गुजरातची चिमणी देशासाठी शहिद झाली ! 

हर्रर्रर्रर्र… 

काय पण काय सांगताय. तर भिडू लोकांनो हे बघा जशा एका झटक्यात तुम्हालापण खूप गोष्टी चुकिच्या वाटतात न  तसच आम्हाला पण वाटतं. म्हणजे चिमणी कुठं, देश कुठं आणि ते शहिद म्हणजे काय खायचा मॅटर आहे का? 

पण विषयात गुजरात होतं आणि तुम्ही तर माहित आहे, गुजरातची बातमी दुर्लक्षीत करणे म्हणजे देशद्रोह. साहजिक म्हणूनच म्हणलं नेमका काय मॅटर आहे तो तरी पहावा. तो पाहिला आणि जो रक्तरंजित इतिहास समजला तो तुमच्यासाठी. 

  • तारिख –  2/3/1974. 
  • स्थळ –  अहमदाबाद. 
  • वातावरण – टाईट.

तर 1974 साली अहमदाबादमधलं वातावरण टाईट होतं, विशेष म्हणजे अहमदाबादमधल्या या टाईट वातावरणासाठी कुठेही नेहरू जबाबदार नव्हते. आत्ता हेच टाईट वातावरण पुढे जावून इंदिरा गांधीची डोकेदुखी करणार ठरलं हि गोष्ट वेगळी. 

तर मॅटर असा होता की, गुजरातमध्ये नवनिर्माण आंदोलन पेटलेलं. घराघरातून लोक रस्त्यावर येवून आंदोलन करत होते. अहमदाबादमधल्या अशाच एका उपनगरात नवनिर्माण आंदोलन चालू होतं. संध्याकाळची वेळ होती. एका बाजूला पोलिस आणि दुसऱ्या बाजूला आंदोलककर्ते अशी एकंदरीत परस्थिती होती. साडेपाच सहा वाजले असतील. आंदोलक ऐकत नाहीत हे बघून पोलिसांनी फायरिंग चालू केलं. फायरिंग पण अस की या गोळीबारात शंभर लोकं गेले. 

लोकांमध्ये प्रचंड असंतोष होता. कित्येकांना गोळ्या लागल्या असतील, 

पण पण पण…… 

याच दरम्यान एक आक्रित गोष्ट घडली. एक भुकेली चिमणी (अस तिथलेच लोकं सांगतात, की ती भुकेली होती. ती खरच भुकेली होती का ते फक्त चिमणीच सांगू शकली असती)  तर अशी एक चिमणी तिथून उड्डाण भरत होती. त्याच वेळी पोलिसांनी फायरिंग चालू केलं. आरारारा करत एक गोळी थेट चिमणीच्या दिशेनं आली. चिमणी कोसळली वगैरे नाही तर चिमणीचे तुकडे झाले. गोळीहून जराच मोठ्ठी चिमणी. झालं,  पोलिस फायरिंग आणि शहिद झालेल्या लोकांच्या मध्ये देखील एखाद्या दुसऱ्या व्यक्तीचं लक्ष चिमणीकडे गेलच. 

लोक एकत्र झाले, अरेरे पोलिसांनी चिमणीला देखील सोडलं नाही. हळहळ होतीच पण त्याची जागा क्रोधाने घेतली. लोक आते रहें औंर कारवां बनता रहां. लोकांनी एकत्रीतपणे तिची अंत्ययात्रा काढली. तिला स्मशानात नेलं आणि तिचे अंत्यसंस्कार केले. 

लोकं इतक्यावर थांबले नाहीत तर त्या शहिद चिमणीचं स्मारक उभा केलं. ते आजही आहे. तिथले लोकं तिला वंदन वगैरे करतात. झालं इतकचं होतं. 

टिप –  भावनेच्या भरात चिमणीच्या भावना दुखावल्या असतील तर आम्ही बोलभिडू दिलगीरी व्यक्त करतो. 

Leave A Reply

Your email address will not be published.