शरद पवारांच्या समाजवादी कॉंग्रेसचं विलीनीकरण शिवसेनाच्या उभारीचं कारण ठरलं होतं.
३१ ऑक्टोंबर १९८४ ची सकाळ झाली ती इंदिरा गांधींवर जीवघेण्या हल्यातून. वाढत्या खलिस्तानवादी चळवळीमुळे सुवर्णमंदिर दहशतवाद्यांचा गड बनला होता. इंदिरा गांधींनी थेट सुवर्णमंदिरावर लष्करी कारवाई केली होती. त्याचा परिणाम म्हणजे इंदिरा गांधींची त्यांच्याच सुरक्षारक्षकांनी हत्या केली. इंदिरा गांधींची हत्या झाली.
इंदिराजींच्या पश्च्यात कॉंग्रेसची पुर्ण जबाबदारी राजीव गांधी यांच्याकडे आली होती. पुढचे पंतप्रधान राजीव गांधी असतील यावर प्रशासकिय पातळीवर तयारी करण्यात येत होती. इकडे इंदिरा गांधीच्या अंतिम संस्काराची तयारी सुरू होती.
शेवटच्या क्षणी अंतीम दर्शन घेण्यासाठी शरद पवार गेले. त्यांनी इंदिरा गांधींच दर्शन घेवून राजीव गांधींची भेट घेतली. तेव्हा राजीव गांधी शरद पवारांना म्हणाले, शरद काळ खूप नाजूक आहे. देशासाठी आपण एकत्र काम करायला हवं.
शरद पवार लिहतात ती वेळ राजकिय विषय बोलण्याची नव्हती. मी त्यांचा हात हातात घेतला. संवेदना प्रकट केल्या आणि बाजूला झालो.
इंदिरा गांधींच्या पश्चात भारतात निवडणूका झाल्या. इंदिरांच्या हत्येमुळे देशभर एक भावनिक लाट निर्माण झाली. डिसेंबर मध्ये झालेल्या या निवडणुकीत राजीव गांधीच्या कॉंग्रेसला ४१४ जागा मिळाल्या. विरोधकांचा पुर्णपणे नायनाट झाला. या निवडणुकीत देशातून सर्वांधिक मताने राजीव गांधी अमेठितून निवडून आले होते. त्यांच मताधिक्य होतं ३ लाख १४ हजार. भाजपच्या तेव्हा दोन जागा होत्या. अशा परिस्थितीत देशातून दोन नंबर सर्वांधिक मताने निवडून आलेले खासदार होते शरद पवार.
शरद पवार समाजवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. या निवडणुकीत समाजवादी कॉंग्रेसचे चार खासदार संपुर्ण देशातून निवडून येवू शकले. औंरगाबादमधून साहेबराव डोणगावकर, केरळमधून के.पी. उन्नीकृष्णन, आंध्रातून किशोरचंद्र देव आणि शरद पवार हे चार खासदार.
तेलगु देसमचे सर्वाधिक खासदार निवडून आले होते. पण तेलगु देमस सारख्या नवख्या पक्षाला संसदिय विरोधाची जाणिव नव्हती. सत्ताधाऱ्यां करायचा हा विरोध एकटे शरद पवार भरून काढत असत. तेव्हा राजीव गांधी त्यांनी म्हणत, हम सब एक उमर के लोग हैं. आप कबतक विपक्ष मैं बैठेंगे. मिलकर काम करना चाहिए.
त्याच वेळी राजीव गांधींच्या राजकिय सल्लागारात केंद्रिय अंतर्गत सुरक्षा मंत्री अरुण नेहरू यांचा समावेश होता. शरद पवारांना पुन्हा कॉंग्रेसमध्ये घेण्याची जबाबदारी राजीव गांधी यांनी अरुण नेहरू यांच्यावर सोपवली होती. त्याचसोबत इंदिरा गांधीचे सचिव पी.एन.धर यांचा मुलगाल विजय धर हा राजीव गांधी आणि शरद पवार दोघांचाही चांगला मित्र होता.
शरद पवारांसोबत पक्षात प्रवेश करण्याबद्दलचा संवाद करण्याची जबाबदारी विजय धर यांच्याकडे आली. दोन्हीकडे मैत्रीचे संबध असल्याने हि चर्चा खुलेपणाने होवू शकली. राजीव गांधी यांना कोणत्याही स्वरुपात शरद पवारांचा समावेश कॉंग्रेसमध्ये करायचा होता.
पण अरुण नेहरू हे उत्तर राजकिय सल्लागारांपैकी एक होते. त्यांच मत या सर्वाहून वेगळ होतं. त्यांच्या मते शरद पवारांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला तर आज कॉंग्रेसला विरोध म्हणून शरद पवारांसोबत असणारा मराठवाड्यातील तरुण मोठ्या प्रमाणात शिवसेनेकडे आकर्षला जाईल. शरद पवारांचा हा प्रवेश शिवसेनेच्या मराठवाड्यात पाय रोवण्यास कारणीभूत ठरेल.
अरुण नेहरू हे उत्तम विश्लेषक असल्याने शरद पवारांनी प्रथमत: मराठवाडा पिंजून काढण्याचं मनावर घेतलं. शरद पवारांनी मधल्या काळात मराठवाड्यातला प्रत्येक तालूका प्रत्येक गाव पिंजून काढलं. संवाद साधला आणि कॉंग्रेस प्रवेशाबद्दलच वातावरण तापवलं. ते योग्य असल्याचं लोकांमध्ये जावून पटवून देण्यास सुरवात केली.
इकडे राजीव गांधींचा जोर पाहून शंकरराव चव्हाण, विठ्ठलराव गाडगीळ यांचा जोर मावळला. याच दौऱ्यातून शरद पवारांनी ठरवलं की कॉंग्रेस प्रवेशाचा हा कार्यक्रम औंरगाबाद इथेच आयोजित करायचा.
७ डिसेंबर १९८६ रोजी औंरगाबाद इथे शरद पवारांच्या कॉंग्रेस प्रवेशाचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला. या सोहळ्याला पाच लाखाहून अधिक तरुण उपस्थित होता. या कार्यक्रमास शंकरराव चव्हाण, प्रदेशाध्यक्षा प्रभा राव, कॉंग्रेसचे सरचिटणीस जी.के. मूपण्णार, फारूख अब्दुला उपस्थित होते.
शरद पवारांचा हा प्रवेश खरच शिवसेना मराठवाड्यात पाय रोवण्यास मदत करणारा ठरला का याबद्दल खुद्द शरद पवार सांगतात की, पक्षाच्या विलिनिकरणानंतर मी परभणीला गेलो होतो? तिथे गेल्यानंतर जयप्रकाश मुंदडा कुठे आहेत याची चौकशी केली. जयप्रकाश मुंदडा हे समाजवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते. पण आत्ता त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याची माहिती मिळाली. शरद पवारांनी मुंदडा यांना कारण विचारलं तेव्हा मुंदडा म्हणाले आमचं राजकारण इथल्या प्रस्थापितांना विरोध केल्यामुळे उभा राहिलं. आत्ता त्यांच्या मांडिला मांडी लावून बसलो तर आमच्या संपुर्ण राजकारणाचा इतिश्री होईल.
हे ही वाच भिडू.
- त्यांनी शरद पवारांना घोड्यांवर पैसे लावायला शिकवलं.
- बाळासाहेब विखेंनी शरद पवारांना कोर्टाची पायरी चढायला लावली होती.
- शरद पवारांचे स्वीय सहाय्यक म्हणाले, “साहेब मी संघाच काम केलयं…”
- म्हणून शरद पवार दाढीवाल्यांना उमेदवारी देत नाहीत…
- शरद पवारांनी जनसंघच्या मंत्र्यांचा केला होता #prank.
Rajiv gandhi kharach pawarana Congress madhye ghenyasathi itke lobbing karat hote tar mag te swata pawaranchya congress praveshweli hajar asalyacha pahije nahi ka bol bhidu ani jar nastil tar tumhi war kay te ulat karun wacha.