादलेल्या जबाबदाऱ्या, आईवडिलांच्या अपेक्षा म्हणजे माणसाला स्वतंत्र न होऊ देनारे साखळदंड वाटतात. त्याला वाटतं की माणसाचा खरं आनंद त्याला मिळणाऱ्या स्वातंत्र्यात असत.

तुम्हाला त्याच अलेक्झांडर सुपरट्राम्प हे नाव थोडंसं विचित्र वाटलं असेल ना? त्याच खर नाव ख्रिस अस होत. पण पदवी मिळवल्यानंतर नोकरीचा शोध घेण्याऐवजी स्वप्नांचा शोध घ्यायचा निश्चय झाला तेव्हा आई वडिलांच्या घरासह त्यांनी दिलेली ओळख सुध्दा त्यानं मागे सोडली.

कधी चालत तर कधी लिफ्ट मागून अनेक रस्ते जंगलं पायाखालून घालत होता. जंगलातल्या ओढ्यावर कान टवकारून अतिशय सावधपणे पाणी पिणारे हरीण कदाचित त्याने आयुष्यात पहिल्यांदाच बघितले असेल.हे दृश्य बघताना त्याचे डोळे अगदी विस्फारून गेले होते. ह्या दृष्याला पक्ष्यांचा किलबिलाट उत्तम पार्श्वसंगीत देत होता.

त्याच्या आयुष्यात आलेल्या विलक्षण व्यक्तींपैकी जान आणि रेनी हे जोडपं त्याला कुटुंबाचाच भाग मानत होत. त्यांच्याशी अलेक्स खूप वेळ गप्पा मारतो. जान जेव्हा समुद्रकिनाऱ्यावर येरझाऱ्या घालत असते तेव्हा तिला सोबत घेऊन तो लाटांच्या सोबत खेळतो उड्या मारतो.

समुद्राच्या लाटा तेव्हा आपल्या शरीरावर जोरदार प्रहार करत असतात तेव्हा त्या आपल्याला एक संधी देत असतात स्वतःला ताकदवर समजण्याची….!

ॲलेक्स च्या मते तुम्ही किती बलवान आहात याच्यापेक्षा तुम्ही किती बलवान समजता हे खूप महत्वाचे आहे.जान ला वाटायचे की  अलेक्झांडर आपल्यासोबत काही दिवस राहील पण स्वतःच आयुष्य नदिसारख समजणाऱ्या त्याला आपल्या प्रवासाला नातेसंबंधांचे बांध घालायचे नव्हते म्हणून तो जान आणि रेनी ला न सांगताच पुढच्या प्रवासाला निघाला.

अमेरिकेतली विस्तीर्ण गव्हाची शेती पार करत जाताना कधी तिथं लावलेल्या तुषार सिंचनाच्या कारंज्यात दाढी करण्याचा मोह आलेक्स ला कधी आवरायचं नाही. तिथली गहू काढणी यंत्र चालवणारा वेन त्याचा मित्र बनला.त्याने त्याला यंत्र चालवायला शिकवली. वेन स्वताला मिस्टर हॅप्पी अस सांगायचा.

तो होता देखील तसाच पांचट जोक मारणारा, मित्रांची खेचणारा आणि पोलिस धरून न्यायला आले तरी शांत डोक्याने आपल्या मित्रांना पुढचे नियोजन सांगणारा..! त्याच्याच एका मित्राने केविनने अलेक्सला मास जास्त काळ कसं टिकवून ठेवायचं याच्या टिप्स दिल्या ज्या आलेक्सला पुढील प्रवासात कामी येणार होत्या.

अलेक्सने केलेलं सगळ्यात जीवघेणं धाडस म्हणजे कुठल्याही अनुभवाशिवाय वादळाला स्वताच्या प्रवाहाबरोबर बांधून वाहणारी कॉलोराडो नदी कुठल्याही रिव्हर राफ्टिंग चे प्रशिक्षण नसताना आणि कुठल्याही सुरक्षा रक्षक उपकरणांशिवाय पार केली होती.

तो हे करू शकला कारण माजोर दगडांना सहज उध्वस्त करणाऱ्या कॉलोराडोपेक्षा अलेक्झांडर चा वेडेपणा आणि इच्छाशक्ती जास्त मोठी होती. बक्षीस म्हणून टेहाळणी करणारे पोलीस त्याच्या मागावर देखील लागले होते. पण त्यांनी पकडायचा आत नदिकाठला फिरायला आलेल्या जोडप्याकडून नदिमार्गे मेक्सिको ला जाण्याचा पत्ता विचारून अलेक्स् त्या मोहिमेवर निघतो.

जेव्हा तो देशाची सीमा पार करत असतो तेव्हा त्याला पोलीस अडवतात. निर्वासितांच्या कॅम्प मध्ये जाऊन अलेक्झांडर सुपरट्राम्प नावाचे ओळखपत्र बनवावे असे वाटते पण हा विचार काही क्षणापुरताच राहतो. सामान उचलून मालगाडी मध्ये बसून जाण्याच्या प्रयत्नात तो पोलिसांना सापडतो व खूप मार खातो. अगदी डोळे सुजेपर्यंत फटके पडलेले असतात.

अलेक्झांडर चालत, लिफ्ट मागत स्लॅब सिटी मध्ये येऊन पोचतो.

ह्या शहरात मात्र त्याच्यासाठी एक सुखद धक्का बसतो जेव्हा त्याला जान आणि रेनी पुन्हा भेटतात.त्यांच्यासोबत पुन्हा गप्पांचा फड रंगतो.समोरच्या फिरत्या घरात राहणाऱ्या गिटार वाजवणाऱ्या मुलीच्या डोळ्यात अलेक्झांडर बद्दलचे आकर्षण रेनी ओळखतो .पण अलेक्स तिला भाव देत नव्हता किंबहुना तो आत्ता कोणत्याही नात्याच्या बंधनासाठी तयार नव्हता.

अलेक्सला जान ने सांगितले की तिचाही मुलगा असाच स्वातंत्र्य जगण्यासाठी तिला सोडून गेला होता तेव्हा त्याच्या लक्षात येत की  ती त्याच्यामध्ये स्वताच्या मुलाला शोधत होती. अलेक्स ला पण वाटायला लागलं होत की शेवटचा अलास्का ची धाडशी सफर पूर्ण केली की परत यांच्याकडे यावं. म्हणून तो लवकरच निरोप घेतो.

ह्या जगात असे खूप लोक असतात ज्यांचा आयुष्य नियती नावाच्या वादळान उध्वस्त करून टाकलेलं असत .आयुष्यभर ते त्या अवजड न पेलणाऱ्या नात्यांचे ओझे घेऊन जड मनाने जगत असतात.

त्यांच्या आयुष्यात अलेक्स सारखा भटक्या येतो तेव्हा ते आपली गमावलेली नाती त्यांच्यात शोधायचा प्रयत्न करतात. त्यातलाच एक सैन्य दलातला निवृत्त अधिकारी श्रीयुत फ्रांज हा भेटतो. त्याने आपल्या बायको आणि मुलाला एका भयानक अपघातात गमावलेले असते. निवृत्तीनंतर त्याने चामाड्यावर कोरीव काम करण्याची कार्यशाळा सुरू केली होती. अलेक्स त्याच्याकडून ही कला शिकला. त्याच्याबरोबर मासेमारी केली.

जेव्हा जास्त वयाच कारण सांगून फ्रांझ टेकडी चढायला नकार देत होता तेव्हा त्याला प्रेरणा देऊन टेकडी चढायला भाग पाडले.दोघंही जर वेगळे झाले तर एकमेकांना खूप मिस करणार होते पण तरीही अलास्का साठी निघण्याची वेळ आल्याने फ्रांजचा निरोप घेणं भाग होत आणि त्याप्रमाणे पाणावलेल्या डोळ्यांनी ते वेगळे झाले.

अलेक्स आता अलास्का ला पोचला होता. तिथं जाताना त्याच्यासोबत फ्रांज ने दिलेले उबदार कपडे, जान ने दिलेली लोकरी टोपी , केविन ने दिलेल्या मास साठवण्याच्या टिप्स होत्याच. सोबत ०.२२ ची एक बंदूक आणि निसर्गात जगण्यासाठी उपयोगी पडतील अशी खुप सारी पुस्तके होती.

तिथं गेल्यावर सर्वात प्रथम हे सर्व सामान ठेवायला आणि रात्री वन्यप्राण्यांपासून त्याच रक्षण करेल असा निवारा बनवावा लागणार होता.पण त्याच्या नशिबाने कुणीतरी सोडून दिलेले फिरत घर त्याला सापडले. हे घर जुनाट असल तरी त्याच्या निवाऱ्याची सोय होणार होती.

तिथल्या बॅरेल चा वापर त्यानं शेकोटी बनवण्यासाठी केला.छोट बॅरल पाणी भरून झाडाला टांगल व त्याच्या खाली छिद्र पाडून त्याचा शॉवर सारखा वापर केला. तिथं त्याने एक छोट्या वातीचा दिवा चालू केला ज्याच्या उजेडात त्याला पुस्तकं

वाचायची होती. सगळ्या सोयी झाल्या पण जेवणाची सोय कारण थोड अवघड होत. प्रत्येकवेळी शिकार करावी लागणार होती. त्याने सुरवातीला छोट्या प्राण्यांपासून सुरूवात केली. सष्यासारके छोट्या कोल्ह्यासारखे प्राणी त्याच्या जेवणाचा भाग बनू लागले. 

अलेक्सच ह्या समाजाने , शिस्तप्रिय वडिलांनी कैद केलेलं बालपण आता मुक्त झालेलं. रेनडिअर च्या कळपामागे धावताना, तिथल्या टेकडावरून घसरत खाली येताना तो स्वतःचे अस्तित्व विसरायचा. पण रेनडिअर आणि तीच पिल्लू पाहिलं की त्याची बंदूक आपोआप खाली जायची.

एके दिवशी मात्र त्याने एक मोठं जनावर ठार केलं. त्या प्राण्याचं मास वेगळं करताना त्याची खूपच दमछाक झाली आणि ते मास पण खाता आल नाही कारण त्याला अळ्या लागल्या. 

दिवसामागून दिवस जात होते अलास्का मधल वातावरण बदललं. आता त्याच्या घराजवळ प्राणी येईनासे झाले.आत्ता उपाशी राहण्यापेक्षा निसर्गातल्या खाण्या योग्य वनस्पती शोधणे आणि त्यावर उदरनिर्वाह करणे हा एकमेव पर्याय त्याच्यासमोर होता. त्याच्याजवळ असलेल्या पुस्तकातली चित्रे पाहून त्याने दोन चार वनस्पतीची फळ काढली आणि अधाष्यासारखी खाल्ली आणि तो झोपी गेला.

दुसऱ्या दिवशी जेव्हा जाग आली तेव्हा मात्र आपण चुकीचं फळ खाल्ले अस जाणवायला लागलं. त्याला कमालीचा अशक्तपणा जाणवत होता.त्यानं पुस्तकात जाऊन परत वाचलं तर त्यात लिहलेले भयानक परिणाम वाचून त्याला आता मृत्यू समोर दिसत होता. तो रडायला लागला. तो वाचण्यासाठी हालचाल करू लागला पण ती हालचाल नसून ही शेवटची तडफड आहे हे एव्हाना त्याला जाणवायला लागलं. 

आयुष्यातली प्रत्येक प्रिय अप्रिय व्यक्ती, प्रसंग समोर फिरायला लागले आपण त्या सगळ्यांना कायमचे मिस करणार ही भावना सुद्धा आली असेल मनात.पण सोबत स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद आणि प्रत्येक अनोळखी व्यक्ती बरोबर घालवलेल्या क्षणांनी त्याला खऱ्या आनंदाचा साक्षात्कार घडवला.

त्याला जाणवलं की खरा आनंद तेव्हाच आहे जेव्हा तो इतरांशी वाटला जातो आणि असा खूप सारा आनंद  तो त्याच्या प्रवासात वाटत आला होता. 

 •  Raghunandan Jagdish Patil  (8600643699)Screenshot 2020 04 01 at 3.06.14 PM

3. गीताश्री मगर यांचा लेख 

Into The Wild” – “जंगलामध्ये” / “प्राकृतिक अवस्थेमध्ये”

रस्त्याविना वाढलेल्या जंगला मध्ये एक वेगळाच आनंद असतो, अथांग पसरलेल्या एकट्या किनाऱ्यावर एक असीम आनंद असतो. त्या तिथं खोल समुद्रात, एक समाज असतो, जिथं कुणीच घुसखोरी करत नाही, त्याच्या लाटांच्या गर्जनातही एक संगीत असतं. माझं माणसावर प्रेम आहेच, पण त्यापेक्षा जास्त निसर्गावर आहे.

लॉर्ड बायरन या इंग्लिश कवीच्या ओळी,

‘इन टू द वाईल्ड’ मधला ख्रिस (ख्रिस्तोफर जोहान्सन मॅककँडलेस) असाच असतो निसर्गवादी. प्राकृतिकपणे आयुष्य जगण्याकडे त्याचा कल असतो. मुक्तेतीची प्रचंड आस असते त्याला. स्वतःच्याच पद्धतीने आयुष्य जगणारा हा ख्रिस,  आरामदायी पिंजर्यातल आयुष्य नाकारून,  भटकं आयुष्य स्वीकारणारा ख्रिस,  नकाशा जवळ न बाळगता, पाय ओढले जातील तिकडे जाणारा ख्रिस, चालत,पोहत, थांबत, पळत रस्ते चुकणारा ख्रिस, जगाला फाट्यावर मारून माणसाच आदिम आयुष्य जगायला निघालेला, अनेक अनोळखी रस्त्यात स्वतःला हरवून, स्वतःला शोधणारा ख्रिस वेडा असतो, हो वेडाच जगासाठी.

पण तो जेव्हा जगाकडे पाहतो तेव्हा जग त्याला वेड वाटतं. तो चंचल, काहीसा अस्वस्थ, जिद्दी असतो, प्रचंड पुस्तकप्रेमी, आशावादी, रोमांटिक असतो.

१ मे १९९० मध्ये ख्रिस्तोपर, एमोरी विद्यापीठातून पदवीधर झालेला असतो. त्यानंतर तो आपली सर्व क्रेडिट कार्ड आणि ओळखपत्रे नष्ट करतो. समाजाने,आई वडिलाने दिलेली कागदावरली ओळख मिटवून टाकतो. त्याच्या जवळ असलेली सर्व सेव्हिंग ऑक्सफॅमला दान करतो.

आई वडिलांकडून मिळालेल्या वस्तू,पैसा इत्यादी वरचा मालकी हक्क सोडतो आणि एक बंधनविरहित, मुक्त आयुष्य जगण्यासाठी तो घरातून रवाना होतो. बाहेर निघताना आपले आईवडील- वॉल्ट आणि बिली,त्याची बहीण कॅरीन यांना तो काहीही कल्पना देत नाही. तो गेल्या नंतरही त्यांच्याशी कसलाच संपर्क साधत नाही. ख्रिस्तच्या अशा अचानक जाण्याने,त्याचे आई वडील,बहिण दिवसेंदिवस चिंता ग्रस्त होतात आणि शेवटी निराश होतात, नंतर नंतर त्यांना अपराधीही वाटू लागतं.

ख्रिसचा नातेसंबंधावर राग असतो, तो राग घरातल्या वातावरणातूनच तयार होतो. वडिलांची दोन लग्न, त्यामुळे आई वडिलांत होणारे सततचे वाद, स्वतःच्याच घरात ख्रिसला आणि त्याच्या बहिणीला एखाद्या आश्रीतासारखी मिळणारी दुय्यम वागणूक, वेळोवेळी वाट्याला आलेला अपमान, हिंसा या सगळ्या गोष्टींचा त्याच्यावर झालेला आघात.

यामुळे आई,वडील,मुले, नवरा बायको हि नाती त्याला झुठ वाटायला लागतात. मनात कडवटपणा बाळगत वरून सुखी जीवनाचा दिखावा करणाऱ्या या लोकाबद्दल त्याला रोष असतो.

प्रत्येकाच्या जगण्याच्या अंतःप्रेरणा वेगवेगळ्या असतात. ख्रिसच्याही होत्या. त्याला आयुष्यात ॲडव्हेंचर हव असतं, थ्रील हव असतं. ही कुटुंब व्यवस्था,समाज व्यवस्था तुमच्या अंतःप्रेरणाना कधीच खतपाणी घालू शकत असं त्याला वाटत. चार चाकी गाडी ऐवजी त्याला बोट हवी असते.

पैसे,चैनीच्या वस्तू पेक्षा त्याला पुस्तके आनंद देतात, थोरो, ब्रायन,टोलस्टोय यांच्या पुस्तकाचा प्रभाव त्याच्यावर असतो. समाजाची आणि त्याच्या जगण्याची मुल्ये वेगवेगळी असतात. ख्रिस म्हणतो,

“मला या जगाचे कायदे नियम माहित आहेत, पण त्यांना मी माहित आहे काय ??

इतरासारख, नौकरी करून, लग्न करून, मुले जन्माला घालून, म्हातार होऊन त्याला मरायचं नव्हत. लोक काय म्हणतात, किवा काय म्हणतील याची पर्वा तो कधीच करत नाही.

तो म्हणतो,

“इथे प्रत्येक जण त्याने बनवलेल्या पिंजर्यात बंदिस्त आहे. पिंजऱ्यात राहणाऱ्या लोकांनी माझ्यासारख्या भटक्या बद्दल विचार करू नये, तुम्ही जरी विचार करत असाल माझा तर, माफ करा ! मी तो नाही, जो तुम्ही विचार करताय.”

कुटुंबाच्या, समाजाच्या कुबड्या घेवून आयुष्य जगण्याचा त्याला तिरस्कार असतो. त्याला वाटत कि जगण्याचं शहाणपण कुटुंब, समाज, शाळा, कॉलेज इथून येत नाही. प्रत्येकाने स्वतःच्या अंतःप्रेरणा ओळखून जगण्याच्या त्या वाटा शोधाव्यात. त्या वाटेवर भलेही माणूस पडतो, ठेचाळतो, जखमी होतो पण पुन्हा उभा राहतो, चालतो आणि याच प्रक्रियेत कुठतरी आपल्याला खर जगणं भेटत असाव असं ख्रिसला वाटत.

सिमेंटचे रस्ते, सिमेंटची जंगलं ख्रिसला कधीच बांधून ठेवू शकली नाहीत. या पेक्षा कुठलाच रस्ता नसणारी हिरवी जंगलं त्याला आकर्षित करत होती. १९९०मध्ये, ग्रज्युएट झाल्यास तो घरातून बाहेर पडतो. खिशात असलेली रोख रक्कम जाळतो. एक नवीन नाव देतो स्वतःला: “अलेक्झांडर सुपरट्रॅम्प.”.

कधी पायी चालत, तर वाहनांतून लिफ्ट घेत, जगाच्या नैसर्गिक सौंदर्याचा अनुभव घेत तो कॅलिफोर्निया,डकोटा,कोलोरॅडो नदी,मेक्सिको,लॉस अन्जोलीस,स्लब सिटी, सल्टन सीटी, आलास्का असा प्रवास करतो.

या प्रवासात त्याला अनेक लोक भेटतात, जॅन आणि राईन, ट्रेसी, फ्रांझ. काही काळ तो त्यांच्या सोबत घालवतो पण त्यांच्या नात्यात अडकत नाही. त्याचं प्रेम ख्रिसला थांबवू शकत नाही. ख्रिसच्या प्रवासाला ना पत्ते होते, ना त्या पत्तावर घेवून जाणाऱ्या वाटा.

त्यालाच माहिती नव्हत कि त्याला थांबवणारी जागा कुठे आहे. ख्रिस जेव्हा जमिनीचे, बर्फाचे तुकडे तुडवत तो चालत असतो, तो जमिनीवर चालतोय अस वाटत नाही. त्याची ‘अंतःप्रेरणा’ त्याचा ‘निसर्गावरचा विश्वास’ याच त्याच्या वाटा असतात.

दोन वर्ष नंतर, एप्रिल १९९२ मध्ये फिरत, फिरत डेनाली नॅशनल पार्कच्या उत्तरेकडील दुर्गम भागात, अलास्कामधील प्रिझिव्हर येथे येतो.

ख्रिसला इथे एक बस दिसते. तिथे तो रहातो. त्याला तो “द मॅजिक बस” म्हणतो. दिवसभर जंगलसफर करणे,शिकार करणे, ती भाजून खाणे,पुस्तके वाचणे, डायरीत रोजचे अनुभव टिपून ठेवणे हा दिनक्रम असतो त्याचा.

तिथं त्याच्याशी बोलणार कुणीच नसत,आणि त्याला गरजही वाटत नाही कि कुणी त्याच्याशी बोलणार असाव. कधी कधी तो स्वःताशीच बोलायचा. वाढलेल्या केसांत घुटमळणारी हवा,आजूबाजूला असणारे झाडे, नदी,जंगलात येणारे प्राणी हे त्याचे सवंगडी.

त्या जगण्यात त्याला रोमांचित करणारं थ्रीलही होतं, शिवाय सोबत भकास वाटणारा एकटेपणाही होता. त्या निर्मनुष्य जंगलात एखादा काळविटाचा कळप कधी आला कि, ख्रिस त्यांच्या मागे असा पळत जायचा. तो कळप नजरेआड होईपर्यंत तो त्याला बघायचा.

त्या काळविटांना बघून ख्रिसच्या डोळ्यात जेव्हा पाणी येतं तेव्हा, वाटत, ख्रिस ज्याच्या शोधात बाहेर पडलेला ते हेच असेल कदाचित. एका काळविटाची शिकार करताना त्याचं पिल्लू मध्येच येत तेव्हा तो ती शिकार सोडून देतो. मारत नाही त्याला. निसर्गाची एक भाषा असते, कदाचित ती ख्रिसला कळायला लागली होती. निसर्गाच्या सहवासात ख्रिस स्वतःला अधिक समजून घ्यायला लागला होता.

प्राण्यांचे कळप पाहून ख्रिस जसा आनंदी होयचा तसं माणसाचे कळप बघून ख्रिसला कधीच आनंद झाला नाही. माणसापासून नेहमी एक अंतर ठेवत तो राहत गेला. पण याचा अर्थ असा नव्हता कि त्याला माणसाबद्दल प्रेम नव्हतं.

चार महिने त्या बंदिस्त बस मध्ये काढल्यास, नंतर त्याच्या खाण्या पिण्याचे हाल होऊ लागले, पावसाळा चालू होतो. अशा स्थितीत इथ दिवस काढण कठीण आहे असं त्याला वाटू लागत. मग तो त्याची बॅग आवरून आपले मित्र आणि कुटुंब यांना भेटायला परत निघतो. परंतु जी नदी तो हिवाळ्यात ओलांडून आलेला असते त्या नदीला पूर आलेला असतो.

तो ओलांडून जाण्याचा प्रयत्न करतो पण जाऊ शकत नाही तो. हताश, दुःखी होऊन परत बस मध येतो. तिथे खाण्यायोग्य असलेल्या वनस्पती, कंदमुळे शोधून, त्यावर गुजराण करतो. या काळात त्याचं वजन खूप कमी झालेलं असत. या काळात त्याच्या सोबतीला पुस्तकांशिवाय कुणीच नसत. मित्र कुटुंब यांची आठवण त्याला यायला लागते. आणि आपले काही निर्णय चुकले कि काय असं त्याला वाटू लागतं.

एके दिवशी दोन सारख्या दिसणाऱ्या वनस्पती मध्ये त्याला संभ्रम निर्माण होऊन विषारी असलेल्या वनस्पतीच्या बिया चुकून त्याच्याकडून खाल्ल्या जातात. त्याची लक्षणे म्हणून हळूहळू त्याला अशक्तपणा येतो, शरीर लुळे पडायला लागते.

त्याचं मरण त्याला समोर स्पष्ट दिसू लागतं. मित्र,आई, वडील, बहिण यांच्या पासून पळ काढलेल्या ख्रिसला या क्षणात त्या सगळ्यांची प्रचंड आठवण होते. तो कल्पना करतो, त्या दिवशी मी जर ती नदी ओलांडून घरी गेलो असतो तर, सगळ्यांना भेटलो असतो तर…..?

या काळात त्याच्या अंतरमनात सेल्फ रिअलायझेशन प्रक्रिया होयला लागते, त्यात त्याला कळत जात कि जगण्याचा खरा आनंद हा तेव्हाच असतो जेव्हा तो इतरांसोबत वाटला जातो.

तो डायरीत लिहितो,

Happiness is only real when shared” .

हि डायरी म्हणजे त्याने जगाला लिहलेल एक पत्रच असत जणू. अशक्तपणा वाढल्यावर तो त्याची स्लीपिंग बॅग अंगाभोवती गुंडाळून घेतो आणि बिछान्यावर पडून,आकाशाकडे बघत, आपले मित्र, कुटुंब यांना आठवत तो शेवटचा श्वास घेतो.

दोन आठवड्यानी त्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मूस शिकाऱ्यांना सापडतो, त्याच्या घरी संपर्क केला साधला जातो, शेवटी त्याची बहिण कॅरीना ख्रिसच्या अस्थी अलास्का पोहचवते.

( “Into The Wild” हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित आहे. हा सिनेमा ज्या व्यक्तीच्या आयुष्यावर आहे त्या व्यक्तीच नाव आहे ख्रिस्तोपर जोहान्सन मेकॅन्डल्स. त्याचा जन्म १२ फेब्रुवारी, १९६८, कलीफोर्निया,मृत्यू : ऑगस्ट १९९२, अलास्का. वय : २४ वर्ष.)

 • गीताश्री मगर.Screenshot 2020 04 01 at 3.11.11 PM

4. शुभम हगवणे यांचा लेख

निरपेक्ष स्वातंत्र्याच्या शोधात एक दीर्घ कवितेतला नायक. कुठेतरी सपाट मोकळ्या  मैदानात एका निर्जन जागेवर बंद पडलेल्या बसमधील अंधुक प्रकाशात लाकडावर कोरून कविता लिहतो. दोन वर्षांचा शेवट एका क्रांतीत होतो आणि स्वतःच्या एका खोट्या अस्तित्वावर मिळवलेला हा मोठा विजय.

कथा विसरून क्षणात जगता येतं असा कोणताही सिनेमा, पुस्तक, कविता मला अफाट वाटतात. दोन हजार सातला आलेला “इन् टू दी वाईल्ड” असाच एक सिनेमा आहे. ह्याच नावाने असणाऱ्या एका पुस्तकावर हा सिनेमा आहे.

एक मोठा फ्लॅशबॅक पडतो. दोन वर्षांचा. सगळ्याच विषयांत उत्तम श्रेणी मिळवून पदवीधर झालेल्या ख्रिस्तोफरचा सध्या कोणताही संपर्क नसलेल्या आईवडिलांना विद्यापीठ पोस्टाने निकाल पाठवतं तेव्हा बैचेन झालेले आईवडील शेवटी त्याला भेटण्यासाठी स्वतःच रवाना होतात.

तोपर्यंत ख्रिस्तोफर कुठेतरी बेपत्ता झालेला असतो. तक्रार होते. तपास होतो आणि तपासात ख्रिस्तोफरची गाडी निर्जन जागी नंबर प्लेटशिवाय सापडते. पुरावे बघता कदाचित ख्रिस्तोफर न सापडण्यासाठीच स्वतःच सगळं मागे सोडून गेला असावा असं पोलिसांना तपासात जाणवतं.

स्वतःची सगळी ओळख संपवून बेपत्ता झालेला ख्रिस्तोफर !

हुशार आणि श्रीमंत असलेले वडील, त्या काळातील कोऱ्या करकरीत चौकोनी गाड्या. पैसा. प्रसिद्धी. घर. असलं सगळं असूनही बेपत्ता झालेला ख्रिस्तोफर खरंतर बेपत्ता झालेला नसून पळून गेलेला असतो.

स्वतःची ही जुनी ओळख संपवून, असलेला थोडाफार पैसा जाळून, स्वतःसाठी एक नवीन नाव घेऊन, आपल्याला कधीही सापडलं जाऊ नये ह्याची काळजी घेत, काही प्रश्नांच्या शोधात अलास्काच्या जंगली भागांकडे जाण्यासाठी त्याने प्रवास सुरु केलेला असतो.

ह्या प्रवासात त्याला वेगवेगळी भेटत जाणारी माणसं, मिळालेल्या मोकळ्या वाटा, मोकळा वेळ आणि विस्तीर्ण जागा आणि स्वातंत्र्य ह्यातून स्वतःचे शोध घेणाऱ्या ख्रिस्तोफरची ही कथा आहे.

माणसांच्या हिसंक असण्यात, दांभिक असण्यात, एकमेकांना दिलेल्या वागणुकीत, समाजात, वडिलांच्या श्रीमंतीत, त्यांच्या चंगळवादी स्वभावात ख्रिस्तोफरचा जीव घुटमळू लागतो. बाहेर जगासाठी चालणारं हे एक उत्तम नाटक खरंतर आत वेगळं विकृत आहे असं वाटत जाणाऱ्या ख्रिस्तोफरच्या स्वतःच्याच अस्तित्वावर प्रश्न उभे राहतात.

खोट्या पायांवर, खोट्या संकल्पनांच्या भोवताली फिरणारं त्याचं अस्तित्व डागमगायला लागतं आणि एका मर्यादेनंतर तो ह्यातून मुक्ती शोधू लागतो. खरंतर हे प्रश्न सगळ्यांना पडतात पण त्याची जाणीव होण्याचा प्रामाणिकपणा आणि हिंमत कोणातच नसते.

अलास्काच्या जंगलात आपल्याला अंतिम स्वातंत्र्य मिळेल आणि आपण खोटी निश्चितता, खोटी सुरक्षा, दंभिकपणा, चंगळवाद, श्रीमंती, नियंत्रणाचे भास आणि ह्या जगाने तयार केलेल्या सगळ्या आभासी संकल्पनांपासून मुक्त होऊ म्हणून चालू झालेल्या प्रवासात त्याला भेटणारी माणसं, त्यांच्या सोबतचे अनुभव आणि स्वतःच्या ओळखीशिवाय आणि ह्या जगाच्या विकृत वाटणाऱ्या संकल्पनांसोबत होणारा जगण्याचा मानसिक संघर्ष ह्या चित्रपटात बघायला मिळतो.

जवळपास सगळाच सिनेमा एक कविता वाटून जातो. सगळ्या चालणाऱ्या संवादात एक लय आहे. उसळणारे समुद्र. उंच सरळ झाडं. नागमोडी प्रवाह असणाऱ्या नद्या. मोकाट सुटलेली जंगली जनावरं. मोडून बंद पडलेली बस. बर्फाळ डोंगर. उडणारे पक्षी.

सगळ्याच फ्रेम ख्रिस्तोफरच्या आतले संघर्ष बघता प्रतिकात्मक वाटतात. तरुण वयात अचानक जग निरपेक्ष होऊन समोर उभं राहिल्यावर जाणवणारी सगळी गुंतागुंत, ओढाताण आणि तिथून शेवटला मिळणारी मुक्ती. अनेक प्रश्नांची उत्तरं देणारा हा सिनेमा ठरू शकतो हे नक्की.

 • शुभम हगवणे 7507634318 (नाशिक)   

Screenshot 2020 04 01 at 3.13.30 PM


 

5. यश वाबळे यांचा लेख 

So the story is about a recently graduated boy. The name of the boy is Christopher McCandless. He has a dream to explore all the things from The Alps to the Alaska without any money and without a companion a solo adventure.
After his family takes the decision of putting the boy into the harvard university he makes the decision of not going in. He finally makes the decision of escaping into the wild. He donates his $10,000 to a organisation.

Then his journey starts and the movie revolves around how he breaks all the barriers and once in a lifetime journey of breaking into the wild.

Then the movie is all about survival , how he meets adventurers , how some people help him towards his journey , how he indulges with a farmer doing the farmers job for a while.
Then he goes on with a name of ‘Alexander Supertramp’ and finds the bus named ‘Fairbanks City transit’. I’ll not open up the whole climax but ‘The bus’ where the journey ends.

Therefore , this movie doesn’t only shows a story of a boy named ‘Christopher McCandless’ but this movie teaches life.

I’ll like to end with a dialogue from the movie which depicts the movie itself “If you want something in life, reach out and grab it.”

 • YASH WABLE 

Screenshot 2020 04 01 at 3.18.35 PM


 6. विवेक महाजन यांचा लेख 

१९९० मध्ये घरातून निघून ५००० किमीच्या प्रवास मजल दरमजल करून अलास्काच्या जंगलात हायकिंगला गेलेल्या ख्रिस्तोफर मॅककेन्डल्स याचा अनुभव सांगणारा हा चित्रपट निसर्गाची आवड, ओढ असणाऱ्या, हायकिंग/ट्रेकिंगची आवड असणाऱ्या  प्रत्येक भटक्याने पाहावाच असा आहे.

1996 मध्ये इनटू द वाईल्ड याच नावाने प्रकाशित झालेल्या कादंबरीवर हा चित्रपट बेतलेला आहे. या कादंबरीचा लेखक जॉन क्रौकर हा पण एक प्रसिद्ध गिर्यारोहक आणि लेखक आहे.

सीन पेन याने लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या ह्या चित्रपटाचे कथानक ख्रिस्तोफरच्या केलेल्या प्रवासाभोवती फिरते. संपूर्ण चित्रपटात खूपसे नैराश्याने भरलेल्या घटना दिसून येत असले तरी हा चित्रपट तरुणाईला आकर्षित करणारा चित्रपट आहे.

हा चित्रपट अशा एक २० वर्षांच्या कॉलेजकुमारची कथा सांगतो जो की आपल्या लौ स्कुल ऍडमिशनसाठी जमा केलेल्या पैशावर डल्ला मारून आयुष्याचे अनुभव घ्यायला घराबाहेर पडतो. सोबत असते ती काही निसर्गाशी जुळवून कसं जगावं हे सांगणाऱ्या पुस्तकांची, एका डायरीची, मोजक्या पैशांची आणि मनात असलेल्या स्वप्नाच्या ओढीची.

या चित्रपटात आपण ख्रिस्तोफरला त्याच्या गर्विष्ठ पालकांच्या विरोधात जाऊन एक आदर्शवादी स्वप्न पाहणाऱ्या युवकाच्या रूपात भेटतो. एकाएकी, मागे काहीही पुरावे न सोडता चांगले मार्क्स मिळवणारा, कायद्याच्या शिक्षणात उज्ज्वल भविष्य असणारा एक युवक त्यांच्या आयुष्यातून का गायब होतो, त्याची कार बेवारस का सापडते, तो कुठे गायब होतो या प्रश्नांची उकल पालकांना होत नसते.

तो स्वतःला असा एक एकटा प्रवासी म्हणून पाहत असतो जो कि सगळं काही सोडून निसर्गाच्या हाकेला ओ द्यायला निघालेला असतो. तो स्वतःला बेघर म्हणून नाही तर घरापासून, समाजापासून  मुक्त झालेला समजत असतो.

चित्रपटात दिग्दर्शक तुम्हाला ती गोष्ट ख्रिस्तोफरला त्याच्या प्रवासात  भेटलेल्या वेगवेगळ्या व्यक्तींच्या नजरेतून दाखवतो. चित्रपटाचा नायक असलेल्या एमिल हार्सचचा अभिनय तर उत्कृष्ठ झालाच आहे पण या सहकलाकारांचा अभिनयही छाप सोडून जातो. ही ती लोकं आहेत जे एका नवख्या तरुणाला खाऊपिऊ घालतात, आसरा देतात, कपडे देतात, त्यांचं आयुष्य सांगतात, त्याला रस्ता दाखवण्याचा ‘प्रयत्न’ करतात आणि तो त्याच्या प्रवासाला पुढे निघून गेल्यावर काळजी पण करतात,

या प्रवासात ख्रिस्तोफर स्वतःची अलेक्साण्डर अशी ओळख करून देतो.

तो त्याच्या नावापेक्षा त्याच्या जीवनशैलीने जास्त ओळखल्या जातो. या प्रवासात तो एका जोडप्याला भेटतो जे कि त्याच्यासारखेच सगळं सोडून आलेले तरी खुश असलेले हिप्पी असतात, वेन नावाचा एक अट्टल दारुडा तरीही मनाने मोकळा असलेला शेतकरी अशा समाजातील वेगवेगळ्या स्तरातील लोकांना भेटतो.

या लोकांत सगळ्यात हृदयस्पर्शी व्यक्ती त्याला भेटते ती म्हणजे रॉन नावाचा एक म्हातारा, जो की त्याच्याकडे खूप विश्वासाने आणि काहीश्या भीतीने पाहत असतो आणि नंतर आपला लहरी नातू समजायला लागतो.

ख्रिस्तोफर ह्या आजोबाला एक लांबलचक लेक्चर देतो, ज्यांनी की सगळंआठवडे असतं, यावर की ते कशापासून दुरावत आहेत. नंतर तो त्यांना एका चढ्या डोंगरावर दूरवरचे क्षितिज पाहायला त्याच्या मागे यायला सांगतो. आधी वयाचं कारण देऊन नकार देणारे रॉन त्याच्यामागे त्या डोंगरावर पोचतात.

आणि नंतर तो त्यांच्या डोळ्यासमोरून गायब होतो अलास्काच्या डोंगररांगात जाण्यासाठी. त्याने याचंच स्वप्न पाहिलेलं असतं. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठीच तो एवढा प्रवास करून आलेला असतो. त्या डोंगररांगाचे चित्रीकरण आपल्या मनात कुठेतरी खोलवर तिथे एकदा तरी  जाण्याची इच्छा नक्की तयार करतात.

दूरदूरवर कुठेही रोड नसताना त्याला एक बेवारस बस सापडते जीला तो आपलं घर बनवतो. तो तिथे शिकार करायचा अपयशी प्रयत्न करतो.

त्याच्या शेवटच्या काळात लिहिलेल्या डायरी वरून आणि परिस्थितीजन्य पुराव्यावरून दिग्दर्शक  सीन पेन ख्रिस्तोफरचे शेवटचे आठवडे आपल्यासमोर घेऊन येतो.  एमिल हार्सचचा अभिनय आपल्याला संमोहित करून सोडतो, त्याचं खंगत चाललेलं शरीर, खोल गेलेले तरीही आवेशाने लकाकणारे डोळे बघणाऱ्याच्या लक्षात राहतात.

स्वतःच्या बिनधास्त जगण्याच्या  इच्छेत वाहवत गेलेल्या तरुणाबद्दल असलेला हा एक गंभीर, खेदजनक तरीही कुठेतरी प्रेरणा देणारा हा चित्रपट आहे. स्वप्ने पाहणे आणि ती पूर्ण करण्यासाठी लागणारी सगळी मेहनत करणे हा चित्रपट शिकवतो.

आयुष्यात कधी कधी मित्रांची गरज पडते तर कधी अनोळखी माणसं ही आपली अनपेक्षित मदत करून जातात.

या दोन्हीपैकी एकही गोष्ट जर तुमच्यासोबत झाली नाही तर तुम्ही अशाच एखाद्या बसमध्ये अडकून पडलेले असाल. खूप चांगली कथा असलेला, तेवढाच चांगला अभिनय असलेला, दोन गोल्डन ग्लोब आणि दोन अकॅडमी अवार्ड साठी नामांकन भेटलेला आणि जगातील ५०० सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक असणारा हा चित्रपट नक्कीच बघायला हवा.

 •  विवेक महाजन. 

Screenshot 2020 04 01 at 3.22.20 PM


7. अजिंक्य बापट यांचा लेख 

 

Screenshot 2020 04 01 at 3.23.39 PM

 

जंगल जिथे जाण्यास कोणताही मार्ग नाही, तिथे जाण्याचा एक वेगळाच आनंद आहे; शांत, एकाकी समुद्र किनाऱ्याची, मजादेखील काही औरच आहे.लाटांच्या गर्जनेत, खोल दूर समुद्रात, असा एक समाज, जिथे कुठलीही गजबज नाही;  मनुष्य माला अप्रिय नाही, मात्र निसर्गाची मजाच काही और आहे… 

शॉन पेन दिग्दर्शीत Into The Wild ची सुरुवात या जॉर्ज ब्राऊन च्या कवितेने होते आणि चित्रपट पाहताना आपल्याला ती खऱ्या अर्थाने गवसते. चित्रपट ऍनालाईझ करण्याआधी त्याची कथा समजून घेणं महत्वाचं आहे. 

तर चित्रपटाची कथा थोडक्यात सांगायची ती अशी: आपल्याजवळील सर्व भौतिक गोष्टींना तसेच समाजाला कंटाळलेला ख्रिस्तोफर(ख्रिस) जॉन्सन मकॅन्डलेस (१२ Feb १९६८ – १८ Aug १९९२) हा Emory युनिव्हर्सिटी मध्ये शिकणारा विद्यार्थी १९९० च्या मे महिन्यामध्ये आपल्या कुटुंबियांना कुठलीही पूर्वकल्पना न देता गायब होतो. हे करत असताना तो स्वतःजवळ कुठलीही भौतिक गोष्ट नको म्हणून स्वतःची सर्व ओळखपत्रे, क्रेडिट कार्ड्स फाडून टाकतो व आपला सगळा कॉलेज फंड ऑक्सफॅम या चॅरिटेबल ऑर्गनायजेशन ला दान करतो. 

नंतरची जवळपास २ वर्षे ख्रिस संपूर्ण पश्चिम अमेरीका पादाक्रांत करतो. या कालावधीतील त्याचा प्रवास, या प्रवासात त्याला आलेले अनुभव, भेटलेली समदुःखी लोकं, त्याला पाहिजे असलेला निसर्ग, नैसर्गिक साधनसंपत्ती वर केलेली गुजराण, अलास्काच्या घनघोर दाट जंगलातील आपल्या अस्तित्वाला शोधण्याची आणि कालांतराने आपला जीव वाचवण्याची धडपड या सर्व गोष्टींचं अप्रतिम चित्रण या चित्रपटामध्ये केलेलं आहे.

काही चित्रपट असे असतात ज्यामध्ये चित्रपटातील सर्व विभाग मग ते चित्रपटाची कथा असो, चित्रण असो, संगीत असो किंवा निर्मिती असो, हे अतिशय सुंदरतेने जुळून येतात आणि निर्माण होतो तो एक Cult क्लासिक असा चित्रपट जो एव्हरग्रीन आणि टाइमलेस बनून राहतो.  Into The Wild हा याच पठडीतील चित्रपट आहे असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही.

दिग्दर्शक-सिनेमॅटोग्राफर या द्वयीने चित्रपटात अलास्काच्या निसर्ग सौंदर्याचा बखुबीने वापर केलेला आहे. बहुतांश सीन्स मध्ये ख्रिस भोवती फिरणाऱ्या कॅमेऱ्यामधून घेतलेले रोटेशनल शॉट्स अलास्काच्या विलोभनीय निसर्ग सौंदर्याचं अतुलनीय दर्शन आपल्याला घडवतात. सर्वच कलाकारांचा अभिनय हा उत्तम असा आहे. एखादी भूमिका निभावणं आणि ती जगणं यातला फरक चित्रपटात ख्रिस ची भूमिका केलेला Emile Hirsch हा अभिनेता दाखवून देतो. चित्रपटाची स्क्रिप्ट म्हणजेच संहिता ही नॉन-लिनिअर प्रकारातील असल्यामुळे आपल्याला ख्रिस च्या वर्तमानाबरोबरच त्याच्या भूतकाळाची सफरही पावलोपावली घडत राहते. 

कुठलाही चित्रपट, मग तो कोणत्याही जॉनर चा असो, आपल्याला काहीतरी शिकवून जातो. Into The Wild च्या बाबतीत सांगायचं झालं तर हा चित्रपट बरंच काही सांगण्याचा प्रयत्न करतो आणि बहुतांशी त्यात सफलही होतो.

या चित्रपटातून गवसलेल्या काही गोष्टी:

१ – Happiness is only real, when Shared! –

खरा आनंद, खरं सुख हे तो आनंद, ते सुख शेअर करण्यातच आहे. ख्रिस ला अपेक्षित असणारा आनंद त्याला मिळतो देखील पण तो शेअर करण्यासाठी कुणीही नसणं ही शोकांतिका होती आणि त्याला ती उशिरा का होईना  समजते देखील. 

 

२ – When we forgive, we Love! –

क्षमा हि प्रेमाचेच एक रूप आहे. ख्रिस चा आपल्या आई-वडिलांवर असलेला राग हा आपल्या जागी ठीक आहे. हा राग विसरून तो त्याच्या पालकांना माफदेखील करू शकला असता, परंतू तो करत नाही आणि याची जाणीव त्याला जोपर्यंत होते तोपरंत खूप उशीर झालेला असतो. 

 

३ – Man is a Social Animal! –

मनुष्यप्राणी हा एक सामाजिक/समाजप्रिय प्राणी आहे असं ऍरिस्टोटल या तत्ववेत्याने म्हंटलंय ते उगाच नाही! ख्रिस च्या मते Wilderness हाच त्याला आनंद मिळवून देऊ शकतो आणि बाकी काहीच नाही. या चुकीच्या किंवा टोकाच्या भावने मुळे तो त्याच्या आयुष्यात असणाऱ्या लोकांमुळे मिळणारा आनंद घालवून बसतो.

Screenshot 2020 04 01 at 3.24.00 PM

हे आणि असे बरेच अनुभव हा चित्रपट आपल्याला देऊन जातो आणि म्हणूनच हा जगणं समृद्ध करणारा चित्रपट आयुष्यात एकदातरी पाहावा!

 • अजिंक्य बापट 

या सात लेखांपैकी सर्वात आवडलेला लेख आपण कमेंट करुन सांगा, सर्व लेख आपल्यासमोर मांडण्यात आल्यानंतर आम्ही पहिल्या पाच जणांची नावे जाहिर करु. काळजी करु नका लयत लय तीन दिवसात नावे जाहीर होतील. 

 

4 Comments
 1. Chinmaya Kulkarni says

  Ajinkya Bapat(lekh no. 7) yancha lekh apratim aahe.
  Lekhkane fakt Movie analysis ch nahi tar movie mdhun shiklelya goshtincha dekhil ullekh kelela aahe.

  So according to me, Ajinkya’s article is the best one among all.

 2. Amit Prabha Vasant says

  गीताश्री मगर यांचा लेख आवडला ..
  … इतरांनीही चांगलं लिहिलंय ; पण अधिक सिनेमे पाहण्यासाठी तिला सबस्क्रिप्शन पॅकेज मिळावं म्हणून …!

Leave A Reply

Your email address will not be published.