प्रत्येक राजकीय पक्षाने सोयीसाठी शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर केला आहे.

शिवाजी महाराजांची रायगडावरची समाधी शोधण्याचे श्रेय जाते महात्मा फुलेंना. त्याआधी पेशवाई सोबत मराठी साम्राज्य नष्ट झाले होते. पण पेशवाई असतानाच महाराजांनी बनवलेली नाणी नष्ट झाली होती. सातारा इथे असलेल्या गादीचं महत्व कमी करण्यात आलं होतं.

त्यानंतर शिवाजी महाराजांचा उल्लेख नेहमी गावोगाव पराक्रमाच्या गोष्टींमध्ये आणि आदर्श राज्यकारभाराची आठवण म्हणून होत राहिला.

इंग्रज अधिकाऱ्यांनी इतिहासाचा अभ्यास करताना, लिखाण करताना वारंवार शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची, त्यांच्या कर्तृत्वाची आवर्जून दखल घेतली. त्याशिवाय पर्यायही नव्हता. पौर्तुगीज दप्तरात, मुघलांच्या नोंदीत आणी इंग्रजांच्या लिखाणात आपल्याला शिवाजी महाराजांची माहिती मिळत जाते. त्याशिवाय मराठीत झालेलं काही लिखाण जे इंग्रजांच्या काळात छापायला सुरु झालं.

मग महात्मा फुलेंनी महाराजांवर पोवाडा लिहिला. पोवाड्यात शिवाजी महाराज कायम महाराष्ट्रासाठी प्रेरणा बनून राहिले. महाराष्ट्रातली जनता महाराजांना कधीच विसरू शकणार नाही. शकली नाही. महाराज नेहमी काळजाच्या कप्प्यात आपली स्वतंत्र जागा ठेवून आहेत.

त्यांच्या नावाने राजकीय सोहळे मात्र महाराष्ट्रात सुरु झाले नव्हते. 

लोकमान्य टिळक यांनी रायगडावर सार्वजनिक शिवजयंती उत्सव सुरु केला. या उत्सवाचं कारण इंग्रजांच्या विरोधात भारतीय जनतेला लढण्याची प्रेरणा मिळावी हे होतं. आजही रायगडावरचा हा उत्सव चालू आहे. पण राष्ट्रीय कारणाने सुरु झालेला शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव पुढे पुढे संकुचित राजकीय नेत्यांनी स्थानिक पातळीवर आणण्यासाठी आतोनात कष्ट घेतले.

खरंतर आधीच इंग्रजांनी चक्क मराठी माणसांनी सैन्यात भरती व्हावे म्हणून शिवाजी महाराजांचे नाव वापरायला सुरुवात केली होती.

इंग्रजांना माहित होत की फक्त शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की मराठी माणूस पुढे येतो. त्यांनी सैन्यभरतीच्या जाहिरातीत ‘शिवाजी तुम्हाला युद्धात लढण्यासाठी आव्हान करत आहे’ असं आवाहन करायला सुरुवात केली. शिवाजी महाराजांचं नाव त्यांच्या पराक्रमामुळे आणि युध्द पद्धतीमुळे देशाबाहेरही झालं होतं. इंग्रज, पौर्तुगीज शिवाजी महाराजांविषयी सविस्तर बातम्या आपल्या देशात पाठवत होते. महाराजांच्या नावाने प्रेरणा मिळालेल्या या देशातल्या सर्वोत्तम गोष्टीपैकी एक म्हणजे मराठा बटालियन.

मराठा बटालियनच्या पराक्रमामुळे महाराजांचे वारस असल्याचा अभिमान द्विगुणीत होतो.

पण हे झालं सैन्याचं.

राजकारणात मात्र महाराजांचं नाव घेऊन निवडणुका लढवणारे सगळे पक्ष त्यांच्या नावाला कलंक असल्यासारखे वागताहेत. वर्षानुवर्ष सुरु असलेल्या आत्महत्या, पूल पडून जीव जाणारी सामान्य माणसं, मोर्चात मार खावा लागणारे अपंग लोक. हे सगळं महाराजांना सहन झालं असतं ?

स्वातंत्र्य मिळाल्यावर महाराष्ट्राचा लढा सुरु झाला संयुक्त महाराष्ट्रासाठी. पंडीत नेहरूंचा सुरुवातीला विरोध होता. याच नेहरूंच्या लिखाणात महाराजांविषयी चुकीचे उल्लेख होते. त्याचा मराठी माणसाला आधीच राग होता. त्यात यशवंतराव चव्हाण यांनी नेहरूंची बाजू घेतली. जागोजाग लोक नेहरू आणि चव्हाणांचा निषेध करायला लागले. शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं पहिल आणि शेवटचं प्रेम. कुणी गद्दारी केली तर त्याला सूर्याजी पिसाळ म्हणण्याची पद्धत आजवर आहे. तीनशे वर्ष उलटून गेल्यावरही एखाद्या राजाविषयी एवढी भक्ती असणं खूप दुर्मिळ आहे.

अगदी महाराजांच्या आजच्या पिढीतले वंशज उदयनराजे यांची लोकप्रियता बघून अंदाज येतो. केवळ महाराजांच्या प्रेमापोटी उदयनराजे प्रचंड मताधिक्याने निवडणून येतात. शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे आश्वासन देऊन गेली काही वर्ष खूप मोठं राजकारण चालू आहे. पण याआधी माह्राजांच्या नावावर राजकारण करण्यासाठी अशा खूप गोष्टी महाराष्ट्रात झाल्या आहेत.

शिवसेनेची स्थापनाच महाराजांच्या नावावर झाली.

पुढे नावात शिव असलेले कितीतरी पक्ष, संघटना आणि संस्था महाराष्ट्रात सुरु झाल्या. पण देशभर पोचले बाळासाहेब ठाकरे. शिवाजी महाराज देशभर वेगवेगळ्या भाषेत पोचवण्याचे काम सेनेने केले नाही. सेनेच्या लोकांना बाळासाहेबांवर हिंदी सिनेमा करावा वाटला. पण आजवर ज्यांच्या नावाने राजकारण करत आलोय त्या शिवाजी महाराजांवर हिंदीत काही करावं असं वाटलं नाही. शेवटी बाळासाहेबांच्या निधनानंतर एका इंग्रजी पत्रकाराने भगवान शिव यांच्या नावाने शिवसेना स्थापन झाली असं लिहिलं. आणखी काय बोलणार? 

त्यातल्या ठळक गोष्टी म्हणजे अंतुले यांनी भवानी तलवार परत आणण्याची केलेली घोषणा.

खरतर ती स्टंटबाजी  होती. पण अंतुले स्टार झाले त्या गोष्टीमुळे. कधी रायगडावर वाघ्याची समाधी हा वादाचा विषय होतो. कधी पुरंदरे यांच्या लिखाणावर वाद होतात. कधी जेम्स लेन प्रकरण पेट घेतं. महाराष्ट्राच्या मातीला असलेला सगळ्यात मोठा कलंक म्हणजे जेम्स लेन प्रकरण. आपल्या महाराष्ट्रात अशी नीच माणसं राहतात जी जेम्स लेनला भलती सलती माहिती पुरवू शकतात यावर तोपर्यंत कुणाचा विश्वास बसला नसता. पण महाराजांच्या नावाने नव्हे तर त्यांच्या बद्दल अफवा पसरवून सुद्धा काही नालायक पोट भरतात हे त्यावेळी लक्षात आलं. 

विधानसभेच्या वेळी प्रत्येक ठिकाणी महाराजांचे फोटो वापरणारा पक्ष अचानक लोकसभेला महाराजांचे फोटो गायब करून टाकतो. याचं कुणाला काही वाटत नाही. महाराजांना हे लोक गरजेपुरते वापरतात याची आता सवय झालीय का?

राष्ट्रवादीवाले शरद पवारांना जाणता राजा म्हणतात. जाणता राजा फक्त एकच. शिवाजी महाराज. मराठवाडा विदर्भावर अन्याय करणारे जाणता राजा असू शकत नाहीत. त्यांनी हे शब्द वापरू नयेत.

या राजकारणापाई महाराजांच्या जयंतीचा वाद सुरु झाला. या राजकारणापाई झेंडे, बिल्ले, गाड्या घोड्या अगदी रुमालावर पण महाराजांचे फोटो छापले जाऊ लागले. मध्ये तर महाराजांना देवाच्या रुपात दाखवायला सुरुवात झाली. महाराज चमत्कार नव्हते.

महाराज स्वकष्टाने, स्वबळावर स्वतःच्या डोक्याने राज्य आदर्श राजा होता येतं हे दाखवून देणारे जिजाऊमातेचे आदर्श पुत्र होते. अशा राजांचा वापर समाजकारण करण्यासाठी व्हायला हवा. राजकारण करण्यासाठी नाही. महाराजांच्या फोटोचा वापर करण्यावर प्रत्येक राजकीय पक्षाला बंदी हवी. कारण तशी कुठल्याच पक्षाची लायकी नाही. त्यांचे नमुने उमेदवार आणि त्यांच्यावरचे गुन्हे पाहिले की महाराजांचा वापर राजकारणात होणार नाही यासाठी आता कठोर नियम असायला हवेत.

महाराजांच्यासारखं आदर्श राज्य येईल तेंव्हा येईल. पण आहे त्या राजकारणात महाराजांचा वापर नको.

हे ही वाच भिडू.

3 Comments
  1. ertert says

    retert

  2. सतिश पाटील says

    मराठा पक्ष काढायला हवा उद्यनराजेंनी

Leave A Reply

Your email address will not be published.