सुभाषबाबूंच्या मृत्यूचे वृत्त कळताच गांधीजी म्हणाले, ‘तो झेंडा जरा उतरवा, माझा मुलगा गेला.’

कंगना रानौत नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच तिने विधान केलं होत कि, १९४७ साली भारताला स्वातंत्र्य भीक म्हणून मिळाले. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. आता अगदी कालपर्यंत हा वाद पेटत होता. त्यातच आता कंगनाच्या आणखी विधानाने या वादात पुन्हा एकदा ठिणगी पडलीये. 

 आपल्या इंस्टाग्रामवर कंगनाने एक स्टोरी टाकली. ज्यात ती म्हणाली कि, एक तर तुम्ही गांधीजींचे फॅन असू शकता नाहीतर सुभाषचंद्र बोस यांचे समर्थक असू शकता. तुम्ही एकाचवेळी दोघांचे समर्थक असू शकत नाही. महात्मा गांधींनी कधीही भगतसिंग किंवा नेताजींना पाठिंबा दिला नाही. भगतसिंग यांना फाशी व्हावी अशी महात्मा गांधींची इच्छा होती, वगैरे वगैरे गोष्टी तिने आपल्या पोस्ट मध्ये सांगितल्या आहेत. यावरून सध्या भारतभर वाद पेटलाय. अनेक उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत.

Kangana Ranaut Mahatma Gandhi post

पण खरंच सांगायचं झालं ना तर खुद्द सुभाषचंद्र बोस हे गांधीजींचे फॅन होते. हा..स्वातंत्र्य कसे मिळवायचं याबाबत दोघांचे मतभेद होते, पण त्यांनी कधीच एकमेकांना अपमान केला नाही कि, विरोधात वक्तव्य केलं नाही.

पण  काही लेखकांनी मीच किती शहाणा हे दाखवून देण्यासाठी महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल अनेक गोष्टी मुद्दाम चुकीच्या पद्धतीने पसरविल्या, गोष्टी पार वाढवून चढवून सांगितल्या आणि लिहिल्या. म्हणजे पार असंही बोललं जात कि, १९३९ मध्ये जेव्हा नेताजींनी गांधीजींच्या उमेदवाराला हरवून काँग्रेसचं अध्यक्षपद जिंकलं होतं, तेव्हा गांधीजींनी हि स्वतःची हार आहे असं म्हणत पक्ष सोडण्याची तयारी केली.

आता खरं स्टेटमेंट सांगायचं झालं तर, या काँग्रेस अध्यक्षपदाच्या निकालावर गांधीजींनी ३१ जानेवारी १९३९ ला बारडोली येथे एक मॅसेज दिला. ज्यात गांधीजी म्हणाले, 

‘मै सुभाष बाबू की विजय से खुश हुं… लेकीन मौलाना अबुल कलाम आझाद द्वारा अपना नाम वापस लेने के बाद भी डॉ. पट्टाभी को चुनाव से हटनेकी सलाह मैने दी थी, इसलिए यह हार ऊनसे जादा मेरी है.’ गांधी पुढे म्हणतात, ‘इस हार से मै खुश हुं… सुभाष बाबू अब उन लोगों की कृपा के सहारे अध्यक्ष नही बने है, बल्की चुनाव जितकर अध्यक्ष बने है. ऊनकी राय मे उनका कार्यक्रम और उनकी नीती दोनो अत्यंत अग्रगामी है, अल्पमत के लोग उसकी सफलता ही चाहेंगे.’

आता यावरून आपणचं अंदाज बांधुयात कि, तथाकथित अभ्यासकांनी किती खोटारडा प्रचार केला असेल. आता याचीच काही उदाहरण पाहायची आहेत तर  स्टोरी पुढे वाचाचं. 

तर,  असं म्हणतात कि गांधीजींना सुभाषबाबू अजिबात पटत नव्हते. पण जेव्हा सुभाषचंद्र बोस यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची बातमी गांधीजींना समजली, तेव्हा पडलेल्या  झालेल्या महात्म गांधींनी म्हंटले की, ‘तो झेंडा जरा उतरवा, माझा मुलगा गेला.’

२७ एप्रिल १९४७ रोजी आझाद हिंद फौजेच्या जवानांशी बोलताना गांधीजी म्हणतात-

‘सुभाष बाबू तो मेरे पुत्र के समान थे. उनके और मेरे विचारों मे भले ही अंतर रहा हो, लेकिन उनकी कार्यशक्ति और देशप्रेम के लिए मेरा सिर ऊनके सामने झुकता है.’

त्यांच्या निधनानंतर देखील गांधीजी सुभाष बाबू यांचा सुभाष असा कधीही एकेरी उल्लेख करीत नसत, तर ते ‘नेताजी’ असा आदराने उल्लेख करायचे.

एवढचं नाही तर ज्या वेळी सुभाष बाबूंना ब्रिटिश सरकारने अटक केली, त्यावेळी त्यांनी  २६ मे १९२७ रोजी ‘यंग इंडिया’मध्ये एक खरमरीत अग्रलेख लिहिणारे गांधीजीचं होते.

या लेखात त्यांनी लिहीलं की,  

‘इस दुख:द मामले से भी अगर कोई सांत्वना की चीज ढूंढ निकालना चाहे, तो उसे एक चीज जरूर मिल जायेगी और वह यह कि अंतिम क्षण तक श्रीयुत सुभाषचंद्र बोस सरकार द्वारा समय-समय पर रखी गई अपमान भरी शर्तो को बडी जंवामर्दी के साथ इन्कार करते रहे. अब हमे आशा और प्रार्थना करनी चाहीए कि परमात्मा उन्हे फिर स्वस्थ करे और वे चिरकाल तक अपने देश की सेवा करते रहे.’

यानंतर ९ जुलै १९४० रोजी सुद्धा  गांधीजींनी दुसरा अग्रलेख लिहिला,  जेव्हा सुभाषबाबूंना पून्हा एकदा अटक करण्यात आली. यावेळी गांधींनी लिहीले की, 

‘सुभाषबाबू जैसे महान व्यक्ति की गिरफ्तारी कोई मामुली बात नही है. लेकीन सुभाष बाबूने अपनी लडाई की योजना काफी सोच-समझकर और हिम्मत के साथ सामने रखी है. वे मानते है कि ऊनका तरीका सबसे अच्छा है… उन्होने मुझे बडी आत्मीयता से कहा कि जो कुछ कार्यसमिती नही कर पाई, वे वह सब करके दिखा देंगे. वे विलंब से ऊब चुके थे. मैने उनसे कहा कि अगर आपकी योजना के फलस्वरूप मेरे जीवन-काल मे स्वराज्य मिला तो आपको बधाई का सबसे पहला तार मेरी और से ही मिलेगा. आप अपना संघर्ष चला रहे होंगे उस दौरान अगर मै आपके तरीके का कायल हो गया तो मै पुरे दिल से अपने नेता के रूप मे आपका स्वागत करूंगा और आपकी सेना मे भरती हो जाऊंगा.’

आता तसं पाहिलं तर गांधीजी हे अहिंसावादी होते तर सुभाष चंद्र बोस हे जहाल मतवादी होते. या दोघांचे विचार जरी वेगवेगळे असले तरी सुद्धा दोघे एकमेकांचा सन्मान करायचे.

सुभाष बाबू यांची प्रशंसा करताना गांधीजींनी लिहिले की, जर या भारत देशाला हुकूमशहा देण्याची वेळ आलीचं तर मी पहिला हुकूमशहा म्हणून सुभाषचंद्रांचीच निवड करीन.

आता ज्या प्रमाणं गांधीजीं सुभाषबाबूंना आपल्या मुलाप्रमाणे समजायचे, त्याचप्रमा णे सुभाष बाबू सुद्धा गांधीजींचा नेहमीच सन्मान करायचे.

सुभाषचंद्र बोस हे पहिले व्यक्ती होते, ज्यांनी गांधीजींना ‘राष्ट्रपिता’ ही उपाधी दिली. मार्ग वेगळा असला तरी गांधीजी हेच स्वातंत्र्यलढ्याचे मुख्य नायक आहेत याबद्दल सुभाषबाबूंना कोणतीही शंका नव्हती.

गांधीजींच्या जन्मदिनी २ ऑक्टोबर १९४३ रोजी बँकॉक रेडियोवरुन सुभाष बाबूंनी एक  मॅसेज प्रसारित केला होता,

‘…. मन की शून्यता के ऐसे ही क्षणो मे महात्मा गांधी का उदय हुआ. वे लाए अपने साथ असहयोग का, सत्याग्रह का एक अभिनव, अनोखा तरीका. ऐसा लगा मानो उन्हे विधाता ने ही स्वतंत्रता का मार्ग दिखाने के लिए भेजा था. क्षण भर मे, स्वत: ही सारा देश उनके साथ हो गया. हर भारतीय का चेहरा आत्मविश्वास और आशा से दमक गया. अंतिम विजय की आशा फिर सामने थी. आने वाले बीस वर्षो तक महात्मा गांधी ने भारत की मुक्ति के लिए काम किया और उनके साथ काम किया भारत की जनता ने. ऐसा कहने मे जरा भी अतिशयोक्ति नही होगी कि यदि १९२० मे गांधीजी आगे नही आते तो शायद आज भी भारत वैसा ही असहाय बना रहता. भारत की स्वतंत्रता के लिए उनकी सेवांए अनन्य, अतुल्य रही है. कोई अकेला व्यक्ति उन परिस्थितीयों मे एक जीवन मे उतना कुछ नही कर सकता था.’

एवढंच नाही तर देशाच्या स्वातंत्र्यासाठी सुरू केलेल्या लढ्याला गांधीजींचे आशीर्वाद मागितले.

आता एवढे चांगले संबंध असूनही गांधीजी आणि सुभाष चंद्र बोस यांच्या नात्यात बद्दल अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेलेयं.

हे ही वाचं भिडू :

1 Comment
  1. Santosh Sasane says

    बहुत बढिया जानकारी आज की झूटी खबरे देखते देखते लोग सच्चाई और हकीकत है वह भूल गए है…

Leave A Reply

Your email address will not be published.