संघाच्या कट्टर कार्यकर्त्याची नेहरूंनी भर संसदेत माफी मागितली होती.

भारतातले दोन पक्ष जे सर्वात शक्तिशाली मानले जातात ते म्हणजे अर्थातच कॉंग्रस आणि भाजप. दोघांचाही इतिहास पाहता सुरुवातीपासूनच यांचं कधीच पटलं नव्हतं. कसं पटणार ना..

दोन्ही पक्षांचा इतिहास, त्यांची पार्श्वभुमी, त्यांचे योगदान आणि विचारधारा ह्या कायमच विरोधाभासी होत्या.

त्यात भारतीय जनता पार्टी जी आधी जनसंघ म्हणून ओळखली जायची त्याची स्थापना  श्यामाप्रसाद मुखर्जींनी केली होती. ते हिंदुराष्ट्रवादी विचारसरणीचे समर्थक आणि संघाचे कट्टर कार्यकर्ते होते. 

असे असूनही त्यांना पंडित जवाहरलाल नेहरू त्यांना प्रथम मंत्रिमंडळात स्थान मिळाले होते. 

देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि त्यानंतर १९५२ साली देशात लोकसभेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या. या निवडणुकीत काँग्रेसला ३६४ तर इतर विरोधी पक्षांना १२५ जागा मिळाल्या होत्या. यात जनसंघ पक्षाने शामाप्रसाद मुखर्जी यांच्या नेतृत्वाखाली फक्त तीन जागा जिंकल्या होत्या. तरीदेखील त्यांना विरोधकांचा नेता म्हणून निवडण्यात आले होते.

मुळात जनसंघाची स्थापना करण्यामागे काश्मीरमधील ३७० हे कलम च महत्वाचं ठरलं, आजही भाजप याच टोकाच्या राष्ट्रवादाच्या आधारेच राजकारण करू पाहतंय तिची स्थिती जनसंघ आणि नंतर च्या भाजपची ही होती.

तेंव्हाही काश्मीर मधील मुद्द्यावरून मुखर्जी आणि नेहरू यांच्यात बरीच खडाजंगी होत असे. नेहरू आणि लीकायत करार झाला आणि त्याच्या निषेधात बंगालच्या शामाप्रसाद मुखर्जी आणि आणखी एका मंत्र्याने राजीनामा दिला होता.

यानंतर लगेचच दिल्लीतल्या नगरपालिका निवडणुका आल्या होत्या. त्यात नव्याने स्थापन झालेला संघ आणि कॉंग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये मध्ये मोठी स्पर्धा होती. याचदरम्यान शामाप्रसाद मुखर्जी यांनी भर संसदेत कॉंग्रेसवर बरेच गंभीर आरोप केले होते. त्यात एक आरोप असाही होता कि,

नगरपालिकेची निवडणूक जिंकण्यासाठी कॉंग्रेस पार्टी आणि उमेदवार ‘वाईन आणि मनी’ चा म्हणजेच दारू आणि पैशांचे प्रलोभने दाखवतात असा आरोप केला होता. आणि या आरोपांना नेहरू विरोध करीत होते..

परंतु नेहरूंनी चुकीचे ऐकले कि, मुखर्जी यांनी ‘वाईन आणि वूमन्स’ असा शब्द वापरला आहे.

परंतु नेहरू ऐकूनच घेत नव्हते कि, शामाप्रसाद मुखर्जी यांनी वापरलेला वाईन आणि मनी हा शब्द वापरला होता, जे कि संसदेच्या औपचारिक नोंदी मध्येही त्याचं शब्दाचा उल्लेख होता.

नंतर नेहरुंना त्यांची चूक उमगली आणि त्यांनी खचाखच भरलेल्या भर संसदेत उभे राहून शामाप्रसाद मुखर्जी यांची माफी मागितली आणि त्यावर मुखर्जी यांनी उत्तर दिले कि, माफी मागण्याची आवश्यकता नाही फक्त हाच मुद्दा महत्वाचा आहे कि मी कधीच संसदेत चुकीचे वक्तव्य करीत नाही.

नंतर एकदा असंही प्रसंग आला होता कि, मुखर्जी यांनी संसदेत तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना काश्मीर मुद्द्यावरून आव्हान दिले होते कि,

 “एकतर मी संविधानाचे रक्षण करेन किंवा मी माझे प्राण देईन”.

आणि तसंच घडलं, मी या देशाचा खासदार आहे. तुम्ही मला माझ्या देशात कुठेही जाण्यापासून कसे रोखू शकत नाही असे म्हणत, श्यामाप्रसाद मुखर्जी परवान्याशिवाय जम्मू-काश्मीरमध्ये गेले आणि परिणामी शेख अब्दुल्ला यांच्या सरकारने त्यांना अटक केली होती.

अटकेनंतर काहीच दिवसांनी त्यांचे निधन झाले. जनसंघाचे अध्यक्ष म्हणून तेथे गेलेल्या संयुक्त भारतासाठी बलिदान देणारे ते पहिले भारतीय होते असं म्हणलं जातं आणि म्हणून भाजप आणि संघ हे  आजचाच दिवस म्हणजेच  २३ जून चा ‘त्याग दिन’ म्हणून साजरा करतात.

जनसंघापासून ते भाजपच्या जाहीरनाम्यापर्यंत ‘संविधानाचे तात्पुरते कलम ३७० रद्द करू’, असा  श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा नारा होता तो आता भाजप सरकारने पूर्ण केला.

हे हि भिडू :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.