मुंबईच्या रस्त्यावर बॅग विकणाऱ्या पोरानं अडीचशे कोटींची कंपनी उभारली….

1992 चं वर्ष होतं. या वर्षी बऱ्याच घटना घडल्या होत्या. त्यापैकीच एक घटना म्हणजे हर्षद मेहता घोटाळा. या घटनेत बऱ्याच लोकांना आपले पैसे गमवावे लागले होते आणि त्या पैसे गमावलेल्या लोकांमध्ये होता झारखंड मधला व्यापारी मूलचंद जैन. या घोटाळ्याने मूलचंद जैनला पुरतं धुवून काढलं. या घोटाळ्याची झळ इतकी प्रचंड होती की मूलचंद जैन आपला मुलगा तुषार याला घेऊन मुंबईत आला आणि रस्त्यावर बॅग्स विकू लागला इतका मोठा झटका या हर्षद मेहताने दिला होता.

वडिलांना पैसे गेल्याचा मोठा धक्का बसलेला होता आणि तुषार हे सगळं बघत होता. पण जिद्द न हारता मेहनतीच्या जोरावर तुषार संघर्ष करत होता. 1999 साली तुषार जैन यांनी 300 रिटेलर्स लोकांना सोबत घेऊन कंपनी सुरू केली होती. 2002 साली तुषार जैन व्यापारासाठी मुंबईत आले तेव्हाच त्यांनी ठरवलं होतं की आपल्याला मोठं काहीतरी करायचं आहे. 2006 मध्ये तुषार यांनी प्रायोरिटी नावाने स्वतःचा पहिला ब्रँड सुरू केला. 2007 पर्यंत मार्केटच गणित त्यांना कळत गेलं. या दिवसांमध्ये तुषार जैन यांची कंपनी दिवसाला तीनशे ते चारशे बॅगा बनवत असे.

सगळीकडून चांगले रिव्ह्यू यायला लागल्यामुळे ट्रॅव्हल हॅशटॅग त्यांनी सुरू केला. तुषार जैन यांनी ब्रँड ट्राबाग वरून सोनम कपूरला ब्रँड अंबेसिडर केलं.

बराच संघर्ष केल्यानंतर रस्त्यावर बॅगा विकल्यानंतर तुषार जैनने 2012 साली हाय स्पिरिट कमर्शियल वेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड नावाची स्वतःची कंपनी उभी केली. आज घडीला ही कंपनी भारतातली चौथी सगळ्यात मोठी बॅग्स विकणारी कंपनी आहे. 250 करोडची असलेली या कंपनीचं मुख्यालय मुंबईत आहे. सोबतच कंपनीचे दहा मेन ऑफिस भारतभर आहेत आणि वेगवेगळ्या राज्यात आपली कंपनी ब्रँड करण्यात व्यस्त आहे.

2014 साली तुषार जैन यांची कंपनी एका दिवसात 10 ते 20 हजार बॅग्स बनवायचे. त्यावेळी कंपनीचा टर्न ओव्हर 90 करोड होता. मात्र पुढच्या काही काळात कंपनीचा उत्कर्ष झाला आणि थेट तीनपट पैसा कंपनीला मिळू लागला. 2017 मध्ये कंपनीने 250 कोटींचा आकडा गाठला आणि दिवसाला बॅग बनवू लागले 30 ते 35 हजार.

भविष्याचा विचार करता तुषार जैन म्हणतात की लवकरच कंपनी हजार कोटींचा टर्नओव्हर करेल. याच धर्तीवर तुषार जैन पटना मध्ये नवीन प्लांट सुरू करत आहे ज्याचं उद्देश हे वर्षाला 25 लाख बॅगा बनवणे असणार आहे. पण रस्त्यावर बॅग विकणारा पोरगा व्यवस्थित गणितं जुळवून कोटींची कंपनी उभारतो हीच सगळ्यात मोठी गोष्ट आहे.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.