स्टीफन हॉकिंगची व्हीलचेअर नुसती मनातल्या विचारांवर चालायची

स्टीफन हॉकिंग नुसती व्हीलचेअरवर बसून, ब्रम्हांडाची गणिते उगडणारा शास्त्रज्ञ. व्हीलचेअरवर बसवलेल्या कंप्युटर स्क्रीनकडं बघत हा माणूस फिजिक्स मधल्या क्वांटम मेकॅनिक्स मग नंतर कॉस्मॉलॉजि, ब्लॅकहोल कसे काम करतात असलं काय तरी  सांगायचा. पण ह्यातलं काहीच कळायचं नाही.

 पुढे त्याचं ‘ब्रिफ हिस्टरी ऑफ टाइम’ वाचल्यावर कळलं की हा माणूस खरंच एक आजूबा आहे. 

आता असलं काई कळल्यावर लोक तो जे म्हणतोय त्या कॉस्मोलॉजि, क्वांटम मेकॅनिक्स या विषयात पीएचडी वगैरे करतील. पण आमचा जीव अडकलेला त्याच्या  व्हीलचेअर आणि त्यावर बसवलेल्या कंप्युटर सिस्टिमवर.

स्टीफन हॉकिंग २१ वर्षांचे असताना त्यांना अमायोट्रॉफिक लॅटरल स्क्लेरोसिस (ALS) चे निदान झालं होतं . 

ALS हा मोटर न्यूरोन रोगाचा एक प्रकार आहे, ज्यामुळे स्नायूंवर नियंत्रण ठेवणाऱ्या मज्जातंतूंचा मृत्यू होतो. 

बहुतेक रूग्णांचा मृत्यू पाच वर्षांच्या आत होतो, परंतु सुदैवाने भौतिकशास्त्रासाठी आणि स्वतः प्रोफेसर हॉकिंग यांच्यासाठी, त्यांचा रोग अत्यंत मंद गतीने वाढला आहे. असे असले तरी, वयाच्या ७३ व्या वर्षी, हॉकिंग यांच्या चेहऱ्याच्या स्नायूंमध्ये फक्त काही प्रमाणात मोटर फंक्शन शिल्लक आहे. त्यामुळं तुम्ही या माणसाला कधी बघितलं असले तर कळेल की हा कधीच कोणती हालचाल नाही करायचा. मग त्याचा जगाशी संबंध कसा व्हायचा तर त्याच्या व्हीलचेअरमध्ये बनवलेल्या संगणक तंत्रज्ञानामुळे.

नुसत्या मनातल्या विचारावर चालणारी त्यांची ती व्हीलचेयर .

होय नुसता मनात विचार करायचा लेफ्टला टर्न घे आणि ही चेअर मग डावीकडं वळणार. तर ह्याच्या मागं नासाने विकसित केलेलं एक जाम भारी तंत्रज्ञान आहे. ते असं की जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा तुमचा मेंदू तुमच्या घशातल्या मज्जातंतूना सिग्नल पाठवतो. जरी तुमचे स्नायू ऐकायला येइल असा आवाज काढण्यासाठी पुरेसे मजबूत नसले तरीही. खरं तर हे सबव्होकल स्पीच जेव्हा तुम्ही फक्त तुमच्या डोक्यात एकदा विचार करता तेव्हाच जेनरेट होतात. मग त्यांच्या घशाच्या त्वचेला इलेक्ट्रोड चिकटवले आहेत ते हे सिग्नल डिटेक्ट करतात आणि  मग ही आज्ञा व्हीलचेअरवर पाठवली जाते. 

आता तुम्ही त्यांच्या व्हीलचेअरवर एक कंम्पुटर बघितला असेल. त्याच्यातही एकदम फाडू टेकनॉलॉजि वापरली होती. प्रोफेसर हॉकिंग त्यांच्या विंडोज टॅबलेट पीसीची सर्व फंक्शन्स फक्त एक स्विच वापरून नियंत्रित करायचे  – म्हणजे समजा तुम्ही तुमचा कंप्युटर नुसत्या स्पेसबारनं चालवताय! 

सुरवातीला हाताने चालवला जाणारा हा कंप्युटर जेव्हा त्यांचे हातही काम करायचे बंद झाले तेव्हा नुसत्या गालाच्या हालचालींवर काम करू लागला. 

जेव्हा हॉकिंग गाल हलवायचे तेव्हा सेन्सर हालचाल ओळखायचा आणि त्यानुसार अक्षर उचलायचा. ते या प्रक्रियेचा वापर एका बटणावरून किंवा मेनू आयटमवरून दुसऱ्या बटणावर स्कॅन करण्यासाठी देखील करायचे आणि त्यामुळे  ईमेल प्रोग्राम (युडोरा), वेब ब्राउझर (फायरफॉक्स) वापरणे किंवा स्काईपवरून कॉल करणे ही सगळी कामं ते गालाच्या हालचालीवरून करायचे.

पुढे त्यांच्या मृत्यूनंतर या व्हीलचेअरचा लिलाव करण्यात आला आणि तोच निधी त्यांच्या चॅरिटीसाठी वापरला जातोय.

हे हि वाच भिडू 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.