नेहरूंच्या संसदेतील जयंतीच्या कार्यक्रमाला लोकसभा अध्यक्ष, राज्यसभेच्या सभापतींची दांडी

आज देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती. त्यानिम्मिताने आज देशभरात विविध कार्यक्रम आयोजित करून त्यांची जयंती साजरी करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधीसह अनेक नेत्यांनी शांतीवन येथे जाऊन श्रद्धांजली अर्पण केली.

भारताचे सर्वाधिक काळ पंतप्रधान पद नेहरूंनी संभाळल आहे. मात्र भाजपचा एक गट नेहमीच पंडित नेहरू यांना टार्गेट करत असतो. आज संसदेच्या सेन्ट्रल हॉल मधील कार्यक्रमाला सरकारचे प्रतिनिधी अनुपस्थित होते. त्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे.

पंडित नेहरू यांचा जन्म १४ नोव्हेंबर १८८९ मध्ये उत्तरप्रदेश मधील इलाहाबाद (प्रयागराज) येथे झाला. त्यांना लहान मुलांची जास्त ओढ होती म्हणूनच  पंडित नेहरूंची जयंती बाल दिवस म्हणून साजरी करण्यात येते. १९६४ मध्ये पंडित नेहरू यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या जयंतीच्या दिवशी बाल दिवस साजरा करण्यात येतो.

१४ नोव्हेंबरला पंडित नेहरू यांची जयंती साजरी करण्यात येते. दरवर्षी संसदेच्या सेन्ट्रल हॉल मध्ये असणाऱ्या पंडित नेहरू यांच्या चित्राला पुष्पहार अर्पण करून  श्रद्धांजली वाहण्यात येते. हा छोटाखाणी कार्यक्रम अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात येतो.

आज सकाळी संसदेचे सेन्ट्रल हॉल मध्ये झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री भानू प्रताप सिंह वर्मा हे सहभागी झाले होते. तसेच राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे, कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि इतर खासदार या कार्यक्रमाला उपस्थितीत होते. मात्र यावेळी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू हे अनुपस्थित राहिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा केवळ एक ट्वीट करून श्रद्धांजली अर्पण केली. त्यामुळे कॉंग्रेस नेते चांगलेच भडकले आहेत.

लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभेच्या अध्यक्षासह सरकार मधील एकही वरिष्ठ मंत्र्याने सेन्ट्रल हॉल मधील कार्यक्रमाला उपस्थिती लावली नाही. त्यामुळे कॉंग्रेसकडून मोठ्या प्रमाणात सरकारवर टीका करण्यात येत आहे.

संसद भवनाच्या सेन्ट्रल हॉल मधील पंडित नेहरू यांच्या चित्राचे अनावरण भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ. एस राधाकृष्णन यांनी ५ मे १९६६ रोजी लावण्यात आले होते. त्यानंतर दरवर्षी सेन्ट्रल हॉल मध्ये हा कार्यक्रम छोट्या खणी पद्धतीने साजरा करण्यात येतो. यावेळी लोकसभा अध्यक्ष, राज्यसभेचे सभापती, केंद सरकर मधील वरिष्ठ मंत्री उपस्थिती लावत असतात. मात्र रविवारी झालेल्या या कार्यक्रमाला या सर्व अनुपस्थित होते.

विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी या संदर्भात ट्वीट करून आपली नाराजी व्यक्त केली आहे.

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी या संदर्भात ट्वीट करून खेद व्यक्त केला आहे. ज्यांच्या चित्रामुळे सेन्ट्रल हॉल सुशोभित दिसतो त्यांच्या जयंती निम्मित आयोजित करण्यात आलेल्या पारंपारिक सोहळ्याला संसदेत असाधारण असे दृश पाहायला मिळाले.

 यावेळी लोकसभेचे अध्यक्ष, राज्यसभेचे सभापती हे अनुपस्थित होते. एक सुद्धा मंत्री उपस्थित नव्हते. यापेक्षा काय भयंकर असू शकते. असा प्रश्न उपस्थित केला आहे. 

तसेच इतर विरोधी पक्षातील नेत्यांनी सुद्धा याबाबत केंद्र सरकारवर टीका केली आहे. तृणमूल कॉंग्रेसचे नेते डेरेक ओ ब्रायन यांनी सुद्धा ट्वीट केले असून याबाबत आपल्याला बिलकुल आश्चर्य वाटले नाही. हे सरकार एक दिवस संसदेसह भारतातील महान संस्था नष्ट करेल. असा टोला त्यांनी लगावला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.