अनेक अपयशे पचवली आणि अखेर १००० कोटींचा काचेच्या भांड्याचा ब्रँड उभा केला …

कधीतरी निवांत टाइम भेटला तर किचनच निरीक्षण केल्यावर दिसून येतं की काचेचे भांडे आपल्याकडे फार कमी असल्याचं आपल्याला आढळून येतं. म्हणजे काचेच्या भांड्यांची गरज केव्हा पडते जेव्हा पाहुणे घरी येतात तेव्हा. पण त्या काचेच्या भांडयांना ब्रँड बनवणाऱ्या कंपनी बद्दल फार कमी लोकांना माहिती असतं. तर आज जाणून घेऊया काचेच्या भांड्यांची ब्रँड व्हॅल्यू तयार करणाऱ्या बोरोसिल ब्रँड बद्दल.

बोरोसिल ग्लास वर्क लिमिटेडचे सध्याचे अध्यक्ष श्रीवर खेरुका आहेत.

श्रीवर खेरुका यांचे पणजोबा 50 च्या दशकाच्या उत्तरार्धात सुतळी आणि इतर सामानाचे ब्रोकर होते पुढे श्रीवर खेरुका यांचे आजोबासुद्धा या व्यवसायात उतरले. दोघांनी मिळून व्यवसाय चांगलाच फुलवला.पण अचानक काही चुकीच्या निर्णयांमुळे तो व्यवसाय बंद पडला. खेरुका आपल्या कुटुंबाला या धक्क्यातून काढू इच्छित होते.

खेरुका यांनी काहीतरी नवीन व्यवसाय सुरू करण्याकरिता हालचाल सुरू केली म्हणून ते जापान, जर्मनी आणि अनेक देश फिरले तेव्हा त्यांच्याकडे दोन आयडिया होत्या. एक होती कागद व्यवसाय आणि दुसरा काच व्यवसाय. खेरुका यांनी दोन्हींसाठी लायसन्स मागवले पण त्यांना काच व्यवसायासाठी परवानगी मिळाली. इथून विंडो ग्लास अस्तित्वात आलं.

आज ज्या कंपनीला बोरोसिल म्हणून ओळखलं जातं तिला अगोदर विंडो ग्लास लिमिटेड कंपनी म्हणून ओळखलं जायचं. 1962 साली या व्यवसायाची दिमाखात सुरुवात झाली.कंपनीने औद्योगिक आणि सायंटिफिक ग्लास बनवून आणि विकण्यासाठी अमेरिकन कंपनी कोर्निंग ग्लास वर्क सोबत या क्षेत्रात प्रवेश केला. पण हा काच व्यवसाय म्हणावा तितका सोपा नव्हता.

बोरोसिल नाव कसं पडलं तर बोरॉसिलिकेट ही अशी काच आहे जी जास्त तापमानात सुद्धा फुटत नाही. या काचेची खासीयतच ही आहे की ती लॅब आणि उद्योग क्षेत्रात वापरण्यास एकदम परफेक्ट आहे. बोरॉसिलिकेट वरूनच कंपनीने बोरोसिल नाव करण्याचा निर्णय घेतला.आज किचन ब्रँड बोरोसिल आहे पण अगोदर परिस्थिती वेगळी होती. कंपनी जास्तीत जास्त सायंटिफिक प्रॉडक्ट बनवण्यात व्यस्त होती. 1988 मध्ये खेरुका यांनी कोर्निंगचे शेअर विकत घेत सगळं नियंत्रण स्वतःकडे घेतलं आणि इथून त्यांनी बोरोसिलला ब्रँड बनवायला सुरवात केली.

कंपनीची तिसरी पिढी अर्थात श्रीवर खेरुका यांनी परदेशात शिक्षण घेऊन त्याप्रमाणे कंपनी मोठी करायला सुरुवात केली. 2006 साली परदेशातून आल्यावर त्यांनी कंपनी नव्या दमाने सुरू केली कारण भले वारसाहक्काने त्यांना ती मिळाली पण त्यांनी कंपनी एका वेगळ्याच उंचीवर नेऊन पोहचवली. सुरवातीची 12 वर्षे कंपनी घाट्यात होती पण परिस्थिती वर मात करत मार्केटचा अभ्यास करत त्यांनी वर्चस्व प्रस्थापित केलं.

आज घडीला केवळ सायंटिफिक प्रॉडक्टचं नाही तर कप, प्लेट, कटोरी, टोस्टर, मिक्सर अशा किचनच्या वस्तूंवर आपली पकड निर्माण केली आहे. बोरोसिलच्या आज घडीला दोन कंपन्या आहेत. बोरोसिल लिमिटेड आणि बोरोसिल रिन्यूएबल्स लिमिटेड. 1000 करोडची उलाढाल आजही बोरोसिल करते. 1500 कर्मचाऱ्यांना रोजगार बोरोसिल देते.हा ब्रँड भारतीय आहे यावर अजूनही लोकांना विश्वास बसत नाही. पण किचन आणि इतर ग्लासच्या गोष्टींमध्ये बोरोसिल एक नंबरला आहे यावर कुणालाच शंका नाहीए.

हे ही वाच भिडू :

1 Comment
  1. Rohan says

    Vishay khup changlya padhatine hatalay pan marathi bhasha suddha kara. Boli bhadha and lekhi bhasha yat farak ahe. Marathi jevdi swacha asel titki wachayla majja yete.
    Lekhachya surwatilach…..kadhitari niwanta time BHETLA ki ….. time bhetat nasto ….wel milto.

Leave A Reply

Your email address will not be published.