त्या गरमागरम रात्रीमुळे शाहरुखने पत्रकाराला पोलिसांच्यासमोर धुतले होते.

शाहरुख खानच्या सुपरस्टार पदाचे दिवस आता इतिहासजमा झालेत असं काही जणांचं म्हणणं आहे.  आमचा त्याला काही आक्षेप नाही. पन आमचा आक्षेप त्याच्या आमच्या पत्रकारा बांधवाना काडीची किंमत न देण्याला आहे. (आम्ही स्वतःला पत्रकार जमातीतले मानतो)

परवाच त्याने पत्रकारितेची बुलंद आवाज रिपब्लिकन अर्णब्दा गोस्वामीला गोड शब्दात धुतले तेव्हा आम्हाला पण वाईट वाटलं होतं. पण आज तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती अर्णबची नाही.

गोष्ट आहे नव्वदच्या काळातली. शाहरुख खान म्हणजे तेव्हा अजून सुपरस्टार व्हायचा होता. दोन तीन पिक्चर आलेले. अगदी नवीन गडी ओ. मिळेल त्या पिक्चरला होय म्हणायला लागत होतं. त्याच्या दिसण्यावरून इंडस्ट्रीतले लोक प्रायव्हेट मध्ये तरी कधी तोंडावर खुळ्यात काढत होते.

तरी अंगातला माज कमी नव्हता.

एकदा काय झालं त्याचा एक सिनेमा रिलीज झाला मायामेमसाब. साल असेल 1992. हा पिक्चर होता एका नाजूक विषयावर. म्हणजे काय असत की मेन हिरोईन ही शादीशुदा असते. पण आपल्या लग्नात खुश नसते. तिचे भरपूर बॉयफ्रेंड असतात. त्यापैकीच एका चा रोल केला होता शाहरुख नं.

दोघांचा बेडसीन होता. त्याकाळच्या मानानं सीन खूपच गरम होता. हिरोईन दीपा साहनी मेहता टॉपलेस दिसली होती. एकदम उशीबीशी फाडून वाईल्ड असा हा सिन दोघांच्या अभिनयाने चांगलाच रंगला होता. तर या हिरॉईनचे मिस्टर हेच पिक्चरचे डायरेकटर होते. नाव केतन मेहता. आपल्या कलात्मक आणि प्रयोगशील सिनेमा निर्मिती साठी ते आजही ओळखले जातात.

बर शूटिंग झालं. पिक्चर तयार झाला. सेन्सॉरशी भांडण वगैरे होऊन रिलीज पण झाला. प्रत्येक आर्ट फिल्मच होत त्या प्रमाणे प्रेक्षकांच्या अभावी फ्लॉप पण झाला. सगळं झालं पण आमच्या पत्रकार बांधवाना गप्प बसवतय होय?

सिने ब्लिटझ नावाच्या एका गॉसिप मॅगझीन मध्ये एक स्टोरी छापून आली. टायटल होत,

“शाहरुख आणि दीपाच्या गरमागरम दृश्याचा रहस्यस्फोट”

आत स्टोरी होती की सिन वास्तववादी वाटावा म्हणून दिग्दर्शकाने आपल्या बायकोला आणि शाहरुखला शूटिंगच्या अगोदर एक रात्र हॉटेलच्या रूममध्ये एकत्र राहायला लावलं होतं.

या स्टोरीचा लेखक कोण होता ठाऊक नाही. त्यांनी नाव लिहिलेल नव्हतं. मासिक बाजारात आलं आणि जोरदार हिट झालं. काही जण मासिक वाचून खास पिक्चर थेटरात जाऊन बघून आले. शाहरुख पर्यंत सुद्धा या मासिकाची कीर्ती पोहचली.

एकदा एका पार्टीत डान्स करत असताना शाहरुखला ब्लिट्स मासिकाचा एक लेखक भेटला. त्याच नाव होतं किथ डी कॉस्टा.  दोघंची तोंड ओळख होती. शाहरुखला वाटलं तो लेख यानेच लिहिला आहे. त्या पार्टीतच त्या बिचाऱ्या किथ ची धुलाई सुरू केली आणि सोबत दिल्लीवाल्या शिव्यांचा भडिमार होताच.कसबस बाकीच्यांनी त्याला अडवलं.

पण शाहरुख भाऊ गप्प बसणाऱ्यातला नव्हता. त्याला सारख फोन करून शिव्या द्यायचा. दीपा सारख्या सिनियर अभिनेत्रीबद्दल एवढ्या थापा लिहिलं तरी कसं हा प्रश्न विचारायचा. एकदा विषय खूप वाढला. त्यादिवशी शाहरुख म्हणाला की

“रात्री तुझ्या घरी येऊन तुझ्या आईवडिलांच्या समोर तुला ठोकणार आहे.”

आणि घडलंही तसंच. मध्यरात्री किथचा दार कोणीतरी वाजवत होत म्हणून उघडून पाहिलं तर सिने स्टार शाहरुख खान तिथे हजर.

परत शिव्या, परत मार सुरू झाला. किथचे मम्मी पप्पा पण सांगत होते की आमच्या पोरानं तो लेख लिहिला नाही,पण शाहरूख ऐकायला तयार नव्हता. अखेर पोलिसांना बोलवून घेण्यात आलं.

शाहरुख खानला अटक झाली. शाहरुखचा ठेका कमी झाला नव्हता. बांद्रा पोलीस स्टेशनमध्ये बसून तिथल्या पोलिसांना तो ऑटोग्राफ देत होता. मोठ्या ऑफिसरनी त्याला समजावून सांगितलं की विषय वाढवू नको, त्या पत्रकाराला फोन करून सॉरी म्हण विषय मिटव. शाहरुख हांहां म्हणाला. मग त्याने तिथूनच किथला फोन फिरवला आणि म्हणाला,

“तुझ्यामुळे मी पोलिसांसमोर आहे,पण भ्रमात राहू नको! तुझ्या घरी येऊन मी तुला **णार आहे!!”

पोलिसांनी डोक्याला हात मारून घेतला. अखेर चंकी पांडेचा भाऊ चिक्की पांडे मध्यरात्री आला, त्याने जामिनाची रक्कम भरली आणि शाहरुखला सोडवले, तो त्याला घरी घेऊन गेला.

पुढे दोन वर्षांनी शाहरुखला कोणीतरी सांगितलं की तो लेख खरंच किथने लिहिला नव्हता. तेव्हा कुठे जाऊन शाहरुखला पटलं आणि त्याने त्याची जाहीर माफी मागितली.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.