ब्रह्मास्त्र : अणुबॉम्बचा शोध लावणाऱ्याने भगवद्गीतेतून प्रेरणा घेतली होती ?
ब्रह्मास्त्र सिनेमा नुकताच रिलीझ झाला. बॉयकॉट बॉलिवूडचा ट्रेंड सुरु असताना, ब्रह्मास्त्र हिट ठरणार की फ्लॉप याच्या चर्चा सुरु आहेत. हा सिनेमा भारतीय पौराणिक कथांवर आधारित असल्याचंही सांगण्यात येतंय. थोडक्यात ब्रह्मास्त्र म्हणजे महाभारत आणि महाभारत म्हणजे भगवद्गगिता. आत्ता सिनेमाच्या नादातून अनेक विषय निघतील, काही दावे व्हाट्सअप विद्यापीठाचे असतील तर काही दावे खरे असतील..
विषय असा आहे की, अणुबॉम्बचा शोध लावणाऱ्याने भगवद्गीतेतून प्रेरणा घेतली होती.
काय बसला ना धक्का? आता तुम्ही पण भिडूला अंधभक्त वर्गात मोडाल त्यापूर्वी सगळा इतिहास सांगतो. नीट वाचा.
अणुबॉम्बचा शोध लावला रोबर्ट ओपन्हायमार याने.
न्युयोर्क शहरात राहणाऱ्या ओपन्हायमार या ज्यू परिवारात जन्माला आलेला मुलगा म्हणजे रोबर्ट. घरातील वातावरणामुळे की अजून कुठल्या गोष्टीमुळे त्याचा स्वभाव हा एकाकी आणि चिडचिडा होता.
रोबर्ट यांनी आपल शालेय शिक्षण संपवून पुढील शिक्षणासाठी हार्वर्ड विद्यापीठात प्रवेश घेतला. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात या म्हणीप्रमाणे त्यांनी भौतिकशास्त्रात सगळ्यात जास्त गुण मिळवले होते. याअगोदर हार्वर्ड मध्ये इतके गुण कुणालाच मिळाले नव्हते. तेव्हा त्यांच्या प्रोफेसर म्हणाले की, हा मुलगा नक्कीच फिजिक्स मध्ये नाव करेल.
आणि रोबर्ट ने केलाही तसंच.
त्याने जगाला पहिला अणुबॉम्ब दिला. पण याला जपानमध्ये झालेल्या नर संहाराची दुखद किनार होती.
याअगोदर त्यांनी शिक्षण संपताच त्याने त्यावेळच्या वेगवेगळ्या शास्त्रज्ञाचा असिस्टंट म्हणून काम करायला सुरुवात केली. सन १९३१ ला त्यांना कॅलिफोर्निया विद्यापीठात असोसिएट प्रोफेसर म्हणून नेमण्यात आल. तिथे त्यांच काम बघून त्यांना १९४१ मध्ये अमेरिकन सरकार खास ओळखल्या जाणाऱ्या मनहटन टीम मध्ये सामील करून घेण्यात आल.
मॅनहॅटन प्रोजेक्ट हा अणुबॉम्ब निर्मितीसाठी सुरु करण्यात आला होता.
दुसऱ्या महायुद्धाचा तो काळ होता. प्रत्येक देश जास्तीतजास्त विघातक शस्त्र बनवण्याच्या स्पर्धेत गुंतला होता. अस म्हणतात की हिटलरची जर्मनी अणुबॉम्ब बनवण्याच्या अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत येऊन पोहचली होती.
अशावेळी अमेरिकेने देखील स्वसंरक्षणाच्या नावाखाली अणुबॉम्ब निर्मिती सुरु केली होती.
वर्षभरातच ओपन्हायमारची नेमणूक मॅनहॅटन प्रोजेक्ट चा चीफ म्हणून करण्यात आली. तिथे त्यांच्या देखरेखीखाली एक टीम अणुबॉम्ब बनवण्याच्या मागे लागली होती. अणुबॉम्ब कसा बनवला हे आजही गुपितच आहे. तो एका रात्रीत नक्कीच बनला नसेल. त्यासाठी रोबर्ट आणि त्यांच्या टीमने जीवतोड मेहनत घेतली होती.
१६ जुलै १९४५ ला पहाटे साडे पाच वाजता त्यांचं स्वप्न पूर्ण झालं. अमेरिकेने अणुबॉम्बची यशस्वीपणे चाचणी घेतली होती. हे ऐकल्यावर संपूर्ण जग हादरून गेल होत. पुढील विनाशाची चाहूल लागली होती.
अमेरिका एवढ्यावरच थांबणे शक्य नव्हत. दुसऱ्या महायुद्धात जपान कुणासोबतही माघार घ्यायला तयार नव्हता.
तेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष ट्रुमन यांनी ६ ओगस्ट १९४५ ला जपानच्या हिरोशिमा वर टाकण्याचे आदेश दिले. याची तीव्रता इतकी भयानक होती की त्याचे परिणाम अजूनही तिथल्या लोकांवर, तिथल्या वातावरणावर जाणवतात.
अणुस्फोटानंतर त्यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया देताना भागवद गीतेतला श्लोक म्हणून दाखवला होता.
(११ अध्यायातील ३२वा श्लोक.) ते म्हणतात की,
i remembered the line from the Hindu scripture, the Bhagavad-Gita; Vishnu is trying to persuade the Prince that he should do his duty and, to impress him, takes on his multi-armed form and says,
“Now I am become Death, the destroyer of worlds.” I suppose we all thought that, one way or another.
याचा अर्थ अस की,
“आकाशातून हजार सूर्याच्या प्रकाशाचा जो प्रकाश होईल तो विश्वरूप परमात्म्याचा चं प्रकाश असेल.”
रोबर्ट ओपन्हायमारहे संस्कृत चे अभ्यासक होते. मॅनहॅटन प्रोजेक्टवर नियुक्ती होण्यापूर्वी १९३१साली बर्कलीमध्ये आर्थर रायडर या संस्कृत शिक्षकाकडून त्यांनी संस्कृत शिकलं होत. त्यांनी गीतेचा अभ्यास देखील केला होता. जेव्हा त्यांना विचारण्यात आलं की हा अणुस्फोट जगातला पहिला का?
त्यांनी उत्तर दिलं की, हो पहिला, पण आधुनिक काळातला.
यातून त्यांना अस सुचवायचं होत की, पुराणकाळात पण असे स्फोट झालेले असू शकतात. हीच गोष्ट त्यांनी नंतरच्या एका मुलाखतीमध्ये देखील सांगितली. याचाच अर्थ अणुबॉम्बबद्दलची संकल्पना त्यांना भगवद्गीतेतील त्या श्लोकामुळे सुचली असू शकते.
पुढे त्यांनी अणुस्फोटात झालेली हिंसा बघून आपल्या पदाचा राजीनामा दिला. १८ फेब्रुवारी १९६७ ला त्यांच आजारपणामुळे निधन झालं.
हे ही वाच भिडू.
- पुनर्जन्माच्या या घटनेची दखल घेवून महात्मा गांधींनी चौकशी समिती बसवली होती.
- अब्दुल सलामांना नोबेल मिळाल्यानंतर ते पाकिस्तानातून भारतात डोकं टेकवण्यासाठी आले.
- अणुशास्त्रज्ञ होमी भाभा यांचा विमान अपघात हे अमेरिकेचे षडयंत्र होते ?
Jabri