लोकसभेत दोन गट पडले, एक श्रीदेवीच लग्न झालय म्हणणाऱ्यांचा अन् दूसरा नाही म्हणणाऱ्यांचा.

बॉलिवुडची सर्वाधिक मानधन घेणारी हिरोईन अस एकेकाळी श्रीदेवी बद्दल सांगितलं जायचं. हा किस्सा सांगण्यात आला तेव्हा देखील ती त्याचं स्थानावर अढळ होती. तुफान चालणाऱ्या सिनेमातून ती स्वत:ला सिद्ध करत होती. त्या काळाची श्रीदेवी नॅशनल क्रश झाली होती. साहजिक सामाजिक विषयांपासून राजकारणाच्या कट्यांवर तिचा विषय निघायचा आणि चर्चा तिच्याच डोळ्यात हरवून जायच्या.

याच काळात देशाचं राजकारण स्थित्यंतराच्या प्रक्रियेतून जात होतं. इंदिरा गांधीच्या मृत्यूनंतर बहुमतात गेलेली कॉंग्रेस पुन्हा आघाडीच्या राजकारणापर्यन्त येवून ठेपली होती. अशा काळात कॉंग्रेस आणि आघाडी पक्षाचं राजकारण यात नेहमीच जोरदार चर्चा चालत असतं. कॉंग्रेस वेगवेगळे मुद्दे चर्चत आणून आघाडीचं राजकारण लंगड करु पाहतं होती. 

त्याचसोबत आपल्या भाषणाने सभागृहात कोपरखळ्या घेण्यासाठी प्रसिद्ध असणारे पुण्याचे खासदार विठ्ठलराव गाडगीळ आपल्या भाषणातून वेगवेगळे संदर्भ लावत, शाब्दिक कोट्या करत सभागृहात मार्मिक टिका टिप्पणी करत असत.

ते आपल्या भाषणात काल्पनिक किस्सा रंगवू लागले. ते म्हणाले,

सभागृहात जोरदार हमरीतुमरी चालू झाली होती. यावेळी प्रथमच सत्ताधारी आणि विरोधक भांडत नव्हते तर एका मुद्यावरुन एकमेकांचे वेगवेगळे गट झाले होते. सभागृहाच्या अध्यक्षांना देखील हा प्रकार नविन होता. पण कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतं. असा गट करुन हे लोक का भांडतायत म्हणून सभागृहाचे अध्यक्ष मध्ये पडले आणि त्यातीलच एकाला शांत करत त्यांनी विचारले,

नेमकं तुम्ही का भांडताय ? 

यावर तो नेता म्हणाला, समोरच्या गटाचं म्हणणं आहे श्रीदेवीचं लग्न ठरलं आणि आमचं म्हणणं आहे तिचं लग्न ठरलं नाही. तिचं लग्न ठरलेलं नाही म्हणूनच आम्ही भांडतोय.

यावर अध्यक्षांनी एक तोडगा सांगितलां ते म्हणाले, इतकाच मुद्दा आहे न तर आपण एक काम करू आपण खुद्द श्रीदेवीला फोन करुन विचारू तुझं लग्न ठरलं आहे की नाही ते. 

अध्यक्षांच्या या प्रस्तावाला पहिल्यांदा पुर्ण बहुमत मिळालं. सभागृहातूनच लायटिंग कॉल जोडण्यात आला. योगायोगाने तेव्हा श्रीदेवी घरामध्येचं होती आणि फोन देखील खुद्द श्रीदेवीनेच उचलला होता!

अध्यक्ष महाराजांनी श्रीदेवीला विचारलं, सध्या सभागृहात तुझ्या लग्नावरुन चर्चा चालू आहे. तर आत्ता तूच सांग तुझं लग्न ठरल आहे की नाही. 

त्यावर श्रीदेवी म्हणाली,

माझं लग्न ठरल्याची बातमी खरी आहे पण आत्ता मी ते लग्न मोडलय. कारण अस की माझं लग्न ज्या माणसाबरोबर ठरलं होतं त्याचं नाव लाल अस आहे. आणि त्याच्याशी लग्न केलं असत तर माझं नाव श्रीदेवीलाल झालं असतं ! आणि तुम्हाला माहित आहे हे नाव आत्ता किती खराब होतय !!

हे ही वाचा –

श्रीदेवीलाल हे तेव्हा उपपंतप्रधान होते त्यांच्यावर टिका करताना विठ्ठलराव गाडगिळांनी हा किस्सा सभागृहात सांगितला. वास्तविक अशी घटना पुर्वी कधीच झाली नव्हती पण गाडगिळांनी हा किस्सा इतका रंगवून सांगितला की सभागृहातल्या जून्या जाणत्यांना देखील प्रश्न पडला मात्र शेवटी श्रीदेवीलाल हे नाव ऐकताच सर्वच नेते एकमुखाने हसू लागले.

असा हा अतरंगी भाषणाचा किस्सा ! गाडगीळांनी तेव्हाच्या सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा विषय काढून एक काल्पनिक कथा रचली आणि अलगदपणे श्रीदेवीलाल यांच्यावर निशाणा साधला.

असाच एक अतरंगी किस्सा होता तो अटलबिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन आणि अटलजींच्या धोतराचा तो पाहूया पुढच्या वेळी आमच्या अतरंगी भाषणाच्या सिरीजमध्ये ! 

  

Leave A Reply

Your email address will not be published.