म्हणून महिंद्राचे टॅक्टर हे जगात सर्वाधिक विकले जाणारे टॅक्टर आहेत..

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे लवकरच तीन भाग होणार आहे. तुम्ही वाचताय ते बरोबरचं आहे. आनंद महिंद्रा आपली कंपनी विकणार नाही. फक्त त्याचे तीन भाग करणार आहेत. 

पहिला विभाग असेल प्रवासी वाहने, दुसरा विभाग इलेक्ट्रिक वाहनांचा आणि शेवटचं म्हणजे ट्रॅक्टर. 

एकट्या महिंद्राचा ट्रॅक्टर बाजारात ४३ टक्के हिस्सा 

या कंपनीने २००७ मध्ये पंजाब ट्रॅक्टर कंपनी विकत घेतली आणि त्यानंतर महिंद्रा भारताची सगळ्यात मोठी ट्रॅक्टर कंपनी बनली. टॅक्टर मार्केटचा विचार केला तर एकट्या महिंद्रा ट्रॅक्टरचा हिस्सा ४३ टक्के आहे. महत्वाचं म्हणजे महिंद्राच ऑटोमोबाईल बिझनेस मध्ये सर्वाधिक प्रॉफिट ट्रॅक्टर विभाग देतो. महिंद्रा कंपनीने ३० लाखांपेक्षा जास्त ट्रॅक्टरची विक्री केली आहे.     

महिंद्रा ॲण्ड मोहम्मद ते महिंद्रा ॲण्ड महिंद्रा 

तुम्हाला आम्हाला तालुक्याच्या ठिकाणी पोहोचविणारी कमांडर बनविण्यापासून ते शेतकऱ्यांच भार हलकं करणारी कंपनी म्हणजे महिंद्रा. भारतातील वाहन उद्योगातील आघाडीचे नाव. या कंपनीची सुरुवात १९४५ म्हणजेच स्वातंत्र्यापूर्वीच झाली होती. कंपनीचे नाव होते महिंद्रा अँड मोहम्मद. 

देशाच्या फाळणीचा फटका या कंपनीला असा बसला की तिचे नावच बदलावे लागले होते. कंपनीची स्थापना जे. सी. महिंद्रा आणि मलिक गुलाम मोहम्मद यांनी केली होती. ही कंपनी अगोदर स्टीलचा व्यवसाय करायची. मोहम्मद यांची कंपनीत खूप कमी भागीदारी होती. एकतेचा संदेश देण्यासाठी मोहम्मद यांचे नाव कंपनीला दिले होते. 

पाकिस्तानच्या निर्मितीनंतर मोहम्मद हे पाकिस्तानात गेले. यानंतर कंपनीचे नाव बदलून महिंद्रा अँड महिंद्रा करण्यात आले. त्यानंतरच कंपनी वाहन क्षेत्रात उतरली. 

महिंद्रा कंपनीने इंटरनॅशनल हार्वेस्टर कंपनी सोबत एक जॉईंट व्हेंचर तयार करून १९६२ मध्ये पहिला ट्रॅक्टर तयार केला. त्याचे नाव B-२७५ नाव दिले. हा ट्रॅक्टर बनविण्याचा मागचा उद्देश होता खडबडीत जागेवर चांगला काम करू शकेल. या मॉडेलच पहिल्या प्रयत्नातच  ८५ हजार ट्रॅक्टर विकल्या गेले.  

ट्रॅक्टर बनविण्या मागची महिंद्रा कंपनीची आयडिया अशी होती की, यामुळे शेती क्षेत्रात क्रांती होईल. महिंद्रानी शेतकऱ्यांच्या गरजा जाणून घेत त्याप्रकारे आपल्या ट्रॅक्टर मध्ये बदल केले. महिंद्रा यांची ट्रॅक्टर बनविण्यामागे मुख्य संकल्पना ही शेती सोपे करणे हा नव्हता तर शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविणे असा होता. 

१९८३ पासून महिंद्रा ट्रॅक्टर मार्केट मध्ये टॉपला आहे. एक-एक करत महिंद्रा कंपंनीने आपल्या प्रतिस्पर्धी कंपन्या विकत घेतल्या. १९९९ गुजरात सरकारच्या मालकीचे असणारे गुजरात ट्रॅक्टरचे ६० टक्के विकत घेतले. त्याचे नाव बदलून ट्रकस्टार केले आहे. 

२००७ मध्ये पंजाब ट्रॅक्टर विकत घेतले आणि महिंद्रा देशातील सगळ्यात मोठी ट्रॅक्टर बनविणारी कंपनी बनली. पंजाब ट्रॅक्टरचे नाव स्वराज असेच कायम ठेवले आहे. स्वराज हा ब्रँड देशातील दुसऱ्या नंबरचा ट्रॅक्टर ब्रँड बनला आहे. तो ही महिंद्रांच्या मालकीचा आहे. 

महिंद्राने २०११ मध्ये युवराज ट्रॅक्टर बाजारात आणला याचे वैशिष्ट होते ते म्हणजे १० हत्तीचे बळ असणारा ट्रॅक्टर. या ट्रॅक्टरमधील ताकत शेतकऱ्यांना सर्वाधिक भावली. 

आज महिंद्रा कंपनी ट्रॅक्टर बरोबरच शेतीला लागणारी सर्व साहित्य बनविते. ज्यात पेरणी पासून ते छाटणी करणाऱ्या साहित्याचा समावेश आहे. यानंतर महिंद्रा कंपनीने जितक्या प्रकारचे ट्रॅक्टर आणले ते सगळे ताकतवान होते. याच ताकतीयाच्या जोरावर महिंद्रा टॅक्टरने डेमिंग पुरस्कार आणि जपानच्या गुणवत्ता पुरस्कार मिळविणारा जगातील एकमेव ट्रॅक्टर आहे.

हे सगळे ट्रॅक्टर शेतीबरोबर इतर ठिकाणी म्हणजेच रोडच्या कामात, जड वस्तूंची वाहतूक यासारखे काम करू लागले. भारताबरोबर, चीन, उत्तर अमेरिका, दक्षिण आशिया आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये महिंद्रा ट्रॅक्टरला मोठी मागणी आहे.

जागतिक मार्केटचा विचार केला तर महिंद्रा जॉन डियर, न्यू हॉलंड सारख्या तगड्या कंपन्यांशी टक्कर देत आहे. भारतातील महिंद्रा कंपनीची वर्षाला दिड लाख ट्रॅक्टर बनविण्याची क्षमता आहे. महिंद्रा वर्षाला ८५ हजार ट्रॅक्टर विकते. भारताचा विचार केला तर विक्रीच्या बाबतीत महिंद्रा ट्रॅक्टर मागच्या ३० वर्षांपासून नंबर १ वर आहे.  

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.