स्वातंत्र्यापूर्वी दक्षिण भारताला उत्तरेशी जोडण्याचं काम मराठा रेल्वेने केलं.

भारतीय रेल्वे म्हणजे जगाला पडलेलं कोडं . रोज ऊन,थन्डी,वारा,पाऊस  काहीही असो २३१ लाख प्रवासी आणि ३३ लाख टन माल वाहून नेणारा, सर्वदूर पसरलेला भारतीय रेल्वेमार्ग आजही एक आश्चर्य समजला जातो. करोडो भारतीयांचं आयष्य या रेल्वे रुळाशी जोडलं गेलेलं आहे.

या जगड्व्याळ भारतीय रेल्वेमध्ये सर्वात गुंतागुंतीचा मार्ग आहे दक्षिणेत. या दक्षिण भारताला उत्तरेही जोडलं होत मराठ्यांच्या रेल्वेने .

नाव सदर्न मराठा रेल्वे.

आपण म्हणतो कि भारतात पहिली रेल्वे मुंबईत बोरीबंदर ते ठाणे धावली तर हे एक अर्ध सत्य ठरते.  भारतातील पहिली रेल्वे इ.स. १८३७ मध्ये मद्रासमध्ये रेड हिल्स पासून चिंतड्रिपेट धावली. तिला रेड हिल रेल्वे असे नाव देण्यात आले. ही रेल्वे मुख्यत्वे मद्रासमधल्या रस्ते-बांधकाम कामासाठी ग्रेनाईट दगडांची वाहतूक करण्यासाठी वापरले जात असे.

इ.स. १८४४ साली, भारताचे त्यावेळचे गव्हर्नर जनरल लॉर्ड हार्डिंग यांनी खाजगी व्यावसायिक मंडळीना रेल्वे व्यवस्था चालू करण्यासाठी परवानगी दिली.

यातून आणखी दोन नवीन रेल्वे कंपन्यांची स्थापना करण्यात आली आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला त्यांना मदत करण्यासाठी सांगण्यात आले. या सगळ्या रेल्वे मालवाहतूक करणाऱ्या होत्या. यात एकही रेल्वे प्रवासी वाहतुकीसाठी नव्हती. इंग्रजांना त्यात रस देखील नव्हता. कंपनी सरकारला फक्त भारतातून पैसे कमवायचे होते.

अखेर १८५१ साली मुंबईच्या नाना शंकर शेठ यांनी जिद्दीने प्रयत्न केले व त्यातून भारतातली पहिली प्रवासी वाहतूक करणारी आगगाडी धावली.

या रुळावरून धावणारे आग ओकणारे राक्षस बघून लोक घाबरून पळून जायचे. हळूहळू भारतीयांची रेल्वे बद्दलची भीती मोडली.

पुढे ग्रेट इंडियन पेनिन्सुलार रेल्वेने मुंबईहुन रेल्वे पुण्याला आणली.इतकंच काय मुंबईला सोलापूर, नागपूर, कोलकाता, जबलपूर,अलाहाबाद अशा अनेक शहरांना जोडलं. उत्तरेतले मुख्य शहरे एकमेकांशी जोडली गेली मात्र दक्षिण अजून बाकी होतं.

रेल्वेच्या कॅप्टन सी.सी.जॉन्सन या इंग्रज अधिकाऱ्याने १८५८ साली एका रेल्वे कंपनीचं प्रपोजल दिलेलं. जे महाराष्ट्रातून कर्नाटक पर्यंत अनेक गवे जोडणार होतं. या रेल्वेला तब्बल २४ वर्षांनी परवानगी मिळाली.

१ जून १८८२ रोजी सदर्न मराठा रेल्वेची स्थापना झाली.

त्याचे हेडक्वार्टर होते धारवाड येथे. सर्वप्रथम या रेल्वे ने बेल्लारी ते होस्पेट या दरम्यान मीटर गेज टाकली. त्यानंतर लगेचच त्यांना पुणे ते मिरज रेल्वे मार्गाचे काँट्रॅक्ट मिळाले.

१८८४ साली पुणे ते मिरज मीटर गेज रेल्वे बांधणीचे काम सुरु झाले. पुण्याहून निघून कोरेगाव, मसूर,कुंडल  करत हा मार्ग मिरजेपर्यंत पोहचत होता. अनेक पूल, बोगदे उभारण्यात आले. त्याकाळचे कोट्यवधी रुपये खर्च झाले. अत्यंत कौशल्याने व वेगाने सदर्न  मराठा रेल्वेने हे काम पूर्ण  केले. दोन वर्षात रलेव मार्ग तयार झाला होता.

२ मे १८८७ ला मिरज ते पुणे रेल्वे सेवा सुरु झाली. पश्चिम महाराष्ट्राचा ग्रामीण भाग खऱ्या अर्थाने मुंबई-पुण्याशी जोडला गेला.

मिरज दक्षिण भारतातील सर्वात महत्वाच्या जंक्शन पैकी एक बनले.

महाराष्ट्राच्या दक्षिण टोकाला जाऊन सदर्न मराठा रेल्वे थांबली नाही. तर मिरजेच्या पुढे कर्नाटकात बेळगाव व लोंढ्या पर्यंत आपला मार्ग वाढवला. फक्त इतकेच नाही तर कॅसल रॉक मार्गे पोर्तुगीजांच्या गोव्यापर्यंत ही मराठा रेल्वे पोहचली. अतिशय कठीण असा हा मार्ग कोकण रेल्वे सुरु होण्यापूर्वी गोव्याला भारताशी जोडणारा एकमेव रेल्वेमार्ग होता.

इतकेच नाही तर कारवार च्या कोस्टल भागात हि सदर्न मराठा रेल्वे पोहचली.

सदर्न मराठाचि स्थापना इंग्रजांनी केली असली तरी या रेल्वे कंपनीत अनेक मराठी माणसे कमला होती. मराठ्यांची विजिगिषु वृत्ती, धाडस, जबर महत्वाकांक्षा याच प्रतीक म्हणजे हि रेल्वे कंपनी संपूर्ण भारतात एक आदर्श समजली जात होती.

या रेल्वेला विकत घेण्यासाठी म्हैसूर स्टेट रेल्वेने अनेक प्रयत्न केले. अखेर १ जानेवारी १९०८ रोजी मद्रास रेल्वे आणि मराठा रेल्वे एकत्र आले.

मद्रास सदर्न मराठा रेल्वे कंपनीची स्थापना झाली. पुढे हीच कंपनी स्वातंत्र्या नंतर दक्षिण रेल्वे म्हणून ओळखली गेली.

आजही जुन्या लोकांच्या आठवणी मध्ये मद्रास सदर्न मराठा रेल्वे घर करून आहे. याच रेल्वेने दक्षिण भारताला उत्तर भारताशी महाराष्ट्राच्या माध्यमातून जोडलं. मुंबईच्या  प्रगतीशी ओळख करून दिली. द्रविड भाषा, लिपी,संस्कृती यामुळे अखंड भारताशी तुटक पडलेला कर्नाटक, तामिळनाडू,केरळ देशाच्या सांस्कृतिक प्रवाहात समरस होऊन वाहू लागला.\

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.