आयकर विभागने लिस्टच दिलीय, सोनू सूदने काय काय घोळ घातलाय ते.

मागच्या दोन दिवसांपासून आयकर विभाग सोनू सुदच्या मुंबईतल्या घर आणि कार्यालयावर तळ ठोकून होते. दोन दिवस झाले तरी आयकर विभाग काही बोलायला तयार नाही म्हंटल्यावर काहीच बाहेर नाही येत असं वाटलं. सगळी धाड फर्जी आहे अस सोशल मीडियात बोललं जाऊ लागलं.

पण सत्य लपत नाही असं म्हणतात, तसंच काहीसं झालंय. आज शेवटी आयकर विभागाने सांगितलंच की सोनू सूद ने अवैध परदेशी फंडिंग जमवून, टॅक्सची चोरी करून केवढी माया जमवली आहे ते.

दोन दिवस आयकर विभाग जे सोनूच्या घरात तळ ठोकून होत,काहीतरी सापडलंच असेल ना ?

होय तर, आयकर विभागाच्या म्हणण्याप्रमाणे, सोनूच्या एनजीओला जी विदेशी रक्कम मिळाली आहे त्याने ती खर्चच केलेली नाही. त्याचप्रमाणे सोनुने कर चुकवेगिरी करत वीस करोड रुपयांची टॅक्स चोरी केली आहे. पासष्ट करोड रुपयांचे फेक ट्रांनजेक्शन दाखवण्यात आलेत. तर दोन कोटींपेक्षा जास्त इंटरनॅशनल फंडिंग सोनूच्या एनजीओला मिळाले आहेत. तसेच जयपूर स्थित एका इन्फ्रा फर्मसोबत १७५ कोटी रुपयांच्या सर्क्युलरची देवाणघेवाण झाली आहे.

फर्जी कर्ज दाखवून टॅक्सवर डल्ला

आयकर विभाग सांगतो, सोनुने आपला टॅक्स वाचवण्यासाठी बऱ्याच ठिकाणांहून लोन घेतल्याचं दाखवलं. जेव्हा आयकर विभागाने सर्च ऑपरेशन सुरू केलं तेव्हा त्यांना सोनूच्या अकाउंट मध्ये फेक एन्ट्री दिसल्या. अशा २० फेक एन्ट्री आयकर विभागाला सापडल्या. त्यानंतर आयकर विभागाने सोनूशी संबंधित मुंबई, लखनऊ, कानपुर, जयपूर, दिल्ली, आणि गुरुग्राम मध्ये असणाऱ्या ठिकाणांवर धाडी टाकल्या. यात सोनुने व्यावसायिक रिसीट्स ला लोन म्हणून सांगितलं.

आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मते,

सोनू सूदची स्वयंसेवी संस्था ‘सोनू चॅरिटी फाउंडेशन’ ने या संपूर्ण कथित फसवणुकीमध्ये मोठी भूमिका बजावली आहे. अधिकाऱ्यांनी दावा केला की जुलै २०२० मध्ये तयार झालेल्या या स्वयंसेवी संस्थेला १ एप्रिल २०२१ पासून आतापर्यंत सुमारे १९ कोटींची देणगी मिळाली आहे. त्यापैकी फक्त दोन कोटी रुपये मदत कार्यासाठी वापरले गेले. उर्वरित १७ कोटी रुपये एनजीओच्या बँक खात्यात पडून आहेत. अधिकारी पुढे म्हणतात की एनजीओला FCRA च्या नियमांचे उल्लंघन करून सुमारे २.१ कोटींचे बेकायदेशीर परदेशी निधी प्राप्त झाला.

अभिनेता सोनू सूदला मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ‘देश के मेंटर’ योजनेचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून घोषित केले.

आयकर विभागाने जारी केलेल्या निवेदनात असेही म्हटले होते की, या छाप्या दरम्यान विविध ठिकाणांहून सुमारे १.८ कोटी रुपयांची रोकड सापडली. त्याचबरोबर ११ लॉकर्सही सापडले, ज्यांना जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लखनौमधील एक इन्फ्रास्ट्रक्चर ग्रुप पण यात इनवोल्व्ह आहे. हा इन्फ्रास्ट्रक्चर ग्रुप सोनू सूदचा सहकारी आणि लखनौचा मोठा उद्योगपती अनिल सिंगचा असल्याचे सांगितले जात आहे.

या कंपनीच्या माध्यमातून फसव्या बिलिंग, बेहिशेबी रोख खर्च, अनियमित डिजिटल व्यवहार आणि ६५ कोटी रुपयांचे बनावट करार यासारखे आर्थिक गुन्हे करण्यात आले.

आता एवढी माहिती हाती लागल्यावर आयकर विभाग शांत बसणार नाही, तर ही शोधमोहीम पुढं चालूच राहणार असल्याचं सांगितलं जातंय.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.