अंपायर आउट देऊ नये म्हणून सेहवाग आधीच त्याच्याजवळ आपली सेटिंग लावायचा.

भिडू वीरेंद्र सेहवाग म्हणजे भारतीय क्रिकेटने पाहिलेला आत्ता पर्यन्तचा सर्वात बिनधास्त प्राणी. मस्त कलंदर माणूस. आयुष्यभर सगळे कप्टन कोच  सिनियर खेळाडू त्याला सांगून सांगून थकले ,

“विरू थोडा देख के खेल, पेहले सेट हो जा और फिर धुलाई कर.”

पण यानं कधी कोणाच ऐकलं नाही. मस्त गाणं गुणगुणत खेळायला यायचा, समोरचा बॉलर कोणीही असो पाय न हलवता पिटाई सुरु करायचा.  आता तो रिटायर झालंय पण आज ही कधी काय करेल , कधी काय बोलेल सांगता येत नाही. त्याचे इंटरव्हू पासून त्याची कोमेंट्री, त्याचे ट्विट सगळच अगदी मज्जेशीर आणि बिनधास्त असत.

काही दिवसापूर्वी एका व्हॉट द डक नावाच्या शो मध्ये तो पाहुणा म्हणून आला होता. त्याच्या सोबत अनिल कुंबळे देखील होते. त्यात सेहवाग आपल्या नेहमीच्या स्टाईलने धुंवादार बॅटींग करत होता, अनिल भाईची देखील फिरकी घेत होता. 

त्या वेळी बोलताना  अनिल कुंबळेनी एक किस्सा सांगितला.

झालं काय होतं की कुंबळे लेग स्पिनर आहे पण त्याचे बॉल विशेष वळत नाहीत. एकदा ऑस्ट्रेलिया सिरीज चालू होती. तिथल्या अंपायरला कुंबळेची बॉलिंग ठाऊक नव्हती. त्यामुळे व्हायचं काय की बऱ्याचदा अंपायर एलबी डब्ल्यू आउट द्यायचेचं नाहीत. कुंबळे वैतागला. अखेर त्याने पुढच्या मचच्या सुरवातीला प्रक्टिस नेट सेशनच्या वेळी अंपायरला बोलवलं आणि दाखवल की आपले बॉल वळत नाहीत. त्या मच पासून ऑस्ट्रेलियन अंपायर बरोबर निर्णय देऊ लागले.

कुंबळेचा हा किस्सा ऐकून सेहवागला ही आपली स्टोरी सांगायची खुमखुमी आली. 

कुंबळेचा जसा बॉल वळत नाही हा प्रॉब्लेम होता तसाच सेहवागचा पाय हालत नाहीत हा प्रॉब्लेम होता. यामुळे सेहवाग हमखास एलबीडब्ल्यू आउट व्हायचा. तसही हा क्रिकेटमधला सगळ्यात वादग्रस्त निर्णय असतो. कुंबळे ने आपल्या स्टाईलने अंपायरना दाखवून दिले होते पण सेहवागचा सगळा कारभारचं वेगळा होता.

भारताची फिल्डिंग चालू असतानाच लोमडी दिमाग असलेला सेहवाग अंपायरकड आपली सेटिंग लावण्यासाठी गोड गप्पा मारायला सुरु करायचा. कधी त्यांना दिवसभर उभे राहून किती त्रास होतो या बद्दल सहानूभूती दाखवायचा.  तर किती जोक सांगून हसवायचा. मग अंपायर आपल्या टप्प्यात आला असं जाणवलं की मग हळूच जाळ टाकायचा,

“do you want something? तुम्हाला भारतात काही हवं असेल तर मिळवून देऊ शकतो. मी भारतात सुपरस्टार आहे.”

त्याच्या या जाळ्यात बरेच अंपायर अडकायचे. कोणाला काही गिफ्ट हवं असायचं तर कोणाला रेस्टराँटमधून जेवणाचं बुकिंग पाहिजे असायचं. सेहवाग हे सगळ देतो म्हणून सांगायचा. मग काय? विरू बॅटिंगला आला की अंपायर त्याच्या बाजूने निर्णय द्यायचे.

एकदा असच झालं. २००८सालची गोष्ट, मोहाली येथे भारत ऑस्ट्रेलिया सामना सुरु होता. सेहवाग बॅटिंग करत होता.पाकिस्तानचं असद रौफ अंपायर होते. सेहवागने नेहमी प्रमाणे त्याच्याजवळ सेटिंग लावली होती. एका बॉल ला कव्हर ड्राईव्ह मारण्याच्या नादात असलेल्या सेहवागच्या बॅटला घासून बॉल किपरच्या हातात जाऊन पोहचला. 

मोहालीच्या ग्राउंडवर जास्त पब्लिक नसल्यामुळे शांतता होती . बॉल बॅटला लागलेला आवाज पार ड्रेसिंग रूम पर्यंत गेला असेल पण तरी असद रौफने सेहवागला आउट दिले नाही. ऑस्ट्रेलियाचा कप्तान रिकी पॉंटिंग भडकला. त्याने सेहवागला विचारले,

“तुझ्या बॅटला बॉल लागलेला ना?”

सेहवागने हो म्हणून सांगितले. सगळ्यांनाचं आवाज गेला होता. सेहवागने नाही म्हणणे शक्यच नव्हतं. मग रिकी पॉंटिंग म्हणाला”आउट आहेस तर ग्राउंडमधून बाहेर का गेला नाहीस?”

सेहवाग म्हणाला,

“जो पर्यंत अंपायर आउट देत नाही तो पर्यंत तू कधी बाहेर जात नाहीस, मी का जाऊ? अंपायरला जाऊन विचार. त्यांनी आउट दिल तरचं मी बाहेर जाईन”

पॉंटिंग अंपायर कडे गेला. त्याने त्याला सांगितलं की विरू मान्य करतोय की त्याच्या बॅटला बॉल लागलेला. मग असद रौफ आणि पॉंटिंग परत सेहवाग कडे आले. पण तेव्हा सेहवागने पलटी मारली.

“आपण असं कधी बोललोचं नाही, पॉंटिंग नेहमीप्रमाणे खोटं बोलतोय.”

gettyimages 83350204 612x612
(Photo credit should read MANAN VATSYAYANA/AFP/Getty Images)

असद रौफने त्याला नॉट आउट देऊन पुढचा खेळ सुरु केला. त्या दिवशी सेहवागने धडाकेबाज ९० धावा ठोकल्या.  बिचारया रिकी पॉंटिंगचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. आपल्यापेक्षा पण कोणीतरी  सव्वाशेर आहे हे त्याला त्या दिवशी कळाले.

हे ही वाचा भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.