इमर्जन्सीमुळं चारपट पैसे द्यावे लागले म्हणून त्याने स्वस्त तिकिटाचं स्टार्टअप सुरु केलं

भारतात रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांची संख्या सगळ्यात जात आहे. कारण लांबच्या पल्ल्यासाठी रेल्वे प्रवास विमानपेक्षा खिशाला परवडणारा आणि बसपेक्षा वेळेत नेणारा आहे. पण रेल्वे प्रवास करायचा म्हंटल कि, बऱ्याचदा तिकीट बुकिंग आणि जागा मिळवणं म्हणजे मोठं टेन्शनचं काम. कारण रेल्वे बुकिंग प्रवासाच्या एक दिवस आधीच फुल असतं.

त्यात तिकीट वेटिंग लिस्ट आणि आरएसीमध्ये असेल तर कन्फर्म तिकीट मिळणं कठीण आहे. मग पार चार्ट तयार होईपर्यंत प्रवाशांना वाट बघणंच भाग असत. नाहीतर दोन पर्याय उरतात एकतर जनरल कंपार्टमेंटचे तिकीट नाहीतर स्टँडिंगने प्रवास. आता हे फक्त इमर्जन्सी बुकिंग करणाऱ्यांसोबतच होत असं नाही आधीच बुकिंग करणाऱ्यांना सुद्धा असे प्रॉब्लम फेस करावे लागतात. 

असाच काहीसा प्रॉब्लम मुंबईच्या रोहन देधीया यांनासुद्धा फेस करावा लागला. पण असं म्हणतात ना, अनुभवचं माणसाला शिकवतो, अशातलाचं प्रकार घडला आणि रोहन यांनी रेलोफाय हे आपलं स्टार्टअप लॉन्च झालं.

जे आपल्याला तिकीट कन्फर्म नसलं तरी, तेवढ्याच पैशांमध्ये नाहीतर त्याच्यापेक्षा थोड्या जास्त पैशात प्रवासासाठी दुसरं ऑप्शन देतं. रोहन यांची हीच आयडिया आज लाखो लोकांच्या कामी येतेय. 

स्टार्टअप सुरु करण्याचा रोहन यांचा अनुभव असा कि, २०१६ साली रोहन यांनी आपल्या आजीला मुंबईहून गुजरातच्या कच्छला घेऊन जाण्यासाठी दोन रेल्वे तिकिटे बुक केली. पण प्रवासाच्या दिवसापर्यंत दोन्हींपैकी एकही तिकीट कन्फर्म झालेलं नव्हतं. ज्यामुळं रोहन यांनी चारपट पैसे देऊन विमान तिकीट काढावं लागलं. 

आता एवढे पैसे मोजलेत म्हंटल्यावर रोहन यांना वाटलं कि, विमानसुद्धा फुल्ल असणार. पण प्रत्यक्षात समजलं कि, १५ ते २० टक्के विमान खाली होत. हा प्रकार बघून भडकलेल्या रोहन यांनी डायरेक्टरेट ऑफ सिव्हिल एव्हिएशनची वेबसाईट तपासली तेव्हा समजलं की, भारतात विमानात दररोज जवळपास ५० हजार जागा रिकाम्या असतात

बस्स.. तेव्हाच डोक्यात आयडिया आली कि, वेटिंग लिस्ट असल्यावर, जर रेल्वेच्या तिकिटाच्या किंमतीत विमानाने प्रवास करता आला तर… लगेच २०१९ मध्ये रोहनने वैभव सराफ आणि ऋषभ संघवी या आपल्या दोन मित्रांना सोबत घेऊन यावर काम करायला सुरुवात केली आणि यातूनच २०२०  रेलोफायची सुरुवात केली. 

रोहन आणि त्याच्या टीमने यासाठी खूप रिसर्च केला. २०१६ ते २०२० हा काळ फक्त डेटा गोळा करून त्यावर काम करायलाच केला. यासाठी रेल्वे, विमान वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञांशी कित्येक चर्चा केल्या. कारण कमी तिकिटासाठी त्यांना राजी करणं मोठं मुश्किलीच काम होत. रोहन यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितलं होत कि, त्यांचा प्रस्ताव एअरलाइन्सने ४० वेळा नाकारला होता. साहजिकच कोणीही जास्तीस्त जास्त पैसा बघेल. 

पण हार न मानता रोहन यांनी त्या अधिकाऱ्यांना आपल्या ऑफिसात बोलवून आपला सगळा पॅटर्न समजून सांगितला आणि तुमचे पैसे वाया जाणार नाहीत याची खात्री करून दिली. त्यांनतर कुठं जाऊन आपला स्टार्टअप लॉन्च केला.

आता हे रेलोफाय नेमकं काम कस करत तर, जस कि आधी सांगितलं तुमचं तिकीट कन्फर्म झालं नाही तर रेलोफाय आपल्याला प्रवासाचा दुसरा ऑप्शन देत. यासाठी आताप काय करायचं तर रेल्वेच्या वेटिंग लिस्ट किंवा आरएसीमध्ये तिकीट खरेदी करताना तुम्हाला रेलोफायवर रेल्वे किंवा बसचे तिकीट लॉक करावं लागेल. यानंतर, जर तुमचे ट्रेन तिकीट कन्फर्म झाले नाही, तर तुम्ही लॉकिंगच्या वेळी तिकीटाची जी किंमत होती त्यातचं  विमान किंवा बसची तिकिटे खरेदी करू शकता. 

यामुळे प्रवाशांना लास्ट मिनिटावर जास्तीचे पैसे देऊन तिकीट घ्यावं लागत नाही. तुम्हाला फक्त रेलोफायवर जाऊन तिकीट बुक करताना २०० रुपयांमध्ये तुमच्या विमानाचे किंवा बसच्या तिकिटासाठी प्रोटेक्शन चार्जेस द्यावे लागतील. जर तुमचे ट्रेनचे तिकीट कन्फर्म झाले तर तुमचे फक्त २०० रुपये जातील आणि जर तिकीट कन्फर्म नसेल तर कुठल्याही एक्सट्रा चार्जेसशिवाय तिकीट मिळू शकेल. 

आता या सगळ्यात फार तर फार ५०० रुपये जातील पण ऐन टायमाला तिकीट घेताना द्यावा लागणाऱ्या हजारो रुपयांपेक्षा ५०० रुपये हा चांगला पर्याय आहे आणि राहिला प्रश्न रेल्वेच्या आधीच्या तिकिटाचा तर रेल्वे तुम्हाला ते रिफंड करेल.  

रोहन यांच्या रेलोफायची इंट्रेस्टिंग गोष्ट म्हणजे मार्केटिंगसाठी त्यांनी शून्य गुतंवणूक केली आणि सोशल मीडियावरचं लोकांशी चर्चा केली. 

रेलोफायला सुरुवात केली, तेव्हा म्हणावा तेवढा रिस्पॉन्स मिळाला नाही, पण हळू हळू काही महिन्यांमध्येचं १०० पेक्षा जास्त प्रोटेक्शन पर्चेस झाले. पण आज लाखो लोकांनी त्यांच्या वेबसाईटला भेट दिलीये आणि ॲप डाउनलोड केलं गेलंय. एवढंच नाही तर कमी वेळात जास्त फेमस झालेल्या या स्टार्टअपला तब्बल ७०० लाख रुपयांची फंडिंग सुद्धा झालीये. 

 हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.