ही आहे बुलडोजरची सक्सेस स्टोरी… 

दोन आकड्यांना महत्व आलय. म्हणजे विरोधक म्हणतात देशात दोनच नेते आहेत. बिझनेसमधली लोकं म्हणतात देशात दोनच व्यापारी आहेत. तसच सध्या देशात दोनच मुद्दे आहेत. त्यातला पहिला मुद्दा भोंग्याचा. त्यापैकी भोंग्याची सक्सेस स्टोरी तर आम्ही करून टाकली. आत्ता दूसऱ्या मुद्याची वेळ आलेय.. 

दूसरा मुद्दा आहे बुलडोजरचा…

भोंगा आणि बुलडोजरमधला महत्वाचा फरक म्हणजे भोंगा हा कारण ठरतो तर बुलडोजर हा उतारा ठरतो. तर आज बुलडोजर काय करतोय तर धार्मिक दंगलीत सहभागी असणाऱ्या लोकांची घरे पाडतोय.. 

विषय माहित नसणाऱ्या लोकांसाठी पहिला विषयाची पेरणी करू.. 

तसा भारताच्या राजकारणात बुलडोजरला महत्वाचा मुद्दा करण्याचं श्रेय दिलं जातं ते योगी आदित्यनाथ यांना. योगी आदित्यनाथ यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या पहिल्या कालखंडात अनेक बेकायदेशीर बांधकामे बुलडोजरच्या मदतीने तोडली होती. त्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर टिका करताना हे मुस्लीम धर्मीय लोकांच्या घरांना टार्गेट करत आहेत अशी टिका केली. अशी टिका करतानाच योगी आदित्यनाथ यांचा उल्लेख बुलडोजर म्हणून करण्यात आला.. 

आत्ता योगी आदित्यनाथ यांनी या संधीचं सोनं केलं. त्यांनी बुलडोजरच्या टिकेला सन्मानासारखं घेतलं आणि बुलडोजरलाच मध्यवर्ती ठेवून प्रचार केला. योगी चांगल्या मतांनी निवडून आले.. 

त्यानंतर बुलडोजर चर्चेत आला तो मध्यप्रदेशात. रामनवमीच्या दिवशी खारकोनमध्ये धार्मिक हिंसाचार झाला. शोभायात्रेवर दगडफेक झाली. ज्या घरांवरून दगड फेकण्यात आले ती घरे बुलडोजर लावून तोडण्यात येतील अस गृहमंत्र्यांनी सांगितलं आणि ठरल्याप्रमाणे घरे तोडण्यात आली. 

त्यानंतर राजस्थान, दिल्ली अस चालू झालं. जिथे जिथे दंगली झाल्या, हिंसाचार झाल्या, ज्या घरांवरून दगडफेक करण्यात आली किंवा दंगलीत जे आरोपी होते अशा लोकांच्या घरावर बुलडोजर चालवण्यात आले. 

आत्ता तुम्ही म्हणाल हे बेकायदेशीर असतंय. अहो सरकारला सगळ्या गोष्टी कायद्यात बसवता येतात. त्यांनी ही घरेच बेकायदेशीर व अतिक्रमणात असल्याचं सांगून बुलडोजर चालवायला सुरवात केली. दूसरीकडे कोर्ट, कायदा, संविधान वगैरे चर्चा सुरू झाल्या तो भाग वेगळा.. 

तर ही झाली विषयाची पेरणी, आपला मुळ मुद्दाय बुलडोजरची सक्सेस स्टोरी काय आहे.  

JCB आणि बुलडोजर वेगळं असतय का? 

तर गोष्टीला सुरवात होते ती २० व्या शतकाच्या सुरवातीला.

जगातला पहिला बुलडोजर कसा दिसत असेल अस तुम्हाला वाटतं. तुमच्या डोक्यात जे काही येईल त्यापेक्षा विचित्र असा पहिला बुलडोजर होता. म्हणजे या पांडूला बुलडोजर का म्हणावं अस तुम्हाला फोटो बघितल्यानंतर वाटलं असणार आहे. एकदा नजर मारा. एक बैलगाडी आहे आणि त्याला फाळकुट लावलय. यालाच पहिला बुलडोजर म्हणलं गेलं. 

झालं काय या थेअरीमुळं बुलडोजरचा पहिला शोध कोणी लावला याबद्दल बरीच मतमतांतरे झाली. कारण आपल्या बैलगाडीला किंवा टॅक्टरला ज्यांनी फालकुट लावून माती ढकलायला सुरवात केली त्याला बुलडोजरचं पहिलं व्हर्जन म्हणलं गेलय. 

Screenshot 2022 04 21 at 8.23.57 PM

तरिही त्यातल्या त्यात १९०४ मध्ये बेंजामिंन होल्ट याला श्रेय दिलं जातं. दूसरीकडे हॉर्नस्बी या कंपनीने पेटंट घेतलेलं ते देखील आजच्या बुलडोजरच्या जवळपास जाणार आहे. 

मात्र बरीच लोकं बुलडोजरचं श्रेय अमेरिकेतल्या जेम्स कमिंग्स आणि ड्राफ्टमॅनला देतात. त्यांनी १९२३ साली स्क्रपर ब्लेड लावलेलं. त्याचं पेटंट केलं.

थोडक्यात अशा बऱ्याचं लोकांची नावं निघतात ज्यांनी आपल्या टॅक्टरला फाळकुट लावून बुलडोजरला जन्म दिला. पण याचं व्यावसायिक उत्पन्न घेण्याचं श्रेय ‘ला प्लॉन्ट चोअटे’ ला जातं. 

Screenshot 2022 04 21 at 8.24.50 PM

त्यानंतर बऱ्याच कंपन्यांनी बुलडोजर सुरू केला पण श्रेय कॅटरपिलर कंपनीस जातं. पण बुलडोजरचा खरा विकास झाला तो शेतीकामातून बाहेर पडल्यानंतर. शहरीकरणास जशी जशी सुरवात झाली तसा तसा बुलडोजर मोठ्ठा होत गेला. मुळात अमेरिकेचा विकासच १९५० नंतर बुलडोजरमुळे झाला. 

महायुद्धानंतर झालेला कचरा साफ करण्यापासून ते बिल्डींग बांधणं वगैरे कामात बुलडोजर कामाला येवू लागला. या धंद्यात वेगवेगळ्या कंपन्या उतरल्या त्यातलीच एक JCB म्हणून बुलडोजरला आपण जेसीबी पण म्हणतो ते कोलगेट आणि टुथपेस्ट किंवा वनस्पती तूप आणि डालडा असा प्रकार जेसीबी बद्दल महाराष्ट्रात झाला. पिवळ दिसणारं आणि डबरी खोदणारं काहीही दिसलं तरी त्याला जेसीबी म्हणायचं हे आपल्याला कळलं, इतकच… 

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.