राष्ट्रपती पदासाठी शरद पवारांच नाव चर्चेत आलं.. पण कुठून आणि कसं..?

शरद पवारांना जर राष्ट्रपती पदाचा उमेदवार घोषीत केलं तर कॉंग्रेसचा पाठींबा असेल अस वक्तव्य कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलय. 

साहजिक यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रपती पदासाठी शरद पवार यांच नाव चर्चेत आलं आहे. 2014 साली केंद्रात नरेंद्र मोदींची सत्ता आली तेव्हा प्रणब मुखर्जी देशाचे राष्ट्रपती होते.

प्रणब मुखर्जी यांच्यानंतर देशाच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणूका होणार होत्या तेव्हा देखील शरद पवार यांच नाव चर्चेत आलं होतं. मात्र तेव्हा शरद पवार यांच नाव चर्चेत आलं होतं ते NDA कडून. 

भाजप व मित्रपक्षांकडून शरद पवार राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असतील. सुप्रिया सुळे या केंद्रात मंत्री होतील अशा अनेक अफवा त्यावेळी रंगत होत्या. मात्र भाजपकडून रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपती पदाचे उमेदवार घोषीत करण्यात आले व या चर्चांना पुर्णविराम लागला.. 

आत्ता पुन्हा एकदा नाना पटोले यांच्या वक्तव्यामुळे शरद पवार यांच नाव चर्चेत आलं आहे. पण मुद्दा असा की नाना पटोले यांच्याच वक्तव्यामुळे पवारांचा नाव चर्चेत आलं आहे का? तर नाही शरद पवार हे राष्ट्रपती पदाचे उमेदवार असतील अशा चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होत्या.. 

त्यासाठी भाजपकडून कोणाच्या नावाची चर्चा आहे हे सर्वात प्रथम पहायला हवं.. 

भाजपकडून राष्ट्रपती पदाचा दावेदार हा आदिवासी व्यक्ती असेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सोबतच रामनाथ कोविंद यांनाच पुन्हा एकदा राष्ट्रपती पदाचा उमेदवार म्हणून घोषीत केलं जाईल अशीही शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वी सलग दोन वेळा राष्ट्रपती पदावर राहणारी व्यक्ती म्हणून राजेंद्र प्रसाद यांचा उल्लेख केला जातो. 

सलग दोन किंवा अधिक वेळा राष्ट्रपती पदावर एखादा व्यक्ती राहू शकतो का याबाबत घटनेत कोणाताही उल्लेख करण्यात आलेला नाही. मात्र संसदीय परंपरा म्हणून एकाच व्यक्तीला पुन्हा राष्ट्रपती करणं टाळलं जातं. 

दूसरी गोष्ट म्हणजे भाजपकडून केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच नाव देखील चर्चेत आहे. तर महिला राष्ट्रपती म्हणून छत्तीसगडच्या राज्यपाल अनुसुईया उइके आणि तेलंगणाच्या राज्यपाल तमिलीसाई सुंदरराज यांची नावे देखील चर्चेत आहे. भाजपकडून मुस्लीम किंवा आदिवासी समाजातील व्यक्तीची निवड राष्ट्रपती पदासाठी केली जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.. 

मात्र महत्वाचा मुद्दा आहे तो विरोधी पक्ष कोणाला राष्ट्रपती पदाचा उमेदवार म्हणून घोषीत करेल..

विरोधी पक्षाकडून दोन नाव प्रामुख्याने चर्चेत आहेत. यापैकी एक नाव शरद पवार यांच आणि दूसरं नाव नितीश कुमार यांच आहे. पण नितीश कुमार यांच नाव अधिक चर्चेत असल्याचं बोललं जातय. त्याला कारण आहेत ते म्हणजे तेलंगणाचे मुख्यमंत्री  चंद्रशेखर राव

चंद्रशेखर राव यांचे सल्लागार आहे प्रशांत किशोर. प्रशांत किशोर यांच्यामार्फत अनपेक्षितपणे नितीश कुमारांच्या नावाचा सल्ला दिला गेला. त्यानंतरच देशातील सर्व मोदीविरोधी पक्षांची एकजुट घडवून आणण्यासाठी चंद्रशेखर राव यांच्यामार्फत प्रयत्न केले जावू लागले आहेत. या अंतर्गतच त्यांचा महाराष्ट्र दौरा झाला होता, या दौऱ्यात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची मुंबई येथे भेट घेतली होती. 

त्यानंतर ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल यांची भेट देखील चंद्रशेखर राव यांनी घेतली. 

नितीश कुमार यांच नाव चर्चेत येण्यामागची कारणे सांगत असताना माध्यमांमधून अस सांगितलं जातय की, 

ते आत्ता अशा पोझिशनला आहेत की तिथून सन्माजनक निवृत्ती त्यांना घ्यायची आहे. दूसरी गोष्ट म्हणजे भाजप आणि JDU मधला वाढता वाद पाहून ते राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्याचा विचार करतील सोबतच भाजपला मुख्यमंत्रीपद पाहीजे म्हणून ते राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवण्याचा विचार करतील.

पण भाजप त्यांना राष्ट्रपतीपदाचा उमेदवार करेल की विरोधी पक्षाकडून ते उमेदवार होतील याबद्दल अनेक शंका आहेत. 

शरद पवारांच नाव आजच चर्चे आलं आहे का तर नाही.. 

मागच्या वर्षीच्या जुलै महिन्यात देखील शरद पवारांच नाव राष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून चर्चेत आलं होतं. आणि त्याला कारण ठरली होती ती राहूल गांधी आणि प्रशांत किशोर यांची भेट 

प्रशांत किशोर यांनी त्यावेळी मांडलेल्या स्ट्रेटेजी नुसार महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तेलंगणा, तामिळनाडू, आंध्रप्रदेश व ओरीसा या राज्यांच्या सहमतीचा उमेदवार विरोधी पक्षाला द्यावा लागेल व त्यासाठी शरद पवार हेच योग्य उमेदवार आहेत. 

ममता बॅनर्जी यांच्यासोबत इतर राज्याच्या मुख्यमंत्र्यासोबतही त्यांच सख्य आहे. या राज्यापैकी फक्त पटनाईक कुटूंब शरद पवारांना मदत करेल का नाही याबद्दल प्रशांत किशोर यांना शंका होती. मात्र बिजुदा आणि शरद पवारांच्यात जुने सख्य असल्याने पटनाईक कुटूंब देखील शरद पवारांना मदत करेल अस बोललं जात त्यामुळेच शरद पवारांच नाव राष्ट्रपती पदासाठी पुढे येत आहे. 

शरद पवारांच नाव राष्ट्रपती पदासाठी चर्चेत येण्यासाठी दूसरं कारण आहे ते म्हणजे ममता बॅनर्जी यांचा सपोर्ट..

विरोधी पक्षाचा उमेदवार ठरवण्यासाठी देशभरातल्या मोदी विरोधी पक्षांना ममता बॅनर्जींना पत्र लिहलं आहे. एकमताने उमेदवार घोषीत करण्यासाठी १५ जून रोजी दिल्लीत बैठकीचं आयोजन देखील करण्यात आलं आहे.. 

दूसरीकडे सोनिया गांधी यांनी देखील शनिवारी पत्रकारांसोबत बोलताना सांगितलं की शरद पवार, ममता बॅनर्जी यांच्यासह अनेक नेते राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीच्या संबंधात आमच्यासोबत संपर्क करत आहेत. 

सोबत कॉंग्रेस पक्षाकडून सांगण्यात आलय की भारतासाठी आपआपसातले मतभेद सोडून सर्व विरोधकांनी मिळून एक उमेदवार द्यायला हवा.. 

ममता बॅनर्जी यांनी एकूण 22 राजकीय पक्षांना पत्र लिहून एक उमेदवार देण्यासंबधीत पत्र लिहलं आहे. ममता बॅनर्जी यांच्याकडून देखील शऱद पवारांच्या नावाला पाठींबा मिळू शकतो कारण शरद पवार हेच आत्ता ममता बॅनर्जी यांच्यासमोर एकमेव उमेदवार आहेत जे 2024 च्या लोकसभा इलेक्शनवेळी तिसऱ्या आघाडीची मोट बांधू शकतात.

अस झालं तर ममता बॅनर्जी यांच नेतृत्व शरद पवारांच्या हातात जावू शकतं. यामुळेच शरद पवारांच नाव पुढे करण्याची खेळी ममता बॅनर्जी आखत असल्याचं बोललं जातय.  

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.